Monday, 30 April 2018

‘श्यामची आई’ ते ‘कासव’ या सिनेप्रवासात 66 मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागासही राष्ट्रीय पुरस्कार








महाराष्ट्र परिचय केंद्र विशेष :

दि.3 मे रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण होत आहे त्यानिमित्ताने विशेष वृत्त )

नवी दिल्ली दि.1: राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या 65 वर्षाच्या इतिहासात मराठी चित्रपटाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. आजपर्यंत 66 मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत,यातील 5 मराठी चित्रपटांना सर्वोच्च सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला आहेतर पुरस्काराच्या विविध श्रेणीमध्ये मराठी चित्रपटाने आजपर्यंत 183 राष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत.

भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके हे मराठीच,भारतीय चित्रपट क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलावंतांना त्यांच्याच नावाने सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. आजपर्यत देशातील 49 दिग्गज कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेयामध्ये5 मराठी कलावंतांचा समावेश आहे. दुर्गा खोटेव्ही. शांताराम,गानकोकीळा लता मंगेशकरभालजी पेंढारकर व आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

देशातले पाहिले सुवर्ण कमळ मराठी सिनेमाला

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सुरुवात 1953 सालापासून झाली आणि पहिले वाहिले सुवर्ण कमळ मिळाले तेही मराठी सिनेमाला. प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित " श्यामची आई" या चित्रपटाने सुवर्ण कमळावर आपले नाव कोरले. यानंतर श्वासदेऊळकोर्ट आणि कासव या मराठी चित्रपटांना सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला. आजपर्यंत देशातील 65 चित्रपटांना सुवर्ण कमळ मिळाले  आहे, यामध्ये सर्वाधिक 23 सुवर्णकमळ हे बंगाली भाषेतील चित्रपटांना मिळाले आहेतत्याखालोखाल हिंदी भाषेतील 13 चित्रपटमल्याळम भाषेतील 10 चित्रपट तर कन्नड भाषेतील 6 चित्रपटांना सुवर्ण कमळ मिळाले आहे.

तीन मराठी चित्रपटांची ऑस्कर वारी

सन 1957 पासून आजपर्यंत 50 चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात आलेयामध्ये तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे .श्वासहरिश्चंद्राची फॅक्टरी व कोर्ट हे मराठी चित्रपट ऑस्कर पर्यंत धडकले. हिंदी भाषेतील सर्वाधिक 32 सिनेमे ऑस्कर साठी पाठविण्यात आलेतामिळ भाषेतील 9 चित्रपट तर बंगाली व मल्याळम प्रत्येकी दोन व तेलगू भाषेतील एक सिनेमा ऑस्कर साठी पाठविण्यात आला होता. या 50 चित्रपटांपैकी मदर इंडियासलाम बॉम्बे व लगान हे तीन हिंदी चित्रपटच ऑस्कर पुरस्कारासाठी नामनिर्देशित झाले होते.

महात्मा फुले ते कच्चा लिंबू.....

प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील 23 प्रादेशिक भाषेतील 676 चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये 61 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. 1954 साली प्र. के. अत्रे दिग्दर्शित महात्मा फुले हा मराठीतला पहिला चित्रपट प्रादेशिक भाषा श्रेणीत सर्वोत्कृष्ट ठरला होता. यानंतर मी तुळस तुझ्या अंगणी,शेवग्याच्या शेंगा,गृहदेवताकन्यादान,माणिनीपाठलाग असा प्रवास करीत किल्लारिंगणदशक्रिया व आत्ताचा कच्चा लिंबू आदी मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात आपली मोहोर उमटविली आहे. प्रादेशिक भाषा श्रेणीत सर्वाधिक 82 पुरस्कार हिंदी भाषेतील चित्रपटांना मिळाले आहेतयानंतर 80 पुरस्कार हे तामिळ भाषेतील चित्रपटांना तर बंगाली भाषेतील 79 चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पुरस्कार मिळाले आहेत.

सचिन पिळगावकर ठरले होते उत्कृष्ट बालकलाकार

उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार आजपर्यन्त 12 मराठी बाल कलाकारांना मिळाला आहे. यामध्ये 10 पुरस्कार हे फिचर फिल्मसाठी तर 2 पुरस्कार हे नॉन फिचर फिल्मसाठी मिळाले आहेत. मराठीतला पहिला बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना 1971 साली अजब तुझे सरकार या चित्रपटासाठी मिळाला होता. यानंतर मृण्मयी चांदोरकर ( कळत नकळत)अश्विन चितळे (श्वास)शंतनू रांगणेकर व मच्छीन्द्र गडकर ( चॅम्पियन्स) व बाबू बँड बाजा या चित्रपटासाठी विवेक चाबुकस्वार यांना उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाला आहे तर, हसंराज जगताप (धग), गौरी गाडगीळ व संजना राय (यॅलो), पार्थ भालेराव (किल्ला), यशराज क-हाडे (म्होरक्या) यांना विशेष उल्लेखनीय भुमिकेबद्दल राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळालेला आहे. नॉन फिचर फिल्मसाठी अनिकेत रुमाडे (विठ्ठल) व पिस्तुल्या चित्रपटासाठी सुरज पवार यांना विशेष उल्लेखनीय समीक्षक पुरस्कार  पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनयाचे 5 पुरस्कार..

आजपर्यंत देशातील 56 अभिनेते व 54 अभिनेत्रींना उत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी 3 मराठी अभिनेत्यांना तर 2 अभिनेत्रींना हा पुरस्कार मिळाला आहे. उपेंद्र लिमये ( जोगवा)गिरीश कुलकर्णी (देऊळ) व विक्रम गोखले ( अनुमती) यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे तर मिताली जगताप-वराडकर ( बाबू बँड बाजा) व उषा जाधव यांना धग या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.दिलीप प्रभावळकर यांना शेवरी व लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटासाठी व मनोज जोशी यांना दशक्रिया या चित्रपटासाठी  उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

दिग्दर्शनासाठी नऊ पुरस्कार....

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून 9 पुरस्कार मराठी चित्रपट दिग्दर्शकांना मिळाले आहेत. यामध्ये 4 पुरस्कार हे फिचर फिल्मसाठी तर 5 पुरस्कार नॉन फिचर फिल्मच्या दिग्दर्शनासाठी मिळाले आहेत. फिचर फिल्मसाठी  शिवाजी लोटा पाटील यांना धग या चित्रपटासाठी तर राजेश मापुसकर यांना व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कारकिर्दीतील पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी राजेश पिंजाणी यांना बाबु बँड बाजा  या चित्रपटासाठी तर नागराज मंजुळे यांना फँड्री या चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षीचा उत्कृष्ट दिगदर्शनासाठीचा पुरस्कारही नागराज मंजुळे यांना पावसाचा निबंध या  नॉन फिचर फिल्मसाठी  जाहीर झाला आहे. यापुर्वी  उमेश कुलकर्णी  ( गिरणी)विक्रांत पवार ( कातळ)रेणू सावंत ( अरण्यक )आदित्य जांभळे ( आबा ऐकताय ना ?) यांना नॉन फिचर फिल्मसाठी  उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.

गायनासाठी आठ राष्ट्रीय पुरस्कार...

पार्श्वगायनासाठी आजपर्यत देशातील 100 गायक व गायिकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहेयामध्ये मराठी चित्रपटातील गायनासाठी चार गायक व चार गायिकांना सन्मानित करण्यात आले आहेयामध्ये अंजली मराठेश्रेया घोषालआरती टिकेकर व बेला शेंडे या गायिका तर हरिहरनसुरेश वाडकर,आनंद भाटे व महेश काळे या गायकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

दोन चित्रपटांना उत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार...

परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी व अमर भरत देवकर दिग्दर्शित म्होरक्या या चित्रपटांना उत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार मिळाला आहे. संगीत दिगदर्शनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार अजय अतुल ( जोगवा)व शैलेंद्र बर्वे  ( संहिता) यांना मिळाला आहे.


माहिती विभागाच्या फिल्मला पुरस्कार

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय निर्मित व दिनकर चौधरी दिग्दर्शित "चुनौती" या एड्स या रोगावरील वैज्ञानिक चित्रपटास उत्कृष्ट नॉन फिचर फिल्म हा पुरस्कार 1992 साली 40 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.



तंत्रज्ञानाच्या बाबतीत मराठी सिनेमा होतोय प्रगल्भ

मराठी सिनेमा सिने तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगल्भ होऊ लागला  आहे. सन 1979 पासून मराठी सिनेमाला उत्कृष्ट कला दिग्दर्शनध्वनिमुद्रण,नृत्यदिग्दर्शनउत्कृष्ट संपादनमेकअपपटकथा या क्षेत्रात 25 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

नॉन फिचर फिल्मसाठी दोन सुवर्ण व तीन रजत कमळ

नॉन फिचर फिल्म या श्रेणीत मराठी भाषेतील फिल्मसाठी दोन सुवर्ण कमळ मिळाले आहेत. सन 2002 सालातील नारायण गंगाराम सुर्वे या अरुण खोपकर दिग्दर्शित नॉन फिचर फिल्मला सुवर्ण कमळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होतेव उमेश कुलकर्णी दिग्दर्शित गिरणी या चित्रपटासही सुवर्ण कमळ मिळाले आहे. दिग्दर्शनतील पहिली नॉन फिचर फिल्मसाठी मराठीतील तीन चित्रपटांना रजत कमळ पुरस्कार देण्यात आला आहे. रीना मोहन दिग्दर्शित कमलाबाईविणू चोलीपरामबील दिग्दर्शित विठ्ठल तर निशांतराय बोंबारडे दिग्दर्शित दारवठा या चित्रपटांना रजत कमल मिळाले आहे.

चित्रपटवरील लेखनासाठी 4 मराठी पुस्तकांना सुवर्ण कमळ

चित्रपटवरील लेखनासाठी मराठी भाषेतील चार मराठी पुस्तकांना सर्वोच्च अशा सुवर्ण कमळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अरुण खोपकर लिखित "गुरू दत्त: तीन अंकी शोकांतिका" या पुस्तकास मराठीतला पहिला सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला. "सिनेमाची गोष्ट" हे अनिल झंकार लिखित पुस्तकअरुणा दामले लिखित " मराठी चित्रपट संगीताची गोष्ट " व "मौलिक मराठी चित्रगीते " या गंगाधर महांबरे लिखित पुस्तकासही सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला आहे.

000000


सुचना सोबत छायाचित्र जोडले आहे.

आम्हला ट्विटर वर फॉलो करा


58th Maharashtra Foundation Day Celebrations at Old Maharashtra Sadan Ne...

58th Maharashtra Foundation Day Celebrations at New Delhi

Sunday, 29 April 2018

राजधानीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी







नवी दिल्ली दि. 30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त व प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रधान सचिव तथा  गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

              महाराष्ट्र परिचय केंद्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.   कार्यालयातील अधिकारी-कर्मच्यांनीही यावेळी त्यांना श्रध्दाजंली वाहिली. 

000000


सुचना सोबत छायाचित्र जोडले आहे.

आम्हला ट्विटर वर फॉलो करा






Friday, 27 April 2018

महाराष्ट्रातील 15 उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार




नवी दिल्ली 27 : बांधकाम, उत्पादन , सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात सुरक्षा विषयक उत्कृष्ट कार्य करणा-या महाराष्ट्रातील 15 उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने केंद्रीय उद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेच्या वतीने देण्यात येणा-या सुरक्षा पुरस्काराचे वितरण आज नवी दिल्ली येथे करण्यात आले. देशातील 72 व्यवस्थापनांना सुरक्षा विषयक केलेल्या उल्लेखनीय कामासाठी सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेचे अध्यक्ष सतीश रेड्डी, उपाध्यक्ष अरविंद दोशी, राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेच्या वित्त विभागाचे अध्यक्ष कल्याण चक्रवर्ती, श्रम व रोजगार विभागाचे अतिरिक्त सचिव हिरालाल समरीया व राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेचे महासंचालक व्हि.बी. संत उपस्थित होते.

महाराष्ट्रातील 15 व्यवस्थापनांना पुरस्कार
उत्पादन, बांधकाम व सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यवस्थापनांना सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार, श्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार, सुरक्षा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कामगारांच्या सुरक्षा विषयक व आरोग्य विषयक बाबींसाठी उल्लेखनीय काम करणा-या व्यवस्थापनांना राष्ट्रीय सुरक्षितता परिषद विविध सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करते. यावर्षी महाराष्ट्रातील 15 व्यवस्थापनांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्पादन क्षेत्रात कार्य करणारी रायगड जिल्ह्यातील सुप्रीम पेट्रोकेम लि., पुणे जिल्ह्यातील स्पायसर इंडिया प्रा. लि. व चंद्रपूर जिल्ह्यातील जी.एम.आर. वरोरा एनर्जी या कंपनीस उत्पादन क्षेत्रातील श्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रौप्य चषक व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील आर.एम.सी. रेडीमिक्स (नवी मुंबई ) व चिपळुण येथील कृष्णा ॲन्टीऑक्सीडंटस्‍ या व्यवस्थापनांना श्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालघर येथील एन.पी.सी.आय.एल. तारापूर ॲटोमिक पॉवर स्टेशन या आस्थापनेस सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांधकाम क्षेत्रातील शापुरजी पल्लोनजी अन्ड कंपनी प्रा. लि. मुंबई या व्यवस्थापनांस कास्य चषक व प्रशस्तीपत्र देऊन सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील नवी मुंबई येथील गॉजेस बार्डन प्रा. लि. , विक्रोळी येथील गोदरेज अन्ड बॉयसी कंपनी लि. व पुणे जिल्ह्यातील हेनकेल ॲडेसीव्ह टेक्नॉलॉजीस या आस्थापनांना सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पाच व्यवस्थपनांना प्रशंसापत्र

महाराष्ट्रातील 5 व्यवस्थापनांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले . यामध्ये ठाणे जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्रातील घरडा केमीकल्स लि. , प्रिवी ऑरगॅनिक्स (रायगड) व राजणगांव पुणे येथील टाटा स्टील प्रोसेसिंग अन्ड ड्रिस्ट्रीब्युशन लि. तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील हडपसर पुणे येथील आर.एम.सी. रेडीमिक्स व मालाड येथील आर.एस.सी रेडीमिक्स या कंपन्यांचा समावेश आहे.

















Wednesday, 25 April 2018

पुणे महानगरपालिकेस स्मार्ट सिटी डिझाईन साठी पुरस्कार




पुण्यातील जंगली महाराज रस्त्याचे रुपांतरण करुन र्स्माट सिटी डिझाईन या संकल्पनेवर आधारीत  नियोजनबध्द आराखडा तयार केल्याबद्दल महापालिकेस पुरस्कृत करण्यात आले. याविषयीची पुणे महानगरपालिकेचे   मुख्य अभियंता अनिरुध्द पावसकर माहिती देतांना.


पुणे महानगरपालिकेस हडकाे चा उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार




पुणे महानगरपालिकेने  सार्वजनिक खाजगी सहभागी तत्वावर (पी.पी.पी) राबविलेला र्स्माट सिटी लाईटिंग या प्रकल्पास  उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीकारल्या नंतर पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल  उगळे यांनी  या प्रकल्पाविषयी  माहिती दिली.

नवी मुंबई व पुणे महापालिकेस ‘हडको’ चा उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार





नवी दिल्ली,25 एप्रिल : नवी मुंबई व पुणे महापालिकेसह 6 खाजगी संस्थांना ‘हडको’ चा उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार आज नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आले.
हडको चा 48 व्या वर्धापन दिनानिमित्त्‍ आयोजित संमारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदिपसिंह पूरी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास हडको चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. एम. रविकांत, गृहनिर्माण विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा, हडको चे मुख्य वित्तीय अधिकारी राकेश कुमार अरोरा आदि उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेच्या दोन उपक्रमांना पुरस्कार

नवी मुंबई महापालिकेच्या ई-तक्रार निवारण प्रणाली व दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण करणारे शिक्षण-प्रशिक्षण-सुविधा केंद्र या उपक्रमासाठी उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार प्रदान करण्यात आले. 4 लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., महापौर जयवंत सुतार ई.टी. सी . केंद्राच्या संचालक डॉ. वर्षा भगत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पुणे महापालिकेस दोन पुरस्कार
पुणे महानगरपालिकेने सार्वजनिक खाजगी सहभागी तत्वावर (पी.पी.पी) राबविलेला र्स्माट सिटी लाईटिंग या प्रकल्पास उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार मिळाला आहे. पुणे शहरात 84 हजार एलईडी बल्ब बसविण्यात आले असून यामुळे महापालिकेची दरमहा दीड कोटी रुपयांची बचत होत आहे. नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून या प्रकल्पाची नोंद घेऊन महापालिकेस हडको चा उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार देण्यात आला. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील वाहतुक पाहता या रस्त्याचे रुपांतरण करुन र्स्माट सिटी डिझाईन या संकल्पनेवर आधारीत नियोजनबध्द आराखडा तयार केल्याबद्दलही महापालिकेस पुरस्कृत करण्यात आले. 4 लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती शितल उगळे व मुख्य अभियंता अनिरुध्द पावसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सहा खाजगी संस्थांनाही पुरस्कार

‘किफायतशीर ग्रामीण/नागरी गृह निर्माण- नवीन,उदयोन्मुख आणि आपत्ती प्रतिरोधक घरे’- या श्रेणीअंतर्गत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कर्जतच्या उडान कॉस्ट इफेक्टिव हाऊसिंग संस्थेला मिळाला. हा पुरस्कार यां संस्थेचे संस्थापक श्री. समीप पदोरा यांनी स्वीकारला. याच श्रेणीत लोणावळ्याच्या ‘शांतीवन डिझाईन अन्ड हाऊसिंग’ या संस्थेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या संस्थेचे संस्थापक श्री. पिकिंश शहा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
देशातील ‘वास्तुचे जतन व संवर्धन’ श्रेणीत मुंबई येथील वर्ष 1916 साली बांधण्यात आलेले रॉयल ओपेरा हाऊस या जुन्या तसेच सांस्कृतिक वास्तुला ‘मूर्त स्वरुप’ अबाधित ठेवून संवर्धन केल्याबाबत ‘आभा नारायण लांबा असोसिएट’ या संस्थेला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. या श्रेणी अंतर्गत नाशिकची संस्था श्री. धनंजय शिंदे डिझाईन स्टुडिओ ‘उदाजी- पूर्वीचे वर्ष’ या प्रकल्पासाठी तर मुंबईच्या आर्किटेक्ट विकास दिलावरी या संस्थेला मुंबईतील एकोणीसाव्या शतकातील कारंजे संवर्धनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. हरित इमारत या श्रेणीअंतर्गत मुंबई येथील ‘वन अविघ्न पार्क’ या प्रकल्पासाठी विवेक भोळे असोसिएटला पुरस्कार द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. द्वितीय पुरस्कार प्राप्त संस्थांना 2 लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते .

Pune Municipal Corporation gets HUDCO best practices Award for Jangali Maharaj Road



Pune Municipal Corporation gets HUDCO best practices Award for Jangali Maharaj Road Rejuvenation project under Pune street program. Chief Engineer of Pune Corporation Anirudha Paraskar speaks to Maha Info Centre about the project after receiving award.

Pune Municipal Corporation gets HUDCO Best Practices Award



Pune Municipal Corporation gets HUDCO best Practices award for Smart City LED lighting project in Pune city. Addl Commissioner of PMC Smt Sheetal Ugale speaks to Maha Info Centre about the project after receiving the awards in New Delhi

Tuesday, 24 April 2018

महाराष्ट्राला राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्कार



महाराष्ट्रातील 18 पंचायत संस्थाना पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

नवी दिल्ली दि.24: ग्रामपंचायतीनां सशक्त करण्यासाठी आधूनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्काराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज हा पुरस्कार मध्य प्रदेशातील मंडला येथे आयोजित पंचायतराज दिन कार्यक्रमात स्वीकारला. महाराष्ट्रातील 15 ग्रामपंचायती 2 तालूका पंचायत समिती व सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेस यावेळी प्रधानमत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आज मध्य प्रदेशातील मंडला येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पंचायतराज दिनानिमित्त दिन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार व नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पंचायतराज मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला आदि उपस्थित होते.

ग्रामविकास विभागास राष्ट्रीय ई –पंचायत पुरस्कार
महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायतींना सशक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने डिजीटल इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत हा पुरस्कार देण्यात आला. या श्रेणीतील पहिला पुरस्कार सिक्कीम या राज्यास तर दुसरा पुरस्कार ओरिसा राज्यास मिळाला आहे. 


सिंधूदूर्ग जिल्हा परिषदेस पुरस्कार
सिंधूदूर्ग जिल्हा परिषदेस दिन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर भंडारा तालुका पंचायत व गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव या तालुका पंचायत समितींनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 14 ग्रामपंचायतींना दिन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जांभळी, अहमदनगर जिल्ह्यातील गनेगाव व एकरुखे, सांगली जिल्ह्यातील सामडोली व कामेरी, चंद्रपूर जिल्ह्यातील अवळगाव व बाबराळा, सातारा जिल्ह्यातील मेतगुताड व शिवथर, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊत्तूर, नंदूरबार जिल्ह्यातील बोकळझर, सिंधूदूर्ग जिल्हातील कोळोशी, वर्धा जिल्ह्यातील बारबाडी व भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ऊत्तूर ग्रामपंचायतीला ग्राम सभा पुरस्कार
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यातील ऊत्तूर ग्रामपंचायतीस नानाजी देशमुख गौरव ग्रामसभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


आम्हला ट्विटर वर फॉलो करा

********

Monday, 23 April 2018

Election Commission Announces Biennial Elections for Maharashtra’s 6 Vidhan Parishad Seats






New Delhi, April 23: The Election Commission has decided to hold Biennial Election to the Maharashtra Legislative Council from said Local Authorities Constituencies, in accordance with the following programme : -
           
              The issue of Notifications would be on 26th April, 2018 and the Last date of making nominations would be 3rd May, 2018. The Scrutiny of nominations has been fixed on 4th May. The last date for withdrawal of candidatures is assigned as 7th May. The date for polling has been fixed for 21st May, 2018 between 8.00am to 4.00pm. The counting of Votes has been held on 24th May, 2018 and the whole election process in this regard shall be completed on 29th May, 2018
             

                The term of office of six members of the Maharashtra Legislative Council from six Local Authorities’ Constituencies is due to expire on 31st May, 2018 and 21st June, 2018 as per details given below:
 

                  Shri Anil Dattatrey Tatkare’s term from Raigad-cum-Ratnagiri-cum-Sindhudurg Constituency is due to expire on 31.05.2018. Likewise, Shri Jadhav Jaywantrao Pundlikrao from Nashik, Shri Bhangdiya Mitesh Gotulal from Wardha-cum-Chandrapur-cum-Gadchiroli constituency term would expire on 21.06.2018, Shri Abdullah Khan A. Latif Khan Durrani from Parbhani-cum-Hingoli, Shri Pravin Ramchandraji Pote from Amravati constituency and Shri Dileeprao Dagdojirao Deshmukh ‘s term would expire on 21st June, 2018

Saturday, 21 April 2018

पीक विमा योजनेच्या उत्कृष्ट अमलबजावणीसाठी बीड जिल्ह्याला पुरस्कार प्रदान





प्रधानमंत्री यांच्याहस्ते जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंग  यांचा सन्मान

नवी दिल्ली दि. 21
 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या उत्कृष्ट अमलबजावणी  बीड जिल्ह्याला  प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंग यांनी पुरस्कार स्वीकारला.  
 
            केंद्रीय प्रशासनिक सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्यावतीने दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिनम्हणून साजरा करण्यात येतो. उत्तम प्रशासकीय अधिका-याला यावेळी प्रधानमंत्री पुरस्कारप्रदान करण्यात येतो. यंदाच्या पुरस्काराचे हे 12 वे वर्ष आहे. यानिमित्त यावर्षी 20-21 एप्रिल दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन विज्ञान भवन येथे करण्यात आले.  या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीड चे जिल्हाधीकरी एम.देवेंद्र सिंग यांना 'प्रधानमंत्री पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते. यासह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणा-या जिल्हाधिका-यांनाही यावेळी ‘'प्रधानमंत्री पुरस्काराने' पुरस्कार देऊन गौरविण्यातआले. 
            पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी श्री. सिंग म्हणाले, 2016-17 खरीप हंगामासाठी नियोजितरित्या आखलेल्या कार्यक्रमाच्या अमलबजावणीमुळे हा पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक  स्फुर्तीने काम करण्याची प्रेरणा मिळेल. हा पुरस्कार माझ्यासह बीड जिल्याला मिळाला आहे.  यामध्ये पालक मंत्री पंकजा मुंढे, खासदार, आमदार, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषीधिकारी, तहसिलदार, बँकेचे नोडल धिकारी, विमा कंपनीचे अधिकारी, तसेच कुटुंबातील सदस्य या सर्वांच्या प्रयत्नांचे हे यश मी मानतो.  


            खरीप हंगाम 2016-2017 साठीच्या कालावधीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या उत्कृष्ट अमलबजावणीसाठी बीड जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 लाख 51 हजार 783 शेतकरी आहेत. तसेच  6 लाख 58 हजार हेक्टर क्षेत्र जमीन शेती खाली आहे. या शेतजमीनीपैकी 50 % टक्के जमीनवर कापुस पेरला जातो. यासह सोयाबीन, तुर, बाज-याचे पीक घेतले जाते.

समन्वय समिती स्थापन
            खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळावा यासाठी  1 जुलै 2017 ला जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सहायक निबंधक, जिल्ह्यातील सर्व बँकेचे नोडल अधिकारी तसेच गावपातळीवरील बँक शाखेचे अधिकारी, यासह विमा कंपनीच्या अधिका-यांचा समावेश करण्यात आला असल्यामुळे पीक पेरणी अहवाल विनाविलंब शेतक-यांना मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वेळोवेळी व्हिडिओ कॉनफरसिंगव्दारे बैठकींमध्ये पीक विमा योजनेचा आढावा घेतला.

पांरपारिक तसेच आधुनिक सामाज माध्यमांचा वापर
           पीक विमा योजनेचा लाभ अंतीम शेतक-यापर्यंत मिळावा, यासाठी व्हॉटसप ग्रुप तयार करण्यात आला. यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार, आमदार, या लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. यासह जिल्ह्यातील  वरिष्ठ  कृषी अधिकारी यांचा मोबाईल क्रमांक देण्यात आला. ज्या शेतक-यांना काही अडचणी येत असतील त्या तत्काळ दूर करण्याचा प्रयत्न यामध्यातुन झाला. यासोबतच टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला. फेसबुक, व्टिटर याचा ही उपयोग केला गेला. तसेच पांरपारिक माध्यमांचाही वापर करण्यात आला. यामध्ये आठवडी बाजारात प्रचार-प्रसाच मोहीमा राबविणे, स्थानीक रेडियो केंद्रावरून झिंगल्सव्दारे प्रचार करणे, जिल्ह्यातील 1031 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात आले.

जिल्ह्यातील 88 % टक्के शेतक-यांना पीक विमाचा लाभ
             जिल्ह्यात एकूण 6 लाख 51 हजार 783 शेतकरी आहेत. यापैकी 88 % टक्के शेतक-यांनी  प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ वर्ष 2017 च्या खरीप हंगामासाठी  घेतला. यासाठी पूर्णत: पारदर्शकता, जबाबदारी आणि नियोजन केल्याचा परिणाम म्हणून इतक्या मोठया प्रमाणात विमा उतविला गेला. यामध्ये सर्व शेतक-यांना आधार क्रमांकाशी जोडण्यात आले.
            वर्ष 2016 च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमायोजनेअंतर्गत 45 कोटी रूपयांचा विमा उतरविला होता. शेतक-यांना 232.84 कोटी रूपयें परतावा मिळाला.
महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. मिलिंद रामटेके यांनाही प्रधानमंत्री पुरस्कार
ईशान्यभागातील राज्यांमधुन  त्रिपूरातील पश्चिम त्रिपूरा भागात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उत्कृष्ट अमलबाजवणी करण्यासाठी पश्चिम त्रिपूरातील जिल्हाधिकारी मुळ मराठी भाषिक डॉ. मिलिंद रामटेके यांनाही आज प्रधानमंत्री पुरस्कारा ने प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
विक्रीकर आयुक्त राजीव जलोटा यांनाही प्रधानमंत्री पुरस्कार
आज  टिम जीएसटीच्या सदस्यांना प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये राज्याचे विक्रीकर आयुक्त श्री राजीव जलोटांचाही  समावेश  आहे. वस्तु व सेवा करांतर्गत देशात  एक देश एक कर प्रणाली लागw करण्यासाठी जीएसटी परिषदेची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये केंद्रातील काही अधिकारी आणि विविध  राज्यातील विक्रीकर अधिका-यांचा समावेश होता. यामध्ये पहिल्या जीएसटी परिषदेपासून राजीव जलोटा यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिनिधीत्व केले होते. अनेक बैठकांमध्ये महाराष्ट्राने महत्वपूर्ण सूचना या परिषदेत मांडल्या आहेत. त्या सूचनांची अमलबजावणीदेखील जीएसटी परिषदेने केलेली आहे.