नवी दिल्ली, दि. 25 : उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलिस पदक केंद्रीय
गृहमंत्रालयाने आज जाहिर केले आहेत. देशातील 1040 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती
पोलिस पदक जाहिर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील 54 पोलिस अधिकारी व
कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती
पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची घोषणा केली आहे. राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये
उल्लेखीनय कामगीरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व
गुणवत्ता सेवा पदक जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये देशातील 1040 पोलिस अधिकारी व
कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
देशातील 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, 286 पोलिस अधिकारी
व कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक तर 93 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ठ
सेवा पदक आणि 657 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहिर झाले आहे.
महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती
पोलिस पदक
महाराष्ट्रातील
10 पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ
सेवा पदक तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहिर झाले आहे.
शौर्य पदक – 1.श्री.मिठू नामदेव जगदाळे, 2.श्री.सुरपत
बावाजी वड्डे, 3.श्री.आशिष मारूती हलामी, 4.श्री.विनोद राऊत, 5.श्री.नंदकुमार
अग्रे, 6.डॉ.एमसीव्ही महेश्वर रेड्डी, 7.श्री.समीरसिंह साळवे, 8.श्री.अविनाश
कांबळे, 9. श्री.वसंत अत्राम, 10. श्री.हमीत डोंगरे.
विशिष्ठ सेवा पदक – 1. श्रीमती अर्चना त्यागी (आयपीएस), 2.
श्री.संजय सक्सेना (आयपीएस), 3.श्री.शशांक सांडभोर (सहा.पोलिस आयुक्त), 4.
श्री.वसंत साबळे (सहा.पोलिस निरिक्षक).
गुणवत्ता सेवा पदक – 1. श्री.धनंजय कुलकर्णी (पोलिस अधिक्षक),
2. श्री.नंदकुमार ठाकुर (पोलिस उपायुक्त, मुंबई), 3. श्री.अतुल पाटील (अतिरिक्त
आुयक्त मुंबई), 4. श्री.नंदकिशोर मोरे (सहाय्यक आयुक्त, मुंबई), 5. श्री.स्टीव्हन
मॅथ्यू ॲनथनी (सहा.आयुक्त मुंबई), 6.श्री.निशिकांत भुजबळ (सहा.आयुक्त, औरंगाबाद),
7. श्री.चंद्रशेखर सावंत (उपाधिक्षक, अकोला), 8. श्री.मिलिंद तोतरे (निरिक्षक,
नागपूर), 9.श्री.सदानंद मानकर (निरिक्षक, अकोला), 10. श्री मुकुंद पवार (वरिष्ठ
निरिक्षक, मुंबई) 11. श्री.संभाजी सावंत (निरिक्षक, सांगली), 12. कायोमर्ज बोमन
इरानी (सहा.आयुक्त, मुंबई), 13. श्री.गजानन काबदुले (वरिष्ठ निरिक्षक, मुंबई
शहर), 14. श्रीमती निलिमा अरज (निरिक्षक, अमरावती), 15. श्री.इंद्रजीत कारले
(सहा.आयुक्त ठाणे) 16. श्री.गौतम पराते (निरिक्षक औरंगाबाद), 17. श्री.सुभाष भुजंग
(निरिक्षक जालना), 18.श्री सुधीर दळवी (निरिक्षक, मालाड, मुंबई), 19. श्री किसन
गायकवाड (निरिक्षक, तुर्भे,नवी मुंबई),
20.श्री जमिल सय्यद (उपनिरिक्षक, नांदेड), 21. श्री मधुकर चौगुले (उपनिरिक्षक,
गगनबावडा, कोल्हापूर), 22.श्री भिकन सोनार (उपनिरिक्षक, जळगांव), 23. श्री. राजू
अवताडे (सहा.पोलिस उपनिरिक्षक, अकोला), 24. श्री.शशिकांत लोखंडे (सहा.पोलिस
निरिक्षक, मुंबई), 25. श्री अशफाखअली चिस्तीया (मुख्य हवालदार, गडचिरोली), 26.
श्री. वसंत तराटे (सहा.पोलिस उपनिरिक्षक, मुंबई शहर), 27. श्री.रविंद्र नुल्ले
(सहा.पोलिस उपनिरिक्षक, कोल्हापूर), 28. श्री. मेहबूबअली सय्यद (सहा.पोलिस
उपनिरिक्षक, नाशिक शहर), 29. श्री.साहेबराव राठोड (सहा.पोलिस उपनिरिक्षक), 30.
श्री दशरथ चिंचकर (सहा.पोलिस उपनिरिक्षक, मावळ, पुणे) 31. श्री.लक्ष्मण टेंभुर्णे
(सहा.पोलिस उपनिरिक्षक, गडचिरोली), 32. श्री.बट्टुलाल पांडे (सहा.उपनिरिक्षक,
नागपूर शहर), 33. श्री.विष्णू गोसावी (सहा.उपनिरिक्षक, नाशिक), 34. श्री प्रदीप
जांभळे (सहा.उपनिरिक्षक, पुणे), 35. श्री. चंद्रकांत पाटील (सहा.उपनिरिक्षक,
जळगांव), 36. श्री.भानूदास जाधव (मुख्य हवालदार, मुंबई शहर), 37. श्री. नितिन मालप
(इटिलीजन्स अधिकारी, मुंबई), 38. श्री.रमेश शिंगाटे (मुख हवालदार, मुंबई), 39.
श्री.बाबुराव बिऱ्हाडे (इटिलीजन्स अधिकारी, नाशिक), 40. श्री.संजय वायचळे (मुख्य
हवालदार, नाशिक)
महाराष्ट्राला 5 जीवन रक्षा पदक
संकटात सापडलेल्यांना वाचवून मानवतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींना जीवन
रक्षा पदक दिले जाते. महाराष्ट्रातील 5 व्यक्तींना जीवन रक्षा पदक जाहिर झाले आहे.
यामध्ये महेश पांडुरंग साबळे यांना सर्वोत्तम रक्षा पदक जाहिर झाले आहे. मुंबईतील कमला
मिल आग दुर्घटनेत साबळे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविले
होते.
जीवन रक्षा पदक जाहिर झालेल्यामध्ये 1. श्री एन.कार्तिकेयन, 2. कुमारीप्रमोद
बाळासाहेब देवडे, 3. मास्टर शिवराज रामचंद्र भांडारवड, 4. श्री दत्तात्रय सुरेश
टेंगळे यांचा समावेश आहे.
अग्निशमन सेवा पदक
अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनिय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 7 अग्निशमन अधिकारी
व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहिर झाले आहे. यामध्ये श्री. प्रभात
सुरजलाल रहांगदळे (मुख्य अग्निशमन अधिकारी), 2. श्री.राजेंद्र चौधरी (उपमुख्य
अधिकारी), 3. श्री.रविंद्र अंबुलगेकर (विभागीय अग्निशमन अधिकारी), 4. श्री.मिलिंद
दोंडे (सहाय्यक अग्निशमन अधिकारी), 5. श्री.अभिजीत सावंत (स्टेशन अधिकारी), 6.
श्री.सुधीर वर्तक (वाहनचालक), 7. श्री. दिलीप पालव (उपमुख्य अग्निशमन अधिकारी)
यांचा समावेश आहे.
दयानंद कांबळे/वृत विशेष क्र. 18
दि.25.01.2020