Saturday, 31 March 2018

महाराष्ट्रातील ४ जिल्हे ठरले "महत्वाकांक्षी" नीति आयोगाची "ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टस" क्रमवारी जाहीर उस्मानाबाद देशात तिसऱ्या स्थानावर




नवी दिल्ली दि.३०:  पायाभूत सुविधा, शिक्षण कृषी, कौशल्य विकास, आरोग्य, आर्थिक समावेशन आदी निकषांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील १०१ जिल्ह्यांची रँकिंग नीति आयोगाने जाहीर केली आहे. या क्रमवारीत महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे.
           
देशातील मागास जिल्ह्यात स्पर्धेचे वातावरण निर्माण करून विकासाला चालना देण्यासाठी विविध स्तरावर मागास असलेल्या १०१ जिल्ह्यांची निवड  महत्वाकांक्षी जिल्हे रूपांतरण या कार्यक्रमासाठी करण्यात आली होती. जानेवारी २०१७ मध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारत छोडो आंदोलनाच्या ७५ व्या वर्धापन दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना, " देशात विविध निकषांवर मागास असलेल्या १०० जिल्ह्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारली तर देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असे म्हटले होते. या अनुषंगाने नीति आयोगाने  ट्रान्सफॉरमिंग ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टस हा उपक्रम सुरू केला.

अभिसरण, सहयोग व स्पर्धा हे धोरण
केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे अभिसरण व या योजनांच्या अंमलबजावणीत प्रभारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांचा सहयोग आणि या योजना अंमलबजावणीचे रूपांतर स्पर्धात्मक व लोक चळवळीत करणे या धोरणातून महत्वाकांक्षी जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी देशातील २८ राज्यातील ११५ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. ही निवड करताना आर्थिक समावेशन, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधा हे निकष ठरविण्यात आले होते.

उस्मानाबाद तिसऱ्या स्थानावर
नीति आयोगाने विविध निकषांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०१ जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर केली आहे यात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद हा जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. वाशीम हा जिल्हा ११ व्या, गडचिरोली जिल्हा १४ व्या स्थानावर तर नंदूरबार ३९ व्या स्थानावर आहे.

शैक्षणिक निकषांवर महाराष्ट्राची प्रगती
नीति आयोगाने विविध आठ शैक्षणिक निकषांवर देशातील जिल्ह्याचे मूल्यमापन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या टॉप २० जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर केली आहे या मध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्हा शैक्षणिक प्रगतीत दुसऱ्या स्थानावर आहे. गडचिरोली जिल्हा तिसऱ्या तर वाशीम पाचव्या स्थानावर आहे.

कृषी क्षेत्रात उस्मानाबाद चौथ्या स्थानावर
उस्मानाबाद हा जिल्हा कृषी क्षेत्रातील विविध निकषांवर देशातील टॉप 20 जिल्ह्यात चौथ्या स्थानावर राहिला आहे. कृषी क्षेत्रांतील कार्याचे मोजमाप हे विविध १० निकषांवर करण्यात आले , यामध्ये गुणवत्तापूर्ण बियाणे वाटप, माती, आरोग्य कार्ड, जनावरांचे लसीकरण, पीक विमा , बाजार उपलब्धता आदी निकषांचा समावेश होता.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा
http://twitter.com/micnewdelhi

Wednesday, 28 March 2018

येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ नवे पासपोर्ट सेवा केंद्र : डॉ. ज्ञानेश्वर मुळे


                                                                     नवी दिल्ली, २८ : येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ नवे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली.
        
देशातील नागरिकांना त्यांच्या जिल्हयातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पासपोर्ट आपल्या दारी या तत्वानुसार पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रात ७ तर देशभरात १७३ पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली असून  दुस-या टप्प्या अखेर येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ केंद्रांसह देशभरात २५१ पासपोर्ट सेवा केंद्रांचे उदिष्टय पूर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

                          ही असणार नवीन १३ पासपोर्ट सेवा केंद्र
पासपोर्ट आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत राज्यात १३ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची संपूर्ण तयारी झाली असून येत्या दीड महिन्यात ही केंद्र सुरु होणार आहेत. ही केंद्र सिंधुदुर्ग, लातूर, अहमदनगर, पंढरपूर सातारा, बीड, मुंबई नॉर्थ-सेंट्रल, मुंबई साऊथ- सेंट्रल, नवी मुंबई, डोंबिंवली, पनवेल, नांदेड आणि जळगाव चा समावेश आहे. 
                     गेल्या वर्षभरात राज्यात नवीन ७ पासपोर्ट सेवा केंद्र
जानेवारी २०१७ पासून सुरु झालेल्या देशव्यापी कार्यक्रमानुसार एप्रिल २०१८ अखेर पर्यंत दोन टप्प्यात एकूण २५१ पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहेत. या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत वर्धा, जालना, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत.
                तिस-या टप्प्यात  राज्यात उर्वरित पासपोर्ट सेवा केंद्र

 देशात दर ५० कि.मी. अंतरावर पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचे केंद्र शासनाचे उदिष्टय असून  २०१८-१९ या वित्तीय वर्षात पासपोर्ट तुमच्या दारी या कार्यक्रमाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये उर्वरित ठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मुळे यांनी दिली. पासपोर्ट विस्ताराच्या या कार्यक्रमामुळे देशातील सर्व सामान्य माणसाला  पासपोर्ट मिळणे सहज शक्य होणार असल्याचा विश्वासही डॉ. मुळे यांनी व्यक्त केला. 

      0000


Tuesday, 27 March 2018

महाराष्ट्राची ‘पैठणी’ आजिविका मेळयात आकर्षणाचे केंद्र - राज्यातील 14 बचत गटांचा समावेश




नवी दिल्ली, दि. २7 : महाराष्ट्राची ‘पैठणी’ सरस आजिविका मेळयात आकर्षणाचे केंद्र ठरत असून राज्यातील अन्य दालनालाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील एकूण 14 महिला बचत गटांचा समावेश या मेळयात आहे.

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने येथील प्रगती मैदानात सरस आजिविका-2018 मेळयाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध राज्यातील हस्तकला, लघुउद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध दालने याठिकाणी मांडली आहेत. राज्यातील ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत येणा-या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने येथे 14 दालने उभारण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्राचे पैठणी, कोल्हापूरी चप्पल, रत्नागिरीचा काजु, नासिकचे मनुके, भटकी चित्रकला, यवतमाळचे सुखे मशरूम, बांबुचे वस्तु, लाकडी सजावटीच्या वस्तु, कलात्मक रांगोळी, रत्न जडीत आभुषणे अशी वैविध्यपुर्ण चांदा ते बांदापर्यंतचे 14 बचत गटांचा समावेश याठिकाणी आहे.

आजिविका मेळयात गोंदिया जिल्ह्यातील तालुका सालेकसातील आरजू बचतगटातर्फे लाकडी साजवटीच्या वस्तु ग्राहकांचे लक्ष वेधुन घेत आहे. या लाकडी वस्तु सागवनापासून बनलेल्या आहेत. याशिवाय या वस्तुंचे वेगवेगळया सुटये तुकडे करून त्या वस्तु लगेचच जोडताही येते या सजावटींच्या वस्तुंची किंमतही माफक असल्याचे बचत गटाच्या रेखा भगत यांनी माहिती दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अमृता कदम यांच्या उद्योगिनी बचत गटातर्फे पारंपारिक दाग-दागिण्यांना ‘न्यु लुक’ देऊन देण्याचा प्रयत्न श्रीमती कदम करीत आहेत. त्यांच्या या अलकांराना खूप मागणी आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुकाच्या इंदिरा कांबळे यांचा दालनामध्ये सुखे मशरूम, मशरूमचे पावडर ठेवलेले आहेत. मशरूमामुळे शरीराला होणारे फायदयांचा फलकही त्यांनी लावलेला आहे. सुख्या मशरूमांची मागणी मोठया प्रमाणात असल्याचे ते सांगतात. त्यांच्या बचत गटात मशरूमवर प्रक्रियाकरून त्याला वाळविले तसेच त्याचे पावडर तयार केले जाते. हे वाळविलेले मशरूम किमान 8 ते 10 महिने टिकते. दिल्लीत प्रथम: संधी मिळाल्याचा त्यांना आनंद आहे. दिल्लीकरांचा प्रतिसाद थोडा अधिक वाढावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आधी बांबुने फक्त टोपली, परडी, सुप बनविणा-या गोंदिया जिल्ह्यातील सुमित बचत गटांच्या कलाबाई कुंमरे आता बांबुपासून विविध सजावटीच्या तसेच गृहउपयोगी वस्तु बनवितात. यामध्ये टेबल दिवे, पेन-पेन्सिल बॉक्स, अशा वस्तुंचा समावेश त्यांच्या दालनामध्ये दिसतो. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत त्यांना मिळालेले प्रशिक्षणामुळे त्यांना ही नवीन कला अवगत झाली असल्याचे ते सांगतात. हाताला नवीन रोजगार आणि संधी मिळाल्याचे त्यांनी व्यक्त केले.

भटक्या जमातीतुन मोडणा-या गोंदिया जिल्ह्यातील तालुका गोरेगाँवच्या योगिता मौजे यांचे ‘भटक्या चित्रकले’चे दालन सर्वांचे लक्ष वेधुन घेते. आदिवासी चित्रकला ‘वारली’ च्या धर्तीवर भटक्या समाजातील जीवनपद्धती त्यांच्या चित्रकलेतुन दिसते.

याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील गौतमी बचत गटाचे रंगोळी चे दालनही मेळयामध्ये आकर्षण ठरत आहे. त्यांच्या जवळ रांगोळीचे विविध छापे, पेन, साहित्य आहेत. नाशिकतील अपेक्षापुर्ती बचत गटातर्फे मनुके, गडचिरोली जिल्ह्यातीली चामोर्शीमधील दुर्गा बचत गटातर्फे अगरबत्ती, चंडिका बचत गटातर्फे काजू, वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामधील पशु उन्नती संसाधन केंद्रातर्फे साबन, निम तेल, औरंगाबाद जिल्ह्यातील रोहिदास बचत गटातर्फे नक्षीकाम केलेली कुर्ती आ तर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामधीले वैष्णवी बचत गटातर्फे सेंद्रिय तांदुळ, हळद, डाळी यांचे दालनालाही प्रतिसाद आहे. हा मेळा 1 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते सांयकाळी 8 पर्यंत असणार आहे.

Maharashtra’s Traditional Paithani Sarees Doing Rounds at SARAS













March 27:  ‘A poem in Silk And Gold’ is how one describes about the Royale traditional Paithani Saree of Maharashtra.  The saree which ages from Centuries, strongly endorsed by Queen Nilofer, the daughter-in-law of the then Nizam of Hyderabad, is doing rounds at SARAS- Aajeevika Mela 2018 at Pragati Maidan in New Delhi.

In a visit to this Mela on Tuesday, the rich, elegant Paithani Sarees were the centre of attraction.  Since, this is a hand woven saree, hence slightly costly, but, the Paithani stall at Hall No. 7 was inviting tremendous response.  The stall owner, Shri Giram from Paithan was happy while sharing this response with the officers of Maharashtra Information Centre.  Contented with his sales on the fifth day of the Mela, he said that he has also received customized orders.

The programme, Deendayal Antyodaya Yojana – National Rural Livelihoods Mission (DAY-NRLM) is one of the flagship programmes of the Ministry of Rural Development, Government of India to alleviate rural poverty. The programme aims to organize the rural poor women into their own institutions like Self Help Groups and their federations, Producers’ Collectives etc. and also ensure their financial inclusion and livelihoods support. The SARAS – Aajeevika Mela is one such platform, it has offered to rural artisans.

Maharashtra’s 14 Self Help Groups (SHGs) have participated in this Mela through Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM).  A wide range of products havebeen put on display-cum-sale at this mela.  Three stalls from Gondia, two each from Ratnagiri and Aurangabad, one each from Yavatmal, Kolhapur, Chandrapur, Nashik, Aurangabad, Wardha and Gadchiroli.

A variety of products have been put up for display-cum-sale.  Gonida’s Bamboo handicrafts, Gondia’s ‘Bhatki’ Adivasi paintings, Ratnagiri’s Cashews and imitation stone jewellery, Nashik’s raisins, neem oil, Yavatmal’s dried mushroom (Dingri) and mushroom powder, kolhapuri chappals, rangoli making devices, cowtherapy soaps and agarbattis, Gondia’s wooden showpieces are intricately decorated and catching the eye of the visitors.

महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १० हजार ६३९ घरे मंजूर





नवी दिल्ली, २७ : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) अंतर्गत महाराष्ट्रातील १५ शहरातील गरिबांसाठी १० हजार ६३९ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण ३ लाख २१ हजार ५६७ घरे मंजूर करण्यात आली आहेत.

        केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मंजुरी व देखरेख समितीच्या ३२ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील १५ शहरातील गरिबांसाठी ८६३ कोटींची गुंतवणूक आणि १५६ कोटींच्या सहाय्यासह १० हजार ६३९ घरे मंजूर करण्यात आली आहेत.
                            
                                            महाराष्ट्रातील या १५ शहरांचा समावेश

            राज्यातील पुणे शहर (पुणे), बार्शी (सोलापूर), कोल्हापूर शहर (कोल्हापूर), त्रिंबक (नाशिक), यावल (नाशिक), सिन्नर(नाशिक), जामनेर( अहमदनगर), बुलडाणा शहर (बुलडाणा), वरूड (अमरावती), अंमळनेर (जळगाव), चोपडा( जळगाव), मनमाड (नाशिक),लोहा (नांदेड), धर्माबाद(नांदेड) आणि पंढरपूर (सोलापूर) या शहरांमध्ये वर्ष २०१७-१८ साठी एकूण १० हजार ६३९ घरे मंजूर झाली आहेत.

 या बैठकीत १८ हजार २०३ कोटींची गुंतवणूक व ४ हजार ७५२ कोटींच्या सहाय्यासह देशभरातील ३५ राज्य व केंद्रशासीत प्रदेशांसाठी ३ लाख २१ हजार ५६७ घरे मंजूर करण्यात आली आहेत.

       0000


Friday, 23 March 2018

Gandhiji and Gadchiroli Are My Only Universities ---Dr. Abhay Bang







March, 23:  Mahatma Gandhi and  Gadchiroli are the only Universities where I learnt to serve the Humanity, expressed Padma Shri Dr. Abhay Bang during his interaction at Maharashtra Information Centre, here today.

In a function held recently at Rashtrapati Bhavan, Dr Abhay Bang and his life partner, Dr. Rani Bang was bestowed with the prestigious Padma Shri Award.  
After receiving this award, the office of Maharashtra Information Centre had organized an interaction session withDr. Bang and the media. Deputy Director, Dayanand Kamble presented a shawl, Shriphal and a bouquet to him.
Dr. Bang on Child Mortality Rate and Pneumonia
While sharing his varied experiences, Dr. Bang underlined many health related issues, the local inhabitants faced at Gadchiroli, which made them stick to the decision of not leaving the District and improving their health by finding the root cause of health issues. Highlighting some issues, the Doctor informed about the Child Mortality Rate and neonatal care. Since Gadchiroli is a Naxalite and an Adivasi district, factors like absence of required education, medical facilities, ignorance and illiteracy only contributed to the maladies further. However, with sincere efforts, sheer dedication, patience combined with Gandhian philosophies and medical experience, the duo dedicatedly worked incessantly in curbing the health issues.  He informed that, infant mortality emerged as one of the most pressing problems. In 1988, 121 newborn babies were dying out of every 1,000 births in the area, which has now reduced to 30 per thousand births, informed Bang. He trained a group of local women in the basics of neonatal care. 
Dr. Abhay Bang and his life partner, Dr. Rani Bang are the pioneers in bring to the notice of the world about the gyanecological issues faced by rural women. Their extensive research on Child Mortality and pneumonia, being major factors leading to child mortality, has severely brought the mortality rate down. Answering to media, he said the death rate here among children who developed pneumonia was 13%, which has considerably reduced with Dr Bang's intervention and has come down to 0.8%. Dr Bang has spent the last 30 years training up local volunteers in Gadchiroli, one of the most deprived districts in the Indian state of Maharashtra, to treat simple maladies at home.
Gadchiroli, a liquor –free District
Answering on rape cases, he cited liquor and tobacco to be the reasons for it.  At the same time, he did not forget to acknowledge his wife, Dr. Rani Bang’s struggle in making Gadchiroli a liquor-free District, and have launched a district program called 'Muktipath'to reduce tobacco and alcohol. He was all praises for his wife not forgetting to mention that, had she not been there around, it would have been impossible to bring out success in all his endeavors.
Dr. Bang pursued his Masters in Public Health from John Hopkins Institute, USA. After completion, however, he was determined to go back to his Alma Mater, Gadchiroli. For,this district had given him recognition, identity and had laid grounds for which the couple stands today.  He said, Gadchiroli has given me enough recognition, which otherwise might not have been possible for him, if he had been in any of the Metro Cities.  He further added that, one should go where one finds problems and not where there are facilities, because then we would not grow fully.
  Praises Maharashtra and GoI on Appreciating and Implementing their Research work
On answering about Maharashtra Bhushan Award, a thorough and a grounded gentleman, Dr. Bang said Maharashtra government gave us a lot of love and support. Even the Indian government appreciated us. For the first time in history, a couple is receiving an award. Rani and I have equally contributed.  Underlining the severity of health issues, he said the government should pay attention in the tribal areas from the health point of view. He also appreciated the GoI honouring the health related questions raised by the couple and he also informed that an Action Plan has been submitted to the PMO underlining the discrepancies implementing ASHA Campaign under National Health Mission.  He further informed that under ASHA, a total of 8 lakh ASHAs have been trained and are executing their duties effectively.
His selfless service to the rural inhabitants can be simply measured by the commendable results they have brought in through their extensive research. Moved by the need to improve health of the rural people, he and his wife Dr. Rani Bang, have founded the voluntary organisation, SEARCH, (Society for Education, Action and Research in community Health) 32 years ago and have developed a village health care program which has now become a nationally and internationally famous model'
Recalling his childhood memories, Dr. Bang reminisced walking past a rural village at the age of 13 with his brother and seeing that the inhabitants didn't have enough food and were sick. His elder brother, Ashok Bang and Abhay Bang discussed about future, where in Ashok said 'he would improve agriculture since he was older,' and Dr Bang said, he would improve the villagers’ health.
         The interaction was very inspirational leaving everyone spell bound.

गांधीजी आणि गडचिरोली हेच माझे विद्यापीठ - डॉ. अभय बंग




                        
नवी दिल्ली, २३ : महात्मा गांधी आणि गडचिरोली हेच माझे खरे विद्यापीठ आहे, ज्याद्वारे मी मानवतेचे शिक्षण घेऊन समाजकार्य करू शकलो असे उदगार पद्मश्री व महाराष्ट्र भूषण डॉ.अभय बंग यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात काढले .
             महाराष्ट्र परिचय केंद्रात आज डॉ. अभय बंग यांचा सत्कार व संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी, ते बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी डॉ. बंग यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. बंग यांच्याशी झालेल्या अनौपचारीक गप्पांमध्ये त्यांनी केलेल्या आरोग्य क्षेत्रातील वैविद्यपूर्ण कार्याला उजाळा मिळाला.

            वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन पत्नी डॉ.राणी बंग यांच्या साथीने गडचिरोली या नक्षलप्रभावीत व आदिवासी बहुल जिल्ह्यामधील ग्रामीण भागात 1986 मध्ये आरोग्य सेवा प्रदान करण्यास सुरुवात केली. या भागातील नवजात बालकांचे मृत्यु थांबविणे यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले. मूळ प्रश्नाचा गाभा शोधण्यासाठी विविध संशोधन केली. सर्च संस्थेची स्थापना करुन बालमृत्यू थांबविण्यासाठी आम्ही कामाला लागलो.

            न्युमोनिया हे नवजात बालकांच्या मृत्यूचे कारण असल्याचे आमच्या लक्षात आले. त्या दिशेने आम्ही संशोधन करुन बालमृत्यू रोखण्याची साधी पध्दत शोधून काढली. प्रत्येक गावात सर्च’  चे आरोग्य दूत निर्माण करुन बालमृत्यू चा दर कमी करण्याबाबत कार्य सुरु केले. सर्च’  च्या माध्यमातून सुरक्षित बाळंतपण, नवजात बाळाची काळजी, प्रभावी आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य सुरु आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करुन नवजात बालमृत्यू रोखण्यासाठी सर्च महत्वाची भूमिका पार पाडत आहे. सर्चच्या माध्यमातून 500 प्रशिक्षक निर्माण करण्यात आले व त्यांनी 8 लाख आशा कार्यकर्त्यांना  प्रशिक्षित केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी दारुबंदी, लैगिंक शिक्षण या क्षेत्रात केलेल्या कार्याची ही माहिती दिली.
या सर्व प्रवासात महात्मा गांधीजीचे विचार आणि गडचिरोलीच्या जनतेची साथ अंत्यत मोलाची ठरली म्हणूनच महात्मा गांधी व गडचिरोली हे आपले विद्यापीठ असल्याचे त्यांनी सांगितले.

                               डॉ. राणी बंग ख-या अर्थाने अर्धांगिनी

                   पत्नी डॉ. राणी बंग यांच्या साथीने गडचिरोलीतील कार्याला सुरुवात झाली. त्यांच्या सक्षम साथीमुळेच हे आभाळभर कार्य करु शकलो त्या ख-या अर्थाने माझ्या अर्धांगिनी आहेत अशा भावना डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केल्या. डॉ. राणी बंग यांनी  सर्च’  ला नवा आयाम दिला. स्वत: गावांगावांमध्ये जाऊन आरोग्य विषयक जागृती करणे,  कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे, तारुण्यभान  या कार्यक्रमाच्या माध्यमातून लैगिंक शिक्षणाविषयी जनजागृती करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. केंद्र शासनाने मला व पत्नी डॉ. राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार देऊन आम्हा दोघांच्या समसमान कार्याचे खरे कौतुक केले असेही  ते म्हणाले.

पद्मश्री पुरस्कार :  300 कार्यकर्ते व गडचिरोलीचा सन्मान

केंद्र शासनाने दिलेला  पद्मश्री या मानाच्या नागरी पुरस्काराचा आम्ही सन्माने स्वीकार केला असून हा सर्चच्या  300 कार्यकर्त्यांचा  व गडचिरोलीचा सन्मान आम्ही मानतो अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. गडचिरोली जिल्ह्यात आमच्या कामामध्ये येणा-या अडचणी व मर्यादा यामुळे आम्हाला सतत प्रेरणा मिळत गेली व काम करण्याचा उत्साह आला. म्हणून  आमच्यासोबत अहोरात्र व समर्पण वृत्तीने  कार्य करणारे सर्च चे कार्यकर्ते व गडचिरोलीवासी यांचाच हा पुरस्कार असल्याचे ते म्हणाले.    

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा व माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे तसेच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, दिल्लीतील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे मान्यवर, परिचय केंद्राच्या ग्रंथालयाचे सभासद, परिचय केंद्राचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 


महाराष्ट्रातील 10 वस्ती स्तर संघाला राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार











हिंगोलीतील 3 आणि वसई-विरारमधील 2 वस्ती स्तर संघाचा समावेश
नवी दिल्ली, २३ : महाराष्ट्रातील 10 वस्ती स्तर संघाला आज राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये हिंगोलीतील 3 आणि वसई-विरारमधील 2 वस्ती स्तर संघाचा समावेश आहे.

            येथील  प्रवासी भारतीय केंद्रात आज केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्रालयाच्यावतीने  दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजिविका मिशन (NRULM) या अंतर्गत कार्यशाळेच आयोजन करण्यात आले. यावेळी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता केंद्रीय शहरी व नागरी राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केली. यावेळभ्‍ सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील नगरपरिषद संचालनालयाचे संचालक डॉ. विरेंद्र कुमार सिंग उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रत्येक क्षेत्रातील सिटी मिशन व्यवस्थापन युनिटमधील सदस्यही उपस्थित होते.

            दिनदयाल अंत्योदय योजन राष्ट्रीय शहरी आजिविका मिशन अंतर्गत नगरपरिषदेच्या हद्दीतील स्वच्छता राखण्यासाठी वस्ती स्तर संघ नेमण्यात आलेले आहेत. यांना वस्ती संघांना कचरा गोळा करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, हगणदारी मुक्त परिसर करण्यासाठी प्रचार प्रसार करणे, वैयक्तीक तसेच सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी आणि वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे, सार्वजनिक शौचालयाची देखभाल करणे, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, त्याठीकाणी वृक्ष लागवड करणे, गांडुळ खत निर्मिती करणे अशी कामे सोपविण्यात आली होती, जाणीव जागृती मोहिम राबविणे, आरोग्य विषयी जागरूकता मोहीम राबविणे, अशी कामे सोपविण्यात आली होती. यामध्ये ज्यांनी सर्वच मापदंड पुर्ण केली अशा वस्ती स्तर संघांना आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
             यावेळी  देशभरातील उत्कृष्ट कार्य करणा-या वस्ती स्तर संघाला केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्री यांच्याहस्ते पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 10 वस्ती स्तर संघाचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील  हिंगोलीतील संभाजी वस्ती स्तर संघ, निरंजनबाबा वस्ती स्तर संघ, राजमाता जिजाऊ वस्ती स्तर संघ, भद्रावतीमधील उन्नती वस्ती स्तर संघ, वसई-विरार येथील मदीना वस्ती स्तर संघ, आधार वस्ती स्तर संघ अकोल्यातील राणी लक्ष्मीबाई वस्ती स्तर संघ, उदगीरमधील  विकास वस्ती स्तर संघ, मालेगावमधील मानसी वस्ती स्तर संघ, वर्धा येथील समता वस्ती स्तर संघ यांचा समावेश आहे.

Capital Pays Tributes to Bhagatsingh, Rajguru, Sukhdev on Martyrs Day







 March 23 : Every year, March 23 is observed as Martyrs Day, also known as “Shaheed Diwas”, as a tribute to the great Martyrs - Bhagat Singh, Rajguru & Sukhdev. This day was observed at Maharashtra Sadan as well.
          Investment & Protocol Commissioner, Lokesh Chandra, paid floral tributes to these great revolutionaries. Additional Resident Commissioner Samir Sahai, Assistanct Resident Commisisoner Suman Chandra, Rajeev Malik, other Officers and staff paid tributes to the Martyrs, who sacrificed their lives for Nation’s freedom.
          Floral Tributes paid by Maharashtra Information Center
          Maharashtra Information Center paid tributes to Bhagatsingh, Rajguru and Sukhdev on Martyrs Day. Deputy Director, Dayanand Kamble paid floral tributes to the trio, who fought for freedom & were martyred on this day. Public Relation Officer Amarjyot Kaur Arora, Information Officer Anju Kamble, Sub Editor Ritesh Bhuyar and all the staff paid tributes to the great freedom fighters.           

राजधानीत शहीदांना अभिवादन












नवी दिल्ली, २३ : भारतीय स्वातंत्र्य लढयात महत्वाचे योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त राजधानीत अभिवादन करण्यात आले.

कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव तथा   गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र  यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त  सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

                 महाराष्ट्र परिचय केंद्रात शहीदांना आदरांजली

स्वातंत्र्य लढयात प्राणांची आहुती देणा-या शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
 000000









Thursday, 22 March 2018

अजिंठा व वेरूळचा प्रतिष्ठित पर्यटन स्थळांच्या यादित समावेश













नवी दिल्ली, दि. २२ : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील जगप्रसिध्द अजिंठा व वेरूळ लेण्यांचा यादित समावेश आहे.

        केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे.अल्फॉन्स यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. देशातील महत्वाच्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरातील महत्वाच्या १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली आहे.

            यादित उत्तर प्रदेशातील ताजमहल आणि फत्तेपूर सिक्री, महाराष्ट्रातील अंजिठा व वेरूळ लेण्या, दिल्लीतील हुमायॅु मकबरा, कुतुबमिनार आणि लाल किल्ला, गोव्यातील कोळवा समुद्र किनारा, राजस्थानातील आमेर किल्ला, गुजरात मधील सोमनाथ मंदिर आणि ढोलाविरा, मध्यप्रदेशातील खजुराहो, कर्नाटकातील हंपी, तामीळनाडूतील महाबलीपूरम, आसाम मधील काझीरंगा अभायारण्य, केरळ मधील कुमारकोम आणि बिहार मधील महाबोधी विहाराचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती श्री अल्फॉन्स यांनी दिली.

                                                         ०००००

गेल्या १४ महिन्यात महाराष्ट्रातील ४ जिल्हयांत ४ हजार घरे




नवी दिल्ली, दि. २२ : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण(पीएमएवाय-जी) अंतर्गत गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद  आणि वाशिम  जिल्हयांमध्ये १४ महिन्यांत एकूण ४ हजार ३७० घरे बांधण्यात आली आहेत.

        देशातील जनतेला हक्काची घरे देण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेची (ग्रामीण) २० नोव्हेंबर २०१६ मध्ये सुरुवात करण्यात आली. यानुसार मार्च २०१९ पर्यंत देशात १ कोटी २ लाख घरे बांधण्याचे उदिष्टय ठेवण्यात आले. आजपर्यंत ५१ लाख घरे बांधून झाली असून उर्वरित घरे नियत वेळेत बांधण्यात येणार असल्याचे मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.   

           पीएमएवाय-जी योजनेंतर्गत देशातील ११५ महत्वाकांक्षी जिल्हयांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील चार जिल्हयांचा यात समावेश आहे. यामध्ये गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद व वाशिम  या जिल्हयांचा समावेश आहे. या जिल्हयांतील ग्रामीण भागात १४ महिन्यांत एकूण ४ हजार ३७० घरे बांधण्यात आली आहेत.
                                         नंदूरबार जिल्हयात सर्वात जास्त २३८७ घरे

        खान्देश विभागातील महत्वाचा व आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असणा-या नंदूरबार जिल्हयात सर्वात जास्त २ हजार ३८७ घरे बांधण्यात आली आहेत. जिल्हयात ६ तालुक्के असून अक्कलकुवा तालुक्यात ७०, धडगाव ४२, नंदूरबार ६९५, नवापूर ५३४, शहादा ७८० आणि तळोदा तालुक्यात आतापर्यंत २६६ घरे बांधण्यात आली आहेत.
            वाशिम जिल्हयातील ६ तालुक्यांमध्ये गेल्या  १४ महिन्यात १ हजार २५४ घरे बांधण्यात आली आहेत. कारंजा तालुक्यात ४२९, मालेगाव ३४५, मंगरूळपीर १६२, मानोरा ११९, रिसोड ५६ आणि वाशिम तालुक्यात १४३ घरे बांधण्यात आली आहेत.

            गडचिरोली या नक्षल प्रभावित व आदिवासी बहुल  जिल्हयातील १२ तालुक्यांमध्ये ९६५ घरे बांधण्यात आली आहेत. अहेरी तालुक्यात २०, आरमोरी २०८, भामरागड ७, चामोर्शी ९१, वडसा ११३, धानोरा ६०, एटापल्ली २, गडचिरोली ११३, कोरची १२३, कुरखेडा २०९, मुलचेरा ४ आणि सिरोंचा तालुक्यात १५ घरे बांधण्यात आली आहेत.

                दुष्काळ प्रवण उस्मानाबाद जिल्हयातील ८ तालुक्यांमध्ये ७६४ घरे बांधण्यात आली. भूम तालुक्यात ९९, कळंब ६९, लोहारा ६५, उमरगा ९४, उस्मानाबाद १७५, परांडा ८६, तुळजापूर १३९ आणि वाशी  तालुक्यात ३७ घरे बांधण्यात आली आहेत.
                                                                  00000000