Wednesday, 9 February 2022

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे शंभरावी टेक्सटाईल एक्सप्रेस रवाना

 


नवी दिल्ली, 9 : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने, चलथान (सुरत विभाग) ते संक्रेल (खरगपूर विभाग, एसईआर ) 100 वी टेक्सटाईल रेल्वेगाडी भरून रवाना करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश, यांनी पहिल्या गाडीला उधना येथून हिरवा झेंडा दाखवून‌‌ ती 1 सप्टेंबर रोजी रवाना केली होती. रेल्वेने हा टप्पा 5 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला आहे.

100 वी टेक्सटाईल रेल्वेगाडी भरून रवाना झाल्याने सुरत वस्त्रोद्योग क्षेत्राचा रेल्वेवरील वाढता विश्वास दिसून येतो.  दक्षिण पूर्व रेल्वेमधील शंकरेल, शालीमार आणि पूर्व मध्य रेल्वेमधील दानापूर आणि नारायणपूर ही प्रमुख गंतव्य स्थाने होती.

        या वस्त्रोद्योग एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांनी 10.2 कोटी रुपयांचा एकूण महसूल  रेल्वेला मिळवून दिला आहे.

No comments:

Post a Comment