Monday, 31 December 2018

महाराष्ट्र परिचय केंद्रातील श्रीकांत भालेराव आणि प्रताप सिंह यांना निरोप













नवी दिल्ली, 31 :  महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिक्षक श्रीकांत भालेराव आणि रोनिओ ऑपरेटर प्रताप सिंह आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला.

                        श्री. भालेराव आणि श्री.प्रताप सिंह यांच्या निरोप समारंभाचे आयोजन आज परिचय केंद्रात करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे  यांनी उभय कर्मचा-यांना पुष्प गुच्छ व भेट वस्तू देवून स्वागत केले. कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी , पत्रकार, कार्यालयाचे निवृत्त अधिकारी -कर्मचारी आणि महाराष्ट्र सदनाचे आजी- माजी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

            श्री. भालेराव यांनी कार्यालयात विविध पदांवर यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली. याशिवाय केंद्रातील विद्यमान मंत्री श्री. सुरेश प्रभु, माजी मंत्री स्वर्गीय गुरुदास कामत यांच्या कार्यालयातही श्री. भालेराव यांनी प्रतिनियुक्ती दरम्यान यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे. 36 वर्षांच्या दीर्घ सेवनंतर श्री भालेराव  सेवानिवृत्त झाले. शिपाई पदावर बराच काळ कार्यरत प्रताप सिंह हे रोनिओ ऑपरेटर म्हणून निवृत्‍त झाले. कामाप्रती समर्पणभाव आणि प्रामाणिकता यामुळे ते सर्वप्रिय कर्मचारी ठरले. 26 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर श्री प्रताप सिंह सेवानिवृत्त झाले.

                                         महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.435/  दिनांक ३१.१२.२०१८ 




Friday, 28 December 2018

Maharashtra’s Five Artists Flirt with Colours In The Capital At ‘Utopian’ Exhibition















New Delhi, Dec. 28: Nagpur’s Five Artists from Government College of Art and Design are in the National Capital to exhibit their paintings with an ‘Utopian’ concept.

The week long exhibition going on at Rabindra Bhawan in Mandi House since Thursday will last till 2nd of January 2019. Lalit Kala Akademi’s Secretary Shri Rajan Fulari inaugurated this exhibition.

Abstract Designs, Human Depiction Art exhibiting 72 Paintings

Five Artists, all Lecturers from the Government College have put up their unique paintings depicting abstract design and art and Human depiction inspired by real life situations. A total of 72 paintings are on the display. Shri Subhash Babhulkar and Shri Abdul Gaffar’s works are a true reflection of one self. The men and women, whether alone or in groups, are lost in their own, often surrounded by verdant nature. Shri Babhulkar is in complete awe of the peacocks. His every painting has peacocks in different sizes, colours and designs.

Whereas, Shri Vikas Joshi, Shri Sanjay Jathar and Shri Kishore Ingale exhibit their paintings in abstract design and art form. Shri Joshi says, he has tried to pick up lessons that nature has given him and has tried to incorporate in his paintings. His every canvas depicts myriad hues, moods, colours, textures, shades of Black. According to him, he plays with colours, and his compositions are poems to him, symphonies of nature that bring out harmonious beauty.

Shri Sanjay Jathar’s compositions are fascinated with ‘lines’ and ‘composition of lines’. Every painting of his reflects hugeness of sea and boats drawn with sleek crispy lines defining the highness of nature. Shri Ingale’s designs are full of human forms, a woman enjoying the company of a peacock, enjoying nature and lost in her thoughts.

The paintings are in oil, acrylic and sketches in black and white. The exhibition is open to all between 11 to 7 pm.

****************

Thursday, 27 December 2018

Maharashtra’s Nandurbar District Improves In Addressing Malnutrition





NITI Aayog Releases Second Delta Ranking of 111 Aspirational Districts

New Delhi, Dec. 27: The Second Delta ranking for Maharashtra’s Nandurbar District has shown an improvement in addressing malnutrition and reduction in the incidence of stunting, says NITI Aayog’s list on Aspirational Districts Programme announced today. Nandurbar ranks amongst top 12 Districts in improving malnutrition.

The NITI Aayog today released the Second Delta ranking for the Aspirational Districts which measures the incremental progress made by them between June 1, 2018 and October 31, 2018, across six developmental areas of Health and Nutrition, Education, Agriculture and Water Resources, Financial Inclusion, Skill Development, and Basic Infrastructure. The Surveys were carried out in all Aspirational Districts during the month of June 2018 covering more than 1lakh households.

While releasing the Second Delta Ranking, Shri Amitabh Kant, CEO, NITI Aayog said, “We have constantly endeavoured to ensure transparent, real-time measurement of qualitative development in Aspirational Districts through the use of third-party validated data. This will strengthen the spirit of competitive and cooperative federalism on the foundations of evidence-based policy making.”

Addressing malnutrition is a priority for the Government, in which Nandurbar District has shown reduction in the incidence of stunting. The percentage of stunted children under five years has shown considerable reduction in Nandurbar.

In the overall Delta Ranking List, Maharashtra’s Osmanabad District ranks 32, Gadchiroli 33, Washim 69 and Nandurbar ranks 84th.

The delta ranking of the Aspirational Districts combines the innovative use of data science with pragmatic administration, keeping the district at the locus of inclusive development.

About ‘Transformation of Aspirational Districts’ programme

Launched by the Prime Minister in January this year, the ‘Transformation of Aspirational Districts’ programme aims to quickly and effectively transform some of the most underdeveloped districts of the country.

**************************

परिचय केंद्राद्वारे राजधानीत महाराष्ट्राची प्रतिमा उंचविण्याचे उत्तम कार्य :खासदार राजू शेट्टी











                                                                  

नवी दिल्ली,27 : महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे दिल्ली आणि महाराष्ट्राबाहेर राज्याची प्रतिमा उंचविण्याचे काम नेटाने होत असल्याचे गौरवोद्गार हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार राजू शेट्टी  यांनी काढले.

            खासदार शेट्टी यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देवून श्री. शेट्टी यांचे स्वागत केले. यावेळी श्री. शेट्टी यांचे स्वीय सहायक जगदिश इनामदार, बिहार माहिती केंद्राचे उपसंचालक लोकेश झा , महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.

            श्री. शेट्टी यांनी यावेळी, परिचय केंद्राच्या वैविद्य उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. शासनातील जनसंपर्क विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा, राज्य शासनाच्या विविध उपक्रमांबाबत समाज माध्यमांद्वारे करण्यात येणारी प्रभावी प्रसिध्दी आणि कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राजधानी दिल्लीत सुरु झालेले देशातील सर्वात जुने कार्यालय असणा-या महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे मराठी भाषा व संस्कृतीच्या प्रचार प्रसारासाठीही महत्वाचे कार्य  आहे याचा अभिमान वाटतो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

         दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीत या कार्यालयाच्या पुढाकाराबाबत श्री. कांबळे यांनी माहिती दिली. दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, परिचय केंद्राची विविध प्रकाशने आदींची माहिती श्री. कांबळे यांनी यावेळी दिली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. शेट्टी यांनी माहिती जाणून घेतली व कार्यालयाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
                                                                 000000   
 रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 431/  दिनांक 27.12.2018  

सिप्राच्या अध्यक्षपदी दयानंद कांबळे यांची सर्वानुमते निवड










       

नवी दिल्ली, दि. 27 : महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची आज दिल्लीस्थित राज्य  माहिती व जनसंपर्क संघटनेच्या (सिप्रा) ध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.  

                महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सिप्राच्या सर्वधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ही निवड करण्यात आली. येत्या आठवडयात कार्यकारणीच्या अन्य पदाधिका-यांची निवड करण्यात येणार आहे .
         सिप्रा ही संघटना दिल्लीत जवळपास १५ वर्षांपासून कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांना राष्ट्रीय स्तरावर मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांकडून शासनातील प्रभावी जनसंपर्कासाठी वापरण्यात येणारे विविध माध्यम यावर चर्चा करण्यात येते. विविध राज्यांच्या चांगल्या कार्याचा गौरव व विचारांची देवान-घेवान करणे आदी काम सिप्रा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येते. 

         सिप्राच्या सर्वसाधारण बैठकीत छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिमबंगाल, ‍बिहार आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे दिल्लीस्थित अधिकारी उपस्थित होते.
   महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
                                       0000000
  रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 433/  दिनांक 27.12.2018  


नंदूरबार जिल्हयात कुपोषणामध्ये घट




         निती आयोगाच्यावतीने आकांक्षित जिल्हयांची क्रमवारी जाहीर

नवी दिल्ली,27 : राज्यातील नंदूरबार या आकांक्षित जिल्हयाने आरोग्यक्षेत्रात चांगली कामगिरी  केल्यामुळे  जिल्हयात कुपोषणामध्ये घट झाल्याचे निती आयोगाने आज जाहीर केलेल्या आकांक्षित जिल्हयांच्या क्रमवारीमध्ये पुढे आले आहे. गतवर्षीच्या पायाभूत क्रमवारीच्या तुलनेत वर्षभरात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे हा जिल्हा कुपोषणात घट झालेल्या  टॉप 12 जिल्हयामंध्ये आला आहे.   

        निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज नितीआयोगात आयोजित पत्रकार परिषदेत देशातील 111 आकांक्षित जिल्हयांची दुसरी डेल्टा क्रमवारी जाहीर केली. 5 वर्षाखालील मुलांमधील कुपोषणात घट झालेल्या 12 आकांक्षित जिल्हयांमध्ये नंदूरबारचा समावेश आहे. यासोबतच आकांक्षित जिल्हयांच्या यादीत महाराष्ट्रातील उस्मानाबाद 32 व्या  तर गडचिरोली 33 व्या स्थानावर आहे.  वाशिम जिल्हा 69 व्या तर  नंदूरबार  84 व्या स्थानावर आहे.

            1 जून ते 31 ऑक्टोबर 2018  या कालावधी दरम्यान 49 बिंदूच्या आधारावर आरोग्य, शिक्षण, कृषी व जलसंधारण, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा या मानकावर देण्यातआलेल्या गुणांकणानुसार देशातील 111 आकांक्षित जिल्हयांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

            विविध क्षेत्रात मागासलेल्या जिल्हांची आकांक्षित जिल्हे म्हणून निवड करण्यात आली. 5 जानेवारी 2018 रोजी प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आकांक्षित जिल्हयांमध्ये केंद्र शासानाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापूर्वी एप्रिल आणि मे 2018 या कालावधीतील प्रगतीच्या आधारे जून 2018 मध्ये आकांक्षित जिल्हयांची  पहिली डेल्टा क्रमवारी जाहीर करण्यात आली होती.  
                                                            000000   
  रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 432/  दिनांक 27.12.2018  


Dayanand Kamble Unanimously Elected as President of SIPRA





New Delhi, 27: The State Information and Public Relations Association (SIPRA), New Delhi, unanimously elected Shri Dayanand Kamble, Deputy Director from Maharashtra State as the President of the States’ Association in the National Capital. The outgoing President, Sanjay Saxena, Joint Director, Madhya Pradesh welcomed the new President and wished him for his future tenure in a general meeting held at Maharashtra Information Centre, here today.

In a meeting held at Maharashtra Information Centre, many of the State Members of SIPRA were present. Officers from Chattisgarh, Madhya Pradesh, Bihar, Haryana, Himachal Pradesh, Maharashtra, posted in the New Delhi unanimously elected Shri Kamble as the new President. The Elective body comprising of Vice-President and other dignitaries would be elected subsequently.

A registered Association, SIPRA has been formed to strengthen the PR activities at the national level. Exchange of ideas pertaining to the welfare activities, policies and schemes benefitting States’ by voicing it on the national platform, emulating and adopting the same at their respective states are some of the major objectives behind forming of this association.

Members from Maharashtra Information Centre, PRO Amarjyot Kaur Arora, Deputy Director, Smt P.H.S.Malini from Himachal Pradesh, Chhattisgarh Joint Director, Umesh Mishra, Director Sunil Singh, PRO Asmita Mishra, APRO Daksha Shukla, Deputy Director Shri Jagdeep Duhan from Haryana, Madhya Pradesh’s Assistant Director Zakia Roohi were present in the meeting.

******************

Wednesday, 26 December 2018

महाराष्ट्रातील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील विकास कामांविषयी महत्वपूर्ण बैठक











               
    
                        
नवी दिल्ली दि. 26 : पुणे विमानतळ, अहमदनगर बायपास व नागपूर शहरातील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील प्रस्तावीत विकास प्रकल्पांबाबत आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांच्या उपस्थित महत्वाची बैठक झाली.

            श्री.गडकरी यांच्या  २ मोतीलाल नेहरू प्लेस या निवासस्थानी आज महाराष्ट्रातील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील विकास कामांविषयी महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी बैठकीस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट, ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी  उपस्थित होते .
                                   
 याबैठकीत पुणे, अहमदनगर आणि नागपूर येथील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील विकासकार्याबाबत चर्चा झाली.  पुणे विमानतळासाठी 15.84 एकर जागा हस्तांतरीत करणे व विमानतळासंदर्भात इतर मंजुरी देणे, पुणे येथील चांदणी चौक आणि एनडीए –पाषण रस्त्याच्या कामाला परवानगी देणे या विषयावर सविस्तर चर्चा झाली. अहमदनगर बायपास आणि उड्डानपुलास परवानगी देण्यासंदर्भातही चर्चा झाली.  

 नागपूरच्या गणेश मंदिरासाठी जागा हस्तांतरीत करणे, शहरातील संरक्षणमंत्रालयाची जागा महानगर पालिकेला सौंदर्यीकरण, शैक्षणिक कार्य आणि अन्य विकास कामांसाठी हस्तांतरीत करण्याबाबत चर्चा झाली. तसेच नागपुरातील झिरोमाईल्सचा विकास करण्याबाबतही  चर्चा झाली.                                       
000000

    रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 430/  दिनांक २६.१२.२०१८ 
           

Maharashtra’s Various Road Development Issues Get Green Signal From Centre; Power Minister, Chandrashekhar Bawankule










                                                                                        
New Delhi, Dec. 26: In a bid to expedite Vidarbha, Marathwada, Khandesh, Western Maharashtra’s pending road development works, a review meeting was held in the Capital, in which the Road Transport and Highways Ministry has given a green signal to expedite all pending issues, informed the State Power Minister, Shri Chandrashekhar Bawankule.


A review meeting was held at 2, Motilal Nehru Marg, the official residence of the Union Road Transport and Highways Minister, Shri Nitin Gadkari. Present in this meeting was Nagpur District Guardian Minister, Shri Chandrashekhar Bawankule, Food, Civil Supplies & Consumer Protection Minister, Shri Girish Bapat, RT & Highways Secretary, Shri Yudhvir Singh Mallick, senior Officers, NHAI senior Officers and many other officers.

Deliberations on Maharashtra’s various pending road development issues took place during the meeting. Issues like widening and connecting of old NH211 stretch (called Jalna Road) with length 14.5 km passing through Aurangabad city from Chikalthana to Nagar Naka involving an estimate expenditure of Rs 200 crores, six-laning of Nagpur-Bhandara, Amravati District’s Nandgaon Peth Toll Naka, One time improvement of Jalgaon City portion on NH6 and another issue of NH6 to connectivity seoni-shirur-PKV-Dakshata Nagar-Ridhora bypass connecting NH6 involving an estimate expenditure of Rs 136 crores was also discussed.  The Union Minister gave a positive assurance for expediting all issues.

Shifting of Mansar Toll Naka – Work-In-Progress
In the previous meetings held for shifting of Mansar Toll Naka in Nagpur towards Khwasa, to which the Government of Maharashtra had consented to do the needful. In today’s meeting, Shri Bawankule informed the union minister about its work in progress.  Informing further, he said, this would definitely boost up the spirits of devotees visiting Ramtek.  Issues pertaining to shifting of Patansavangi-savner Toll Naka towards Baitul in Madhya Pradesh, constructing of a over bridge at Nagpur-Savner Road and putting up a signage board as, ‘11.285’, to avoid accident prone area and to provide adequate security cover to this area were discussed.

Pune District’s issue of Integrated Infrastructure of road development of NH4 at Chandni Chowk, one time improvement of Miraj City roads development for Rs 100 crores, construction of flyover near Koradi Mandir Road on NH47 and Amravati-Chikali and Fagane-Gujrat Border NH (IL&FS Project) were also discussed. The Minister gave a patient ear to all issues and assured of all clearances as early as possible.


Pune’s 32km Ring Road Phase-I Proposal Submitted to Ministry
                 Guardian Minister, Girish Bapat

Pune Guardian Minister, Shri Girish Bapat was here to deliberate on the Pune Metropolitan Region Development Authority’s (PMRDA) revised Phase-wise project proposal of Pune Ring Road Phase-I to NHAI under Bharatmala Pariyojana. The project cost of Rs 110 meter wide and 32 KM Ring Road would be around Rs 1981 crores, informed the minister. In this regards, PMRDA would take responsibility of land acquisition, informed Shri Bapat. The total cost involved will be around Rs 3Thousand 674 crores including land acquisition, he added.  After going through the proposal, Shri Gadkari asked Shri Bapat submit a presentation of the same to Secretary, NHAI. Shri Bapat said that, he would submit this presentation within few days.

******************

                                                                           


पुणे रिंग रोडच्या कामाच्या सादरीकरणाचे आदेश












            राजधानीत महाराष्ट्रातील रस्ते विकासांबाबत महत्वपूर्ण निर्णय
                        
नवी दिल्ली दि. 26 : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील रस्ते विकासाबाबत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पुणे रिंगरोडच्या कामासंदर्भात सादरीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह राज्यातील रस्ते विषयक कामांबाबत यावेळी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

            केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी आज महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट, ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचे सचिव युधविरसिंह मल्लीक आणि केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी  उपस्थित होते .
                                   
               पुणे रिंगरोडच्या कामाला गती येणार
                                                         मंत्री गिरीष बापट
पुणे रिंगरोडचे काम टप्प्या-टप्प्याने करण्याच्या सूचना देत या संदर्भातील सादरीकरण करण्याचे आदेश श्री. गडकरी यांनी या बैठकीत दिले असून यामुळे रिंगरोडच्या कामाला गती येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी बैठकी नंतर दिली.

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे शहाराच्या परिसरात 132 कि.मी. चा बारा पदरी रिंगरोड बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्विस रोड बांधण्याचे प्रस्तावित आहे. या रिंगरोडच्या माध्यमातून वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच सातारा व अहमदनगर हे राष्ट्रीय महामार्ग पुण्यात न येता परस्पर शहराबाहेरच जोडण्यात येणार आहेत.  रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 3 हजार 675 कोटींचा खर्च होणार आहे. तर रिंगरोडच्या बांधकामासाठी 1 हजार 900 कोटींचा खर्च येणार आहे यासाठी केंद्र शासनाच्या ‘भारतमाला’ प्रकल्पातून किंवा ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या’ माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्याची या बैठकीत मागणी करण्यात आली. यास सकारात्मकता दर्शवत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे रिंगरोडचे काम टप्प्या-टप्प्याने करण्याच्या सूचना देत या संदर्भातील सादरीकरण करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे रिंगरोडच्या कामाला गती मिळेल असा विश्वास श्री. बापट यांनी व्यक्त केला.

                मनसर टोल नाका स्थलांतरणाच्या कामास गती 
                                                   ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर जिल्हयातील रामटेक येथील मनसर टोल नाका खवासा सीमेकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय 29 ऑक्टोबर 2018 रोजी परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. आजच्या बैठकीत यासाठी आवश्यक सहकार्य महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणार असल्याचे श्री.बावनकुळे यांनी सांगितले त्यानुसार या टोल नाका स्थलांतरणाच्या कामाला गती येणार आहे. यामुळे  रामटेक येथे दर्शनासाठी येणारे भाविक आणि येथील स्थानिक शेतक-यांना  मोठा दिलासा मिळणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

पाटणसावंगी-सावनेर रस्त्यावरील टोलनाका बैतुलकडे स्थलांतरित करणे,  नागपूर -सावनेर रस्त्यावर चिन्हीत ’11.285 या अपघात प्रवण स्थळावर उड्डानपूल बांधणे आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.47 वरील कोराडी महालक्ष्मी मंदिर भागात उड्डानपूल बांधण्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच  येथील अपघात प्रवण स्थळावर सुरक्षेच्या पुरेशा उपाय योजना करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी श्री. गडकरी यांनी उपस्थित अधिका-यांना केल्या.

             याबैठकीत नागपूर -भंडारा 6 पदरी रस्ता, अमरावती जिल्हयातील नांदगाव पेठ टोल नाका, औरंगाबाद शहरातून  जाणारा चिखलठाणा –नगर नाका  14 कि.मी.चा रस्ता, जळगाव शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील कामे, मिरज शहर रस्ता, अमरावती- चिखली रस्ता आदि प्रकल्पांचा आढावा  या बैठकीत घेण्यात आला.  
                                      
000000

    रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 429/  दिनांक २६.१२.२०१८ 
          

Thursday, 20 December 2018

स्टार्टअप रँकींग जाहीर ; महाराष्ट्र ठरले उदयोन्मुख राज्य




नवी दिल्ली दि. 20 : ‘राज्यांची स्टार्टअप रँकींग 2018’ आज येथे जाहीर करण्यात आली. या रँकींगमध्ये महाराष्ट्र राज्य उदयोन्मुख राज्य ठरले आहे.
           
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्यावतीने येथील प्रवासी भारतीय भवनात आयोजित कार्यक्रमात या विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांनी ‘राज्यांचा स्टार्टअप रँकींग’ अहवाल जाहीर केला. यावेळी  सचिव रमेश अभिषेक यांच्या हस्ते राज्यांना ६ श्रेंणींमध्ये रँकींगनुसार प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्यांच्या श्रेणीत प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. राज्याच्या कौशल्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य नवउपक्रम संस्थेचे सह मुख्यकार्यकारी अधिकारी मिथून जॉन आणि विपणन व्यवस्थापक देवेंद्र नागले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

  केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडिया या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी  केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्यावतीने घालून दिलेल्या निकषानुसार राज्या- राज्यांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री यांनी ६ फेब्रुवारी २०१८ मध्ये ‘स्टार्टअप रँकींग २०१८’ कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी एकूण ७ आधार मानक आणि ३८ कार्यबिंदू ठरविण्यात आले. या आधारावर देशभरातील २७ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमधील ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमांचा तज्ज्ञ समितींकडून आढावा  घेण्यात आला व परिक्षण करण्यात आले. या आधारावर अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार घालून दिलेल्या निकषावर गुणांकनाच्या आधारे  सर्वोत्तम राज्य, शिर्ष राज्य, आघाडीचे राज्य, आकांक्षी राज्य, उदयोन्मुख राज्य आणि आरंभी राज्य अशा सहा श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली. यात महाराष्ट्राचा समावेश उदयोन्मुख राज्यांच्या श्रेणीत करण्यात आला आहे.      
           
            महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यात स्टार्टअप धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नवउपक्रम या नोडल संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. आजच्या कार्यक्रमात प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर  या संस्थेचे सह मुख्यकार्यकारी अधिकारी मिथून जॉन यांनी सांगितले, महाराष्ट्रात फेब्रुवारी २०१८ मध्ये स्टार्टअप धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे . केंद्राच्या स्टार्टअप इंडिया रँकींगसाठी मार्च २०१८ हा कालावधी ग्राहय धरून रँकींग देण्यात आली आहे. अल्प कालावधीत राज्याने ही रँकींग मिळविल्याचे सांगत श्री जॉन म्हणाले, राज्यात स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी १६ कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. या माध्यमातून स्टार्टअपसाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य पुरविण्यात येते. राज्यात अजून अशा २५ कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत तसेच राज्यात स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे व गुंतवणूक व्हावी यासाठी  राज्याबाहेरील २४ स्टार्टअप्सना परवानगी देण्यात आली आहे. या प्रत्येक स्टार्टअपला महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५ लाखांची मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            यावर्षीच्या स्टार्टअप रँकींगच्या तुलनेत पुढील वर्षीच्या रँकींगमध्ये राज्याची प्रगती दिसून येईल असा विश्वासही श्री जॉन यांनी व्यक्त केला.                                                                           
   महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                                   0000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.428/  दिनांक 20.12.2018