उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते
महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन
नवी दिल्ली, १३ : आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र
दालन सज्ज झाले आहे. “ग्रामीण
भारतातील उद्योग” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा
"महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग" साकारला आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे
उद्घाटन राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांच्या उपस्थितीत दि.
१४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
प्रगती मैदान येथे दि.१४ ते २७ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत
इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनच्यावतीने ३८ व्या आंतरराष्ट्रीय
व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र
राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने " महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग"
हे राज्याच्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन
घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे.
संस्कार भारती रांगोळीच्या धर्तीवर महाराष्ट्र दालनाची सजावट करण्यात आली आहे. राज्यातील ग्रामीण
उद्योजकांचे १३ आणि महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचा एक असे एकूण १४ स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. ग्रामीण उद्योगाच्या
माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली
संधी, लघुउद्योगास चालना देणारे राज्याचे धोरण, विदेशी गुंतवणूक, पर्यटन आदी विषयांना स्पर्श करणारे आकर्षक महाराष्ट्र दालन
यंदा राज्याच्यावतीने उभारण्यात आले आहे.
महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन उद्योग
व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री
प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितीत १४ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी ३ वाजता प्रगती
मैदान येथील ‘हॉल क्रमांक १२-अ’ मध्ये होणार आहे. या प्रसंगी उद्योग विभागाचे अपर
मुख्य सचिव सतिश गवई, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय
संचालक संतोष कुमार आणि निवासी आयुक्त
(अ.का.) समीर सहाय आदी उपस्थित राहणार आहेत.
20 नोव्हेंबर रोजी
साजरा होणार ‘महाराष्ट्र दिन’
व्यापार उद्येागासह या मेळाव्यात
सहभागी विविध देश आणि राज्यांच्यावतीने आपली सांस्कृतिक परंपरा दर्शविणारा
सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातो. याअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रगती
मैदान येथील ‘हंसध्वनी रंगमंच’
येथे ‘महाराष्ट्र दिन’ साजरा
होणार आहे. मुंबई येथील पृथ्वी आर्ट गृपचे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार असून या
माध्यमातून व्यापार मेळयास भेट देणा-या देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांना महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण
संस्कृतिचे दर्शन होणार आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
रितेश भुयार /वृत्त वि.
क्र.३९३/ दिनांक 13.11.2018
000000
No comments:
Post a Comment