Monday, 31 May 2021

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

 

            

 





नवी दिल्ली दि. 31 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

 

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासह कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळयासही श्री गोयल यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

या दोन्ही कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांनीही  यावेळी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी कार्यालयात कर्मचा-यांनीही  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

Friday, 28 May 2021

राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

 

                 

नवी दिल्ली दि. २८ :  थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर  यांची  जयंती आज  महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी  कर्मचा-यांनीही  यावेळी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन 

            महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांच्यासह कार्यालयातील उपस्थित कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

                                                          000000  

Tuesday, 25 May 2021

 ‘खेलो इंडिया’अंतर्गत पायाभूत सुविधेसाठी राज्याला200 कोटींचा निधी मिळावा- क्रीडा मंत्री सुनील केदार 


नवीदिल्ली दि. 25 : खेलो इंडिया अंतर्गत राज्यातील विविध प्रलंबित असणा-या पायाभुतसुविधेसाठी  200 कोटीं रूपयांचा निधीमिळावा, अशी मागणी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आजकेंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली. श्री केदार यांनी केंद्रीयक्रीडा मंत्री श्री रिजिजू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनीराज्यातील विविध क्रीडाबांबी चर्चा केली. राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा अधिकसक्षम करण्याकरीता प्रलंबित असलेल्या 37 प्रस्तावासाठी राज्याला खेलो इंडियामधून200 कोटी रूपयांचा निधी मिळावा, अशी मागणी श्री केदार यांनी केली. कांदिवली येथील क्रीडा संकुलसंदर्भात राज्य शासन आणि भारतीयक्रीडा प्राधिकरण (साई) यांच्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे अमलबजावणी करण्यातयावी. अशी चर्चा बैठकीत झाली. राज्य शासन आणि साईमध्ये झालेल्या कराराप्रमाणे कांदीवलीयेथील  सराव शिबीराचे औरंगाबाद येथे राज्यशासनानेविनामुल्य उपलब्ध करून दिलेल्या जागेत सराव शिबिरे व्हावीत, अशी मागणीही श्रीकेदार यांनी केली.विदर्भातील आदिवासी भागातील खेळाडुंना अधिक प्रोत्साहन मिळावे,यासाठी दुर्गम भागात केंद्र शासनातर्फे क्रीडा अकादमी सुरू करावी, असा प्रस्तावहीश्री केदार यांनी बैठकीत मांडला. यासह चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे क्रीडासंकुल बांधुन तयार आहे, हे संकुल साईने लीजवर घेऊन याभागातील खेळाडुंना प्रोत्साहनद्यावे, असा प्रस्ताव आज श्री केदारे यांनी केंद्रीय मंत्री श्री रिजिजू यांच्यापुढे मांडला. 

पोल्ट्रीफार्म असणा-यांना योग्य मोबदला मिळावा :सुनील केदार 

पोल्ट्री फार्म असणा-यांनाआपत्ती काळात होणा-या नुकसानीबाबत योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी, आज केंद्रीय पशुसंवर्धन व डेयरीमंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली.  बर्ड फ्लुआणि अन्य साथीच्या रोंगामुळे एकाच वेळी अनेक कोबडयांना मारावे लागते. यामुळेपोल्ट्री मालकाचे अतोनात नुकसान होते. अशा वेळी केंद्र व राज्य शासन मिळुन काहीमदत पोल्ट्री फार्म मालकांना केली जाते. मागील 15 वर्षापासून केंद्र आणि राज्यमिळून  प्रत्येक कोबंडयामागे 45:45 रूपये अशी मदत दिलीजाते. ही मदत अपुरी असुन ही आर्थिक मदत वाढवून किमान प्रत्येकी  100:100 रूपये असावी. अशी मागणी श्री केदार यांनी केली. भारतीय गीर जातीच्यागायीवर ब्राझीलमध्ये  संशोधन होऊन अधीकदुधाळ संकर तयार झालेले आहे. ही नवीन संकरीत गीर गाय दिवसाला 25-27 लीटर दूध देते. या गीर जातीच्या गायी भारतात आणुनशेतक-यांना  द्याव्यात जेणे करून शेतक-यांच्याजोडधंधा म्हणुन असणा-या दुग्ध व्यवसायाला भरभराट येईल. अशी माहिती देत या गीर गायीदेशात आणण्याची मागणी श्री केदार यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली.यासोबतच सानेन याजातीच्या बक-या ज्या दिवसाला 10-12 लीटर दूध देतात. त्यांना देशात आणव्या जेणेकरून येथील लोकांना या बक-यांच्या दुधातून रोजगार वाढीसाठी मदत होईल, अशी मागणीहीश्री केदार यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली.  या बकरीचे संकर नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनेडा,इजराईल येथे मोठया प्रमाणात आहेत. दुध आणि भाजीपाल्यापासूनबनविण्यात येणा-या लोणीचा फरक समजण्यासाठी दोघांचा  रंग वेगवेगळा असावा, अशी मागणीही श्री केदारयांनी आज केंद्रीय मंत्री श्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली. दूधापासून तयारहोणार-या लोणीच्या तुलनेत भाजीपाल्यांपासून तयार करण्यात येणा-या  लोणीला कमी गुंतवणूक  लागते. मात्र, बाजारात आल्यावर दोघांची किमतसारखी असते. यामुळे दुधापासून लोणी बनविणा-यांना नुकसान होते.  यासाठी दोन्ही लोणींचा रंग वेगळा असावा. यासह  ग्राहकांनी कोणता लोणी खरेदी केले आहे हेकळण्यासाठी दोघांतील फरक स्पष्ट दिसावा. करिता लोणीचा रंग वेगळा ठेवण्याची, विंनती श्री केदार यांनी केली.

Friday, 21 May 2021

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा

 


 




नवी दिल्ली दि. 21 : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची  30 वी पुण्यतिथी  दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन म्हणून सोमवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली . 

     कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त श्याम लाल गोयल यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्री गोयल यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा

            महाराष्ट्र परिचय केंद्रात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी उपस्थित अधिकारी व  कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांच्या सह अन्य कर्मचारी उपस्थित होते. 

Monday, 10 May 2021

कोल्हापूर ने भारतीय चित्रपसृष्टीचा पाया रचला - डॉ. कवीता गगराणी


 

नवी दिल्ली दि. 10 मे : भारतीय चित्रपट सृष्टीला कलात्मक आणि तांत्रिक दर्जा प्रदान करण्यात कोल्हापूर चे महत्वाचे योगदान आहे खऱ्या अर्थाने कोल्हापूरने भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया रचला आहे, असे प्रतिपादन चित्रपट अभ्यासक प्रा.डॉ. कवीता गगराणी यांनी केले.

         नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत कविता गगराणी  यांनी "चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान " या विषयावर 43 वे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.

यावेळी डॉ गगराणी म्हणाल्या,  चित्रपट सृष्टी आणि कोल्हापूरचे योगदान या विषयाचा आवाका बघता याचे दोन भाग करावे लागतील. मराठी चित्रपट सृष्टीला आणि पर्यायाने भारतीय चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान. यासह चित्रपटांचे दोन भाग करावे लागतील.  मुकपट आणि बोलपट. मुकपटाचा कालखंड हा 1913 ते 1932 चा आहे. यामध्ये भारतातील पहिला मुकपट ‘राजा हरीशचंद्र’ हा दादासाहेब फाळके यांनी बनविलेला. तर बोलपटाचा 1932 पासून ते आजतगायतपर्यंतचा. मराठी चित्रपट सृष्टीचा विचार करतानारही  दोन भाग करावे लागतील 1932 ते 1960 आणि महाराष्ट्र निर्मिती नंतर 1960 पासून ते आजपर्यंत. मराठी चित्रपट सृष्टीचा धावता आढावा घेतल्यास 1932 ते 1960मध्ये बरेच प्रयोग मराठी चित्रपट सृष्टीने केले. यामध्ये मनोरंजन, सामाजिक, वैचारिक विषयांवर अनेक मुकपट आणि बोलपट आलेत.  50 चे दशक मराठी चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने महत्वाचे दिसते. 1953 मध्ये साने गुरूजीच्या कथेवर आधारित असणारा अत्रेने दिग्दर्शीत केलेला ‘श्यामची आई’ या चित्रपटास राष्ट्रपती पदकाचा सन्मान मिळाला. ‘महात्मा फुले’ हा ऐतिहासिक चित्रपटही अत्रेंनी दिला.   1959 ला अनंत माने यांचा ‘सांगते ऐका’ या मराठी चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला वेगळे वळण दिले.

 या चित्रपटातील बुगडी माझी सांडली ग....... या गाण्यामध्ये जयश्री गडकर यांची अदा आजही प्रेक्षकांना घायाळ करते, असे डॉ. गगरानी म्हणाल्या.

70 च्या च्या दशकात आलेला ‘पिंजरा’ आणि ‘सोंगाडया’ या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. याच दशकात दादा कोंडके यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे आकर्षीत केले होते. तर देवकीनंदन गोपाला, सिंहासन, जैत रे जैत,  सामना या सारखे वैचारिक सिनेमेही आलेते. महाराष्ट्र शासनाने 1975 मध्ये करपत्तीची योजना आणली. पुढच्या टप्प्यात करमणुक कर माफ केला. अलीकडे मराठी चित्रपटांना अनुदानही देण्यात येत आहे, असे ही डॉ. गगरानी यांनी सांगितले. 80 च्या दशकात कौटुंबिक विनोदी मराठी चित्रपटांचे होते. विनोदी चित्रपटांसह शापीत, उंबरठा, मुलगी झाली हो, कळत-न- कळत, आक्रीत, अरे संसार संसार यासारखे चित्रपटही तयार झाले.

21 व्या शतकाच्या सुरवातील श्वास या मराठी चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला ऑक्सीजन दिल्याचे दिसते.  यानंतर दहावी फ, पकपकाप, टिंग्या, वळू, किल्ला, कायदयाचे बोला, देऊळ, कोर्ट,  कासव, निशाणी डावा अंगठा, सुंभराण, बालक-पालक, मी शिवाजी राजे बोलतोय, वास्तुपुरूष यासारखे अनेक विविध विषय हाताळणारे त्यांच्या मांडणीमध्ये वैविध्य असणारे अनेक चित्रपट दिले.

फ्लॅशबॅक’ कोल्हापूर चित्रपट सृष्टीचे

फ्लॅशबॅक हे तंत्रच कोल्हापूरात विकसित करण्यात आले. यासह मराठी चित्रपट सृष्टीमुळे हिंदी चित्रपट सृष्टीला सामाजिक चित्रपट निर्माण करण्याची प्रेरणा दिली. मराठीमधील पहिला वास्तवादी चित्रपट म्हणुन   ‘सामाजिक पाश’ हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये फॅल्शबॅक तंत्र दाखविले होते. याची सुरूवात बाबुराव पेंटर यांनी केली.

बाबुराव पेंटरचे चित्रपट सृष्टीला अमुल्य योगदान कला महर्षी बाबुराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीचा घेतलेला ध्यास पुर्ण केला. बाबुराव पेंटर हे उत्तम चित्रकार आणि, तंत्र विशारद  होते. 1 डिसेंबर 1917 मध्ये  त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी सुरू केली. या कंपनीचा ‘सैरंद्री’ पहिला कलात्मक चित्रपट होता. या चित्रपटांचे वैशिष्टये म्हणजे हा चित्रपट स्वत: पेंटर यांनी बनविलेला कॅमे-याने म्हणजे स्वदेशी कॅमे-याने चित्रित झालेला होता.  लोकमान्य टिळकांनी हा सिनेमा बघ‍ितल्यावर  पेंटरांना  ‘सिनेमा केसरी’ हा खिताब देऊन गौरव केला होता.

श्री पेंटर यांचे चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदामध्ये कॉमे-याला गती देणारे स्पीड मीटर, फिल्म वाढण्यासाठी फिल्म केम‍िकलमध्ये असणारे पत्र्याचे ड्रम, वाळण्यासाठी असणारे लाकडी ड्रम प्रिटिंग मशीन , जॉयनिंग (संकलन) मशीन, र‍िफे्लक्टरचा वापर, कृत्रीम विजेच्या सहायाने चित्रिकरणाची सुरूवात त्यांनी केली.

चित्रपटांची जाहिरात करण्यासाठी पोस्टरर्सची सुरूवात बाबुराव पेंटर यांनी केली. पुढे जाहिरातींसाठी पोस्टर्स सर्वांनीच वापर केला. चेह-याचा नाजुकपणा दिसण्यासाठी गॉजचा वापर त्यांनीच सुरू केला.  यासह चमत्कृती दृश्यांचे चित्रिकरण करताना  मागच्या बाजुला पांढ-या पडदा लावून ते पात्र अंधातरी लटकून कॉमेराला गती देऊन फिरवून त्या चमत्कृती दृश्याला विशिष्ट इीफेक्ट दिला. ‘सिंहगड’ चित्रपटातील क‍िचक वधाचे चित्रिकरण इतके हुबेहुब होते की बॉम्बेच्या गव्हर्नर ने बाबुराव पेंटरवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारणे दाखवा नोटीस जारी केले होते.  तेव्हा मुंबईला जाऊन ते चित्रिकरण कसे करण्यात आले हे सांगितले. या चित्रपटापासून सिनेसृष्टीत सेन्सार  सुरू झाले असे म्हणायला काही हरकत नाही. ‘सिंहगड’ या चित्रपटाने सिनेसृष्टीत अनेक इतिहास रचलेच होते,  करमणुक कर देखील या सिनेमापासून सुरू झालेला आहे. पेंटर यांनी कला आणि तंत्रज्ञान प्रेमीची एक गुरूशिष्य पंरपराही निर्माण केली होती.व्ही.शांताराम यांनी 1 जुन 1929 ला प्रभात आणि पुढे राजकमल फिल्म कंपनी स्थापना केली.  या कंपण्यां माध्यमातून एकापेक्षा एक मराठी आणि हिंदी चित्रपट दिले. हिंदीतील पहिला बोलपट आलम आरा या चित्रपटात ज्यांनी प्रमुख भुमिका केली होती ते विठ्ठल भारगीर हे कोल्हापूरचे. पुढे त्यांना चित्रपट सृष्टीचा ‘इंडियन डगलस’ असे ओळखले गेले. वी.शांताराम यांनी ‘सैरंद्री’ चित्रपट बोलपट बनवून तो रंगीत पणे प्रदर्शित केला होता. हा प्रथम रंगीत चित्रपट ठरला. यासह या चित्रपटाची पहिली ध्वनी मुद्रिका ही वी.शांताराम  दिली आहे.

स्टुडियोची  नगरी कोल्हापूर.. 

काळाच्या ओघात बरेच बदल घडले, कोल्हापूरची कला पंरपरा अखंडीत राहवी आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी राजा छत्रपती राजाराम यांनी  कोल्हापूर सिनेटोन आणि त्यांच्या भगिणी  अक्कासाहेब महाराज यांनी शालिनी सिनेटोनची सुरूवात केली. आताचे जयप्रभा आणि शालिनी सिनेटोन स्टूडियो कोल्हापूर संस्थांनामार्फत बांधण्‍यात आले.

भालची पेंढारकरांनी प्रभाकर स्टुडियो, शालिनी सिनेटोन हा स्टूडियो देवासच्या राजाकडून वी. शांताराम यांनी लीजवर घेऊन या स्टूडियोचे नाव शांताकीरण असे केले. पुढे कोल्हापूरात राज सिनेटोन, छत्रपती सिनेटोन, प्रभात सिनेटोन, श्याम सिनेटोन, श्याम शिवाजी सिनेटोन, माया सिनेटोन, लता मंगेशकरांचे सुरेल चित्रण आणि दिनकर पाटीलांचे उदय कला चित्र,अनंत मानेंच चेतना चित्र, यासारख्या अनेक चित्रपट कंपन्या कोल्हापूरात आजही आहेत. पुढे पुण्यातील स्टूडियो बंद पडल्यावर हा ओघ कोल्हापूरकडे वळलेला दिसतो. चित्रपट निर्मितीसाठी कोल्हापूरमध्ये येऊन अनेकांनी चित्रपट निर्माण केलेले आहेत.  कोल्हापूराचे निर्सग सौंदर्य, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपलब्धतेमुळे कोल्हापूर के चित्रपट निर्मितीसाठी आवडते केंद्र बनले होते. 1984 मध्ये शासनाकडून पाठपुरावा करून चित्रनगरी वसवली. मधल्या काळात अनेक स्थिंत्यतरे झाली. मात्र, पुन्हा एकदा चित्रनगरीने भरारी घेतली आहे. आता येथे मराठी आणि हिंदी सिलीयल आणि चित्रपट निर्मिती होत आहे.

कोल्हापूराचे सिनेसृष्टीमधील योगदानाचा आढावा घेतल्यास एक-पेक्षा एक व्यक्तीमत्व कोल्हापुरने दिले आहेत. यामध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर, वी.शांताराम, भालजी पेंढारकर, बाबुजी पेंटर, सुधीर फडके, ग.दी. माडगुडकर, दत्ता डावजेकर, जगदीश खेबुडकर, त्यागराज पेंढारकर, जी. कांबळे, आशुतोष गोवारीकर, उषा जाधव, अंनत काळे, ऑसकर विजेता भानु अथैया अशी न संपणारी यादी आहे. हिंदी चित्रपट सृष्टीचे शो मॅन मानले जाणारे राज कपूर यांची कारकीर्दही कोल्हापूरातून सुरू झाली, पेंढारकरांच्या ‘वाल्मीकी’ या चित्रपटात नारदाची छोटीशी भुमिका करून चित्रपट सृष्टीत पर्दापण केले. या चित्रपटासाठी त्यांना मानधन मिळाले होते.  असेही  डॉ. गगराणी यांनी सांगितले. महात्मा गांधीच्या हत्येनंतर बेचिराख झालेला जयप्रभा स्टूडियो फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभा करून नव्याने चित्रपट निर्मिती भालजी पेंढारकर यांनी केली , असा ध्यास त्याकाळातील लोकांमध्ये होता असे, डॉ. गगराणी म्हणाल्या.

अंजु निमसरकर/ वृत्त क्रमांक 139/ 10.05.2021

                                       ***************************

आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic  

 

 

 

Sunday, 9 May 2021

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत चित्रपट अभ्यासक डॉ. कविता गगरानी यांचे व्याख्यान 'चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान' या विषयावर गुंफणार 43 वे पुष्प


 

नवी दिल्ली दि. 9 मे : चित्रपट सृष्टिवरील अभ्यासक डॉ. कविता गगरानी  या उद्या दिनांक 10 मे रोजी महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत महाराष्ट्राच्या 'चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान' या विषयावर 43 वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला 1 मे रोजी 61 वर्ष पूर्ण होत आहेत आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे . या निमित्ताने परिचय केंद्राने 19 मार्च 2021 पासून महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु केली आहे . या व्याख्यानमालेत 10 मे रोजी सायंकाळी 7 वाजता चित्रपट अभ्यासक,  संशोधक  डॉ. कविता गगरानी आपले विचार मांडणार आहेत.

डॉ. कविता गगरानी यांच्याविषयी

डॉ. कविता गगरानी या कोल्हापुरातील द न्यू कॉलेज येथे इतिहास या विषयाच्या सहायक प्राध्यापक आहेत.  त्यांचा   पीएचडी चा विषय  कोल्हापुरातील चित्रपट सृष्टी : ऐतिहासिक अभ्यासक्रम,असा होता.

श्रीमती गगरानी  या पुर्वी  शिवाजी विद्यापीठात इतिहास विभागात संशोधन अधिकारी म्हणुन कार्यरत होत्या.  श्रीमती गगरानी यांनी वेगवेगळ्या विषयावर जवळपास 100 लेख लिहिले आहेत. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषद, सेमिनारमधे त्यांची 50 रिसर्च पेपर प्रकाशित झालेली आहेत.

श्रीमती गगरानी या  कॉलेज, संस्था, कार्यालय, रेडियोमधे बरेच टॉक शो करतात. रॉबिन हुड आर्मीमधे रॉबिन म्हणुन काम पहातात. भालजी पेंढारकर कला अकादमीत सल्लगार म्हणुन आहेत. आतापर्यंत त्यांनी 11 युरोपीयन देशात भ्रमन्ती केली आहे.

समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

            सोमवार दि. 10 मे 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राच्या खालील लिंक वर थेट प्रसारित होईल.

थेट प्रसारण येथे पहा

ट्विटर

https://twitter.com/MahaGovtMic   

https://twitter.com/micnewdelhi   

https://twitter.com/MahaMicHindi   

यू ट्यूब

https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi    

फेसबुक

https://facebook.com/micnewdelhi   

कू (Koo)

https://www.kooapp.com/profile/micdelhi

 

                                       *******

Thursday, 6 May 2021

राजर्षी शाहू महाराजांचे संपूर्ण कार्य राष्ट्र बांधणीचे - डॉ जयसिंगराव पवार


 

नवी दिल्ली दि. 6 मे : धर्मभेद, वर्णभेद, जातीभेद आणि अज्ञान नष्ट करून जनतेमध्ये ज्ञान निर्माण करण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर केले, हे कार्य राष्ट्र बांधणीचे कार्य असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक, समाजप्रबोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले.

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत डॉ जयसिंगराव पवार  "छत्रपती शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता" या विषयावर 42 वे पुष्प गुंफताना बोलत होते.

यावेळी डॉ पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता हा विषय समजण्यासाठी आधी राष्ट्र समजुन घेतल पाहिजे. आपल्या सर्वांमध्ये  राष्ट्रीय, भावनात्मक, सांस्कृतिक, सामाजिक बंध आहे. या सर्व बंधांमधूनच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होत असते.

सामाजिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महात्मा फुले यांच्या पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरापर्यंत झालेले कार्य हे  राष्ट्रीय बांधणीचे असल्यामुळे यांना केवळ सुधारक न म्हणता राष्ट्रपुरुष म्हणायला पाहिजे.

महात्मा गांधींनी शाहू महाराजांना स्वराज्याचे संस्थापक मानले होते. कारण  शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात अस्पृश्यता नष्ट करून स्वराज्य निर्माण करण्याचे कार्य केले.राष्ट्रीय एकात्मता साध्य करायची असेल तर सर्वात प्रथम पारतंत्र्य नष्ट केले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्यांचा लढा असो वा समाजिक समतेचा लढा असो यासाठी राष्ट्रीय एकात्मता असने सर्वात महत्वाचे आहे यासाठी शाहू महाराजांनी पूरेपर प्रयत्न केला असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय एकात्मता  निर्माण करण्यासाठी सर्वात मोठे अडथळे हे पारतंत्र्यासह‍, धर्मभेद, वर्णभेद, जातीभेद, अज्ञान हे घटक आहेत. हे दूर करण्यामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, त्यात त्यांना यशही आले, असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

1894 ला शाहू महाराजांचा राज्यभिषेक झाला. त्यापुर्वी 1893 ला मुंबईमध्ये हिंदू-मुस्लिम दंगल झाली होती. शाहू महाराजांचा अभिनंदनाचा कार्यक्रम पुण्यात 1995 मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यात शाहू महाराज म्हणाले होते, हिंदू-मुस्लिम हे दोन्ही धर्मीय या देशाचे घटक आहेत, यापुढे अशी दंगल होता कामा नये अशी अपेक्षा त्यांनी याठिकाणी व्यक्त केली होती. 1857  साली हिंदू आणि मुस्लिम खांदयाला खांदा लावून लढले होते. या लढयातुन पूढे इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा अशी निती अवलंबली. शाहू  महाराज हे इंग्रजांचे मांडलिक असूनही  हिंदू-मुस्लिम ऐक्याची भाषा बोलत होते. शाहू महाराजांच्या आयुष्यात धर्मापेक्षा राष्ट्राला मोठे स्थान होते, असे डॉ पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय एकात्मते विषयी शाहू महाराजांचे विचार सांगताना डॉ. पवार म्हणाले, आम्ही सर्व हिंदी आहोत, या भुमीवर जन्म घेणारे कोणत्याही धर्माचे असो ते सर्व हिंदी आहेत, व्यक्तीच्या दृष्टीने धर्माची बाब महत्वाची असेल, मात्र राष्ट्राच्या हिताच्या अनुषघांने धर्म आड येता कामा नये, असे सार्वजनिक कार्यक्रमात शाहू महाराज म्हणाले होते. या विचाराना सोडून आजही राष्ट्र बांधले जाऊ शकत नाही. मुस्लिम आणि हिंदू लोकांचे पोषाख, आचार, विचार सर्व समानच आहेत. त्यामुळे मी केवळ हिंदूचा राजा आणि मुस्लिमांचाही राजा आहे, असे शाहू महाराज म्हणत असत. मुळ अरबीमध्ये असणारे कुराणाचा उर्दुत अनुवाद करण्‍यासाठी शाहू महाराजांनी त्याकाळी 25 हजार रूपये खर्च केले. कुराण हे सर्वाना कळावे अशी यामागची भावना असल्याचे डॉ. पवार यांनी सांगतिले.

पाठगावाच्या मौनीबाबाच्या मठातील उत्पनाचा काही भाग मशिदीला जोडून दिला होता. तर शिरोळला पीरबाबाचा दरगाहाचे उत्पन्न हे जवळच्या आंबाबाई देवस्थानाला जोडून दिले होते. यासर्वांमधून मशजिद आणि मंदिर काही वेगळी नाहीत हे त्यांना दाखवायचे होते. आजही कोल्हापूरात धार्मिक ऐक्य दिसून येते, मोहर्रम आणि गणपती उत्सव एकाचवेळीला असल्यास  दोन्ही सण मिळून साजरे करण्याची पंरपरा कोल्हापूरात आहे. हिंदू-मुस्लिमांचे ऐक्याचा धडा राष्ट्रापूढे शाहू महाराजांनी घालून दिला असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

जातीभेदाच्या पोटातच अस्पृश्यता आहे असे नमूद करून डॉ पवार म्हणाले, शाहु महाराजांना जातीभेदाचे मनोरे तोडायचे होते. त्यासाठी, त्यांनी आपल्या भाषणात जपानमधील समुराई वर्गाचे उदाहरण दिले होते, जपानमध्येही काही वर्ग उच्च व काही निम्न समजले जायचे मात्र, देशाची प्रगती व्हावी यासाठी जपानमधल्या समुराई वर्गाने आपले सर्व हक्क, आपली प्रतिष्ठा ही राष्ट्राच्या चरणी अर्पण करून सामान्य माणसासारखे जीवन जगायला सुरूवात केल्याचे त्यांनी जाहीर केले, त्यामुळेच एक विकस‍ित राष्ट्र एक बलदंड राष्ट्र म्हणुन जपानचा उदय झाला, असेच या देशात व्हावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे जाणुन शाहू महाराजांनी जाणीवपुर्वक प्रयत्न केले.

जातीभेदाचे सर्वात वाईट दर्शन आपल्याला अस्पृश्यतेमध्ये दिसते, असे शाहू महाराज म्हणायचे. कुत्रा, मांजर, डुकरे हे प्राणी माणसाला चालायचे  मात्र, हाडा मासाचा माणुस नाही चालत, हे अतीशय शोचणीय आहे. आपल्या देशात असणारा जातीभेद जगाच्यापाठीवर कोठेही नाही. ज्यारितीने अस्पृश्य लोकांना वागविले जाते, तशाप्रकारे जगात कुठेही माणसाला वागवले जात नाही. ही शरमेची बाब असल्याचे शाहू महाराजांनी अस्पृश्येच्या सभेत म्हणाले असल्याचे, डॉ. पवार यांनी सांगितले.  शाहू महाराजांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी स्वत: संस्थानातून सुरवात केली. हत्तीवरचे माहूत, गाडीचे ड्रायवर, शिकार खाण्यावर अस्पृश्यांना कामावर नेमले होते. येवढेच नव्हे तर, सोनतळीला असणा-या देवस्थानात त्यांनी पुजारीही नेमले होते. हे सर्व प्रयोग करताना यामागे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचीच भावना होती. शाहू महाराज म्हणायचे तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे महत्वाचे नाही. तुम्ही कोणत्या देशाचे आहात हे सर्वाधिक महत्वाचे आहे. त्तत्कालीन राजकीय लोकांना शाहू महाराजांनी सवाल केला होता जोपर्यंत सामाजिक स्तरावरील समानता या देशात येत नाही तोपर्यंत स्वातंत्र्यांला काही अर्थ राहणार नाही. राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी शिक्षण, जागरूकता, समंजसपणा, ज्ञानी होणे गरजेचे आहे. यासाठी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये शिक्षणावर एकूण मिळकतीचा सहावा भाग खर्च करीत असत. ते म्हणत जर माझी जनता शिक्ष‍ित झाली तर माझे राज्य मी सर्वसामान्यांच्या हातात देईल. असे, डॉ. पवार यांनी सांगितले. संविधानामध्ये अंतर्भुत असलेली  धर्मनिरपेक्षतेमुळे राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे. आज काही प्रमाणात देशाची स्थिती वेगळी आहे. काही वेळेला काही लोक आमचा धर्म श्रेष्ठ आणि इतर धर्म दुय्यम असल्यासारखे वागतात ते अंत्यत चुकीचे वर्तन असल्याचे डॉ. पवार म्हणाले. जर हे राष्ट्र आम्हाला टिकवायचे असेल तर आम्ही सर्वधर्माचे आहोत, आमचे राष्ट्र हे अनेक धर्मींयांचे  आहे, असे म्हणावेच लागेल. यासाठी आम्हाला शिक्ष‍ित व्हावे लागेल ज्ञान अर्जित करावे लागेल. महात्मा फुलेंपासून ते भाऊराव पाटीलांपर्यंत 97 टक्के लोक कसे शहाणे होतील यासाठी  शेवटीपर्यंत प्रयत्नरत राहीले.  यावरून ते किती दूरद्रष्टे होते हे लक्षात येते. 97 टक्के लोक जेव्हा धर्मनिरपेक्ष बुद्धीने वागतात तेव्हा देश धर्मनिरपेक्ष होतो. याचे मुल्याकंन होणे ही गरजेचे असल्याचे डॉ. पवार म्हणाले.

                                                   ***************************

आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic  


Wednesday, 5 May 2021

राजर्षी शाहू महाराजांचे स्त्री विषयक कार्य हे योध्दा सुधारकाचे : डॉ. मंजुश्री पवार


 

नवी दिल्ली दि. ५ मे : स्त्री शिक्षण, मुलींच्या लग्नाचे वय, विधवा विवाह तसेच आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह अश्या सर्वच पातळीवर राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य हे योद्धा सुधारकाचे होते, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ मंजुश्री पवार यांनी केले.

              नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत डॉ मंजुश्री पवार  " छत्रपती शाहू महाराजांचे स्त्री विषयक कार्य आणि सद्यस्थिती " या विषयावर ४१ वे पुष्प गुंफताना बोलत होत्या.

                   यावेळी डॉ मंजुश्री पवार म्हणाल्या, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण ही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी झाली. शाहु महाराजांचे वेगळेपण म्हणजे राजा असुनही त्यानी आपल्या राज दंडाचा वापर प्रत्येक घटकाला उन्नत करण्यासाठी  केला. महात्मा फुलेंनी महाराष्ट्रात समतेची बीजे पेरली. त्यांनी शुद्रातिशुद्रांना, स्त्रीयांना गुलामीच्या आणि अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्याचे कार्य केले. महात्मा फुलेंची ही पंरपरा खंडीत न होता ती शाहू महाराजांच्या कार्यातून प्रवाहीत होत राहीली. या कार्यात नवीन स्वातंत्र्य चळवळीचा प्रवाह येऊन मिसळलेला होता. ब्रिटीशांच्या मांडलिकत्वात राहून शाहू महाराजांनी केलेले कार्य हे  संपूर्ण भारतात अभिनव असे होते. शाहू महाराजांच्या काळातही समाज सुधारक होते, त्यांनीही कार्य केले मात्र, हे कार्य समाजाच्या वरच्या स्तराच्या सुधारणेचे कार्य होते. ते कार्य आडव्या स्वरूपाचे (Horizontal ) असे होते.  तर शाहू महाराजांनी केलेले कार्य हे उभे (vertical ) असे सर्व स्तरांना स्पर्श करणारे होते.

शाहू महाराजांनी दोन पातळयांवर स्त्री मुक्तीचे कार्य केले एक म्हणजे स्त्री शक्षित व्हावी यासाठी प्रयत्न केले तर दुसरीकडे स्त्रीयांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण व्हावे यासाठी त्यांनी केलेले कायदे. शाहू महाराजांनी जे स्त्री मुक्तीचे कार्य १९ व्या शतकाच्या सुरूवातीस केले ते २० व्या शतकातील स्त्री मुक्ती चळवळीचे प्रवेश व्दार आहे, असे डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या.

            शाहू महाराजांनी केलेले स्त्री मुक्तीचे कार्य हे जागतिक दर्जाचे होते, असे सांगुन डॉ पवार म्हणाल्या, जागतिक पातळीवर जेंव्हा उदारमतवादी स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, जहालवादी स्त्रीवाद आणि समाजवादी स्त्रीवाद अशी मांडणी केली जात होती, त्यावेळी शाहू महाराजांचे स्त्री मुक्तीचे कार्य हे उदारमतवादी स्त्रीवादामध्ये बसणारे होते.

            भारतीय स्तरावर जर पाहिले तर तीन कालखंड पडतात यामध्ये पहिला कालखंड  हा पुरूष सुधारकांनी स्त्रीदास्य विमोचनाचे केलेले कार्यदुसरा कालखंड स्त्री स्वातंत्र्यांचा कालखंड आणि तीसरा स्त्री जागृतीचा कालखंड आहे. शाहु महाराजांचे कार्य हे पहिल्या कालखंडात बसणारे असे आहे.

                                                         शिक्षणासाठी अनुदान..

               भारत स्वतंत्र्य होण्यापुर्वी भारतीय समाजात एक उतरंड  होती. त्यामध्ये उच्चवर्णीय हा इंग्रजांच्या गुलामगीरीतून स्वतंत्र होऊ इच्छित होता मात्र, खालच्या वर्गातील लोकांना आपल्या अधिनस्थ ठेऊ इच्छित होता. तसेच येथील बहुजनवर्ग उच्चवर्णियांच्या गुलामीतुन मुक्त होण्याचा प्रयत्न करीत होता मात्र, आपल्या घरातील स्त्रीयांना गुलाम ठेऊ इच्छित होता. ही उतरंड लक्षात घेऊन शाहू महाराजांनी  स्त्रीयांना शिक्षित करने हा त्यांच्या कारभारातील एक महत्वाचा भाग मानला. शाहू महाराजांनी त्या काळात प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा संस्थानात लागु केला होता. यासाठी त्यांनी आपल्या खजीन्यातील एक लाख रूपये खर्च केले होते ज्यामध्ये  स्त्री शिक्षण अंतर्भुत होते. तत्कालीन ब्रिशिट सरकाराने मुंबई इलाख्यासाठी ज्यामध्ये सिंध, गुजरात, कर्नाटक मिळून जो भाग होता येथील लोकांच्या शिक्षणासाठी एक लाख रूपयाहून कमी खर्च करीत होते.

                                                   मुली-प्रौढ - महिलांसाठी अभिनव उपक्रम

 सन  १९१७ मध्ये कोल्हापूरात २४ शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या १२९६ इतकी होती. शाहू महराजांच्या कार्याच्या परिणाममुळे या १९२१ मध्ये २४ शाळांची संख्या वाढून ती ४२० इतकी झाली आणि २२ हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले. पुढे शाहू महाराजांनी शिक्षणासाठी असलेली एक लाखाची तरतूद वाढवून तीन लाख रूपये केली.  यासर्वांचा सकारात्मक परिणाम स्त्री शिक्षणावर झालेला दिसून येतो. शाहू महाराजांनी केवळ शहरी भागातच नव्हे तर डोंगरी भागात, मागास भागात, ग्रामीण भागात मुलींच्‍या शाळा सुरू केल्या. त्या काळातील होणारे जातीभेद ओळखून जातीनिहाय मुला-मुलींसाठी शाळा सुरू केल्या. मुलींच्या शिक्षणात प्रगती व्हावी म्हणुन त्यांनी अभिनव उपक्रम राबविले. त्यामध्ये  मुलींची शाळेची  संख्या वाढल्यावर शिक्षकांना बक्षिस देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली होती. स्त्रीयांच्या प्रौढ शिक्षणासाठीही शाहू महाराजांनी कार्य केल्याचे दिसते. सन १९१९  मध्ये शाहू महाराजांनी मागासवर्गीय स्त्रीयांसाठी हूकूम काढून, ज्या प्रौढ स्त्रीयांना शिक्षण घ्यायचे असेल त्यांची राहण्याची, खाण्याची,  सर्व सोय राजवाडयामार्फत मोफत केली होती अशी माहिती डॉ. पवार यांनी यावेळी दिली.

            त्यांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाहाच्या वेळी कोल्हापूर सह देशभरातील हुशार मुंलीसाठी शिष्यवृत्त्या सुरू केल्या होत्या. शाहु महाराजांनी मुलींच्या  उच्चशिक्षणासाठीही प्रयत्न केल्याचे दिसते. कोल्हापूरमध्ये  फिमेल ट्रेनिंग स्कुल होते, त्याच्या प्रमुख या युरोपीय महिला मीस लिटील होत्या. त्या जेव्हा सेवानिवृत्त झाल्यावर रखमाबाई केळवकर या अंतत्य बुद्ध‍ीमान हुशार स्त्रीची नेमणुक केली. अल्बर्ट मेमोरियल संस्था काढून त्यातील स्त्रीयांच्या स्वतंत्र विभाग काढून त्यांचे प्रमुख पद हे स्त्रीलाच दिले होते. रखमाबाई केळवकर यांची कन्या कृष्णाबाई केळवकर यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली, होती वैद्यकिय शिक्षणासाठी मुंबईच्या मेडीकल कॉलेज मध्ये पाठविले होते, पुढे या कृष्णाबाईंना वैद्यकिय उच्च शिक्षणासाठी इंग्लंडलाही पाठीवले होते. अतरीकाबाई डॅनियल बेकर या इंग्रजी बाईलाही त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठविले होते. स्त्रीयांनी केवळ प्राथमिक शिक्षणच घेऊ नये तर उच्च शिक्षणही घ्यावे हे त्यांचे धोरण होते.

                                             स्त्रीयांच्या सर्वांगीन विकासाचा प्रयत्न..

 स्त्रीयांना सर्वांगांने कसे समृध्द करता येईल हा शाहूंचा विचार होता. त्यानुसार त्यांनी कार्यही केले. स्त्रीयांच्या राजकीय सहभागही वाढला पाहिजे यासाठी १८९५ मध्ये जेव्हा राष्ट्रीय कॉग्रेस राष्ट्रीय अधिवेशन होते, या सभेसाठी आपले प्रतिनिधी म्हणुन कृष्णाबाई केळवकर आणि व्दारकाबाई केळवकर या दोन महिलांना पाठविले होते.

शाहू महाराजांचा स्त्री उद्धाराचा जो परिघ आहे तो त्यांची सुन राणी इंदूमती यांच्याशिवाय पुर्ण होत नाही. राणी इंदूमती या वयाच्या ११ व्या वर्षी विधवा झाल्या होत्या. त्यावेळच्या सर्व रूढींना झुगारून त्यांची शिक्षणाची व्यवस्था सोनतळी येथे केली होती. राणी इंदुमतीमध्ये समतेचा संस्कार व्हावासाठी त्यांच्यासोबतीला महाराजांनी त्यावेळी वेगवेगळया जातीतील

  चार मुलींना सोबत ठेवले होते. इंदुमतीला केवळ पुस्तकी शिक्षण न देता चौफेर शिक्षण देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला होता. इंदुमतीला शाहू महाराजांनी पत्रे लिहीले होती, त्या पत्रात आपल्या सोबत असऱ्यांची काळजी घ्यावी, तसेच

          शिक्षणाचे महत्व सांगणारे असा संदेश त्यांनी दिला होता. इंदूमतींचे आयुष्य म्हणजे शाहु महाराजांची स्त्रीविषयक सुधारणा करण्याची प्रयोगशाळा होती. शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाची बीजे १९ व्या शतका-या सुरवातीस रोवली होती. त्यानुसार आज महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची दिशा अधिक प्रगत असायला हवी होती मात्र,आज इतक्या वर्षानंतरही तसे आश्वासक चित्र राज्यात विशेषत: ग्रामीण भागात  दिसत नाही याकडेही लक्ष वेधून हे चित्र बदलण्याचे प्रयत्न करने गरजेचे असल्याचे  आवाहन  डॉ. मंजुश्री पवार यांनी यावेळी केले.

                                                      स्त्रीमुक्तीसाठी कायदे...

 स्त्रीला जर पुर्ण  स्वातंत्र्य देण्यासाठी स्त्रीदास्य विमोचनाचे कायदे करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शाहू महाराजांनी ५ क्रांतीकारक कायदे केले होते. वर्ष १९१७ ला शाहु महाराजांनी  विधवा पुर्नविवाह कायदा केला, असे नमूद करून डॉ पवार म्हणाल्या, १९०१ च्या खानेसुमारीनुसार  ब्राम्हण जातीतील ५ वर्षाखालच्या १५,५०० विधवा होत्या, तर १५ वर्षाखाली ३ लाख २५ हजार विधावा होत्या आणि २५ वर्षाखाली २५ लाख ४० हजार विधवा होत्या. ही दाहकता बघून शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात विधवा पुर्नविवाहाचा कायदा केला होता. येवढे करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांची सुन इंदुमती पुढे ही पुर्नविवाहाचा प्रस्ताव ठेवला होता.

आतंरजातीय-आंतरधर्मीय विवाह कायदा हा शाहू महाराजांनी १२ जुलै १९१९ ला केला. त्यांनी आपल्या संस्थामध्ये मुलीच्या लग्नाचे वय १२ वरून १४ वर्ष केले होते, या कायदात एक कलम असेही होते, १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर लग्नासाठी मुलींना आपल्या पालकांची परवानगी घेण्याची गरज नाही. स्वतंत्र भारतात १९५५ ला असा कायदा करण्यात आला होता शाहू महाराजांचे कार्य हे किती काळाच्या पुढेच होते हे यावरून दिसते. याच काळात पटेल बील आले होते. ज्यामध्ये मुलीचे वय हे १२ वरून १४ करावे असे होते. त्तत्‍कालीन सनातनी व्यवस्थेन या बीलाला प्रखर विरोध दर्शविला होता. स्त्रीला माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार देणारा कायदा शाहु महाराजांनी केला होता. त्यांनी केलेला घरगुती छळ प्रतिबंधक कायदा म्हणजे स्त्री उद्धाराकडून स्त्री मुक्तीकडे जाणारा हा कायदा होता. अश्या स्वरूपाचा कायदा भारत सरकारने २००५ मध्ये सम्मत केला. जातपंचायतीकडे घटस्फोटासंदर्भातील अधिकार शाहू महारांजानी काढून घेतला होता. नको असलेला जोडदारापासून काडीमोड करण्याचा कायदाही शाहू महाराजानी स्त्रीयासाठी केला होता. समाजातील  स्त्री उतरंडीमध्ये सर्वात खालच्या वर्गात असणा-या स्त्री देवदासी, जोगतीनी, मुरळी, भावीनी यांच्यासाठी १९२० मध्ये कायदा केला आणि जोगतीनी ही प्रथा बंद केली. शाहू महाराजांनी केलेले कार्य स्त्री उत्क्रांतीच्या द‍िशेने केलेले कार्य आहे, असे डॉ. पवार म्हणाल्या.

                                        ***************************

आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic