Sunday, 12 June 2022

महाराष्ट्र सदनातील सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांची मन जिंकली















    महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांच्या सांस्कृतिक वैभवाचे दिमाखदार प्रदर्शन  

 

नवी दिल्ली, दि. 12 : दालखाई, सिंगारी आणि बजासाल या ओडिशातील लोकनृत्यांचे बहारदार सादरीकरण, जोडीला महाराष्ट्राच्या लोककलांचे लेणे असणाऱ्या लावणी,भारुड,वासुदेव आदि लोककलांच्या तितक्याच आकर्षक सादरीकरणाने आज उभय राज्यांच्या सांस्कृतिक वैभवाचे दिमाखदार दर्शन दिल्लीकरांना घडले.

               प्रसंग होता,एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, दिल्लीस्थित महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त (.का.) डॉ निरुपमा डांगे यांच्या हस्ते झाले. सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार  यावेळी उपस्थित होते.

               केंद्र शासनाच्या एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान- प्रदानासाठी करार झाला आहे. या पार्श्वभूमीवर उभय राज्यांतील सांस्कृ‍तिक बंध अधिक घट्ट होण्याच्या उद्देशाने आयोजित आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील एकपेक्षा एक सरस सादरीकरणाने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.

                   ओडिशा सरकाराच्या संगीत नाटक अकादमीच्यावतीने प्रतिवा समूहाच्या १० आणि  सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने महाराष्ट्राकडून सांगली येथीलशाहीर शुभम विभूते आणि पार्टी यांच्या १५ कलाकारांनी या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमात उत्तमोत्तम सादरीकरण केले. या कलाकारांनी ‘सिंगारी’ या लोकनृत्याच्या माध्यमातून ओडिशातील  समृध्द आदिवासी परंपरेचे दर्शन घडविले. ‘बजासाल’ या लोकनृत्याच्या सादरीकरणातून ओडिशातील लग्नविधी प्रसंगी स्थानिकांकडून धरण्यात येणारा नृत्यावरील फेर उपस्थितांनी अनुभवला व टाळयांच्या कडकडाटात या सादरीकरणास त्यांची दाद मिळाली. राज्यातील बहुतांश भागात सण-समारंभावेळी सादर होणारे ‘दालखाई’ नृत्य व या नृत्याला वेगळया उंचीवर घेवू जाणारी पारंपरीक वाद्येही आकर्षणाचे केंद्र ठरले. ओडिशाच्या महिला कलाकारांनी परिधान केलेली खास पारंपरिक अवचपुरी साडी आणि कतरीया,बंदरीया,वगला या आभुषनेही आकर्षण ठरली.  

                शाहीर शुभम विभूते यांच्या चमुने गणेशवंदनेद्वारे महाराष्ट्राच्या लोककला सादरीकरणास  सुरुवात केली. पारंपरिक वेशभुषेतील या सादरीकरणानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात  भल्यापहाटे गाव जागवीत येणारी  वासुदेवाची स्वारी  ‘वासुदेव नृत्या’तून उत्तमरित्या मांडली.  आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणाऱ्या  भारुडाचे सादरीकरणही उपस्थितांची दाद मिळवून गेले. महाराष्ट्राच्या लोककलेतील मोलाचा दागीना असणाऱ्या लावणी नृत्याच्या बहारदार सादरीकरणाने सभागृहात एकच उत्साह संचरला. गौळण ,पोवाडा  आदी लोककलांच्या सादरीकरणानेही उपस्थितांची मने जिकंली.                  

                               0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो कराhttp://twitter.com/MahaGovtMic

रितेश भुयार /वि.वृ.क्र.87/दि.12.०६.२०२२


 

Thursday, 9 June 2022

Five Districts Felicitated With District Skill and Development Planning Awards Maharashtra Gets highest number of Honours






Five Districts Felicitated With District Skill and Development Planning Awards

Maharashtra Gets highest number of Honours

 

New Delhi, 9: Under the Ministry of Skill Development and Entrepreneurship’s, District Skill and Development Planning Competition for the year 2020-21, Maharashtra’s five Districts, Sindhudurg, Satara, Thane, Solapur and Washim were honoured with the ‘Awardsfor Excellence’ for their outstanding workdone in their District, today.

An Award ceremony was organized by Ministry of Skill Development and Entrepreneurship (MSDE) at AmbedkarBhavan.  The Secretary MSDE, Shri Rajesh Aggarwal presented a total of 30 Awards, in which a total of 30 Awards were presented. Of which, the highest number of five awards went to Maharashtra. Sharing the dais were, National Skill Development Corporation’s CEO, Vedmani Tiwari and Joint Secretary, Smt. AnuradhaVemuri.

The Awards for excellence in District Skill Development and planning was instituted under the SANKALP Project, which means, Skill acquisition and Knowledge awareness for livelihood promotion (SANKALP) by Ministry of Skill Development and Entrepreneurship (MSDE) in June 2018. The objective was to promote decentralized planning, acknowledge and reward the extraordinary and innovative work done by the Districts in the field of skill development.

Award For Excellence For Satara and Sindhudurg

After receiving the Award of Excellence, the SindhudurgDistrict collector, Smt. K. Manjulekshmi informed about various skill development initiatives undertaken for the year 2020-21, under DSDP. She said, the district had focussed mainly on the tourism sector, trained rural women in the hospitality sector, specific training in hospitality skills, language skills and cuisines, which yielded fruitful results and increase in incomes. Agro based industries mainly Devgad Alphonso, Bamboo training are some of the initiatives which were focussed upon, informed the collector.

Satara District was also awarded with the Certificate for Excellence.  The Collector, Shekhar Singh was pleased to receive the award and expressing gratitude towards the Chief Minister, he said that out of 467 districts, eight have been shortlisted for this prestigious recognition. The main focus is on agro-tourism, adventure, trained 450 Women who turned widows during Covid-19in the field of agriculture and training to healthcare workers in rural areas.

Certificate of Excellence ToWashim and Thane Districts

The Districts of Washim and Thane received the Certificate of Excellence Award for the Year 2020-21. Asssistant Commissioners, Smt. KavitaJawale and Smt. Sunandda Bajaj, Department of Skill Development and Employment Enterpreneurship from Washim and Thane received this honour at the hands of the Secretary, MSDE.

After receiving the Certificate of Excellence Award, Smt. Jawale apprised about the initiatives undertaken in Thane. She informed that the District’s 70% population falls under the age group of 15-30.  And Thane district is surrounded by rural, urban and tribal population.The main focus is on the youth, hence, a variety of specialized training activities are undertaken, else they would migrate to other districts in the quest for employment. The initiative of bringing the transgenders into the streamline is also taken care of, through various initiatives.

After receiving the Award, Assistant Commissioner, Smt. Sunanda Bajaj informed the office of Maharashtra Information Centre about the initiatives undertaken in the aspirational district of Washim. She said, the main industry of Washim is agriculture and agro based. The project ‘Hindu HrudaySamratBalasaheb Thackeray SamruddhiMahamarg’ passes through this district and we have generated employment for a number of young people.  For Jail inmates in the District, a variety of initiatives like baking, cookery and sheep rearing has been kept in focus to engage women inmates.

Letter of Appreciation To Solapur Districts

A total of 9 districts were felicitated with the letter of appreciation Award.  The Collector, Milind Shambharkar received this honour.  After receiving the award, he informed, Solapur is mainly known as a medical hub. The adjoining states and districts come here for their treatment. As a result, activities like training the youth and the local population under the DSDP initiative, people have been trained to handle medical related problems and employed in hospitals, processing of fruit related crops like bananas and grapes, softskill programmes has also been undertaken even during the Covid pandemic, he added


 

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची केंद्राच्या ‘कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत’ मोहर







महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. 9 : केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत(२०२०-२१)’ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाच जिल्ह्यांनी बाजी मारली. सातारा, सिंधुदुर्ग,ठाणे,वाशिम आणि सोलापूर या विजयी जिल्ह्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज येथे गौरविण्यात आले.

येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सभागृहात केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते‘ जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे’(२०२०-२१) पुरस्कार वितरित करण्यात आले. मंत्रालयाच्या सहसचिव अनुराधा वेमुरी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य नियंत्रण अधिकारी वेदमनी तिवारी यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६७ जिल्हयांतून विजयी ठरलेल्या ३० जिह्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये या यावेळी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील पाच जिल्हयांना तीन श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ‘उत्कृष्टता पुरस्कार’

‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत’ देशभरातून एकूण ८ जिल्ह्यांना ‘उत्कृष्टता पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले.यात सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना शेखर सिंह म्हणाले, उत्कृष्टता पुरस्कार श्रेणीत निवड झालेल्या देशातील ८ जिल्हयांमध्ये सातारा पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आहे.पुरस्काराचा मनस्वी आनंद असून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात मोलाचा वाटा आहे. कोविड महामारीच्या काळात केंद्र आणि राज्यशासनाच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जवळपास १ हजार कोविड फ्रंटलाईन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.साहसी खेळ, ग्रामीण व कृषी पर्यटनासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली. कोविडमुळे विधवाझालेल्या स्त्रिया आणि कातकरी समाजातील लोकांना येत्या काळात कौशल्य प्रशिक्षण देण्याचा तसेच ग्रामीण व कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

श्रीमती मंजूलक्ष्मी म्हणाल्या, राज्य कौशल्य विकास विभाग, जिल्हा कौशल्य विकास केंद्र आणि जिल्हयातील बचतगटांच्या उत्तम कार्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बचतगटांच्या महिलांना आदरातिथ्यक्षेत्रात प्रशिक्षण देण्यात आले.मालवण आणि वेंगुर्ला भागातील न्याहरी निवासांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच मत्स्यव्यवसाय,आंबा, काजू आणि बांबुवरील प्रक्रिया उद्योगाबाबत विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्याचे श्रीमती मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.

ठाणे आणि वाशिम जिल्हयांना उत्कृष्टता प्रमाणपत्र

या स्पर्धेंतर्गत देशभरातून एकूण १३ जिल्ह्यांना ‘उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले. यात ठाणे आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे आणि वाशिम जिल्ह्याच्या त्यांच्या समकक्ष सुनंदा बजाज यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
श्रीमती जावळे म्हणाल्या, ठाणे जिल्हा हा महानगर परिक्षेत्रात येतो व जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के लोकसंख्या की १५ ते ३० वयोवर्ष गटातील तरुणांची आहे. त्यामुळे तरुणांना केंद्रस्थानी ठेवून विविध कौशल्य कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. ठाणे जिल्हयात शहरी, ग्रामीण आणि आदिवासी अशा तिन्ही स्तरातील महिलांचे वास्तव्य आहे अशा महिलांचे स्थलांतर थांबविण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. येत्याकाळात जिल्हयातील तृतीयपंथींयासाठी कौशल्य विकासकार्यक्रम राबविण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्रीमती बजाज यांनी सांगितले, वाशिम हा आकांक्षी जिल्हा असल्याने व येथील बहुतांश उद्योग हे शेतीआधारित असल्याने जिल्हा कौशल्य नियोजन आराखडयात यासंबधी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा अंतर्भाव करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यातून ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग’ जात असल्याने बांधकाम क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. केंद्रशासनाच्या ‘संकल्प’ कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील महिलांसाठी बेकरी, पाककला आणि शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्याचे श्रीमती बजाज म्हणाल्या.
सोलापूर जिल्हयाला प्रशस्तीपत्र

देशभरातून एकूण ९ जिल्ह्यांना या स्पर्धेंतर्गत ‘प्रशस्तीपत्र पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले. या श्रेणीत सोलापूर जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
श्री. शंभरकर यांनी सांगितले, वर्ष २०२०-२१ चा जिल्हा कौशल्य नियोजन आरखडा तयार करून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. मेडीकल हब म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख असून महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून जिल्हयात रुग्ण उपचारघेण्यासाठी येतात. ही बाब लक्षात घेवून रुग्णांना गुणवत्तापूर्ण औषधोपचार देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. केळी, द्राक्ष प्रक्रियाविषयक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. तसेच ऑनलाईन सॉफ्टस्कील प्रोगाम यशस्वीपणे राबविण्यात आल्याचेही श्री शंभरकर यांनी सांगितले.
या स्पर्धेत देशभरातील ४६७ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाने पुरस्कार निवडीसाठी दिल्ली आणि खरगपूर आयआयटीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली होती.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वि.वृ.क्र. 85 /दि. 09.06.2022


 

Tuesday, 7 June 2022

Maharashtra Ranks Third In State Food Safety Index: Receives Award 11 Districts Awarded under GoI’s ‘Eat Right Challenge’ Initiative



 


New Delhi, 7:  Maharashtra has ranked third on World Food Security Day for its outstanding performance in food security.  The award was given by the Ministry of Health and Family Welfare, today.

On the occasion of World Food Safety Day, A award event was held in FDA Bhavan in New Delhi. This award was accepted by Food and Drug Administration Commissioner Parimal Singh at the hands of Union Minister, Mansukh Mandviya.

With an aim of creating a competitive and positive change in the food safety ecosystem in the country and to provide safe and nutritious food to the citizens, the 4th State Food Safety Index (SFSI) was organized by the Ministry of Health and Family Welfare at FDA Bhavan.  Maharashtra State ranked third in the country amongst 20 largest States. The Food and Drugs Administration Commissioner, Shri Parimal Singh received the Award at the hands of Union Health Minister, Shri Mansukh Mandviya. The first two States include Tamil Nadu and Gujarat.

Present on the occasion were all the senior dignitaries of all the States including the Maharashtra’s Joint Commissioner of FDA, Dr. Shashikant Kenkre and two other Assistant Commissioners.

The Index ranking of any State is determined on the basis of five parameters. The Human Resources and institutional, compliances made by the state, Food testing –infrastructure and Surveillance, Training and capacity and the Consumer Empowerment.  On the scale of 100, Maharashtra received 70, whereas the States of TN and Gujarat received 82 and 77.5 respectively.

After receiving the Award, Dr Kenkre spoke to the officials of state government.  He informed about the consistent efforts taken up by the Commissioner of FDA, Shri Parimal Singh.  He said, that the Commissioner’s personal intervention and constant follow up with all the State’s Officers concerned, went a long way to help the State government in getting this national recognition.  Adding further, he said that in the Year 2020-21, the State’s ranking in SFSI was 15th and this year we have reached on the third spot, which is commendable. The Award consists of a Citation and a Memento.

Eleven Districts Get Recognition Under ‘Eat Right Challenge’

To develop and execute a plan that supports a healthy, safe and sustainable food environment through adoption of various Eat Right Initiative. Under this initiative, Maharashtra’s eleven districts and cities were awarded under ‘Eat Right Challenge’. This challenge for districts is envisioned as a competition among districts to recognise their efforts in adopting and scaling up various initiatives under Eat Right India. In order to motivate states to develop a food strategy that supports healthy, safe and sustainable food environment through participation.

On the basis of parameters like increasing Licenses registration, Eat right campus, clean vegetables and fruits, clean eateries and lanes, Training of Aanganwadi sevikas, eleven cities and Districts were awarded today. These include, Mumbai, Mumbai Sub-urban, Pune Municipal Corporation, Mira-Bhayandar Municipal Corporation, Navi Mumbai Municipal Corporation, Thane Municipal Corporation, Solapur, Wardha, Aurangab, Latur and Nashik.

******************

Follow us on:  https://twitter.com/micnewdelhi

 AkAroraEngNews/07.06.2022

 


Thursday, 2 June 2022

महाराष्ट्र सरकार ने ऊर्जा क्षेत्र में किए कई नए बदलाव

 



 सकारात्मक बदलाव के चलते वर्ष 2021 का स्टार ऑफ गव्हर्नन्स स्कॉच अवॉर्ड घोषित

 

नई दिल्ली, 02 : महाराष्ट्र सरकार के ऊर्जा विभाग में नई तकनीकीओं का उपयोग कर राज्य के दुर्गम इलाकों में बिजली पहुँचाई जा रही है. साथही पिछले वर्ष में आई कई प्राकृतिक आपदाओं से भी विभाग जल्दही उभरकर आम जनता को बिजली पहुँचाने में सक्षम रहा है. इन सारे सकारात्मक पहलुओं के चलते महाराष्ट्र सरकार को वर्ष 2021 का प्रतिष्ठित स्टार ऑफ गव्हर्नन्स स्कॉच अवॉर्ड घोषित हुआ है. 

स्कॅाच ग्रुप 1997 से भारत की अग्रणी पूर्ण सेवा परामर्श संस्था है. यह संस्था विविध विषयों का राज्य निहाय  तुलनात्मक अभ्यास कर  रिपोर्ट प्रस्तुत करती है. वर्ष 2021 में ऊर्जा विषय अभ्यास में महाराष्ट्र ने उत्कृष्ट काम कर देश में अव्वल स्थान  हास‍िल किया है. ऐसा स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट 2021 दर्शाता है.

ऊर्जा विभाग ने किए ये बदलाव

 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण)  राज्य में दुर्गम भागों में अति उच्च दाब तारों का सर्वेक्षण तथा रखरखाव करने के लिए ड्रोन यंत्रणा का उपयोग किया जा रहा है. 

मुंबई उपनगर एवं शहरी भागों में जरूरी जगहोंपर पारेषण की पुरानी तारों को बदलकर नये तकनिक की एचटीएलएस कंडक्टर का उपयोग कर तारों की क्षमता बढ़ाई गई है. साथ ही मोनोपोल टावर का उपयोग शुरू किया गया है. इससे राईट ऑफ वे की समस्या में कमी आई है तथा लंबित परियोजना पूरा करने के लिए योग्य पर्याय उपलब्ध हुआ है.

हाई वोल्टेज प्रेशर सिस्टम (एचव्हीडीसी) योजना तहत कुल 1 लाख 29 हजार 546 कृषीपंपों को ऊर्जा मुहैय्या कराई गई है. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनातंर्गत राज्य में कुल 99 हजार 744 कृषीपंप खेतों मे लगाए गए है.

24 एप्रिल 2021 से शुरू हुई डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना के तहत अनुसूचित जाती, जनजाती एवं घुमंतु  परिवारों के लगभग 12 हजार 102 घरों में बिजली पहुँचाई गई है.

            इसके साथ 2020 में कारोना महामारी के चलते,  लॉकडाऊन काल में राज्य की जनता को अखंडित बिजली पहुँचाने  का संचालन किया गया है. इसी वर्ष 2020 में आए तौक्ते, निर्सग तुफान, तथा बाढ़ जैसी परिस्थ‍िती के तुंरत बाद आवश्यक जगहोंपर  विद्युत आपुर्ती की गई. इन सारे सकारात्मक कदमों के चलते राज्य को वर्ष 2021 के लिए स्टार ऑफ गव्हर्नन्स स्कॉच अवॉर्ड घोषित हुआ है.  विभाग के कॅब‍िनेट मंत्री डॉ नितीन राऊत ने विभाग के अधिकार‍ियों तथा कर्मचार‍ियों  को उनकेव्दारा किए गऐ अथक परिश्रमों की सराहना की है.

राजधानीत महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी






नवी दिल्ली, दि. :  शूर योध्दा, महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह  यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

             कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  यांनी  महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

              महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात  महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयात उपस्थित  कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

                                                0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

वि.वृ.क्र. 8/दि.०२.०६.२०२२

 

 


 

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी









नवी दिल्ली, दि. ३१ : प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक,राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांची  जयंती आज  उभय  महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

             कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात आमदार तथा राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री. जानकर यांनी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या अतुलनीय कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार यांच्यासह  उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या पुतळयास व  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

     महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांना अभिवादन

            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांच्यासह कार्यालयात उपस्थित  कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

                                                0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

 रितेश भुयार /वि.वृ.क्र. 82 /दि.31.05.2022

 

 


 

Wednesday, 1 June 2022

महाराष्ट्र में बनने जा रहा है डॉ. बाबासाहब आंबेडकर का सबसे भव्य स्मारक

 


मुर्ती की ऊँचाई 350 फिट रहेगी

नई दिल्ली, 01 जून : महाराष्ट्र की राजधानी मुंबई के अरबी समुद्र किनारेपर  भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर का सबसे भव्य स्मारक बनने जा रहा है. इस स्मारक में बाबासाहब आंबेडकर की 350 फिट उँची कांस्य की मुर्ती लगने वाली है.  लगनेवाली मुर्ती गाजियाबाद स्थित पद्मभूषण प्रख्यात मुर्तीकार राम सुतार बना रहे है. महाराष्ट्र सरकार के सामाजिक न्याय एवं विशेष सहायता विभाग की ओर से स्मारक बनने जा रहा है. इस कार्य का अब तक  75 प्रतिशत काम पुरा हो चुका है.   यह स्मारक मार्च 2024 तक  पूरा हो, ऐसी राज्य सरकार की मंशा  है.

            इस स्मारक के लिए लगभग 1100 करोड़ रूपयों का निधी का प्रावधान किया गया है. इसके लिए राज्यसरकार ने संशोधित  निधी को भी मंजुरी दी है. वर्ष 2022-23 के बजेट में इस स्मारक के लिए 200 करोड़ रूपयों का निधी उपलब्ध कराया गया है.  जिसमें से 28 करोड़ रूपये अब तक आवंटित  किए जा चुके हैं.  

ऐसी होगी स्मारक की खास‍ियत

संविधान के शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर का स्मारक मुंबईस्थित दादर  में  इंदु मिल की जगहपर बनने जा रहा है. मुंबई अंतरराष्ट्रीय स्तर का शहर है. महाराष्ट्र राज्य बाबासाहेब की कर्मभूमी रही है. मूलत: वे मराठी भाषिक थे. उनके प्रति श्रध्दा अर्पित करने के लिए तथा उनके किए गए सुधारवादी कार्यों को देश दुनियातक पहुँचाने के उद्देश्य से यह भव्य स्मारक बनाया जा रहा है. यह स्मारक केवल स्मारक न रहते हुए उनकेव्दारा किए गए  ऐतिहास‍िक कामों का लेखा जोखा रहेगा. जिसे नवप्रोद्योगिकता की सहायता से लोगों के सामने पेश किया जाएगा. जिसे देखकर लोगों में प्ररेणा और उमंग जागेगी .

इस स्मारक के लिए अत्याधुनिक नव प्रोद्योगिकता का इस्तमाल किया जा रहा है. लगभग सौ साल तक यह प्रतिमा यथास्थिती में रहेगी, ऐसा सरकार का नियोजन है. इस मुर्ती का वजन लगभग एक हजार टन रहेगा. यह कांस्य की मुर्ती रहेगी. 903 यह एक विशेष कांस्य धातु  है. जिसे मुंबई आयआयटीव्दारा मंजुर किया गया है.  इसमें 88 प्रतिशत कांस्य, 8 प्रतिशत टिन,और 4 प्रतिशत जिंक होता है. मुंबई के नमीभरे वातावरण का इस मूर्तीपर कोई असर नही होगा.  यह स्मारक अरबी समुद्र किनारेपर उभारने से प्राकृतिक आपदाओंसे आहत नही होगा इसका खास ध्यान रखा गया है. मुंबई का उमसभरा हवामान, समुद्री हवायें, समुद्री तूफान, हवा की गति तथा दिशा जैसे अनेक विषयों का ध्यान रखा गया है. इसी के साथ प्रतिमा की संरचनात्मक स्थिरता भी बहुत महत्वपूर्ण है. बाबासाहब की बहुतांश प्रतिमाएँ एक हाथ में संविधान की प्रत और दूसरे हाथ की ऊँगली सामने की दिशा की और इशारा करते हुए देखी हैं. यह विशालकाय प्रतिमा भी इसी तरह की है. इसलिए प्रतिमा के भीतर से क्रेन लगाकर विशेष व्यवस्था की जाएगी, जिससे  भविष्य में इस प्रतिमा का खंडन न हो सके.

 

यह स्मारक डॉ. बाबासाहब आंबेडकर के किए गए कामों का ज्वलंत उदाहरण रहेगा. हाल ही में राज्य के सामाजिक न्याय एवं विशेष सहाय्यता मंत्री धंनजय मुंडे तथा राज्य की शिक्षा मंत्री वर्षां गायकवाड ने गाजियाबाद स्थित राम सुतार आर्ट कपंनी में  भेट दी. यहीपर ही बाबासाहेब की विशाल प्रतिमा का कार्य तेज गती से चल रहा है.  श्री.मुंडे  ने इस प्रतिमा को मार्च 2024 से पूर्व पूर्ण करने के निर्देश संबंधितों को दिए है.

000000