Thursday, 30 August 2018

मुंबईत होणा-या व्हील चेअर क्रिकेट आशिया कप स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


                                      

                                                    
नवी दिल्ली, 30 : येत्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई येथे होत असलेल्या व्हील चेअर क्रिकेट आशिया कप स्पर्धेसाठी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन आज केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.
                 भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने नुकतेच श्रीलंका दिव्यांग क्रिकेट संघाचा २-१ असा पराभव करून टी२० मालिका जिंकली आहे. या पार्श्वभूमीवर श्री आठवले यांनी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघातील खेळाडूंचा आज सत्कार केला. यावेळी श्री. आठवले बोलत होते.
            डिसेबल स्पोर्टिंग सोसायटी अंतर्गत कार्यरत भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ आणि व्हील चेअर क्रिकेट संघाच्या विविध अडचणींबाबत यावेळी खेळाडूंनी श्री. आठवले यांच्या समोर विषय ठेवले. या सर्व विषयांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन श्री. आठवले यांनी दिले. तसेच, ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१८ दरम्यान मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हील चेअर क्रिकेट आशिया कप स्पर्धेसाठी’ केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन श्री .आठवले यांनी  दिले.      
    श्री आठवले म्हणाले, भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने श्रीलंका संघासोबतची  टी२० मालिका जिंकून मोठी उपलब्धी मिळविली आहे. या संघातील प्रत्येक खेळाडू  मेहनती असून देशासाठी त्यांनी हा बहुमान मिळवून दिला. संघातील सर्व गुणी खेळाडूंना शासकीय नोकरी देण्यासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयासोबत चर्चा करण्याचे आश्वासनही त्यांनी  यावेळी दिले.    
                                                        ०००००    
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 326  दिनांक  30.08.2018   
            

Wednesday, 29 August 2018

बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी जीवन आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी : केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत





नवी दिल्ली 29: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायी आहे, विशेषत: त्यांचे विद्यार्थी जीवन आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे, प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी आज येथे केले.
            येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रातील भीम सभागृहात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने वर्ष 2017 च्या  डॉ. आंबेडकर गुणवत्ता राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण समारोह आज आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत, सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, विजय सांपला, सामाजिक न्याय विभागाच्या सहसचिव रश्मी चौधरी, डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे संचालक डी.पी. मांझी मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्रातील एकूण 6 विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी दशेतील जीवन अतिशय संघर्षरथ होता शाळेच्या बाहेरील पायरीवर बसून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पुर्ण केले.  उच्च शिक्षणासाठी त्यांना तत्कालीन परिस्थतीशी खूप झटावे लागला. हार न पत्करता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले. जगातील निवडक उच्च विद्या विभूषित व्यक्तीमत्वांमध्ये आज त्यांचे नाव लौकिक आहे. असे सांगत श्री गहलोत म्हणाले, बाबासाहेबांनी केलेल्या  अभ्यासाच्या आधारावर आजची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीय जल आयोग अशा कितीतरी संस्था आज कार्यरत आहेत.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना उद्देशून श्री गहलोत म्हणाले,  बाबासाहेबांचा आर्दश सदैव डोळयापुढे, ठेवून भविष्याची वाटचाल करावी. बाबासाहेबांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग देशबांधणीसाठी, देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी केलेला आहे. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या संविधानामुळे आज सर्वांना शिक्षण घेता येत आहे. त्याचा अधिकाधिक उपयोग करण्याचे आवाहन श्री गहलोत यांनी यावेळी  विद्यार्थ्यांना केले.
              देशभरातील सर्वच राज्यातील अनुसूचित जाती-जमातीतील गुणवत्ता मिळविणा-या   एकूण  190 विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये 104 विद्यार्थी  दहावीचे तर 86 हे बारावीचे होते.  महाराष्ट्रातील एकूण 6 विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. प्रथम पुरस्काराच्या स्वरूपात 60 हजार रूपये रोख, व्दितीय ला 50 हजार रूपये रोख तसेच तृतीय पुरस्काराला 40 हजार रूपये रोख देण्यात आले. या सोबतच  प्रशस्ती पत्र, भारतीय संविधानाची प्रत आणि एक पुस्तक असे प्रदान करण्यात आले.
            नांदेड जिल्ह्यातून  दोन विद्यार्थींनींना  दहावीत उत्तम गुण मिळविले आहे.  त्यांना आज गौरविण्यात आले. नुपूर गायकवाड या विद्याथींनीला दहावीमध्ये 99 टक्के गुण मिळाले. तर नांदेड जिल्ह्याचीच  हातगाव तालुक्यातील किरण रामकृष्ण इटूबोने या विद्यर्थींनीने दहावीमध्ये 98 टक्के मिळाले. तसेच मुंबई आयसीएसई बोर्डमधून प्रथम आलेला आदित्य तुळशीराम अंनतवार या विद्यार्थ्यांला 97.83 टक्के दहावीत प्राप्त झाले आहेत. या तीन्ही विद्यार्थ्यांना आज पुरस्कृत करण्यात आले.  
            नागपूर जिल्ह्यातील तन्मय रमेश  शेंडे हा विज्ञान शाखेतील विद्यार्थी बारावीत अनुसूचित जातीमधून महाराष्ट्रातून प्रथम आला. त्याला 97.23 टक्के प्राप्त झाले. सध्या तो वैद्यकिय अभ्यासक्रम करीत आहे. बुलढाणा  जिल्ह्याची  जयश्री जानराव तायडे या वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनीला बारावीमध्ये 93.69 टक्के प्राप्त झाले. तसेच लातूर जिल्ह्यातील रजनी गायकवाड या कला शाखेतील विद्यार्थींनीला बारावीमध्ये 93.38 टक्के मिळाले यांना आज गौरविण्यात आले. या दोन्ही विद्यार्थीनींना भारतीय प्रशासकीय सेवेत यायचे असून त्यांनी आतापासून अभ्यासही सूरू केल्याचे सांगितले.
           


डॉ. ज्ञानेश्वर मुळेंचा प्रवास भारतीयांसाठी प्रेरणादायी : मंत्री पियुष गोयल


                                                    




नवी दिल्ली 29: डॉ.ज्ञानेश्वर मुळेंचा प्रवास भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. पासपोर्टसारखी जटल वाटणारी सेवा सामान्यांपर्यंत पोहचविण्यात मुळें यांचे योगदान मोठे आहे, असे गौरवोदगार केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज येथे काढले. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज (२८.८.२०१८) येथील संसद प्रांगणात झाले. त्या प्रसंगी मंत्री श्री. गोयल बोलत होते.
ते म्हणाले, डॉ. मुळे हे कोल्हापूर सारख्या ग्रामीण भागातून येऊन परराष्ट्र सेवेत रूजू झाले, त्यांचा जीवनाचा संघर्ष हा आजच्या तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. अवघ्या एक वर्षात पावणे तीनशेपेक्षा जास्त पासपोर्ट सेवा केंद्र देशात उभे करून त्यांनी भारतीय प्रशासनासमोर नवा आदर्श घालून दिला आहे. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मंत्री श्री. गोयल यांच्यासह केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, विचारवंत आणि संसद सदस्य कुमार केतकर, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य श्री. अजित भोसले, श्री. भास्कर प्रकाश हे होते.
डॉ. मुळे यांनी लिहिलेल्या पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया व अँन्ड द जिप्सी लर्नड टू फ्लाय या दोन पुस्तकांचे प्रकाशन श्री. गोयल व श्री. केतकर यांचे हस्ते झाले. पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक पासपोर्ट सेवा कश्या पध्दतीने भारतात विस्तारण्यात यश आले आहे याची यशोगाथा सांगते तर अँन्ड द जिप्सी लर्नड टू फ्लाय हे पुस्तक डॉ. मुळे यांचे आत्मचरित्रावर प्रकाश टाकणारे आहे. हे पुस्तक माती, पंख आणि आकाश या मराठी पुस्तकाची सुधारित पहिली इंग्रजी आवृत्ती आहे.
या प्रसंगी मनोगत व्यकत करताना डॉ. मुळे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लाट सारख्या खेडे गावातून मी जेव्हा प्रथमच दिल्लीत आलो तेव्हा टाय व बुट कश्या पध्दतीने वापरावेत, हे सुध्दा मला माहिती नव्हते परंतु देश सेवा करायची आहे या प्रेरणेने जगभर नोकरीच्या निमित्ताने फिरलो. टोयाटोची पहिली फॅक्टरी जपानपूर्वी भारतात सुरू केली. दिल्लीच्या मेट्रोला जागतिक जाचक अटीतून मुक्त करून दिली. रशियात इंडियनन बिझनेस असोसिएशन सुरू केली. ही असोसिएशन आजही अविरतपणे सुरू आहे. मालदिवमध्ये माझ्या नावे स्पर्धांचे आयोजन केले जाते. देशाच्यासेवेसाठी एक शेतकरी वर्गातील मुलगा परराष्ट्र सेवेत प्रचंड कार्य करू शकतो, याचा अभिमान मला आहे

डॉ. सुभाष भामरे यांनी शुभेच्छापर भाषणात म्हणाले, डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचा परिचय गेल्या दोन वर्षात झाला. मी त्यांना पासपोर्ट कार्यालय माझ्या मतदार संघात उघडण्याची विनंती केली व अवघ्या कांही दिवसात धुळे सारख्या निमशहरी भागात पासोपोर्ट कार्यालय सुरू झाले. जलदगतीने प्रशासन चालविण्याची किमया डॉ. मुळे यांच्या जवळ आहे आणि ते महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे.


श्री. केतकर म्हणाले, माझा व मुळे यांचा परिचय वीस वर्षांपासून आहे. मी रशियात वृत्तपत्र प्रतिनिधी होतो तेव्हा मुळे हे रशियात भारताचे राजदूत प्रतिनिधी होते. त्यांचे कार्य मी जवळून अनुभवले आहे. साधाना सारख्या प्रतिष्ठीत मासिकातून त्यांनी केलेले लेखन वाचनीय व संग्रही ठेवण्यासारखे आहे. त्यांच्या आजच्या पुस्तकांचे प्रकाशनास माझ्या शुभेच्छा.


श्री. भोसले यांचे शुभेच्छापर भाषण झाले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरवातीस दिप प्रज्वलन व माजी पंत प्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून झाली. सौ. क्षमा पाठक यांच्या सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. धनंजय बावळेकर यांनी श्री. मुळे यांच्या जीवनावर आधारित जिप्सी या मराठी लघुपटाची निर्मिती केली आहे. या लघुपटातील कांही क्षणचित्रे समारंभ प्रसंगी दाखविण्यात आली. समारंभाचे सुत्रसंचालन निवेदिता खांडेकर यांनी केले तर पुढचे पाऊलचे अध्यक्ष प्रफूल्ल पाठक यांनी आभार मानले.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा
**********
दयानंद कांबळे/वृत्त वि. क्र. 323  दिनांक 29.08.2018 



Tuesday, 28 August 2018

MoU Inked For Indore-Manmad New Railway Line Project - Maharashtra CM Devendra Fadnavis Present during the signing




New Delhi, 28: The Memorandum of Understanding for the Indore-Manmad New Rail line project was inked under the Chairmanship of Union Minister for Shipping and Ports, Nitin Gadkari, while the Maharashtra Chief Minister, Devendra Fadnavis was also present at this event. It was signed at Transport Bhavan, today. 

The Indian Port Rail Corporation Limited (IPRCL), under the Shipping Ministry, along with the Ministry of Railways and the main promoter Jawaharlal Nehru Port Trust (JNPT) in collaboration with the Madhya Pradesh and Maharashtra Governments will have a 362 km long new railway line, from Indore to Manmad to JNPT, thereby saving a travel distance of 171km from Indore to Mumbai.

Under the Sagarmala project, JNPT will work for the new line of Indore-Manmad, 362 km long, with a 55% stake. For this, the agreement was signed today in the presence of Railway Minister, Piyush Goyal, Union Minister of State for Defense Dr. Subhash Bhamre, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan.

All obstacles in this railway route have been removed. Indore-Manmad rail lines would cost around Rs 8574.79 crores. This will help reduce the distance of industrial town of Indore from JNPT Mumbai to 171 km. This rail line will provide a new means of transport to the backward areas of Maharashtra and Madhya Pradesh, which will accelerate the development of these areas.

 In the first phase, four bridges have been tendered and the inauguration would be held soon, informed Shri Gadkari. It will take approximately six years for this railway route. However, he has instructed to complete this work in four years, informed the union minister. He expressed confidence that the railway will be completed in next four years.


186 km railway route from Maharashtra

In the year 2016, the distance of 362 km which was approved for the new railway line on Indore-Manmad railway route, 186 km from Maharashtra and 176 km from Madhya Pradesh has been included. It is a broad gauge railway route, with a total of 13 bridges and a total of 595 railway bridges including 249 small bridges. The total land acquisition to be done for this stretch will be 2008 hectares, of which, 964 hectares of Maharashtra and 1044 hectares of land in Madhya Pradesh will be acquired. The total cost of this train is Rs 8, 574 crores and 79 lakhs and 15% of the funds will be funded by both the Maharashtra and Madhya Pradesh governments, while the remaining 70% will be funded by JNPT through equity.

This new railway route will be developed by Manmad and Indore industrial center and about 6000 persons shall be employed on the project during construction and operation phase, informed Shri Gadkari. It is believed that the agriculture and industrial area will be developed along the railway lines in both the states, he added. This railway route will reduce the distance of Delhi-Chennai and Delhi-Bengaluru railways by 325 kilometers, which will reduce the travel time of passengers. Similarly, the distance between Mumbai-Indore will be reduced by two hundred kilometers. Every year, 47 thousand containers are sent to Jawaharlal Nehru Port Trust in Mumbai, Indore. This rail corridor will reduce the traffic congestion, as well informed the union minister.

              *****************

MoU for Indore-Manmad New Rail Line Project was signed today

इंदूर-मनमाड रेल्वे मार्गासाठी सामंजस्य करार




                                                          
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
नवी दिल्ली, 28 :  इंदूर-मनमाड या नवीन रेल्वे मार्गाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री यांच्या अध्यक्षतेत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य  करारावर स्वाक्ष-या झाल्या.
परिवहन भवन येथे आज  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी , रेल्वे मंत्री पियुष गोयल, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, रेल्वे मंत्रालय , महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासन यांच्या दरम्यान 362 कि.मी. च्या नवीन इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाच्या अंमलबाजवणी संदर्भातील करारावर स्वाक्ष-या झाल्या.  
            जहाजबांधणी मंत्रालयाच्या पुढाकाराने देशात प्रथमच रेल्वे मार्ग
       करारानंतर  बोलताना श्री गडकरी म्हणाले, जहाजबांधणी मंत्रालयाच्यावतीने देशात प्रथमच रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. इंदूर-मनमाड नवीन रेल्वे मार्ग हा  जहाजबांधणी मंत्रालय, रेल्वे मंत्रालय तसेच मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येत आहे. या नवीन रेल्वे मार्गामुळे मनमाड व इंदूर या औद्योगिक केंद्राचा विकास होऊन या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रेाजगार निर्मिती होणार आहे. तसेच उभय राज्यांतील रेल्वे मार्ग लगतच्या  शेती व औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल असा विश्वास श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. या रेल्वे मार्गामुळे दिल्ली-चेनई  व‍ दिल्ली बेंग्लुरु  हे रेल्वे मार्गाचे अंतर 325 किलोमीटरने कमी होणार असून यामुळे रेल्वे प्रवाशांचा फेरा वाचणार आहे. तसेच मुंबई-इंदूरचे अंतर 200 किलो मीटर ने कमी होईल.   
महाराष्ट्रातून 186 किलोमीटर रेल्वे मार्ग
वर्ष 2016 मध्ये  मंजूर झालेल्या 362 किमी अंतराच्या इंदूर –मनमाड रेल्वे मार्गापैकी महाराष्ट्रातून 186 किमी रेल्वे मार्ग जाणार आहे. हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग असून यावर मोठे 13 पूल तर 249 लहान पुलांसह  एकूण 595 रेल्वे पूल असणार आहेत. या रेल्वे मार्गासाठी एकूण 2008 हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात येणार असून महाराष्ट्रातील 964 हेक्टर तर मध्यप्रदेशातील 1044 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गासाठी एकूण 8 हजार 574 कोटी  79 लाख रुपये खर्च अपेक्षित असून यातील प्रत्येकी 15 टक्के निधी हा महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकार इक्वीटीच्या माध्यमातून भांडवल स्वरूपात उभारणार तर उर्वरित 70 टक्के निधी हा जेएनपीटी  कर्ज घेऊन उभारणार आहे. नुकतेच या मार्गावरील चार पुलांच्या कामांसाठी 50 कोटींच्या निवीदाही काढण्यात आल्या आहेत.
                                                        ०००००
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 322  दिनांक २८.०८.२०१८ 
 सूचना : सोबत फोटो जोडले आहेत.

                                  

Friday, 24 August 2018

महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १२ हजार २३८ घरे मंजूर




नवी दिल्ली, २४ : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १२ हजार २३८ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण १ लाख १२ हजार २१३  घरे मंजूर करण्यात आली आहेत.  
        केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या गुरूवारी झालेल्या ३७ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील विविध शहरांतील गरिबांसाठी १२ हजार २३८ घरे मंजूर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, हरियाणा,मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, अरूणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर या आठ राज्यांसाठी या बैठकीत एकूण १ लाख १२ हजार २१३ घरे मंजूर करण्यात आली आहेत.       
                 प्रधानमंत्री आवास योजना (शहरी )अंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने आतापर्यंत देशभरात विविध राज्यांकरिता  ५४ लाख ९५ हजार ४४३ घरांना मंजुरी  दिले आहे.
       0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. ३२१/ दिनांक  २४.८.२०१८

Thursday, 23 August 2018

भारतातील बुद्धीस्ट सर्कीट जगासाठी खूले : राष्ट्रपती कोविंद




6 व्या आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट परिषदेचे राष्ट्रपती यांच्याहस्ते उदघाटन

नवी दिल्ली, 23 : भारतीय संस्कृतीत तथागत बुध्दांनी सांगितलेले धम्म देसनेची पाळेमुळे रूजलेली आहेत. बुध्दांच्या अस्तित्वाचे दर्शन करण्यासाठी भारतातील बुद्धीस्ट सर्कीट जगासाठी खूले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 6 व्या आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट परिषदेच्या उदघाटन प्रसंगी केले.  
येथील विज्ञान भवनात केंद्रिय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने 6 व्या आंतराराष्ट्रीय बुद्धीस्ट परिषदेचा उदघाटन सोहळा आज आयोजित करण्यात आला, त्यावेळी राष्ट्रपती बोलत होते.  उदघाटन समारोह कार्यक्रमाची अध्यक्षता केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे. अल्फोंस यांनी केली. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव रश्मी वर्मा, जपानचे भारतातील राजदूत केन्जी हिरामत्सू , पर्यटन विभागाचे महासंचालक सत्यजित राजन मंचावर उपस्थित होते.  या परिषदेच्या उदघाटन सोहळयास राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.
भारतातून बौध्द धर्म आशिया खंडात आणि जगभर पसरला. बौध्द धर्माने अध्यात्मासह जगाला बरच काही दिले असल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, बौध्द धर्म  ज्ञानाचे वाहक आहे. बौध्द धर्माने कला आणि शिल्पाला जोपासले असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.  ध्यान साधनेच्या अनेक पारंब्या बौध्द धर्मात आहेत. पुरातन काळात बौध्द उपासक-उपासीकांमुळेच देश-विदेशात भंतेनी बौध्द धर्माचा प्रचार-प्रसारात मोठी भुमिका बजावली आहे. बौध्द धर्मामुळे इसवी सन पूर्वीच भारताचे नाते जगाशी जोडले गेले असल्याचेही राष्ट्रपती म्हणाले. तथागत बुद्धांचे तत्वज्ञान हे आजही मागदर्शक असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
भारतात तथागत बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली, त्यांच्या आयुष्यातील मोठा काळ हा उत्तर भारतात गेला. त्यांच्या शिष्यांनी भारतभर बुद्ध धर्माचा प्रचार-प्रसार केला आणि  त्यामुळेच भारताच्या प्रत्येक कोप-यात बौध्द धर्माचे स्तुप, चैत्य, विहार, आदिंचे पुरातत्व अवशेष आढळतात. हे पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भारतात येतात.
बौध्द धर्माच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडविण्यात केंद्रीय आणि राज्यातील पर्यटन मंत्रालय, खाजगी पर्यटन सेवा उपलब्ध करून देण्या-या संस्था, स्थानिक लोक मोठी जबाबदारी निभावतात. व्यवसायिक दृष्टीकोनातून पर्यटन क्षेत्र वाढत आहे.  या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे जगभरातील पर्यटक भारताकडे वळतील याचा फायदा स्थानिक रोजगार वाढीसाठीही होईल, असा विश्वास  राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
यावेळी केंद्रिय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने landofbuddha.in या संकेत स्थळाची सुरूवात राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच यावेळी भारतातील बौध्द स्थळांवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.
6 व्या आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट परिषदेचे जपान हे भागीदार आहे. परिषदेस भारतीय उपमहाखंडातील देशांचे पर्यटन मंत्री उपस्थित होते. यासह भंते, बौध्द धम्माचे अभ्यासक, खाजगी पर्यटन सेवा पुरविणा-या पर्यटन संस्था असे 30 देशातील  200 प्रतिनिधी  या कार्यक्रमास उपस्थित होते. तीन दिवस चालणारी ही आंतरराष्ट्रीय परिषद महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये होणार आहे. सर्व 200 प्रतिनिधींना अजंठा, राजगीर, नालंदा, बोधगया येथे घेऊन जाण्यात येईल. ही परिषद दर दोन वर्षांनी एकदा आयोजित केली जाते.
बुध्दीस्ट परिषदेमध्ये सहभागी प्रतिनिधींच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज
                                                 पर्यटन मंत्री जयकुमार रावल
6 व्या आंतराराष्ट्रीय बुध्दीस्ट परिषदेच्या  दुस-या टप्प्याचा कार्यक्रम प्रथमच अजंठा येथे होणार आहे. यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र  बिहारच्या राजगीर, नालंदा बोधगया आणि उत्तरप्रदेशातील सारनाथ  येथे परिषद होणार आहे. उद्या शुक्रवार 24 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील  जग प्रसिद्ध अजंठा लेण्यांच्या ठिकाणी परिषद होणार आहे. अजंठा लेणींचा समावेश युनोस्कोंच्या जागतीक पर्यटन स्थळांमध्ये आहे. महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक  खजिना जगासाठी खुला आहे. महाराष्ट्रात जवळपास 300 बुध्दीस्ट लेणी आहेत. या परिषदेच्या माध्यमातून यांची माहितीही जगभर पोहोचेल, असा विश्वास श्री रावल यांनी यावेळी व्यक्त केला.  परिषदेत सहभागी होण्यासाठी येणारे प्रतिनिधी मंडळ महाराष्ट्रातील मराठमोळया संस्कृतीच्या स्वागताने नक्कीच भारावतील आणि वांरवार महाराष्ट्रात पर्यटनासाठी येतील, असा विश्वासही श्री रावल यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील बौध्द धर्मीय ऐतिहासिक लेण्या, स्तुप, चैत्य याबाबत सादरीकरण महाराष्ट्राचे पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे यांनी सादर केले.

नागनदी शुध्दीकरण प्रकल्पाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


     
              
नवी दिल्ली, 23 :  नागपूर येथील नागनदी शुध्दीकरणाच्या कामासंदर्भात येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असून फेब्रुवारी २०१९ मध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
            नागनदी  शुध्दीकरण प्रकल्पासंदर्भात श्री. गडकरी यांच्या अध्यक्षतेत परिवहन भवन येथे बैठक झाली, या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी जपानची जायका कंपनी कर्ज उपलब्ध करून देणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी जपानचे भारतातील राजदूत  केंजी हिरामस्तू , जायका कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, नागपूरचे आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, नागपूरचे  जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            या बैठकीत नागनदी शुध्दीकरण प्रकल्पासाठी जायका कंपनीकडून ७५१.३९ कोटी रूपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे आणि केंद्र शासन याची हमी घेणार आहे. कर्जाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी श्री. गडकरी यांनी दिले. त्यानुसार एका आठवडयातच हा विषय मार्गी लावण्यात येणार असल्याचे जपानचे राजदूत आणि जायका कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी मान्य केले. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामास गती येणार असून डिसेंबर २०१८ पर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येऊन त्यानंतर कामाच्या निवीदा प्रक्रिया आदी पूर्ण करून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात होणार असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.
            श्री. गडकरी म्हणाले, अंबाझरी येथून उगम पावणारी नागनदी पुढे वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द प्रकल्पास मिळते. या नदीच्या पाण्यामुळे प्रदूषण होत असून पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच नागनदी शुध्दीकरण प्रकल्प आखण्यात आला आहे. या प्रकल्पातील पाणी शुध्द करून महाराष्ट्र  राज्य वीज मंडळाला देण्यात येणार असून त्यातून नागपूर महानगर पालिकेस वर्षाकाठी  ७८ कोटी रूपये रॉयल्टी स्वरूपात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
                                                   असा उभारला जाणार निधी
            या प्रकल्पास केंद्र शासनाकडून १४ जून २०१६ रोजी मंजुरी मिळाली असून या प्रकल्पासाठी एकूण १२५२.३३ कोटी रूपये खर्च येणार असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले. यापैकी  २५ टक्के खर्च राज्य शासन वहन करणार असून हा वाटा ३१३.८ कोटी आहे. नागपूर महानगरपालिका १५ टक्के खर्च वहन करणार असून हा वाटा १८७.८४ कोटी आहे तर केंद्र शासन ६० टक्के वाटा उचलणार असून जायका कंपनीकडून या प्रकल्पासाठी घेण्यात येणा-या ७५१.३९ कोटींच्या कर्जाची हमी देणार असल्याचे श्री. गडकरी म्हणाले.
                                 नागपूर येथील ग्रीन बसेसच्या अडचणी लवकरच दूर होणार
नागपूर येथील ग्रीन बसच्या परिचालनात येणा-या अडणीबाबत श्री गडकरी यांच्या अध्यक्षतेत चर्चा झाली. स्वीडनचे राजदूत क्लास मोलीस, नागपूरचे आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे,  नागपूर महानगर पालिकेचे परिवहन सभापती बंटी कुकडे , नागपूरचे  जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत ग्रीन बसच्या परिचलनातील विविध अडचणींबाबत चर्चा झाली व मार्गही काढण्यात आला. तसेच, नागपूरतील  वाडी  परिसरातील ६ एकर जमीन आणि खापरी परिसरातील  ९ एकर जमिनीवर  ‘बांधा, वापरा व हस्तांतरीत करा’ या तत्वावर बस पोर्ट तयार करण्यात येणार असल्याचे श्री. गडकरी यांनी यावेळी  सांगितले.