Monday, 3 January 2022
राजधानीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
Thursday, 30 December 2021
साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान ; महाराष्ट्राच्या लेखिका सोनाली नवांगुळ आणि डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचा सन्मान
नवी दिल्ली, 30 : प्रसिध्द लेखिका सोनाली नवांगुळ यांना मराठी भाषेसाठी तर ख्यातनाम
लेखिका डॉ मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेकरिता आज साहित्य अकादमीचे मानाचे अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात आले.
हा
पुरस्कार आयुष्यातील महत्वाचा व आत्मविश्वास वाढविणारा असल्याच्या भावना श्रीमती
नवांगुळ यांनी व्यक्त केल्या असून डॉ. कुलकर्णी यांनी या पुरस्कारासाठी
महाराष्ट्रातील तमाम जनतेप्रती ऋणनिर्देश व्यक्त केले.
येथील कोपर्निक्समार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष 2020च्या अनुवाद पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते देशातील 24 प्रादेशिक भाषांतील अनुवादकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. ि
आयुष्यातील महत्वाचा व आत्मविश्वास वाढविणारा सन्मान – सोनाली नवांगुळ
देशभरातील २४ प्रादेशिक भाषेतील नामवंत साहित्यिकांसह मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीचा
मानाचा अनुवादाचा पुरस्कार प्राप्त करणे हा आयुष्यातील महत्वाचा व आत्मविश्वास
वाढविणारा सन्मान असल्याच्या भावना सोनाली नवांगुळ यांनी महाराष्ट्र परिचय
केंद्राशी बोलताना व्यक्त केल्या. अपंग व्यक्ती
दर्जेदार साहित्यनिर्मिती करू शकत
नाही अशा दृष्टीकोणातून बघितले जात नाही उलट त्यांना सहानुभूती दिली जाते. मात्र,
आपल्या मनात असले व आपल्या भाषेवर प्रेम
असेल तर अतिशय उत्कृष्ट कार्य आपण करू शकतो व त्याची शाबासकीही मिळू शकते हा
आत्मविश्वासच या पुरस्काराने दिल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती नवांगुळ यांनी अपंगत्वावर मात करत साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी तामीळ भाषेतून मराठीत अनुवादीत केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकासाठी सन्मानित करण्यात आले. लेखिका सलमा यांच्या ‘इरंदम जामथिन कथाइ’ या तामीळ भाषेतील कादंबरीचे मराठी अनुवादित ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाच्या ‘भारतातील लेखिका’ या लेखमालेतील 2015 मध्ये प्रकाशित पुस्तक होय.
पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार – डॉ. मंजुषा कुलकर्णी
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी केलेले समाज कार्य हे संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या आत्मकथनाचा संस्कृत भाषेत अनुवाद करणे महा खडतर असे कार्य होते. संस्कृत ही भारताचा आत्मा व्यक्त करणारी भाषा असून या भाषेतून व्यक्त झालेल्या कलाकृती चिरकालीन व अजरामर होतात म्हणूनच डॉ प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या आत्मकथनाचा ‘प्रकाशमार्गा:’ हा संस्कृत भाषेतील अनुवाद करण्याचे खडतर कार्य यशस्वीपणे पूर्ण केले. या कार्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील तमान जनतेचा व संस्कृततज्ज्ञांचे आभारही मानले.
डॉ कुलकर्णी यांची 25 पुस्तके प्रकाशित असून त्यांनी
दीर्घकाळ अध्यापन केले आहे. लेखिका, कवियित्री, व्याख्याता आणि निवेदिका म्हणून त्या प्रसिध्द आहेत तसेच त्यांनी
नाटयप्रयोगही केले आहेत.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश
भुयार /वि.वृ.क्र.
263 /दि.
30.12.2021
साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा : प्रणव सखदेव यांना मराठी भाषेसाठी पुरस्कार
Tuesday, 28 December 2021
सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक
Monday, 27 December 2021
‘सुशासन निर्देशांक अहवाल-२०२१’ मध्ये महाराष्ट्र देशात द्वितीय क्रमांकावर
नवी दिल्ली, 27 : कृषी व कृषी संलग्न क्षेत्र, मनुष्यबळ, सरकारी
पायाभूत सुविधा आणि समाज कल्याण व विकास
या क्षेत्रांमध्ये विविध 58 मानकांवर सरस ठरत महाराष्ट्र
राज्याने केंद्र शासनाच्या ‘सुशासन निर्देशांक अहवाल-२०२१ ’ मध्ये संयुक्त श्रेणीत द्वितीय स्थान मिळविले आहे.
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या प्रशासकीय सुधारणा व जन तक्रार निवारण विभागाच्यावतीने ‘सुशासन निर्देशांक अहवाल 2021’ तयार करण्यात आला असून नुकतेच केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा निर्देशांक जाहिर करण्यात आला.
महाराष्ट्राने या अहवालात ५.४२५ गुणांसह दुसरे स्थान मिळविले असून राज्याच्या समग्र प्रशासनात सकारात्मक बदल होत असल्याचे या अहवालात दिसून येते. एकूण १० क्षेत्रांमध्ये ५८ मानकांच्या आधारे करण्यात आलेल्या मुल्यांकणात महाराष्ट्राने कृषी व कृषी संलग्न क्षेत्र, मनुष्यबळ, सरकारी पायाभूत सुविधा आणि समाज कल्याण व विकास या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.
‘सुशासन निर्देशांक अहवाल 2021’ मध्ये सहभागी देशातील सर्व राज्यांपैकी 20 राज्यांनी गुणांकणाच्याबाबतीत सुधारणा केली आहे. यात गुजरात पाठोपाठ महाराष्ट्र आणि गोवा ही राज्ये पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश
भुयार /वि.वृ.क्र.
260 /दि.
27.12.2021
राजधानीत डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी
नवी दिल्ली, 27 : कृषी क्रांतीचे प्रणेते आणि शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती आज
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त शामलाल गोयल यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे , सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी तसेच उपस्थित पत्रकार यांनी यावेळी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
वि.वृ.क्र.
259 /दि.
27.12.2021
Monday, 13 December 2021
नवी दिल्ली, 13 डिसेंबर : आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतंर्गत सर्वाधिक लाभार्थी राज्य म्हणून महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याची माहिती आज केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत दिली.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (एबीआरवाय) अंतर्गत कंपन्यांकडून
प्राप्त झालेल्या अर्जांनुसार महाराष्ट्रातून एबीआरवाय मधून सर्वाधिक लाभ घेतला
असल्याचे श्री तेली यांनी सांगीतले. महाराष्ट्रातील एकूण 17,524 कपंन्यांमधील 6,49,560
कर्मचा-यांनी 4,09,72,34,366 इतकी रकम वर्ष 2019-20 ते आर्थिक वर्ष 2021-22 या
कालावधीत उचलली आहे. महाराष्ट्र पाठोपाठ
गुजरात, कर्नाटक या राज्यातील कामगारांनी रकम उचलली आहे.
केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)
दाव्यांच्या निपटा-यांची प्रक्रिया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ)
जानेवारी 2020 मध्ये सरु केली होती.
महामारी, पूर, भूकंप इत्यादी आपत्तीच्या वेळी इपीएफ
सदस्यांना अखंड सेवा देण्यासाठी इपीएफओ मध्ये मल्टी-लोकेशन क्लेम सेटलमेंट सुविधा सुरू
करण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे ईपीएफ सदस्यांना अखंड सेवा पुरवण्यात मदत झाली
आहे.
खासदार सदाशिवराव लोखंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट
Thursday, 9 December 2021
महाराष्ट्र शासनाच्यावतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
नवी
दिल्ली, 9 डिसेंबर : राज्यात स्थानिक
स्वराज्य संस्थेच्या होणा-या निवडणूका ओबीसी प्रवर्ग सोडून होऊ नयेत यासाठी राज्य शासनाच्यावतीने इतर मागासवर्गीयांच्या
(ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येणार असल्याची,
माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा
मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.
आज
कस्तुरबा गांधीमार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे श्री भुजबळ यांनी पत्रकार परिषद
घेतली. श्री भुजबळ यांनी सांगितले, ओबीसी प्रवर्गाला सोडून निवडणुक न व्हावी, यासाठी
राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी 13 डिसेंबरला सर्वोच्च
न्यायालयात न्यामुर्ती ए.एम. खानविलकर यांच्या खंड पीठापुढे बाजु मांडणार आहेत.
ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च 2021 ला
निर्णय दिला होता. मात्र, तरीही देशातील इतर राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये
संबधित राज्यांनी ओबीसी प्रवर्गाला आरक्षण दिले होते. महाराष्ट्र राज्यानेही
अध्यादेश काढून अन्य प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसींना 27 टक्के
आरक्षण दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक संस्थांच्या
ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. या निणर्यामुळे ओबीसी
प्रवर्गातील निवडणुक लढवणा-या उमेदवारांना निवडणुक लढविता येणार नाही. ओबीसी
प्रवर्गातील पात्र उमेदवार निवडणुक लढविण्यासाठी अपात्र ठरतील. असेही श्री भुजबळ यांनी
सांगितले.
जातनिहाय जनगणनेची माहिती (इम्पिरिकल डाटा) जी भारत सरकारकडे उपलब्ध आहे,
ती माहिती राज्य शासनास उपलब्ध करून देण्यात यावी, अशी बाजु राज्य शासनाकडून सर्वोच्च
न्यायालयात मांडण्यात येणार असल्याचे श्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
स्किलबुक एप हे ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा संगम : डॉ. ज्ञानेश्वर मुळे
स्किलबुक एप
प्रकल्पाचा देशार्पण सोहळा संपन्न
नवी
दिल्ली, 9 डिसेंबर : स्किलबुक एप हे ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा
संगम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी
केले.
नवीन महाराष्ट्र सदन येथे आज स्किलबुक एप चा देशार्पण
सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशी जिल्हा उस्मानाबाद येथे शिल्पनिदेशक ( कोपा) या
पदावर कार्यरत असलेले डॉ. किरण प्रकाश झरकर यांनी तयार केलेल्या स्किलबुक एप च्या देशार्पण
समारंभ कार्यक्रमात जगन्नाथ पुरी येथील गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्लानंद
सरस्वती यांच्यासह भारतातील विविध पंथांचे गुरू उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील
विविध ह.भ.प. प्रमुख मंचावर उपस्थित होती.
श्री मुळे म्हणाले, स्किलबुक एप हा विद्यार्थ्यांपासून
ते शेतक-यांपर्यंत प्रत्येकाला उपयोगी पडणारे महत्वाचे एप आहे. हा उपक्रम फेसबुक समाज
माध्यमांपेक्षा चारपट मोठा उपक्रम आहे. याचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा आणि
इतरांनाही करून दयावा, असे आवाहनही श्री मुळे यांनी यावेळी केले.
श्री. झरकर यांनी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्किल बुक या संगणकीय प्रणालीची निर्मिती केली आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारी
बदल करणारे स्किलबुक हे उपकरण विद्यार्थ्यांना व शेतक-यांना उपलब्ध करून
देण्यासाठी मुळे आण्णा सोशल फाउंडेशन, औरंगाबाद या संस्थेच्या मदतीने स्किलबुक हे
आंतरराष्ट्रीय दर्जाचे एप तयार करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या स्किल इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेला बळ देण्यासाठी डॉ. झरकर यांनी
गेल्या चार वर्षापासून स्किल बुक या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीवर संशोधन केले
आहे.
स्किल बुक हे एक कोटी विद्यार्थी व शेतकरी यांना एक
लाख कौशल्यांशी जोडण्याचे डिजिटल माध्यम आहे. मोबाईल एप्लिकेशन,
संगणक
वेबपोर्टल व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस या तिन्ही माध्यमातून ते उपलब्ध होणार आहे.
स्किल बुक या एप प्रणालीतून मुख्यत्वे विद्यार्थी व शेतकरी यांचे एक लाख कौशल्याचे
जाळे तयार करण्यात येणार आहेत. यात कौशल्य प्रकाशन, प्रशिक्षण,
अभ्यासक्रम,
प्रमाणपत्र,
नोकरी,
शिकाऊ
उमेदवारी, सेवा व स्टार्टअप या सुविधा सर्वांना
उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
स्किल बुक या प्रकल्पास स्मित किरण पब्लिशिंग प्रा. ली.
या कंपनीने स्टार्टअप इंडिया या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत तयार केलेले आहे.
या प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्यावतीने कंपनीस डिप प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले
आहे.
यावेळी कार्यक्रमास स्किल बुकच्या संचालिका, प्राचार्य डॉ. भारती
पाटील, तसेच विशेष निमंत्रीत करण्यात आलेले माहिती जनसंपर्क विभागाचे माजी संचालक
तथा न्यूज स्टोरी टूडे या आंतरराष्ट्रीय वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ आणि जेष्ठ दूध तज्ञ्ज अशोक कुंदप हे ही उपस्थित होते.