Monday, 15 October 2018

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती राजधानीत साजरी















नवी दिल्ली दि. 15 :  माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय यांनी  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, राजीव मलिक,अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही  यावेळी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

           महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह  कार्यालयात उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000000

    रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 378/  दिनांक १५.०.२०१८ 
          



No comments:

Post a Comment