Monday, 31 July 2023
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 अगस्त को पुणे का दौरा करेंगे प्रधानमंत्री पुणे मेट्रो ट्रेनों को हरी झंडी दिखाएंगे प्रधानमंत्री आवास योजना के तहत निर्मित मकानों का शिलान्यास कर, पिंपरी चिंचवाड के लोगों को सुपुर्द करेंगे, ऊर्जा संयंत्र का भी उद्घाटन करेंगे प्रधानमंत्री को लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित किया जाएगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या विभागाचे करणार लोकार्पण पिंपरी-चिंचवाड येथील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरांचे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरण, कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या संयंत्राचेही उद्घाटन लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येणार
Thursday, 27 July 2023
09 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात 'मेरी माटी मेरा देश अभियान' राबविण्यात येणार देशातील सुमारे 7,500 ब्लॉकमधून तरुण त्यांच्या राज्यातील माती आणतील.
अबसे महाराष्ट्र सरकार के हर सरकारी पत्र पर लगेगा शिवराज्याभिषेक का चिन्ह! -सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
Wednesday, 26 July 2023
महाराष्ट्रात 5 हजार 441 किलो मीटर रेल्वेचे विद्युतीकरण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची लोकसभेत माहिती
महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेतंर्गत मिळणार 1866.40 कोटी रुपये लाभ
Sunday, 23 July 2023
राजधानीत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी
नवी दिल्ली दि. 23 : भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य
बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज महाराष्ट्र
सदन येथे साजरी करण्यात आली.
कोपर्निकस
मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ.
राजेश अडपावार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र
सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्प
अर्पण करून अभिवादन केले.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र.130, दि.23.07.2023
Saturday, 22 July 2023
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी घेतली सहकुटुंब केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट
नवी दिल्ली ,
22 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.
यावेळी श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री शहा यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा भेट दिली.
या भेटीत श्री शिंदे त्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली शिंदे नातु रूद्रांश यांच्या सोबत होते.
याप्रसंगी श्री. शहा यांनी श्री. शिंदे यांच्या सोबत महाराष्ट्रासंबंधी विविध विषयांवर चर्चा केली.
महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री यांनी घेतली सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट
नवी दिल्ली , 22 : राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
आज मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी प्रधानमंत्री श्री मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. श्री शिंदे यांनी त्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली शिंदे नातु रूद्रांश यांच्या समवेत भेट घेतली.
या भेटी दरम्यान कुटुंबीयांची प्रधानमंत्री यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली असल्याचे भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासोबतच राज्याच्या सर्वंकष विषयांवर चर्चा करून राज्यात सुरू असलेल्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पाठबळ असल्याचे आश्वासक आश्वासनही यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांनी दिले असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या ईशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या घटनेबाबत सहवेदन प्रधानमंत्री श्री मोंदी यांनी व्यक्त करत या दुःखाच्या समयी केंद्र सरकार खंबीरपणे पाठीशी उभे असल्याच्या भावना प्रधानमंत्री यांनी यावेळी व्यक्त केल्या असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबतची माहिती जाणून घेतली.
धारावी प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावेल त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा प्रधानमंत्री मोदी यांनी श्री शिंदे यांच्याकडून व्यक्त केली. त्याचबरोबर मुंबईतील पुनर्विकासांचे रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची चर्चा यावेळी झाली. यासोबतच प्रत्येक कुटुबांला हक्काचे घर मिळावे, असे केंद्र शासनाचे धोरण असून राज्य त्या दिशेनेही काम करीत असल्याचे समाधान प्रधानमंत्री यांनी व्यक्त केले असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.
राज्यातील रखडलेले पुर्नविकासाचे प्रकल्प मार्गी लावावेत. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे राज्यातील असे सर्व प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशाही सूचना प्रधानमंत्री श्री मोदी यांनी यावेळी केल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासह राज्यात वांरवार होणारी अतिवृष्टी त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचे होणारे नुकसान याबाबतही प्रधानमंत्री यांनी विचारपूस केली. कोकणात येणारा उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळविता येईल, यावर भविष्यात काही उपाययोजना आखता येतील का याबाबतही चर्चा करण्यात आली. मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनेबाबतची माहिती श्री मोदी यांनी घेतली. यासह राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा याबाबतही विचारणा केली असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.
Friday, 21 July 2023
पशुधन क्षेत्रासाठीच्या पहिल्या "पत हमी योजने" चा प्रारंभ ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना, 750 कोटी रुपयांच्या पतहमी निधी न्यासाची स्थापना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) जोखीमरहित विनातारण कर्ज
नवी दिल्ली, 21: पशुधन क्षेत्रात गुंतलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर्ज वितरणाची प्रणाली मजबूत करण्यासाठी तसेच जोखीमरहित विनातारण सुरळीत कर्ज उपलब्ध होण्यासाठी, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, केंद्रीय पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने ′पत हमी योजना′ लागू केली आहे. या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने 750 कोटी रुपयांचा पत हमी निधी न्यास स्थापन केला आहे. हा न्यास पात्र कर्ज देणाऱ्या संस्थांद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विस्तारित पत सुविधांच्या 25% पर्यंत पत हमी कवच प्रदान करेल.
या पतहमी योजनेमुळे, सेवा न मिळालेल्या किंवा अत्यल्प सेवा मिळालेल्या पशुधन क्षेत्रासाठी सुलभ वित्तपुरवठा सुलभ करू शकेल, मुख्यत्वे पहिल्या पिढीतील उद्योजकांना आणि समाजातील वंचित घटकांना, ज्यांना त्यांच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी संपार्श्विक सुरक्षा नसते.
वैयक्तिक उद्योजक, खाजगी कंपन्या, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) आणि कलम 8 अंतर्गत येणाऱ्या कंपन्या ज्या -डेअरी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा, मांस प्रक्रिया आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा, पशुखाद्य संयंत्र, पशु जाती सुधार तंत्रज्ञान आणि जाती गुणन फार्म, पशु कचरा संपत्ती व्यवस्थापन (कृषी कचरा व्यवस्थापन) आणि पशुवैद्यकीय लस आणि औषधे उत्पादन सुविधांची स्थापना यांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 15000 कोटी रुपयांच्या “पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी” (AHIDF) च्या पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियान प्रोत्साहन पॅकेज अंतर्गत पत हमी निधी न्यासाची स्थापना मंजूर करण्यात आली आहे.
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे 750 कोटी रुपयांच्या पतहमी निधी न्यासाची स्थापना. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने NAB संरक्षण ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड च्या सोबतीने या ट्रस्टची स्थापना केली आहे. नाबार्डची पूर्ण मालकी असलेल्या ही उपकंपनी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) योजनेंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पतहमी योजनेचा विस्तार करणाऱ्या या न्यासाच्या स्थापनेसाठी तयार करण्यात आली आहे. मार्च 2021 मध्ये स्थापन झालेला हा निधी न्यास कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) च्या पतहमी योजनेंतर्गत देशातील पहिला फंड न्यास असून पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने (DAHD) हाती घेतलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्यामुळे पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) चा लाभ मिळवणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रांची संख्या झपाट्याने वाढू आणि बँकांकडून विणातारण कर्ज मिळवण्यासाठीची व्यवस्था मजबूत होईल.
3% व्याज दराची सवलत देणार असून, कोणत्याही शेड्यूल्ड बँक, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) यांच्याकडून एकूण प्रकल्प खर्चाच्या 90% पर्यंत कर्ज देण्याची सुविधा पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये मार्फत देण्यात येणार आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी, या संकेतस्थळाला भेट द्या: https://dahd.nic.in/ आणि
Wednesday, 19 July 2023
परदेशातून भारतात येणा-या प्रवाशांसाठी कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वे सुलभ - केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
नवी दिल्ली, 19 : जगभरातील सध्याची कोविड-19ची प्रचलित स्थिती आणि कोविड-19 लसीकरणामध्ये
केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल घेवून परदेशातून भारतामध्ये येणा-या
प्रवाशांसाठी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे,
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिक सुलभ केली आहेत.
भारतीय प्रमाण
वेळेनुसार दि. 20 जुलै
2023 च्या मध्यरात्रीपासून (रात्री 12.00वाजता) नवीन
मार्गदर्शक तत्वे लागू होणार आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारतात येणा-या
आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी 2 टक्के
प्रवाशांना आर टी-पीसीआर चाचणी करणे गरजेचे होते.
आता या चाचणीची आवश्यकता
रद्द करण्यात आली आहे.
तथापि, कोविड-19 च्या
संदर्भात एअरलाइन्स तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी पाळण्याच्या सावधगिरीच्या
उपायायोजना पूर्वीप्रमाणेच लागू असतील.
अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वांची माहिती, आरोग्य आणि
कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.mohfw.gov.in/) उपलब्ध
करून देण्यात आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने
कोविड-19 स्थितीकडे निरंतर बारीक लक्ष ठेवून
आहे.
निवडणुकी दरम्यान दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी राष्ट्रीय प्रादेशिक पक्षांना डिजिटल टाइम व्हाउचर जारी करणार – भारत निवडणूक आयोग
नवी दिल्ली 19 :निवडणुकीदरम्यान आकाशवाणी आणि दूरदर्शनवर
राजकीय पक्षांना दिले जाणारे वेळ आता ऑनलाइन होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने, राजकीय
पक्षांद्वारे सरकारी मालकीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वापरासाठी विद्यमान
योजनेत सुधारणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान (IT) प्लॅटफॉर्मद्वारे
डिजिटल टाइम व्हाउचर जारी करण्याची तरतूद सादर करून हे केले गेले आहे. या
सुविधेमुळे, राजकीय पक्षांना निवडणुकीदरम्यान वेळेचे व्हाउचर
मिळवण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी ECI/CEO कार्यालयात
पाठवण्याची आवश्यकता भासणार नाही. निवडणूक प्रक्रियेच्या सुधारणा, सर्व भागधारकांच्या
सुलभतेसाठी, तसेच तंत्रज्ञानाची सुविधा घेण्यासाठी आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले
आहे.
तंत्रज्ञानातील
प्रगती ओळखुन आयोग राजकीय पक्षांशी संवाद साधण्यासाठी आयटी आधारित पर्याय उपलब्ध
करून देत आहे. अलीकडेच,
आयोगाने निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांकडून आर्थिक खाती ऑनलाइन
भरण्यासाठी एक वेब पोर्टलही सुरू केले आहे.
सविस्तर माहितीसाठी
पुढील लिंक ला भेट द्यावी.
ऑर्डरची
लिंक:
राष्ट्रीय/प्रादेशिक
राजकीय पक्षांना पाठवलेल्या पत्राची लिंक:
देशाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशां’कात महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर
नवी दिल्ली 18 : निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीति आयोगाच्या 'निर्यात सज्जता निर्देशांक-2022' अहवालात 78.20 गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे.तर तामिळनाडू राज्याने पहिले स्थान मिळवले आहे. देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी ‘निर्यात सज्जता निर्देशांक (Export Preparedness Index ) 2022’ अहवाल जारी केला.
‘निर्यात सज्जता निर्देशांक (Export Preparedness Index ) 2022 ची तिसरी आवृत्तीत चार प्रमुख व 11 उपमानकांच्या आधारे महाराष्ट्र राज्य 78.20 गुण मिळवत दुसरे स्थानावर राहिले आहे, तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आणि कर्नाटक राज्य तिस-या क्रमांकवर राहिले आहे.
काय आहे निर्यातविषयक सज्जता निर्देशांक?
हा अहवाल म्हणजे भारताच्या निर्यातविषयक कामगिरीचे समावेशक विश्लेषण आहे. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना त्यांच्या सहकारी राज्यांच्या तुलनेत स्वतःच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि उपराष्ट्रीय स्तरावरील निर्यातीवर आधारित विकासाला चालना देण्यासाठी उत्तम धोरणात्मक यंत्रणा विकसित करण्याच्या संभाव्य आव्हानांचे विश्लेषण करणे, यासाठी या निर्देशांकाचा वापर करण्यात येतो. निर्यातविषयक सज्जता निर्देशांक पुढील चार मुख्य घटकांच्या संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांची क्रमवारी निश्चित करतो – धोरण, व्यवसाय परिसंस्था, निर्यात परिसंस्था आणि निर्यातविषयक कामगिरी. तसेच या क्रमवारीसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण, संस्थात्मक चौकट, व्यवसायाचे वातावरण, पायाभूत सुविधा, वाहतुकीची सुविधा, अर्थसहाय्य मिळण्याची सोय, निर्यातविषयक पायाभूत सुविधा, व्यापारविषयक मदत, संशोधन आणि विकासविषयक पायाभूत सुविधा, निर्यातीचे वैविध्यीकरण आणि विकासाभिमुखता हा 11 उपनिर्देशक विचारात घेतले जातात.
ईपीआय 2022 च्या अहवालात महाराष्ट्र राज्याने सर्व श्रेणींमध्ये निर्यात सज्जता निर्देशांकात उत्तम कामगिरी बजावली आहे. तसेच बहुतांश ‘तटवर्ती राज्यांनी चांगली कामगिरी केली असून, तमिळनाडू (80.89), कर्नाटक (76.36) आणि गुजरात (73.22) गुणांसह ही राज्ये देखील सर्व श्रेणींमध्ये निर्यात सज्जता निर्देशांकात अग्रगण्य स्थानावर आहेत. अहवाचा उद्देश देशातील सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये निरोगी स्पर्धाची भावना निर्माण करणे आणि राज्यांमध्ये समतुल्य- शिक्षणाला प्रात्साहन देणे हा आहे.
नीति आयोगाचे उपाध्यक्ष, सुमन बेरी यांनी अहवालाचे प्रकाशन करताना सांगितले की, “आपण 2047 कडे पाहत असताना आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत असताना, उत्पादनासोबत सेवा आणि कृषी निर्यातीत स्पर्धात्मकता वाढवण्यावर भर देणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
Friday, 14 July 2023
चंद्रयान-3 चे प्रक्षेपण भारतीयांसाठी अभिमानाची बाब -सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार
नवी दिल्ली 14: चंद्रयान-3 चे
सफल प्रक्षेपण आम्हा सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब असल्याची भावना
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
आज श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर सर्वांना शुभेच्छा देताना त्यांनी आशा व्यक्त केली की, लवकरच भारत हे यशस्वी मिशन सुरू करणारा चौथा देश असेल.
महाराष्ट्र सदन येथे आज महाराष्ट्र राज्याच्या 2010 च्या सांस्कृतिक धोरणाचा फेर आढावा घेण्यासाठी शासनाने नेमलेल्या पूर्नविलोकन समितीची बैठक,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना, श्री मुनगंटीवार म्हणाले, जगामध्ये इकॉनोमी मध्ये आम्ही पाचव्या क्रमांकावर आहोत आता तर फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनोमिक होत आपण जर्मन आणि जपानलाही मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर जाण्याचा एक दृढ संकल्प केला. त्याच पद्धतीने विज्ञानामध्ये जेव्हा हे चंद्रयान यशस्वीपणे 42 दिवसानंतर चंद्रावर पोहोचेल तेव्हा जगातल्या 193 देशात आमचा देश चौथ्या क्रमांकाचा देश असेल ज्याचा अभिमान भारतीयांना निश्चित वाटेल. प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये याचा अभिमान निश्चितपणे निर्माण होईल आणि त्यादृष्टीने या मोहिमेकडे आपण सर्वजण पाहतो आहोत. आपल्या शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस मेहनत, कष्ट परिश्रम करत 'पुन्हा एकदा घे भरारी' म्हणत चंद्रयान दोनच्या नंतर सफलतेच्या मार्गावर चंद्रयान तीन चे प्रक्षेपण केले आहे. ही बाब सर्व भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि आम्ही चौथ्या क्रमांक निश्चितच गाठू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सांस्कृतिक धोरण समितीचे कार्याध्यक्ष डॉ विनय सहस्रबुदधे व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव श्री विकास खारगे उपस्थित होते.
००००००
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
अमरज्योत कौर अरोरा/वृत्त वि. क्र. 122, दिनांक 14.07.2023