नवी दिल्ली दि. 31 : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची
जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात
निवासी आयुक्त समीर सहाय यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह
महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुण्यश्लोक
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प
अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर
यांची जयंती साजरी
करण्यात आली. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांनी प्रतिमेस
पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित अभ्यागत, अधिकारी व कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000000
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.124/ दिनांक ३१.०५.२०१९