Thursday, 3 May 2018

65 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान






नवी दिल्ली, 3 :  65 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईरानी यांच्याहस्ते  प्रदान करण्यात आले.
            विज्ञान भवन येथे केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाच्या फिल्म समारोह संचालनालयाच्यावतीने या कार्यक्रामचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईराणी, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड,  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीचे अध्यक्ष शेखर कपूर व अन्य सदस्य मंचावर उपस्थित होते.
                            
                          विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
यावर्षी मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते दिवंगत विनोद खन्ना यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी कवीता खन्ना, तसेच पुत्र अभिनेते अक्षय खन्ना यांनी राष्ट्रपती यांच्या हस्ते स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रूपये रोख,  सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र असे आहे.
विनोद खन्ना यांनी  वर्ष 1970 ते 2015 पर्यंत अनेक  चित्रपंटामध्ये अभिनय केला. त्यांनी सुरूवातीला नकारात्मक भुमिका केल्या.  नंतर त्यांना सकारात्मक भुमिकाही मिळाल्या. त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन, दिवगंत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबतही काम केले. अमर अकबर अन्थोनी, मुकद्दर का सिकंदर, दयावान, अलीकडचा चित्रपट दबंग, दिलवाले या चित्रपटातही ते बघायला मिळाले होते. त्यांच्या चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदाणासाठी त्यांना यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपट सृष्टीत बहुमोल योगदान देण्या-या 47   व्यक्तींना आतापर्यंत  दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाची अमीट छाप सोडणा-या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मॉम या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांचे पती बोनी कपुर,  मुलगी जान्हवी कपुर आणि खुशी कपुर यांनी राष्ट्रपती यांच्या हस्ते स्वीकारला. पुरस्कारचे स्वरूप रजत कमळ आणि 50 हजार  रूपये रोख असे आहे.

 नगरकिर्तन या पंजाबी चित्रपटासाठी रिध्दी सेन या 19 वर्षीय अभिनेत्याला त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रपती यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.  रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

धप्पा ला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मतेसाठी पुरस्कार
निपून धर्माधिकारी दिग्दर्शित आणि सुमतीलाल शाह निर्मित धप्पा या मराठी चित्रपटास राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार राष्ट्रपती यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. रजत कमळ आणि 1 0लाख 50 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पावसाचा निबंध या नॉनफिचरला राष्ट्रीय पुरस्कार
 नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली पावसाचा निबंधया चित्रपटासाठी प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार राष्ट्रपती यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. स्वर्ण कमळ आणि 1 लाख 50 हजार रूपये रोख पुरस्काराचे स्वरूप आहे. याच चित्रपटाचे ऑडीओग्राफर अविनाश सोनवने यांना सर्वोत्कृष्ट ऑडीयोग्राफीचा पुरस्कार राष्ट्रपती यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. रजत कमळ आणि ५० हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.                                         

                                             म्होरक्या : सर्वोत्तम बाल चित्रपटाचा पुरस्कार
अमर देवकर दिग्दर्शित व कल्याण पाडाळ निर्मित म्होरक्या हा मराठी चित्रपट देशातील सर्वोत्तम बाल चित्रपटाचा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्री यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. स्वर्ण कमळ आणि १  लाख ५० हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. म्होरक्या या चित्रपटासाठी यशराज क-हाडे आणि रमण देवकर या दोन बालकलाकारांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूपात प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

                             कच्चा लिंबू : सर्वोत्तम मराठी  चित्रपट
          मराठी भाषेसाठी  कच्चा लिंबू या चित्रपटाला  सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईरानी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून मंदार देवस्थळी यांची निर्मिती आहे. दिग्दर्शक व निर्मात्यास रजत कमळ आणि 1 लाख रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
           
मयत : सर्वोत्कृष्ट लघुपटाला पुरस्कार

             सुयश शिंदे दिग्दर्शित व निर्मित मयत हा सर्वोत्कृष्ट लघुपटाला आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटास रजत कमळ आणि ५० हजार रूपये असे  पुरस्काराचे स्वरूप  आहे.
नॉनफिचर चित्रपट श्रेणीत स्वप्निल कपुरे दिग्दर्शित भर दुपारी या चित्रपटास विशेष उल्लेखनीय पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्री यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.  पुरस्कार स्वरूपात प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
                               व्हीलेज रॉकस्टार्स सर्वोत्कृष्ट चित्रपट
व्हीलेज रॉकस्टार्स हा आसमी भाषेतील चित्रपट देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असुन आज राष्ट्रपती यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वर्ण कमळ आणि 2 लाख 50 हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावर्षी पुरस्कारार्थींना रोख मिळालेली रक्कम ऑनलाईन प्रणालीव्दारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील १५ जिल्हयांचा सहभाग




नवी दिल्ली ,3 :  देशात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या बेटी पढाओ बेटी बचाओकार्यक्रमांतर्गत नव्याने समावेश करण्यात आलेल्या देशातील २४४ जिल्हयांसाठी ४ मे २०१८ रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यात महाराष्ट्रातील १५ जिल्हयांचा समावेश आहे.
  
  केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने बेटी पढाओ बेटी बचाओकार्यक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २४४ जिल्हयांसाठी  दिल्लीत एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी या परिषदेच्या मुख्य अतिथी तर  केंद्रीय महिला व बालकल्याण राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार प्रमुख अतिथी असतील. या मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव हे बेटी पढाओ बेटी बचाव कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती देतील. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही मुलींचे आरोग्य व शिक्षणाबाबत शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करतील. या परिषदेत विविध राज्यांचे महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, राज्य समन्वयक,जिल्हा  समन्वय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील सातारा, धुळे, नांदेड,अकोला, मुंबई उपनगर, मुंबई शहर, वर्धा, सिंधुदुर्ग, यवतमाळ, ठाणे, नागपूर, रायगड, अमरावती, रत्नागिरी आणि नंदुरबार या  जिल्हयांची निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी २०१५ मध्ये बेटी पढाओ बेटी बचाओकार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत देशात आतापर्यंत १६१ जिल्हयांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असून राज्यातील १६ जिल्हयांचा यात समावेश आहे. या अंतर्गत बीड, जळगाव, अहमदनगर,बुलडाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना, हिंगोली, सोलापूर, पुणे,परभणी, नाशिक आणि लातूर जिल्हयांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील झुनझुन येथे यावर्षी जागतिक महिला दिनी घोषणा करत  बेटी पढाओ बेटी बचाओ कार्यक्रमाचा विस्तार करून देशातील ६४० जिल्हयांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने देशातील २४४ जिल्हयांची निवड केली. या जिल्हयांमध्ये बेटी पढाओ बेटी बचाओ कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  शुक्रवार ४ मे २०१८ रोजी दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण २४४ जिल्हयांमध्ये महाराष्ट्रातील १५ जिल्हयांचा समावेश आहे. उर्वरीत २३५ जिल्हयांमध्ये प्रसारामाध्यमे व अन्य माध्यमांद्वारे प्रचार मोहिम आखून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 
   
00000

     आम्हाला ट्विटर वर फॉलो करा  http://twitter.com/micnewdelhi

Wednesday, 2 May 2018

५ व ६ मे रोजी राजधानीत ‘महाराष्ट्र महोत्सवाचे’ आयोजन : डॉ. ज्ञानेश्वर मुळे



नवी दिल्ली दि. 2 : महाराष्ट्र दिनानिमित्त पुढचे पाऊल आणि महाराष्ट्र शासनयांच्या संयुक्त विद्यमाने  महाराष्ट्र महोत्सवा चे आयोजन ५ व ६ मे २०१८ रोजी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात होणार आहे. अशी माहिती  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव तथा पुढचे पाऊल संस्थेचे संस्थापक व निमंत्रक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत आज दिली.
           
दोन दिवसीय आयोजनामध्ये 5 मे रोजी महाराष्ट्रातील उद्योजकता, उद्योगांसाठी विविध संधी, महिला उद्योजकांच्या यशोगाथा, या व अशा अनेक विषयांवर परिसंवादाचे आयोजन या निमित्त  करण्यात आलेले आहे. यास‍ह नाटक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी या दरम्यान असणार आहे. ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यासह याच दिवशी मराठी नाटक बाप व्हाया फेसबुकयाचे सादरीकरणही आहे.
6 मे रोजी महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रमधला संवाद दृढ व्हावा यावर चर्चासत्र होणार आहे.  यासह आजची मराठी कविता- दशा आणि दिशा याविषयावरील परिसंवाद होणार आहे. महराष्ट्रातील क्लसटरचा विकास आणि राज्यातील क्रीडा क्षेत्र याविषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
 मुळ मराठी भाषिक मात्र, महाराष्ट्राबाहेर राहुन विविध क्षेत्रात नावलौकीक करणा-या व्यक्तींचा सत्कार या महोत्सवादरम्यान करण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ मुर्तिकार पद्मभुषण पुरस्कार प्राप्त राम सुतार आणि ज्येष्ठ साहित्यिका पद्मश्री पुरस्कार प्राप्त मालती जोशी यांचा सत्कार  होणार, असल्याची माहिती डॉ. मुळे यांनी यावेळी दिली.

                                         मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
     दोन दिवसीय महाराष्ट्र महोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. राज्यसभेचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही उपस्थिती असणार आहे. यासह विविध केंद्रीय मंत्री, विविध क्षेत्रातील दिग्गजांचा या कार्यक्रमामध्ये  सहभाग असणार अशी महिती डॉ. मुळे यांनी दिली. या महोत्सवा दरम्यान संस्थेच्या संकेतस्थळाचे व स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.      

दिल्लीत कार्यरत विविध मराठी संस्था व मराठी  माणसांना एकत्र आणणे, महाराष्ट्रातील तरूणांना भविष्यासाठी  दिल्लीतील विविध क्षेत्रातील संधी व करीअरसाठी प्रेरीत करणे, राजधानीत महाराष्ट्रीय जनतेला एकत्रीत आणून महाराष्ट्राची मुद्रा उमटविणे हा या महाराष्ट्र महोत्सवाचा उद्देश असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगीतले.                 
                  
          दिल्ली येथे  विविध केंद्रीय मंत्रालये व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत महाराष्ट्रातील अधिका-यांच्या पुढाकाराने पुढचे पाऊलया संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबविण्यात येतात. सदर संस्था प्रथमच महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करीत असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगीतले.     


महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती आयोजन समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित

 










नवी दिल्ली ,2 :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त देशभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाबाबत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांच्या उपस्थितीतील राष्ट्रीय समितीच्या बैठकीस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली.

      केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक सभागृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गठीत राष्ट्रीय समितीची बैठक झाली. 2019 मध्ये महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी होत आहे. याचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय  सांस्कृतिक मंत्रालयाने "बापू को कार्यांजली" हा कार्यक्रम आखला आहे. यासाठी राष्ट्रीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य गणमान्य मान्यवरांचा समावेश आहे.

गांधीचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविणे प्रमुख उद्देश : मुख्यमंत्री

महात्मा गांधी यांनी सत्य, अंहिसा, ग्रामविकास व  शेतीवर आधारित भारत देशाची संकल्पना मांडली होती. याच विचारावर आधारित कार्यक्रमांची आखणी करून केंद्र व देशातील विविध राज्यसरकार यांच्या समन्वयाने विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.


00000000000

Saudi Arabia’s Emaar Company To Invest in Maharashtra under Food Processing











New Delhi, 2: Under the food processing sector, the Saudi Arabian Government Company Emaar has expressed its eagerness to invest in Maharashtra. In this context, positive talks were discussed in a meeting held in the presence of Prime Minister Shri Narendra Modi. Maharashtra Chief Minister, Shri Devendra Fadnavis informed that the process of signing the contract will be done sooner.
A meeting was held at 7, Lok Kalyan Marg, the official residence of the Prime Minister. The Chief Minister, Devendra Fadnavis was accompanied by his counter parts of Madhya Pradesh, Shivraj Singh Chavan and Gujarat Vijay Rupani and members of the Emaar Industry Group.
Emaar, a company working in the food processing sector in Middle-East countries, is a leading Saudi Arabia government company. During the Middle East tour of Prime Minister Modi, there was a preliminary discussion about the company's cooperation in food security for oil security. In the backdrop of the same, a meeting was held today as per the invitation of the Prime Minister. The company showed interest in investing in three states of Maharashtra, Gujarat and Madhya Pradesh, and it is understood that the company has the capability to invest in all these three states.
Positive deliberations were carried out on sending these products made through processing of fruits, vegetables and cereals in the Middle East. The company's team will arrive tomorrow (03rd May) and a presentation will be made about the proposed project of investment in the presence of senior officials of the Maharashtra State Industrial Development Corporation along with officials of other concerned departments. All the necessary documents related to the investment of the project will be completed within 30 days and the agreement will be executed. Districts like Nashik will mainly benefit by this project, which will process on mango, grapes, onion, pomegranate and vegetables. If a food park is built in this area, it will definitely benefit from getting a permanent price for farmers' produce. Also, the quantity of food grains will be reduced considerably.
Private network usage notice for Mahanet
The Chief Minister, Shri Fadnavis in a series of his meetings, called upon the Union Minister of State for Telecommunications with (Independent Charge), Manoj Sinha, today. Speaking about the Flagship Project of GoI’s Bharatnet, the chief minister informed that Mahanet Project is being set up in Maharashtra, which is an important project of the central government, through which efforts are made to reach every gram panchayat. Chief Minister Fadnavis suggested the use of private companies' fiber network and bandwidth for speeding up the project. This kind of proposal has been introduced for the first time and appropriate action will be taken. In addition to using the network of private companies' fiber network, the areas where the network access would not be possible, then in these areas, with the help of government intervention, the time duration will be reduced to half of the total time of implementation. This will definitely benefit the network to reach in villages, schools, health centers, markets, agriculture, etc. along with the Gram Panchayats.
Information the media about the remarkable achievements of the State, the Chief Minister said that the government has fulfilled the goal of clean Maharashtra in a short time. Also, work has been done to distribute electricity to every village panchayat and revenue village in most of the villages. The goal of reaching the remaining households would be completed in a year. Additional Chief Secretary  to chief minister, Pravin Pardeshi, Principal Secretary of Department of Information Technology, SVR. Srinivasan, resident commissioner of Delhi, Abha Shukla, special secretary of the Central Telecommunication Department Shiva Salem were present during the meeting.
*************************

सौदी अरेबियाची एमार कंपनी महाराष्ट्रात अन्न प्रक्रियेसाठी गुंतवणूक करणार















नवी दिल्लीदि. 2: अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची सरकारी कंपनी एमार(EMAAR)ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असून या संदर्भात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कंपनी सोबत करार करण्याची प्रक्रिया देखील लवकरच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
प्रधानमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी,  एमआर उद्योग समुहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मध्य-पूर्वेतील देशांमधील अन्न प्रक्रिया क्षेत्रात काम करणारी एमार ही सौदी अरेबिया सरकारची एक आघाडीची कंपनी आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या मध्य-पूर्वेच्या दौऱ्यादरम्यान तेल सुरक्षेच्या बदल्यात अन्न सुरक्षा या सुत्रावर या कंपनीचे सहकार्य घेण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. प्रधानमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार आज ही बैठक पार पडली. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत गुंतवणूक करण्यास कंपनीने रुची दाखविली असून या तिन्ही राज्यांत आवश्यक असणारी गुंतवणूक करण्याची कंपनीची क्षमता असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
फळे, भाज्या,अन्नधान्य आदींवर प्रक्रिया करून तयार केलेली उत्पादने मध्य-पूर्वेत पाठविण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. या कंपनीचे पथक उद्या (दि. 03 मे) मुंबईत येणार असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाचे वरिष्ठ अधिकारी इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुंतवणुकीच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत सादरीकरण केले जाणार आहे. प्रकल्पाच्या गुंतवणुकी संदर्भातील सर्व प्रक्रिया 30 दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर करार करण्यात येईल.नाशिकसारख्या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा प्रामुख्याने फायदा होऊ शकणार असून आंबा, द्राक्षे, कांदा, डाळिंब, भाज्या आदी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या भागात फूड पार्क उभारल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनांना शाश्वत भाव मिळण्यास त्याचा निश्चित फायदा होईल. तसेच अन्न धान्याच्यानासाडीचे प्रमाणही अत्यंत कमी होईल.

महानेटसाठी खाजगी नेटवर्कच्या वापराची सूचना
केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)मनोज सिन्हायांच्याशीही आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली. केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या भारतनेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात महानेट प्रकल्प उभारण्यात येत असून त्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायती पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या गतिमान कार्यवाहीसाठी खाजगी कंपन्यांचे फायबर नेटवर्क आणि बँडविड्थ वापरण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना केली. अशा प्रकारचा प्रस्ताव प्रथमच आला असून त्यासंदर्भात विचार करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेऊन उचित कार्यवाही केली जाणार आहे. खाजगी कंपन्यांचे फायबर नेटवर्क असणाऱ्या भागात त्यांचे नेटवर्क वापरण्याबरोबरच इतर भागात सरकारकडून नेटवर्कची उभारणी केल्यास या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या कालावधित निम्म्याने घट होणार आहे. यामुळे ग्रामपंचायतींबरोबरच महसुली गावे, शाळा, आरोग्य केंद्र,बाजार, शेती आदी ठिकाणी गतीने नेटवर्क पोहोचून त्यांना निश्चित फायदा होईल.
त्याचबरोबर महाराष्ट्राने केलेल्या उल्लेखनीय बाबींची माहिती माध्यमांना देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्याने स्वच्छ महाराष्ट्राचे लक्ष्य वेळेआधी पूर्ण केले आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि महसुली गावासह बहुतांश वाड्या-पाड्यापर्यंत वीज पोहोचविण्याचे काम झाले आहे.आता उर्वरित प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचविण्याचे लक्ष्य वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवासन, दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला, केंद्रीय दूरसंचार विभागाचे विशेष सचिव शिवा सेलम उपस्थित होते.
-----0-----

सूचना : सोबत फोटो जोडले आहे.
आम्हला ट्विटर वर फॉलो करा

Maharashtra Governor, C. Vidyasagar Rao Meets Home Minister Rajnath Singh



New Delhi, 2 May:  The Governor of Maharashtra, Hon. Shri C. Vidyasagar Rao called upon the Union Home Minister Shri Rajnath Singh at the latter’s official residence at 17, Akbar Road today morning.
            In the meeting, the Governor, C. Vidyasagar Rao apprised the Union Home Minister about the prevailing law and order situation in the State.  He informed Shri Singh about all the measures taken by the State of Maharashtra to maintain peace in the State.

महाराष्ट्राचे राज्यपाल, चे. विद्यासागर राव यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री यांची भेट



नवी दिल्ली, में : महाराष्ट्राचे राज्यपाल, मा. श्री चे. विद्यासागर राव यांनी आज सकाळी केंद्रीय गृह मंत्री, श्री राजनाथ सिंह यांची, त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
            १७, अकबर रोड येथे संपन्न झालेल्या बैठकीत, राज्यपाल, श्री चे. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र राज्याच्याकायदा सुव्यवस्थाद्दलच्या द्यस्थितीबाबत श्री. सिंह यांना अवगत केले.
            राज्याने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली असल्याचे माहिती केंद्रीय गृह मंत्री यांना यावेळी दिली.

CM Shri Devendra Fadanvis interacts with media after the meeting regardi...

CM Shri Devendra Fadnavis interacts with media after meeting with PM