Tuesday, 30 March 2021

‘दिल्लीतील मराठी पत्रकारिता’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांचे व्याख्यान



 

  नवी दिल्ली, दि. २९ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळ नवी  दिल्लीच्या वृत्त विभागाचे प्रमुख अनंत बागाईतकर हे उद्या ३० मार्च २०२१ रोजी दिल्लीतील मराठी पत्रकारिताया विषयावर बारावे पुष्प गुंफणार आहेत.

             महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्षआणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालाआयोजित करण्यात आली आहे. ३० मार्च रोजी या व्याख्यानमालेच्या बाराव्या दिवशी अनंत बागाईतकर हे दुपारी ४ वाजता विचार मांडणार आहेत.

                                       अनंत बागाईतकर यांच्या विषयी

श्री बागाईतकर हे गेल्या ४० वर्षांपासून सक्रीय पत्रकारितेत आहेत. पत्रकारितेची पदवी संपादन करून पुण्यातील दैनिक केसरी वृत्तपत्रातून डिसेंबर १९७९ मध्ये त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. १९८ मध्ये  दैनिक केसरीचे दिल्ली विशेष प्रतिनिधी मधून त्यांनी कार्याला सुरुवात १९८९-९४ दरम्यान त्यांनी जन्मभूमी या गुजराती  वृत्तपत्र समुहासाठी  दिल्ली विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे. १९९४ पासून त्यांनी दैनिक सकाळच्या दिल्ली ब्युरो कार्यालयात विशेष प्रतिनिधी म्हणून कार्याला सुरुवात केली ते आजतागायत या कार्यालयात कार्यरत असून गेल्या १० वर्षांपासून वृत्तविभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ‘माध्यमे आणि राजसत्ताही त्यांची पुस्तिका प्रकाशित आहे.

दिल्ली आकाशवाणी, लोकसभा टिव्ही, राज्यसभा टिव्ही, एनडी टिव्ही आदींवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांचा सहभाग असतो. वर्ष २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुककाळात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरून या निवडणुकांचे विश्लेषण केले आहे. त्यांनी २०१८-१९ मध्ये  प्रेस क्लब ऑफ इंडिया या पत्रकारितेतील नामांकीत संस्थेचे अध्यक्ष तर २०१९-२० मध्ये सेक्रेटरी जनरल पद भूषविले आहे. लोकसभा अध्यक्षांच्या माध्यम सल्लागार समितीवरही त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे. माजी लोकसभा अध्यक्ष दिवंगत सोमनाथ चटर्जी यांच्या कार्यकाळात त्यांनी या समितीचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. श्री बागाईतकर हे सध्या राज्यसभेच्या माध्यम सल्लागार समितीचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.      

                मंगळवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

        मंगळवार, 30 मार्च 2021 रोजी दुपारी 4 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे. 

             

आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :https://twitter.com/MahaGovtMic

                                                  ००००

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.७०/दिनांक २९.०३.२०२१

 

छत्रपती शाहू आणि डॉ आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांना मोठे बळ - इतिहास संशोधक इंद्रजित सावंत


 नवी दिल्ली , २९ : छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी घेतलेला पुढाकार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  छत्रपती शाहूंचे‍ विचार पुढे घेवून जाण्याचे केलेले कार्य आणि या दोघांमधील ऋणानुबंधातून आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांना मोठे बळ मिळाले, असे मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत योनी आज मांडले.

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प गुंफताना छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध या विषयावर श्री सावंत बोलत होते.

      छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या थोर व्यक्तीमत्वांनी भारतदेश आणि महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रावर दुरगामी परिणाम केला. या दोन्ही महापुरुषांमध्ये अडीच वर्षांच्या काळात झालेल्या अप्रकाशित पत्रव्यवहारातून त्यांच्या नात्यातील ऋणानुबंध आपणास दिसून येतो. या कालावधीतील गाठी-भेटी व परिषदांमधून शाहूंनी आंबेडकरांचे नेतृत्व प्रस्थापित केले.त्यामुळे बाबासाहेबांना नैतृत्वाचा संघर्ष कमी होवून त्यांना राजमार्ग मिळाला ,असे श्री सांवत म्हणाले.

डॉ आंबेडकरांनी स्वत:च्या हस्ताक्षरात छत्रपती शाहुंना लिहीलेली काही अप्रकाशित पत्र कोल्हापूरच्या पुराभिलेख विभागात सापडली आहेत. नागपूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेच्या संबंधाने ही पत्र होती. शाहु आणि आंबेडकर एकाच ध्येयाने पुढे जाणारे व्यक्तीमत्व होती. कागदपत्र आणि अभ्यास असा सांगतो की फक्त दोन ते अडी वर्षाच्या त्यांच्या एकमेकांच्या गाठी-भेटी आहेत. छत्रपती शाहुंनी १९०२ ला त्यांच्या कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा पहिला जाहीरनामा काढून  ५० टक्के जागा आरक्षीत ठेवल्या होत्या. बाबासाहेबांची भेट होण्याआधी शाहु महाराजांनी ६ सप्टेंबर १९१९ रोजी शिवतरकर मास्तरांना लिहीलेले पत्र उपलब्ध झाले आहे. या पत्रानंतरच छत्रपती शाहु आणि बाबासाहेब यांची भेट झाली. या पत्रात शाहुंनी अस्पृष्यतेविरोधातील आपले मत लिहीली होती. या पत्राचे प्रतिबिंब राज्यघटनेत आल्याचे ‍ दिसते असे श्री सावंत म्हणाले.

     अस्पृष्य चळवळीच्या नेतृत्चाच्या शोधात असताना छत्रपती शाहुना डॉ. आंबेडकरांविषयी कळताच ते परळच्या चाळीत स्वत: गेले. या दोघा महापुरुषांमध्ये १९१९ ला पहिली भेट झाली. त्या भेटीतच मूकनायकृत्तपत्रासाठी शाहूंनी अडीच हजार रूपये दिले. पहिल्याच भेटीत शाहूंनी आंबेडकरांना कोल्हापूर संस्थानात आमंत्रित केले त्यांचे स्वागत करत फेटा दिला. बाबासाहेबांनीही शाहूंनी बांधलेल्या या फेटयाचा मी आयुष्यभर मान राखीन असा शब्द  दिला. आणि येथून या दोन नेत्यांतील ऋणानुबंधाला सुरुवात झाली. गाठी भेटी सुरु झाल्या .

                         भारताच्या राज्यघटनेचा शिल्पकार छत्रपती शाहुंनी भारताला दिला

            कोल्हापूर संस्थानातील कागल जहागिरीच्या मानगाव येथे २० आणि २१ मार्च १९२० ला दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन भरले हे अधिवेशन म्हणजे बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनातील नैतृत्वाची सुरुवात होती. बाबासाहेब अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात पारित झालेल्या १५ ठरावांवरच बाबासाहेबांच्या पुढील चळवळीची वाटचाल झाली. या अधिवेशनातच छत्रपती शाहूंनी डॉ आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याची घोषणा केली. पुढे ते संपूर्ण भारताचे नेते झाले. भारताच्या क्षितीजावर तडपणा-या या ता-याने देशाला राज्यघटना दिली ज्यावर आज आपला देश समर्थपणे मार्गक्रमण करीत आहे असे श्री सावंत म्हणाले.

                                    बाबासाहेबांना शाहुंविषयी होता अतिव आदर

            बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत वर्तमानपत्रात शाहू महाराजांच्या वाढदिवसानिमित्त विशेषांक काढला व त्याची  माहिती गोळा करण्यासाठी आपण स्वत: कोल्हापूरला येत असल्याचे  पत्र त्यांनी शाहूंना लिहीले होते. १९५६ मध्ये प्रबुध्द भारत च्या अंकात बाबासाहेबांनी शाहूंची महती सांगणारा अंक प्रकाशित केला. शाहुंच्या निधनानंतरही बाबासाहेबांच्या मनातून शाहू कधीच गेले नाहीत, छत्रपती शाहूंचा जन्मदिन उत्सव म्हणून साजरा व्हावा अशी  कल्पना बाबासाहेबांनी मांडली होती, असे श्री सावंत म्हणाले.

            ३०, ३१ मे १९२० दरम्यान नागपूर मध्ये अखिल भारतीय परिषद भरणार होती शाहू महाराजांनी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी बाबासाहेंबांची इच्छा होती. त्याचवेळी छत्रपती शाहुंच्या कन्या अक्कासाहेब यांची प्रकृती बरी नव्हती. अक्कासाहेब आजारी असल्याने येवू शकत नाही असे शाहुंनी बाबासाहेबांना पत्राद्वारे कळवले होते. त्यावर बाबासाहेबांनी शाहुंना चार पानाचे पत्र लिहीले त्यात त्यांनी अक्कासाहेबांप्रमाणेच आम्ही आपले लेकर नाही का? असा लडीवाळ हक्क सांगितला होता. या पत्रानंतर शाहुंनी विनंती मान्य करून नागपूर अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविल्याचे श्री सावंत म्हणाले.उच्च शिक्षणासाठी डॉ.आंबेडकर लंडनला  गेले तेव्हाही  छत्रपती शाहुंचा त्यांच्यासोबत पत्रव्यवहार सुरु होता.

महात्मा फुले यांचा वारसा छत्रपती शाहुंनी पुढे नेला तर  डॉ. आंबेडकरांनी  फुले-शाहुंच्या विचारांचा वारसा पुढे नेत त्यात भर टाकली. भारत देशाचा सबंध गाडा ज्या राज्यघटनेवर चालतो ती राज्यघटना डॉ. आंबेडकरांनी आपल्याला दिली.आधुनिक महाराष्ट्राचा पायाच या महारुषांनी घातला व हेच विचार महाराष्ट्राला पुढे घेवून जाणारे आहेत असा विश्वास श्री सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

        http://twitter.com/micnewdelhi

                                                   ०००००

रितेशभुयार /वृत्त.वि. क्र.६९/दिनांक २९.०३.२०२ 

 


Sunday, 28 March 2021

‘छत्रपती शाहू-डॉ.आंबेडकर यांचे ऋणानुबंध’या विषयावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे व्याख्यान


 


नवी दिल्ली, दि. २८ :  महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत हे उद्या २९ मार्च २०२१ रोजी  छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध या विषयावर अकरावे पुष्प गुंफणार आहेत.  

            महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालाआयोजित करण्यात आली आहे. २९ मार्च रोजी या व्याख्यानमालेच्या अकराव्या दिवशी इंद्रजित सावंत हे दुपारी ४  वाजता विचार मांडणार आहेत.   

                                                 इंद्रजित सावंत यांच्या विषयी   

इंद्रजित सावंत यांनी शिवगर्जनानरशार्दुल संभाजी ही महानाटय लिहीली आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे चित्ररूप चरित्र, छत्रपती शिवरायांच्या अस्सल पत्रांवर टाकलेला प्रकाश, शोध भवानी तलवारीचा  आदी त्यांचे संशोधनात्मक ग्रंथ होत. शिवकालीन इतिहासाचा दस्ताऐवज असणा-या शिवाजी द ग्रेट या संकेतस्थळावरील मजकुराचे संपादन श्री सावंत यांनी केले आहे. यासह विविध पुस्तके व ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे. 

                             सोमवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण  

 

         सोमवार, 29 मार्च 2021 रोजी  दुपारी  4 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे. 

                                   

 आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :  https://twitter.com/MahaGovtMic

                                                         ००००

‍िरितेश भुयार  /वृत्त वि. क्र.६८/दिनांक  २८.०३.२०२१

 

लोकमान्य टिळकांच्या वैचारिक वारशाचा महाराष्ट्रावर प्रभाव- डॉ अशोक चौसाळकर


                                       

नवी दिल्ली , 28 : आशियाई देशातील लोकांचे जनजागरण,भारतीय धर्मनिपरपेक्ष राष्ट्रवादाची मांडणी आणि देशात लोकशाही स्थापन होण्यासाठी मांडलेले विचार हे लोकमान्य टिळकांच्या वैचारिक वारशाचे महत्वाचे पैलु असून त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही जाणवतो, असे मत विचारवंत व राज्यशास्त्रज्ञ डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे दहावे पुष्प गुंफताना लोकमान्य टिळक यांचा वारसा या विषयावर डॉ. चौसाळकर बोलत होते.

        आधुनिक भारताच्या इतिहासात 1880 ते 1920 या कालावधीत लोकमान्य टिळकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ब्रिटीश सत्ताधा-यांविरुध्द उभे राहण्यासाठी त्यांनी भारतीय जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. दैनिक केसरीच्या शिरोभागी लिहीलेल्या श्लोकातून टिळकांनी ब्रिटीश सत्तेचा मदांध सत्ताधारी असा उल्लेख करून मोठे आवाहन दिले होते व आयुष्यभर त्यांनी ब्रिटीश साम्राज्यवादा विरूध्द लढा दिला. या संपूर्ण कालावधीत लो. टिळकांनी दिलेला वैचारिक वारसा हा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वपूर्ण असल्याचे डॉ. चौसाळकर म्हणाले.

ब्रिटीशांच्या दडपशाहीमुळे भारतीय जनतेमध्ये निर्माण झालेली भिती नष्ट करून त्यांच्या मध्ये वीर वृत्तीचे पोषण करण्याचे कार्य टिळकांनी केले. टिळकांनी मराठी भाषेत लिखाण केले त्यासाठी वर्तमानपत्र काढले .लोकांमध्ये जावून कार्य केले.लोकचळवळ उभारल्या. राजकीय कारणासाठी तुरुंगवास भोगणारे लो.टिळक हे पहिले भारतीय राजकीय पुढारी होत. कोल्हापूर प्रकरणात लो.टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांना 101 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. 1897 ते 1899 या काळात त्यांना राजद्रोहासाठी तुरुंगवास भोगावा लागला. 1908 ते 1914 असा दीर्घ काळाचा कारावास त्यांना ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात भोगावा लागला.

         1918 साली पॅरीस येथे भरलेल्या परिषदेत टिळकांनी राष्ट्रीय स्वयं निर्णयाचा प्रस्ताव मांडला होता व अनेक देशांनी याला पाठिंबा दिला. टिळकांनी राष्ट्रवादाची शिकवण दिली. धर्माधिष्टीत राष्ट्रात प्रत्येकास आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे असा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद त्यांनी मांडला. टिळकांनी स्वराज्याची कल्पना मांडताना लोकशाही राज्याची भूमिका मांडली. स्वराज्यात जनतेला स्वत:चे भवितव्य घडविण्याचा अधिकार असावा, लोकांना मनाप्रमाणे सरकार निवडण्याचा अधिकार असावा,स्वराज्याचा कारभार लोककल्याणासाठी व्हावा असे टिळक मानत. गिता रहस्य  ग्रंथाच्या माध्यमातून आपले कर्तव्य निस्वार्थपणे करावे व अन्यायाचा निष्काम भावनेने प्रतिकार करावा असा विचार टिळकांनी  मांडला.

         स्वराज्य, स्वदेशी’, ‘राष्ट्रीय शिक्षणआणि बहिष्कार या चतु:सूत्रीच्या आधारावर टिळकांनी ब्रिटीश सरकार विरुध्द निडरपणे संघर्ष केला.1905-06 मध्ये देशात वंगभंगाविरूध्द सुरु झालेल्या स्वदेशी चळवळीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मध्ये टिळकांना मोठया प्रमाणात पाठिंबा मिळाला. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी होमरूल चळवळ अर्थात स्वराज्य संघाची चळवळ सुरु केली त्यासाठी त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली व  हजारो लोकांना लीगचे सभासद बनवले.

होमरूल लीगचे महत्व सांगतांना लो. टिळकांनी ,‘स्वराज्य माझा जन्म सिध्द हक्क आहे व तो मी मिळविणाराच अशी प्रसिध्द घोषणा केली. हजारो लोक या चळवळीत सहभागी झाले. या चळवळीत स्त्रिया मोठया प्रमाणात सहभागी झाल्या. स्वराज्याचे अधिकार हे जनतेचे जन्मसिध्द अधिकार असून नैसर्गिकरित्या ते प्राप्त झाले आहेत अशी  टिळकांची मांडणी होती.

टिळकांनी काँग्रेस डेमोक्रॅटीक पार्टीची स्थापना करून 1920 मध्ये त्या पार्टीचा जाहीरनामा घोषित केला. यात नवभारताची प्रतिमा अभिव्यक्त झाल्याचे दिसते. लोकमान्य टिळकांनी देशासह महाराष्ट्राला दिलेला हा वैचारीक वारसा जपून महाराष्ट्राला पुढे घेवून जावू या असा विश्वास डॉ चौसाळकर यांनी यावेळी मांडला.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

  http://twitter.com/micnewdelhi

                                                             ०००००     

रितेशभुयार /वृत्त.वि. क्र.६७/दिनांक २८.०३.२०२