नवी दिल्ली, दि. १३ : माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या
भाषणाने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा रविवार, १५ ऑगस्ट २०२१
रोजी समारोप होणार आहे .
महाराष्ट्र
राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी
वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक
महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे.
व्याख्यानमालेत एकूण ६० व्याख्यान पूर्ण होत असून १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११
वाजता डॉ. दिलीप पांढरपट्टे हे
व्याख्यानमालेचे समारोपीय भाषण करणार आहेत.
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या
विषयी
डॉ दिलीप पांढरपट्टे हे प्रथितयश लेखक आणि कवी आहेत. त्यांनी एलएलएम, एमबीए या पदव्यांसह पीएचडी प्राप्त केली आहे. सनदी अधिकारी म्हणून निवासी जिल्हाधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी,उपायुक्त आणि उपसचिव पदावर त्यांनी काम पाहिले आहे.
प्रशासकीय सेवा बजावताना डॉ.
पांढरपट्टे यांनी आपली वांड्मयीन व साहित्यिक सर्जनशीलता फुलवीत ठेवली आहे. ‘घर वाऱ्याचे,
पाय पाऱ्याचे’ हा ललित लेखसंग्रह , ‘कथा
नसलेल्या कथा’ हा कथासंग्रह, ‘बच्चा
लोग ताली बजाव’ हा विनोदी लेखसंग्रह ,उर्दू शायर आणि शायरीचा
परिचय देणारे ‘शायरी नुसतीच नाही’ , ‘शब्द झाले सप्तरंगी’ हा मराठी गजल संग्रह , ‘सव्वाशे बोधकथा’ हा बोधकथा संग्रह, ‘डॉ. राम पंडित संपादित मराठी गजल’ तसेच
कुळकायद्यातील घरठाण हक्काबाबत माहिती देणारे ‘राहील त्याचे
घर’ आदी पुस्तके प्रकाशित आहेत.
डॉ.पांढरपट्टे हे २२ जानेवारी २०२०
पासून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे
सचिव आणि महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
रविवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
रविवार,
१३ ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत
ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित
होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी
ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता
येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक
मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वर पाहता येणार
आहे.
आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic
००००
वृत्त वि. क्र.१७८ /दिनांक १३.०८.२०२१
No comments:
Post a Comment