Friday, 29 October 2021

आदिवासी विभागातंर्गत येणा-या शाळांना गुणवत्तापूर्ण करण्याचा प्रयत्न : प्राजक्त तनपुरे

 


 


नवी दिल्ली , 29 :  आदिवासी विभागातंर्गत येणा-या शाळांना गुणवत्तापूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज येथे दिले. 

श्री तनपुरे यांनी  आज दिल्लीतील दोन शासकीय शाळांना भेट दिली. यावेळी दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया त्यांच्यासोबत होते. दिल्ली (पूर्व) येथील सर्वोदय गर्ल्स स्कूल विनोद नगर (पश्चिम) आणि स्कुल ऑफ स्पेश्लाईझ्‍ड एक्सलेंस खिचडीपूर दिल्ली (पुर्व) या दोन शाळांना भेटी दिल्या. यावेळी श्री तनपुरे यांनी दिल्लीतील सरकारी शाळेतील झोलेल्या आमुलाग्र बदलाची सविस्तर माहिती जाणून घेतली. याप्रसंगी दिल्ली शिक्षण विभागाच्या अतिरिक्त संचालक रीटा शर्मा यांच्यासह अन्य अधिकारी, शिक्षक तसेच विद्यार्थीही उपस्थित होते. या भेटी दरम्यान श्री तनपुरे यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

दिल्लीतील सरकारी शाळेची महती देश-विदेशात पोहोचलेली आहे. शाळांमधील पायाभूत बदल,  शिक्षक आणि विद्यार्थ्यांची वाढलेली गुणवत्ता याविषयी श्री सिसोदिया यांनी सांगितले. शाळेतील शिक्षकांना आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांच्या (International Board) निकषानुसार प्रशिक्षित करण्यात येत आहे.  त्यांना परदेशातील उत्कृष्ट संस्थानात प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासह  देशातील ख्याती प्राप्त असणा-या संस्थांशी करार करण्यात आलेला आहे. यामध्ये टाटा समाजविज्ञान संस्था, आयआयएमसी, एनएसडी आदी संस्था आहेत. नुकतेच मेंटॉरशीप असा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून यातंर्गत इयत्ता ९ वी  ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आव्हान तरूण पिढीला करण्यात येते. याचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे  श्री सिसोदिया यांनी श्री तनपुरे यांना सांगितले.   

   यासह विद्यार्थ्यांमधील उणीवा तसेच गुणवत्ता ओळखून त्यांना त्या पद्धतीने शिकविले जाते. प्राथमिक इयत्ता ते आठवीपर्यंत हॅपीनेस करीक्यूलमप्रोग्राम आणि नववी ते बारावी एँटरप्रेन्युशिप माईंडसेटअसे प्रशिक्षण  दिले जाते, असल्याचीही माहिती श्री सिसोदिया यांनी दिली.  हॅपीनेस करीक्यूलम अंतर्गत विद्यार्थ्यांचा  आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिकाधिक सकारात्मक केला जातो. यामध्ये रोज ध्यान साधना, माईंडफुलनेस असे उपक्रम राबविले जातात.

एँटरप्रेन्युरशिप माईंडसेट या उपक्रमामध्ये इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्यात असलेल्या उद्योजकाला प्रोत्साहन देण्याचे काम सध्या सुरू असल्याचे श्री सिसोदिया यांनी सांगितले. यातंर्गत शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्यांला एक हजार रूपयांचे भांडवल दिले जाते. गृहसज्जा, शिवनकाम, चित्रकला, इलेक्ट्रीकल काम, खत बनविणे, आदि व्यवसाय कसा करावा यासाठी विद्यार्थ्यांचे समूह नेमले आहेत. समूहातील विद्यार्थी वस्तू तयार करण्यापासून ते ती विकण्याच्या प्रक्रियेमध्ये विविध भुमिका निभावतात. यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला तसेच आत्मविश्वास वाढीला अधिक वाव मिळत असल्याचेही दिसत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

शाळेतील पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचेही सांगत श्री सिसोदिया, म्हणाले,  कुठल्याही खाजगी शाळेत असणा-या सर्व सोयी-सुविधा सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनाही मिळाव्यात याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते. या कोविडच्या काळात खाजगी शाळेतील 2 लाख 70 हजार विद्यार्थी हे सरकारी शाळेकडे वळले असल्याचीही ही श्री सिसोदिया महत्व त्यांनी अधोरेखित केली. 

00000

 

 

 

             

 

 

 

 

Wednesday, 27 October 2021

नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी

 


                         २ हजार ११७ कोटींच्या कामांना होणार सुरुवात

 नवी दिल्ली , २७ : नागपूर येथील नागनदीच्या पुनरुज्जीवन  प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आज कॅबिनेटच्या खर्च व  वित्त समितीने (ईएफसी) मंजुरी दिली आहे, याद्वारे प्रकल्पाच्या २ हजार ११७ कोटींच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

            नागनदी  पुनरुज्जीवन  प्रकल्पाच्या पूर्णत्वास आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून याअंतर्गत ९२ एमएलडी  क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प,५०० किमी सीवरेज नेटवर्क, पंपीकरण स्टेशन कम्युनिटी टॅायलेट निर्माण केले जाणार आहेत.

               नागपूर शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या नागनदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी  योजना  मंजूर केली आहे. नागनदीच्या प्रवाह क्षेत्रातील भूजलपातळी वाढवण्यात आल्यास नदी पुनरुज्जीवित होईल,असा निष्कर्ष नागपुरातील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने केलेल्या संशोधनात काढण्यात आला होता .

         नागनदी आधी शुद्ध पाण्याने प्रवाहित होती. झपाट्याने झालेल्या शहरीकरणाचा परिणाम नदीच्या मूळ प्रवाहावर झाला आहे. नागपूर महापालिकेने केंद्र सरकारकडे नागनदी पुनरुज्जीवित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे केंद्र शासनाने या प्रकल्पास मंजुरी दिली होती. केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीने दिलेल्या आजच्या मंजुरीनंतर आता या प्रकल्पाच्या  प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे .

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                                   00000

वि.वृ.क्र.२२० /दि. २७.१०.2021

 

             

Tuesday, 26 October 2021

राजधानीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा


 






नवी दिल्ली दि. 26 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. या  यानिमित्त  भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची….’ प्रतिज्ञा घेण्यात आली.  

राज्यात दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहआयोज‍ित करण्यात येतो. यावर्षी 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी स्वतंत्र भारत @७५ : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे ही संकल्पना घेऊन केला जाणार आहे.   

यातंर्गत कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त श्याम लाल गोयल यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची...... प्रतिज्ञा   दिली. याप्रसंगी सचिव व आयुक्त (गुंतवणुक व राजशिष्टाचार), अपर निवासी आयुक्त निरूपमा डांगे आणि  सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा

            महाराष्ट्र परिचय केंद्रात दक्षता जनजागृती सप्ताहसाजरा करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक(अ.का. ) अमरज्योत कौर अरोरा  यांनी  उपस्थित अधिकारी व  कर्मचा-यांना  भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची...... प्रतिज्ञा   दिली.  यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांच्या सह अन्य कर्मचारी उपस्थित होते. 


Monday, 25 October 2021

‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 









नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ताजमाल ला प्रदान

सामाजिक विषयासाठी  आनंदी गोपाळ ला पुरस्कार

 

दिल्ली, दि.25 :  67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार आज उपराष्ट्रपती वैकंया नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बार्डो या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता हा पुरस्कार ताजमाल या चित्रपटास प्रदान करण्यात आला. यासह सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत आनंदी गोपाळ या मराठी सिनेमाला प्रदान करण्यात आला.

        विज्ञान भवनात 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  आज दिले गेलेले पुरस्कार वर्ष 2019 चे आहेत.   

 

अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

 

सुप्रसिद्ध तसेच बहुभाषीक अभिनेता रजनीकांत यांना आज दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रजनीकांत ला  रजिनी, थलैवा, सुप्परस्टार, बॉस असेही संबोधले जाते. त्यांनी कन्नड, तेलगु, तमिळ, हिंदी, मल्ल्याळम, इंग्लिश, बंगाली या भाषेतील सिनेमांमध्ये अभिनय केलेला आहे. त्यांच्या विश‍िष्ट स्टाईलमुळे, डायलॉग डीलीवरीमुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग भारतभर आहे.    आशिया खंडातील सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. रजीकांत यांचे मुळ नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड असुन ते कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील मराठी कुटूंबातील आहेत. त्यांची चित्रपट सृष्टीतील कारर्कीद 1975पासून सुरू केली.

 

अभिनेता मनोज वाजपेयी यांना भोसले या हिंदी चित्रपटासाठी तर दक्षिण भारतीय अभिनेता धनुष्य यांना असुरन यांना तमिळ चित्रपटासाठी  दोन्ही अभिनेत्यांना  यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील पुरस्कार विभागुन प्रदान करण्यात आला. 

 

अभिनेत्री कंगना रणावत यांना मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसीआणि पंगा या दोन चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

बार्डो सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

 

बार्डो या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे हे आहेत. रितु फिल्मस कट एलएलपीने हा चित्रपट निर्माण केलेला आहे. याच चित्रपटातील  रान पेटला... या गाण्याच्या गायिका सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.    

 आनंदी गोपाळ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यासोबतच या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिसाइनचाही पुरस्कार मिळाला आहे.  प्रोडक्शन डिसाइन सुनिल निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे.

राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ताजमाल या सिनेमाला प्रदान करण्यात आला आहे.  हा सिनेमा नियाज मुजावर यांनी दिग्दर्शीत केला आहे. तर टूलाईन स्टूडियो प्रा.ली. यांची निर्मिती आहे.

 

ताकश्ंत फाईल या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सुपर डिलक्स या तमिळ सिनेमासाठी विजय सेथुपथी यांना सहायक अभिनेता या श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.    

 

नॉन फिचर फिल्म या श्रेणीत विविध मराठी चित्रपटांना पुरस्कार

 

जक्कल या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सिनेमा निऑन रील क्रियेशन ने निर्मित केला असून विवेक वाघ दिग्दर्शक आहेत.

 

उत्कृष्ट डेब्यु दिग्दर्शक या श्रेणीमध्ये खिसा या चित्रपटाला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माते पीपी सिने प्रोडक्शन आहे.  राज प्रितम मोरे हे या स‍िनेमाचे दिग्दर्शक आहे.

सामाजिक विषयावर आधारित श्रेणीत  होली राईट्स या हिंदी नॉन फिचर फिल्मला विभागुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्मात्या प्रियंका मोरे या आहेत तर दिग्दर्शक फराह खातून या आहेत.

 

 

 

 

स्पेशल मेन्शन या श्रेणीत 2 मराठी चित्रपटांना पुरस्कार प्रदान

 

स्पेशल मेन्शन या श्रेणीत सत्य घटनावर आधारित लता भगवान करे या मराठी  सिनेमात अभिनय करणा-या लता करे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्रीमती करे यांचे  पती आजारी होते त्यांच्या आजारपणासाठी लागनारा निधी गोळा करण्यासाठी त्या बारामतीतील  म्यारॉथनमध्ये धावुन प्रथम पुरस्कार मिळवणा-या लता करे या आहेत. त्यांच्या या विलक्षण कृतीवरच हा सिनेमा बनविलेला आहे.

 याच श्रेणीत पिकासो या मराठी सिनेमाला सुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत वारंग हे आहेत.

 

त्रिज्या या सिनेमाला उत्कृष्ट ऑडीयोग्राफी (साऊंड डिजाइनर) चा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 

चित्रपटांवरील उत्कृष्ट समिक्षात्मक पुस्तक या श्रेणीत सिनेमा पाहणारा माणूस या पुस्तकाला  स्पेशल मेन्शन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हे पुस्तक अशोक राणे यांनी लिहीले आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची ‘सफल’ प्रक्रिया केंद्राला अभ्यास भेट






नवी दिल्ली, २५ :  ‍ राज्यातील आदिवासी  शेतकऱ्यांचा शेतमाल आणि वनउपज प्रत्यक्ष रिटेल चेनद्वारे अंतिम वापरकर्त्याला विकण्याच्या उद्देशाने अभ्यास करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष श्री  नरहरी झिरवाळ यांनी आज दिल्ली स्थित 'मदर डेयरी' च्या सफल या फळ व भाजीपाला प्रक्रिया केंद्राला भेट दिली.

               श्री. झिरवाळ यांनी येथील मंगोलपुरी औद्योगिकक्षेत्रात स्थित सफल फळ व भाजीपाला प्रक्रिया केंद्राला भेट दिली. राज्यातील आदिवासी  शेतकरी  विविध  प्रकारची  फळे व भाजीपाला  यांचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांच्या मालाला उचित दर व बाजारपेठ मिळावी तसेच गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनासाठी त्यांनी मदर डेयरीचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ.ओमविर सिंह यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. सफलकडून  शेतकऱ्यांना करण्यात येणारे मार्गदर्शन आदिंविषयांचीही माहिती घेतली. नाचणीपासून ते स्ट्रॉबेरी, द्राक्षे आदि वैविद्यपूर्ण पीक घेणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचा माल रिटेल चेनद्वारे उपभोक्त्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सफलकडून भविष्यात सहकार्य मिळण्याची अपेक्षाही श्री झिरवाळ यांनी  यावेळी व्यक्त केली.

                   श्री. झिरवाळ यांनी येथील २२ एकर परिसरात वसलेल्या सफल केंद्राची पाहणी केली. त्यांनी या केंद्रातील मध्यवर्ती  वितरण सुविधा (सीडीएफ) समजून घेतली. येथील वाटाणा प्रक्रिया विभाग, वाटाणा पॅकेजिंग विभाग, शीतगृह, फळ पिकवणी विभाग, डिस्पॅच विभाग तसेच या केंद्राच्या परिसरातील सफल आऊटलेटलाही भेट दिली व याबाबतची यंत्रणा सविस्तररित्या जाणून घेतली.   

            डॉ.ओमविर सिंह यांनी यावेळी सादरीकरण केले. सफल केंद्राच्यावतीने शेतकऱ्यांच्या मालाला देण्यात येणारा उचित दर व ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध करून देण्यात येणारा गुणवत्तापूर्ण माल आदिंबाबत सविस्तर माहिती  दिली.  

        मंगोलपुरी स्थित सफलचे  बिजनेस हेड विनोद कुमार, युनिट हेड अशोक कुमार, फार्मर डेव्हलपमेंट विभाग प्रमुख डॉ विनीत कथुरिया यांच्यासह श्री झिरवाळ यांचे खाजगी सचिव मुकेश भोग, विशेष कार्य अधिकारी सर्वश्री  राजू नंदकर आणि अजित कसरळीकर उपस्थित हेाते.  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

                                            00000

रितेश भुयार / वि.वृ.क्र.२१७ /दि. २५.१०.2021

 


 

Friday, 22 October 2021

नाशिकच्या सायकल स्वारांचा दिल्लीकरांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश





नवी दिल्ली, २२ : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे २२ सायकलवीर देशाच्या राजधानीत दाखल झाले असून  नेट झिरो इंडिया या उपक्रमांतर्गत दिल्लीकरांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत .

             ‍संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली, जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (.का.) अमरज्योतकौर अरोरा यांनी  स्वागत केले. उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी ‘नेट झिरो इंडिया’ उपक्रमांतर्गंत 20 ऑक्टोबर 2021 पासून दिल्लीत राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण संवर्धन विषयक जागरुकता कार्यक्रमाची माहिती दिली.

               एकूण प्रदुषणाच्या टक्केवारीत वाहनांच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाचे 25 टक्के एवढे प्रमाण आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार वातावरणात वाढत असलेल्या हरित वायूचे प्रमाण कमी होण्यासाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करावा या उद्देशाने ऐतिहासिक इंडिया गेटहून या उपक्रमाला सुरुवात झाली. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी इंडिया गेट आणि महात्मा गांधीजी यांचे समाधी स्थळ राजघाट येथे या सायकलस्वारांनी नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून दिले. यासाठी पत्रके वाटली , मौखिक माहितीही दिली. आठवड्यातून एक दिवस "नो वेहिकल डे" पाळावा किंवा महिन्यातून एक दिवस सायकलचा वापर करावा व गाडीचा वापर टाळावा असा महत्वाचा संदेश त्यांनी दिल्लीकरांना पटवून देत आहेत. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यात प्रत्येकाचे योगदान लाभेल असे कळकळीचे आवाहन हे सायकलस्वार दिल्लीकरांना करीत आहेत. हे महत्वाचे  संदेश  त्यांनी  सायकलींवरही लावले आहेत.

             उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आयोजित आझाद हिंद सेनेच्या ७८ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात या सायकलस्वारांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी उपस्थित केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री सर्वश्री अर्जुनराम मेघवाल आणि मिनाक्षी लेखी यांनी ‘नेट झिरो इंडिया’ या अनोख्या उपक्रमाविषयी जाणून घेतले व या उपक्रमाचे कौतूकही केले. यावेळी दिल्लीकरांसह देशाच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांना या सायकलस्वारांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

                या सायकलस्वारांनी आज कुतुब मिनार येथे जावून पर्यावरण संवर्धन विषयक जागरूकता संदेश दिले. परतीच्या प्रवासात त्यांनी  चौकाचौकांमध्ये थांबून जनतेचे पर्यावरण संवर्धनाविषयी  प्रबोधनही केले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी या सायकलस्वारांनी भेट दिली, यावेळी श्री दानवे यांनीही या उपक्रमाचे कौतूक केले. उद्या २३ ऑक्टोंबर रोजी  या उपक्रमाचा समारोप होणार आहे.

           तत्पूर्वी  २ ऑक्टोबर २०२१ रोजी नाशिक ते मुंबई असा सायकल प्रवास करून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्यावतीने ‘नेट झिरो इंडिया’ या उपक्रमाची सुरुवात झाली . राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेवून उपक्रमाविषयी माहिती दिली.  त्यांनीही या उपक्रमाचे कौतूक करून शुभेच्छा दिल्याची माहिती नाशिक  सायकलिस्ट फाउंडेशनचे उपाध्यक्ष सर्वश्री चंद्रकांत नाईक, किशोर माने आणि सचिव डॉ  मनिषा रौंदळ व खजिनदार राजेंद्र दुसाने यांनी दिली.

      महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीनेही ‘नेट झिरो इंडिया’ या उपक्रमासह नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या भविष्यातील उपक्रमांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                                   00000

वि.वृ.क्र.२१६ /दि. २२.१०.2021

 

             

 

 

 

 

 

‘मुख्यमंत्री कृषि वाहिनी परियोजना’ का राष्ट्रीय सम्मान


 


नई दिल्ली, 22 : 'मुख्यमंत्री कृषि वाहिनी परियोजना'  के तहत स्थापित और नियोजित सौर परियोजनाओं के उत्कृष्ट कार्य के लिए महाराष्ट्र सरकार की महानिर्मिती बिजली कंपनी को केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी के हाथों 'इंडिया ग्रीन एनर्जी' राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित किया गया है.

            केंद्रीय नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय से अनुलग्न  'इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी' द्वारा आयोजित एक कार्यक्रम में बुधवार को 'इंडिया ग्रीन एनर्जी' पुरस्कार वितरित किए गए. इस अवसर पर केन्द्रीय नवीन एवं नवीकरणीय ऊर्जा राज्य मंत्री भगवंत खुबा और इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी के अध्यक्ष प्रमोद चौधरी उपस्थित थे. समारोह में उत्कृष्ट पर्यावरण हितैषी हरित ऊर्जा परियोजना का पुरस्कार महानिर्मिती कंपनी को प्रदान किया गया. यह पुरस्कार महानिर्मिती के अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक संजय खंदारे ने स्वीकार किया.

              किसानों और कृषि पर ध्यान केंद्रित करते हुए, राज्य सरकार ने 'मुख्यमंत्री कृषि वाहिनी  परियोजना' शुरू की.  यह  परियोजना राज्य सरकार की महानिर्मिती कंपनी के माध्यम से क्रियान्वित की जाती है. इस परियोजना के तहत सौर ऊर्जा के माध्यम से विद्युतीकरण द्वारा पारंपरिक ऊर्जा की बचत हो रही है तथा  पर्यावरण के अनुकूल हरित ऊर्जा का भी उत्पादन हो रहा है. यह परियोजना कृषि के लिए कारगर साबित हो रही है तथा पर्यावरण की समृद्धि भी हासिल कर रही है. सौर ऊर्जा का उपयोग कर कृषि को समृद्ध बनाने की राज्य सरकार की यह सराहनीय पहल  ऊर्जा और कृषि विकास को एक नया आयाम दे रही है.     

 हमारे ट्वीटर हँडल को फॉलो करे :  http://twitter.com/MahaMicHindi

                                  

                                                                  00000