Friday, 17 February 2023

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार को लेंगे शपथ


 


 

नई दिल्ली  17:   महाराष्ट्र के नवनियुक्त राज्यपाल के रूप में श्री. रमेश बैस शनिवार को कार्यभार संभालेंगे। उनका शपथ ग्रहण समारोह 18 फरवरी 2023 को दोपहर 12.40 बजे राजभवन के दरबार हॉल में आयोजित किया गया है ।

श्री. बैस शुक्रवार, 17 फरवरी, 2023 को शाम 5.45 बजे मुंबई हवाई अड्डे पर पहुंचेंगे और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहित गणमान्य व्यक्ति उनकी अगवानी करेंगे।

 

श्री रमेश बैस का परिचय

·         नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस तत्कालीन मध्य प्रदेश और वर्तमान छत्तीसगढ़ राज्य के साथ-साथ राष्ट्रीय राजनीति में एक सम्मानित नाम हैं।

·         संसदीय राजनीति, सामाजिक सरोकार और संगठन कार्य में पांच दशकों के लंबे अनुभव के साथ, श्री. बैस ने सार्वजनिक जीवन में नगरसेवक के पद से लेकर केंद्रीय राज्य मंत्री और राज्यपाल के पद तक विभिन्न जिम्मेदारियों को बखूबी निभाया है।

·         2 अगस्त 1947 को रायपुर (छत्तीसगढ़) में जन्मे रमेश बैस की शिक्षा रायपुर में हुई।

·         वर्ष 1978 में वे पहली बार रायपुर नगर निगम में पार्षद चुने गए। वे 1980 से 1985 तक मध्य प्रदेश विधान परिषद के सदस्य रहे। इस अवधि के दौरान, उन्होंने मध्य प्रदेश विधानमंडल की बजट समिति के सदस्य और पुस्तकालय समिति के सदस्य के रूप में कार्य किया है। वह 1982 से 1988 तक मध्य प्रदेश भारतीय जनता पार्टी के राज्य मंत्री भी रहे है।

·         वर्ष 1989 में श्री बैस पहली बार रायपुर से लोकसभा के लिए निर्वाचित हुए। सात बार लोकसभा के लिए चुने जा चुके हैं।

·         वर्ष 1998 में, श्री.रमेश बैस केंद्रशासन के मंत्रिमंडल में इस्पात और खान मंत्रालय में राज्य मंत्री थे।

·         1999 से 2004 में वे रसायन और उर्वरक राज्य मंत्री और उसके बाद सूचना और प्रसारण राज्य मंत्री के रूप में उन्होनें कार्य किया है।

·         वर्ष 2003 में श्री. बैस को केंद्रीय खान मंत्रालय में राज्य मंत्री का स्वतंत्र प्रभार संभाला है । वे केंद्रीय पर्यावरण और वन मंत्रालय में राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) रह चुके है।

·         अपने लंबे संसदीय जीवन के दौरान, श्री बैस ने पेट्रोलियम और प्राकृतिक गैस विषयक संसदीय समिति, लोक लेखा समिति, विद्युत मंत्रालय की सलाहकार समिति, कोयला और खान मंत्रालय की हिंदी सलाहकार समिति, नियम समिति के सदस्य के रूप में भी कार्य किया है।

·         वर्ष 2014 से 2019 तक वे सामाजिक न्याय और अधिकारिता पर संसदीय स्थायी समिति के अध्यक्ष थे। श्री बैस ने दिव्यांग व्यक्तियों के साथ-साथ तृतीयपंथी (ट्रांसजेंडर) व्यक्तियों के लिए अधिकार और सुरक्षा विधेयक के संबंध में व्यापक शोध और अध्ययन किया है।

·          29 जुलाई 2019 से 13 जुलाई 2021 तक त्रिपुरा के राज्यपाल रहे है। 14 जुलाई 2021 को वे  झारखंड के राज्यपाल बने ।

·         नवनियुक्त राज्यपाल श्री. बैस समाज सेवा में सक्रिय रहते हैं  तथा  उन्होंने अक्सर ग्रामीण क्षेत्रों में स्वास्थ्य शिविर, नेत्र परीक्षण शिविर और खेल प्रतियोगिताओं का आयोजन किया है। श्री. बैस छत्तीसगढ़ तीरंदाजी ओलम्पिक संघ के अध्यक्ष और  मध्य प्रदेश बीज एवं कृषि विकास निगम के अध्यक्ष भी रह चुके हैं।

·         श्री. रमेश बैस बहुआयामी व्यक्तित्व के धनी है ।

छत्रपति शिवाजी महाराज की जयंती से महाराष्‍ट्र गीत का स्वीकार -सांस्कृतिक मामला मंत्री सुधीर मुनगंटीवार



नई दिल्ली,  17 : छत्रपति शिवाजी महाराज की जयंती 19 फरवरी को पूरे राज्य में मनाई जाएगी। सांस्कृतिक मामला मंत्री सुधीर मुनगंटीवार ने जानकारी दी कि इस जयंती से "जय जय महाराष्ट्र माझा" राज्यगीत के रुप में स्वीकार किया जाएगा।

            1 फरवरी 2023 को सामान्य प्रशासन विभाग द्वारा जारी किए गए सरकारी निर्णय में महाराष्ट्र राज्य गान की घोषणा की गई है। सरकार व्दारा लिए गए निर्णय के अनुच्छेद क्रमांक 2 के अनुसार छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के उपलक्ष्य में  “जय जय महाराष्ट्र माझा” (जय जय महाराष्ट्र मेरा) महाराष्ट्र गीत अपनाया जाएगा।19 फरवरी 2023 को सुबह 10 बजे, सभी संबंधित वरिष्ठ अधिकारी और कार्यालय प्रमुख महाराष्ट्र राज्य का राज्य गान गाकर चित्र पर पुष्पांजलि अर्पित करें।  इस राष्ट्रगीत  के बाद  एक छोटा सांस्कृतिक समारोह के आयोजन के भी  निर्देश दिए गए है।

 


 

Thursday, 16 February 2023

संगीत नाटक अकादमी चा ‘उत्साद बिसमिल्ला ख़ाँ युवा’ पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातील 11 कलाकारांना सन्मानित

 



नवी दिल्ली , 16 : प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी चा ‘उत्साद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’  केंद्रीय  सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पखवाज, कथक नृत्य कलाकारांना आणि  संगीत वाद्य निर्माता यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात वर्ष 2019, 2020 आणि 2021 चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यातील एकूण 11 कलाकरांना याप्रंसगी सन्मानित करण्यात आले.

            येथील मेघदूत सभागृहात 14 ते 17 फेब्रुवारीपर्यंत अृमत युवा कलोत्सव 2022-23 सुरू आहे. यादरम्यान बुधवारी सायंकाळी ‘उत्साद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’  प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, उपाध्यक्ष जोरावरसिंग जाधव सचिव अनेश राजन यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी तीन वर्षांसाठी एकूण 102 युवा कलाकारांना  पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

वर्ष 2019 साठी लोकसंगीत श्रेणीतील योगदानासाठी राज्यातील विकास कोकाटे  यांना सन्मानित करण्यात आले.  वर्ष 2020 साठी तबला वाद्य बनविणारे किशोर व्हटकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संगीत वाद्य बनविण्याची श्रेणी नव्याने सुरू करण्यात आली असून श्री व्हटकर या श्रेणीतील पुरस्कार स्वीकारणारे प्रथमआहेत. वर्ष  2020 साठी हर्ष नारायण यांना सारंगी वादनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.  शाकीर खान यांना हिदुस्थानी वाद्य संगीत स‍ितार वादनासाठी सन्मानित करण्यात आले. एल. राम कृष्णन यांना कर्नाटक वाद्य संगीत (वायलिन) वादनात उल्लेखनिय कार्यासाठी सन्मान‍ित करण्यात आले. स्वप्नकल्पा दास गुप्ता यांना ओडिसा नृत्यातील त्यांच्या योगदासाठी गौरविण्यात आले. पवित्र कृष्ण भट्ट यांना भरतनाट्यम नृत्यातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

वर्ष 2021 साठी तमाशा या श्रेणीत सुप्रसिद्ध तमाशा कलाकार वैशाली जाधव यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. पंढरपूरात जन्मलेले ज्ञानेश्वर देशमुख यांना पखवाज वादनाच्या योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबईत जन्मलेले अहसान अली यांना नृत्यासाठी संगीत श्रेणीतील त्यांच्या योगदानासाठी गौरविण्यात आले.  मुंबईत जन्मलेले सुनील सुनकारा यांना कथक नृत्यातील समग्र योगदासाठी वर्ष 2021  च्या युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. संग्राम भंडारे यांना वारकारी कीर्तन या श्रेणीतील युवा पुरस्कार  जाहीर झाला होता. मात्र ते पुरस्कार सोहळयात उपस्थित होऊ शकले नाहीत.

            मूळच्या महाराष्ट्रातील वर्धेच्या गौरी देवल यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी या सध्या दिल्लीत स्थायिक असून  नाटय क्षेत्रातील एक सुपरिचित व्यक्तीमत्व आहेत.      

उत्साद बिसमिल्ला खान युवा पुरस्कार संगीत, नृत्य, नाटक, पांरपारिक(लोकसंगीत/आदिवासी/ नृत्य/संगीत/नाटक/ बोलक्या बाहुल्या) या श्रेणीतील युवा कलाकारांना कलेच्या योगदानासाठी पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाते. यासह परफॉर्मिंग आर्ट्स सादर करणाऱ्यांना ‘उत्साद बिसमिल्ला ख़ाँ युवा’  पुरस्कारातंर्गत  शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.  पुरस्कार प्राप्तीचे वय 40 वर्षापर्यंतचे आहे. पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे.  


‘आदि महोत्सवा’त महाराष्ट्रातील आदिवासींची दालने

 


आजपासून राजधानी दिल्लीत ‘आदि महोत्सव’ सुरू

 

नवी दिल्ली , 16 : राजधानी दिल्लीत आजपासून ‘आदि महोत्सव’ सुरू झालेला आहे. यात राज्यातील अदिवासी संस्थांची तसेच कारागीरांची दालने उभारली आहेत.

 

येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेड‍ियममध्ये आजपासून ‘आदि महोत्सवा’ची सुरूवात झाली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा उपस्थित होते. हा मेळा 27 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

 

आदि महोत्सवात 200 पेक्षा अधिक दालने आहेत. यामध्ये आदिवासी समाजातील समृद्धता आणि सांस्कृत‍िक पंरपरेचे दर्शन घडविले जाईल. हे वर्ष अंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष (भरडधान्य/ श्री अन्न) म्हणुन साजरे केले जात आहे. यातंर्गत येथे आदिवासी समाजात रोजच्या जेवणात वापरण्यात येणारे भरड धान्याचे दालने ही आहेत. यासोबत हस्तकला, हातमाग, मातीची भांडे, दागदागिने, अलंकार, सजावटीच्या वस्तू इत्यादी आदि महोत्सवाचे आकर्षण आहे.

 

राज्याच्यावतीने याठ‍िकाणी दालने उभारली आहेत. यातंर्गत तीन वारली चित्रकार कारागीर, जिल्हा गडचिरोली, तालूका धानोरा येथील दिपज्योती लोकसंचालित सधन वनधन विकास केंद्राच्यावतीने दोन दालने आहेत. यात आदिवासी समाज जीवनातील खाद्य पदार्थांचे दालने आहेत. एक आदिवासी शेतकरी उत्पाद‍ित कपंनीच्या वस्तुंची दालन आहे. आणखी एक ऑरगानिक वस्तुंच्या उत्पादनाची स्टाल राज्याच्यावतीने आहे.

 

सकाळी 11 ते रात्री आठपर्यंत आदि महोत्सव सुरू राहणार आहे. राज्याच्या दालनाला भेट देण्याचे आव्हान ट्रायफेडतर्फे यांनी केलेले आहे.

Wednesday, 15 February 2023

राजधानीत संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी

 

                



नवी दिल्ली , 15 : संत सेवालाल महाराज यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन  आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.  

 

            कॉपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी  निवासी  आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी  संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी  संत सेवालाल महाराजांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

 

                 महाराष्ट्र परिचय केंद्रात संत सेवालाल महाराजांना अभिवादन  

              

            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर  यांच्यासह  उपस्थित कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.                           

                                                         0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

वि.वृ.क्र. 32/ दि.15.02.2023

Tuesday, 14 February 2023

‘भारत रंग महोत्सवा’त दिल्लीसह अन्य शहरात 6 मराठी नाटके

 




नवी दिल्ली, 14 : प्रतिष्ठ‍ित राष्ट्रीय नाटक विद्यालयातंर्गत होणाऱ्‍ या 22 व्या ‘भारत रंग महोत्सवा’त दिल्लीसह अन्य शहरात 6 मराठी नाटके प्रस्तुत केली जातील. दिल्लीत 2, नाशिकमध्ये 3 आणि केवड‍िया येथे  1 असे एकूण सहा नाटके दाखविली जाणार आहेत.

22 वा भारत रंग महोत्सव मंगळवारपासून सुरू आहे. केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल, नाटक दिग्दर्शक तथा अभिनेते  राम गोपाल बजाज, अभिनेत्री आणि निर्माता वाणी त्रिपाठी टिक्कू, राष्ट्रीय नाटक विद्यालयाचे संचालक रमेश चंद्र गौर यांच्या उपस्थित‍ित कॉपरर्निकस मार्ग येथील कमानी सभागृहात मुख्य कार्यक्रम सोहळयाचे उद्घाटन होईल. यावर्षी दिल्लीसह अन्य दहा शहरात ‘भारत रंग महोत्सव’ साजरा होत आहे. दिल्ली, नाशिक आणि केवडिया (गुजरात) येथे  मराठी नाटक प्रस्तुत केले जाणार आहे.

दिल्ली येथे रविवार  19 फेब्रुवारीला सांयकाळी 6 वाजता  ‘शब्दांची रोजनिशी’  हे नाटक दाखविले जाईल. गुरूवारी  23 फेब्रुवारीला सांयकाळी 6.30 वाजता ‘मराठी कर्ण’ (दशावतार) हे नाटक दाखविले जाईल. हे दोन्ही नाटके कमानी सभागृहात दाखविले जातील.

नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने महाकवी कालीदास कलामंदीर सभागृह येथे  18, 20 तसेच 23 फेब्रुवारीला ‘संगीत मत्स्यगंध’, ‘विश्वामित्र’, ‘संगीत सुवर्णतुला’ ही नाटके प्रस्तुत केली जाणार आहेत.  केवड‍िया येथे गुजरात स्टेट संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने एकता सभागृहात 23 फेब्रुवारीला  ‘तेरव’ हे नाटक दाखविले जाणार आहे.   यासह महाराष्ट्रातील हिंदी नाटक समुहाचे नाटकेही दिल्लीसह अन्य शहरात दाखव‍िली जाणार आहेत.

Friday, 10 February 2023

राज्य की जनता के लिए 500 स्थलों पर 'आपला दवाखाना' - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


नवी दिल्ली, दि. 10: राज्य के सभी  नागरिकों को स्वास्थ्य सुविधाएं प्रदान करने हेतू, हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना'   खोलने की योजना सुरु करने का निर्णय लिया गया जिसके तहत, राज्य  मे 500 दवाखानों व्दारा नागरिकों को स्वास्थ सुविधा प्राप्त होने की जानकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दी।

          राज्य के हर तहसील में एक हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना'  खोलने हेतू गुरुवार को एक कार्यक्रम आयोजित किया गया। इस समय मुख्यमंत्री श्री. शिंदे बोल रहे थे। | यह कार्यक्रम शासकीय अतिथीगृह सह्याद्री में आयोजित किया गया था। इस अवसर पर वाशिम जिले के रिसोड स्थित 'आपला दवाखाना'  (हमारा अस्पताल)  का प्रतिनिधिक रूप से उद्घाटन किया गया।

          जनस्वास्थ्य मंत्री प्रो. डॉ. तानाजी सावंत, जल आपूर्ति एवं स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल, बंदरगाह मंत्री दादाजी भुसे, राज्य के आबकारी मंत्री शंभूराज देसाई, स्कूल शिक्षा मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, विधायक आशीष शेलार, भरत गोगावले, स्वास्थ्य विभाग के प्रधान सचिव संजय खंडारे आदि उपस्थित  थे ।

          मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा, मुंबई के बाद राज्य के हर तहसील मुख्यालय में 'आपला दवाखाना'  शुरू होगा और करीब 500 जगहों पर शुरू होगा. मुंबई में खोले गए "दवाखाना" को नागरिकों से सकारात्मक प्रतिक्रिया मिली। घर के नजदीक अस्पताल होने के कारण तुरंत इलाज की सुविधा मुहय्या कराई जाएगी। आगे जानकारी देते हुए उन्होने बताया की, इस अवधारणा को राज्य के तहसीलों  तक विस्तारित करने का सरकारी निर्णय लिया गया है।

000000000

Tuesday, 7 February 2023

आमदार निलेश लंके यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट


                      

नवी दिल्ली, 03 : पारनेर मतदार संघाचे आमदार श्री. निलेश लंके यांनी   महाराष्ट्र परिचय केंद्राला आज सदिच्छा भेट दिली.

 

परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक, अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री.लंके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

                यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे करण्यात येणारे कार्य, प्रका‍शित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाव्दारे देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणारा समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्रा मार्फेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली.  श्री. लंके यांना यावेळी “लोकराज्य” मासिकाची प्रत भेट करण्यात आली.

 

            श्री. लंके यांनी कार्यालयाची पाहणी केली.  ग्रंथालयात उपलब्ध असलेली पुस्तके तसेच दुर्मिळ हस्तलिखित दिवाळी अंकांची पाहणी केली. या हस्तलिखित दिवाळी अंकांचे डिजिटायजेशन केल्यास मराठी भाषिकांना दुर्मिळ अंक वाचायला मिळतील, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.  त्यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. महेंद्र पठारे, सतीश भालेकर, पोटघन मेजर यावेळी उपस्थित होते. 

Sunday, 5 February 2023

पुणे -नाशिक हाय स्पीड रेल्वे ला केंद्राची तत्त्वतः मंजुरी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




नवी दिल्ली, 5 : पुणे -नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

           श्री फडणवीस यांनी आज श्री वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. श्री फडणवीस म्हणाले, रेल्वे मंत्र्यांसोबत आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल असून त्यासाठी मंत्र्यांचे आणि केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले. लवकरच राज्य शासनाचे संबंधित कंपनी आणि केंद्राचे अधिकारी यांच्यात बैठक घेऊन पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबतच्या तांत्रिक बाबींना मूर्त स्वरूप देण्यात येईल असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

 महाराष्ट्राची दोन ऐतिहासिक शहर जोडण्याने  राज्याच्या विकासाला गती मिळेल

- केंद्रीय रेल्वे मंत्री

 

            पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची शहर आहेत. रेल्वेच्या माध्यमातून या शहराच्या आर्थिक स्थितीला गती मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुकही त्यांनी केले.   

 00000




 

Friday, 3 February 2023

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटींचा निधी : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव

 



नवी दिल्ली, 03 : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार 539 कोटी रूपयांच्या निधींची तरतूद केली गेली आहे.   राज्यातील 123 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येईल. यासह ‘बुलेट ट्रेन’  प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे  जमीन अधिग्रहणाच्या आवश्यक मंजूरीचे काम पूर्णत्वास झाले, असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज येथे दिली.

येथील रेल भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय रेल्वे मंत्री श्री वैष्णव बोलत होते. त्यांनी सांगितले, रेल्वेच्या दृष्टीकोणातून महाराष्ट्र हे एक महत्वाचे राज्य आहे. यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार 539 कोटी रूपयांची भरीव तरतूद केली गेली आहे.

महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल. यातंर्गत निवड केलेल्या  रेल्वे स्थानकांमध्ये  मुलभूत तसेच अद्यावत सुविधा पुरविण्यात येतील.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या  आधुनिकीकरणाच्या  कंत्राटाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होऊन त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी माहिती श्री वैष्णव यांनी दिली.  

‘बुलेट ट्रेन’ रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने  जमीन अधिग्रहणाच्या आवश्यक  मंजुरीचे  काम  पूर्ण झालेले आहे. मुंबई ते वापीपर्यंतच्या कामाचे कंत्राट दिले गेले आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गावरील बांधणी सुरू झालेली आहे.  वर्ष ऑगस्ट 2026 पर्यंत बुलेट ट्रेन धावणार असल्याचेही श्री वैष्‍णव यांनी यावेळी सांगितले.

अद्यावत तंत्रज्ञानयुक्त आणि सुविधापूर्ण असणाऱ्या ‘वंदे भारत’ रेल्वेची सुरूवात झालेली आहे. येत्या काळात अधिक संख्येने ‘वंदे भारत’ रेल्वे गाडया धावतील. तसेच,  50 ते 100 किलो मीटर अंतरावर असणाऱ्या दोन शहरांना जोडण्यासाठी, प्रादेशिक दळवळणाला अधिक गती देण्यासाठी  ‘वंदे मेट्रो’ नावाने गाडयांचे काम हाती घेतले असून ‘वंदे मेट्रो’ नजीकच्या शहरांना जोडणाऱ्या गाडया पुढील काळात दिसतील, असेही श्री वैष्णव यांनी सांगितले. याशिवाय हाड्रोजन रेल्वे भव‍िष्यात सुरू केली जाईल, सध्या जगातील दोन-तीन देशात हाड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे आहेत. भारतातही या दिशेने काम सुरू झाले असल्याची माहिती श्री वैष्णव यांनी दिली.

 मागील वित्त वर्षात जवळपास 250 रेल्वे डब्यांचा दर्जा वाढलेला आहे. यावर्षी 300 रेल गाडयांचे जुने डब्बे बदलून राजधानी दर्ज्याचे केले जातील, यावर काम सुरू असल्याचे श्री वैष्णव यांनी सांगितले. कवच (स्वंयचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली) आहे.  या प्रणालीत 5 जी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. कवच प्रणालीच्या वापराने अपघाताचे प्रमाण कमी होईल.  सध्या या प्रणाली अंतर्गत 4 हजार किलो मीटर चे काम सुरू आहे. येत्या वर्षभरात यात  पाच हजार किलो मीटरची भर होणार असल्याची, माहिती श्री वैष्णव यांनी यावेळी दिली.