Saturday, 9 November 2019

महाराष्ट्राला आठ ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार’

















                                           
नवी दिल्ली,दि.9 : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज महाराष्ट्रातील एकूण आठ संस्थांना  केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या 5 व्या वर्धापन दिनाचे औचित्यसाधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात आज राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार -2019’ चे वितरण करण्यात आले. मंत्रालयाचे सचिव डॉ. के.पी. कृष्णनन, सह सचिव ज्योत्सना सिटलींग आणि दलीत चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की)चे संस्थापक मिलींद कांबळे यावेळी मंचावर उपस्थित होते.

        देशातील प्रतिभावान युवा लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार अंतर्गत आज एकूण चार श्रेणींमध्ये देशातील 36 संस्थांना सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील एकूण 8 संस्थांचा समावेश आहे.
            या पुरस्कारांना आणि अशा दोन श्रेणींमध्ये विभागण्यात आले होते. अ श्रेणीमध्ये तीन उप श्रेणी करण्यात आल्या होत्या  याअंतर्गत 1’ या उपश्रेणीत 1 लाख रुपयांपर्यंत सुरुवातीची गुंतवणूक असणा-या उद्योजकांची निवड करण्यात आली. या श्रेणीमध्ये पुण्यातील लोहेगाव परिसरातील अर्ली फुड्स प्रा.ली.चा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक शालीनी कुमार आणि विजयालक्ष्मी नागराज यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2016 मध्ये स्थापन झालेली ही संस्था मुलांसाठी ऑर्गनिक बिस्कीट तयार करते. स्थानिक महिलांना या उद्योगामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.
              अ1 श्रेणीमध्येच नागपूर जिल्हयातील बुटीबोरी येथील क्रांतीज्योती महिला बचतगटाला सन्मानित करण्यात आले. बचतगटाच्या दिपा चौरे, अरुणा खडसे आणि अंजुमन शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2012 पासून कार्यरत या बचत गटाच्या माध्यमातून 100 महिला उद्योजिका तयार झाल्या असून कापडी पिशव्या बनविण्याचे कौशल्य त्यांनी अवगत केले आहे.
            2’ या उपश्रेणीत 1 लाख ते 10 लाखा पर्यंतची आरंभीची गुंतवणूक असणा-या उद्योजकांची निवड करण्यात आली यात राज्यातील 4 संस्थांना सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्हयातील पाचगणी नजीकच्या देवरीगावातील देवरी कला गावया संस्थेला यावेळी सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक मंदाकिनी व अतुल माथुर, सुरेश पुंगटी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  2009 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने स्थानिक आदिवासींच्या कला व संस्कृतीची जोपसणा करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

            याच श्रेणीत नवी मुंबई येथील लेटसकँपआऊट कँपग्राऊंड प्रा.लि. चा सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अभिजीत आणि मंगला म्हात्रे यांनी पुरस्कार स्वीकारला. 2010 मध्ये स्थापन या संस्थेने मोठया शहरानजिकच्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या शेतावर उत्तम नियोजनबध्द मनोरंजन पार्क उभारून देत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वर्धा येथील ग्लोबल एंटरप्रायजेसचाही यावेळी सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक बलवंत ढगे यांनी पुरस्कार स्वीकारला. 2012 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने तंत्रशुध्दपध्दतीचा वापर करून खादी कापडांचा उद्योग सुरु केला आहे या माध्यमातून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. नाशिक येथील स्त्री स्वाभिमान सॅनिटरी नॅपकीन निर्मिती युनीटचाही यावेळी सन्मान करण्यात आला.  दिव्यांग असूनही समाजसेवेच्या प्रेरणेने 2016 मध्ये ही संस्था स्थापन करणारे रविंद्र सुपेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या संस्थेने बायोडीग्रेडेबल आणि रासायनिक द्रव्यांचा उपयोग न करता व स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीनची निर्मिती करत ग्रामीण भागांतील महिलांना या नॅपकिन्स उपलब्ध करून दिल्या.
                 3’ या उपश्रेणीत 10 लाख ते 1 कोटी पर्यंतची आरंभीची गुंतवणूक असणा-या उद्योजकांची निवड करण्यात आली. या श्रेणीत ठाणे पश्चिम येथील स्काऊट माय ट्रिपया संस्थेला सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक विनीत राजन आणि दीपक अनंथ यांनी पुरस्कार स्वीकारला. पर्यटकांना विविध सोयी उपलब्ध करून देणारी ही संस्था 2016 मध्ये स्थापन झाली आहे.

            श्रेणी अंतर्गत  पर्यावरण पुरक वस्तू निर्मात्यांना एकूण 6 पुरस्कार प्रदान करण्यात आले यात राज्यातील पुणे येथील पाषाण भागातील व्हेंचर सेंटर या संस्थेचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या नुरेल पेझारकर आणि डॉ रेणुका दिवाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

        ‘ श्रेणीतील पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र असे आहे  तर श्रेणीतील पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र असे आहे. 2016 पासून दरवर्षी राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
                 
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000  

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२४५ /  दिनांक  ९.११.२०१९ 



Friday, 8 November 2019

महाराष्ट्र सूचना केंद्र को मिला प्रभासाक्षी पुरस्कार




नई दिल्ली, 8: 17वीं लोकसभा चुनावों में सामाजिक माध्यमों के प्रभावी उपयोग के लिए, दिल्ली स्थित महाराष्ट्र सूचना केंद्र को आज प्रभासाक्षी पुरस्कार से सम्मानित किया गया।
भारत के प्रमुख हिंदी समाचार पोर्टल प्रभासाक्षी की 18वीं वर्षगाँठ पर 'डिजिटल मीडिया पर राष्ट्रभाषा हिंदी और क्षेत्रीय भाषाओं की बढ़ती भूमिका' विषय पर आज कांस्टीट्यूशन क्लब, नयी दिल्ली में आयोजन किया गया।
इस कार्यक्रम में विभिन्न राजनीतिक दलों के सांसद, प्रवक्ता, प्रमुख पत्र-पत्रिकाओं/टीवी चैनलों के संपादकों, वरिष्ठ पत्रकारों तथा पत्रकारिता के छात्रों और समाज के विभिन्न वर्गों से भी लोगों को आमंत्रित किया गया था।
महाराष्ट्र सूचना केंद्र को इस पुरस्कार से सम्मानित किया गया। प्रभासाक्षी न्यूज़ पोर्टल के संस्थापक तरुण विजय, जदयू के राष्ट्रीय प्रवक्ता, राजीव रंजन तथा श्रीमती शाज़िया इल्मी ने यह पुरस्कार दिया। इस पुरस्कार को उपनिदेशक, दयानद कांबले, जनसूचना अधिकारी, अमरज्योत कौर अरोड़ा और उपसम्पादक रितेश भूयार ने स्वीकार। पुरस्कार का स्वरूप प्रशस्ति पत्र, ट्रॉफी और शॉल था।
**
अमरज्योत कौर अरोरा, जनसंपर्क अधिकारी

Maharashtra Information Centre Gets Prabhasakshi Award for effective use of Social media


New Delhi, 8 November : The office of Maharashtra Information Centre received the 'Prabhasakshi' Award for effective use of social media during the 17th Loksabha elections, today.
          A discussion on the 'Increasing Role of National Language Hindi and Regional Languages' was organized on digital media in the backdrop of its 18th year of Prabhasakshi, India's premier Hindi news portal at the Constitution Club, at Rafi Marg, in which Maharashtra Information Centre was honored with the Award. Shri Tarun Vijay, founder editor of Prabhasakshi portal, JDU Spokesperson, Rajiv Ranjan and Ms Shajia Ilmi presented this award. It consisted of a Trophy, Citation and a shawl. The award was received by the Deputy Director, Dayanand Kamble, PRO Amarjyot Kaur Arora and Sub-Editor, Ritesh Bhuyar. 
In relation to the increasing dominance of Hindi and regional languages ​​over digital media and the new media platform, politicians of various political parties, spokespersons and journalists of major newspapers, magazines, TV channels presented their views. 
The program started with the lighting of the lamp. JDU national spokesperson and sitting MP, Rajiv Ranjan, IIMC former DG KG Suresh, and Makhanlal Chaturvedi's Prof.  Sanjay Dwivedi, Uttar Pradesh Minister of State for Health, Atul Garg, Ms Shajia Ilmi, and Hemant Tiwari were present during this time. Journalism students in large numbers were also present on the occasion.
*****

महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार सोशल मिडियाच्या प्रभावी वापरासाठी प्रथम क्रमांक




लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मिडीयाच्यामाध्यमातून दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्ससाठी आज प्रथम क्रमांकाच्या ‘प्रभासाक्षी’ सोशल मिडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दिल्लीतील कॉन्स्टिटयूशन क्लब मध्ये आयोजित ‘प्रभासाक्षी’च्या 18 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे आरोग्य व  कुटुंब कल्याण राज्यमंत्री अतुल गर्ग, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार-लेखक तरूण विजय, खासदार राजीव रंजन आणि शाजिया इल्मी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा आणि उपसंपादक रितेश भुयार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 


महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार


  


सोशल मिडियाच्या प्रभावी वापरासाठी प्रथम क्रमांक
 
नवी दिल्ली, दि.8 : लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मिडीयाच्यामाध्यमातून दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्ससाठी राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राला आज प्रथम क्रमांकाच्या ‘प्रभासाक्षी’ सोशल मिडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देशातील आघाडीचे हिंदी न्युज पोर्टल ‘प्रभासाक्षी’ च्या वतीने समाजमाध्यमांचा प्रभावी व योग्य वापर करणा-या देशातील संस्थांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षी राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्राला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील कॉन्स्टिटयूशन क्लब मध्ये आयोजित ‘प्रभासाक्षी’च्या 18 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अतुल गर्ग, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार-लेखक तरूण विजय, खासदार राजीव रंजन आणि शाजिया इल्मी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा आणि उपसंपादक रितेश भुयार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधित प्रभासाक्षीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले . यात दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयांच्या समाजमाध्यमांद्वारे देण्यात येणा-या अपडेट्सचेही सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात योग्य व प्रभावीरित्या समाज माध्यमांद्वारे अपडेट्स देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने बाजी मारली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अधिकृत(प्रमाणीत) ट्विटर हँडल असणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे राजधानीत एकमेव कार्यालय असून फक्त याच कार्यालयाने लोकसभा निवडणूक कालावधित राज्यातील लोकसभा मतदारसंघ निहाय अचूक व प्रभावी माहितीचे अपडेट दिले. ट्विटरद्वारे 1952 पासून ते 2014 पर्यंत राज्यातील लोकसभा निवडणुकीची वैविद्यपूर्ण आकडेवारी देण्यात आली तसेच या कालावधितील संबंधित अपडेट वृत्तही देण्यात आले. त्यासाठी इन्फोग्राफीक्स , व्हिडीयो आदिंचा प्रभावी वापर करण्यात आला.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिनही ट्विटर हँडलहून दररोज महत्वाच्या माहितीचे अपडेट्स देण्यात येत असून देशातील तीन हजारांहून अधिक पत्रकार कार्यालयाच्या सोशल मिडीयाशी जोडले गेले आहेत. ट्विटर सोबतच कार्यालयाचे फेसबुकपेजेस(तीन), ब्लॉग, युटयूब चॅनेल, वॉटस्अप ग्रुप आणि एसएमएस सेवेच्या माध्यमातून प्रसार माध्यम आणि जनतेला वेळोवेळी माहिती देण्यात येते. समाजमाध्यमांद्वारे अचूक, योग्य व वेगवान माहिती देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने आघाडी घेतली असून यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री. ब्रिजेशसिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

यावेळी ‘हिंदी और क्षेत्रीय भाषाओं की डिजीटल मीडिया पर बढती भूमिका’ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात वरिष्ठ पत्रकार तथा इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनीकेशनचे माजी महासंचालक के.जी.सुरेश, उत्तर प्रदेशचे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अतुल गर्ग, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार-लेखक तरूण विजय, खासदार राजीव रंजन आणि शाजिया इल्मी यांनी विचार मांडले.

******

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twiter.com/MahaGovtMic
http://twitter.com/MahaMicHindi
http://twitter.com/micnewdelhi
रितेश भुयार/वृ.वि.क्र. 244 / दि.08.11.2019


इतिहास, पर्यटन, साहित्य, कला व संस्कृती या महितीबरोबरच महाराष्ट्र व महाराष्ट्राशी संबंधित दिल्लीतील घटना-घडामोडींची माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तीन भाषेतील ट्विटर हँडल फॉलो करा.






जरुर फाँलो करा


Wednesday, 6 November 2019

सोशल मिडियाच्या प्रभावी वापरासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार












नवी दिल्ली, दि.6 : लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मिडीयाच्यामाध्यमातून  दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्सची  दखल देशातील आघाडीचे  हिंदी न्युज पोर्टल ‘प्रभासाक्षी’ ने घेतली असून 8 नोव्हेंबर 2019 ला प्रभासाक्षीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात परिचय केंद्राला सन्मानित करण्यात येणार आहे.

            ‘प्रभासाक्षी’ पोर्टलद्वारे समाजमाध्यमांचा प्रभावी व योग्य वापर करणा-या  देशातील संस्थांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षी  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी (भाजपा) या राजकीय पक्षांसह महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्राची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. 8 नाव्हेंबर रोजी येथील कॉन्स्टीटयूशन क्लब मध्ये  प्रभासाक्षीच्या 18 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

            यावर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधित प्रभासाक्षीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले . यात दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयांच्या समाजमाध्यमांद्वारे देण्यात येणा-या अपडेटचेही सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात योग्य व प्रभावीरित्या समाज माध्यमांद्वारे अपडेट्स देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने बाजी मारली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अधिकृत(प्रमाणीत) ट्विटर हँडल असणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे राजधानीत एकमेव कार्यालय असून फक्त याच कार्यालयाने लोकसभा निवडणूक कालावधित राज्यातील लोकसभा मतदारसंघ निहाय अचूक व प्रभावी माहितीचे अपडेट दिले आहे. ट्विटरद्वारे 1952 पासून ते 2014 पर्यंत राज्यातील लोकसभा निवडणुकीची वैविद्यपूर्ण आकडेवारी देण्यात आली तसेच याकालावधितील संबंधित अपडेट वृत्तही देण्यात आले. त्यासाठी इन्फोग्राफीक्स , व्हिडीयो आदिंचा प्रभावी वापर करण्यात आला.

                सोशल मिडीयाच्या माध्यमातून देशातील तीन हजारांहून अधिक पत्रकार जोडले     

              महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिनही  ट्विटर हँडलहून दररोज महत्वाच्या माहितीचे अपडेट्रस देण्यात येत असून देशातील तीन हजारांहून अधिक पत्रकार कार्यालयाच्या सोशल मिडीयाशी जोडले गेले आहेत. ट्विटर सोबतच कार्यालयाचे फेसबुकपेजेस(तीन), ब्लॉग, युटयूब चॅनेल, वॉटस्अपग्रुप आणि एसएमएस सेवेच्या माध्यमातून प्रसार माध्यम आणि जनतेला वेळोवेळी माहिती देण्यात येते.समाजमाध्यमांद्वारे अचूक, योग्य व वेगवान माहिती देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने आघाडी  घेतली असून यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री. ब्रिजेशसिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
              वैविद्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागाची पताका राजधानी दिल्लीत मानाने उंचविण्याचे काम करणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे आधुनिक युगाची पावले ओळखून समाजमाध्यमांचा प्रभावी  व योग्य वापर करीत आहे. ‘प्रभासाक्षी’ या आघाडीच्या न्युज पोर्टलने परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांद्वारे केल्या जाणा-या जनसंपर्काची घेतलेली दखल कार्यालयाच्या कार्याचा विशेष बहुमान आहे.

            येत्या 8 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 4 वाजता येथील कॉन्स्टीटयूशन क्लबच्या डेप्युटी स्पीकरहॉलमध्ये प्रभासाक्षीच्या 18 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र परिचय केंद्राला सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यालयाचे उपसंचालक दयानंद कांबळे पुरस्कार स्वीकारणार आहेत. ‘हिंदी और क्षेत्रीय भाषाओं की डिजीटल मीडिया पर बढती भूमिका’ विषयावर यावेळी परिसंवाद होणार आहे.  
                                                            ******
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा         http://twiter.com/MahaGovtMic
                                                          http://twitter.com/MahaMicHindi
                                                       http://twitter.com/micnewdelhi

                                                    

रितेश भुयार/वृ.वि.क्र. 243 / दि.06.11.2019


Monday, 4 November 2019

अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना केंद्राने मदत करावी 50 लाख शेतकऱ्यांना विमा रक्कम तात्काळ मिळावी मुख्यमंत्र्यांचे केंद्रशासनाला निवेदन




नवी दिल्ली, दि.4 : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, तसेच राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्र शासनाकडे केली आहे.
            महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर प्राथमिक अहवाल गृहमंत्र्यांना सादर केला व शेतकऱ्यांना केंद्र शासनाने मदत करावी यासाठीचे निवेदन दिले.
            महाराष्ट्रातील 325 तालुक्यात अनेक ठिकाणी 90 ते 100 टक्के शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी,  राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे, या सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी तसेच केंद्रीय पाहणी पथक महाराष्ट्रात लवकरात-लवकर पाठवावे, अशी विनंती केली.
गृहमंत्री घेणार विमा कंपन्यांची बैठक
                        राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी, यासाठी गृहमंत्री अमित शहा हे लवकरच विमा कंपन्यांची बैठक घेणार असून शेतकऱ्यांना ही मदत लवकरात-लवकर मिळेल अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच महाराष्ट्रात पाठविले जाईल या संदर्भात अमित शहा यांनी सचिवांशी चर्चा करून महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठविण्याचे निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्रयांनी यावेळी सांगितले.
******
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic 
दयानंद कांबळे/वृत विशेष क्र. 242   दि.04.11.2019

Saturday, 2 November 2019

महाराष्ट्र सदनात ‘दक्षता जनजागृती सप्ताह’साजरा




                                                                                                       

नवी दिल्ली, 30 :  महाराष्ट्र सदनात  28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019 या कालावधी दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहा चे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचा प्रारंभ 30 ऑक्टोबर रोजी भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन करण्यात आला. निवासी आयुक्त समीर सहाय यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचा-यांना भ्रष्टाचार निमूर्लनाची शपथ दिली.

या सप्ताहच्या निमित्ताने महाराष्ट्र सदनात वेग-वेगळे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुस-या दिवशी ईमानदारी-एक जीवनशैली या विषयावर निबंध स्पर्धेचा आयोजन करण्यात आला. यात, सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या बहुसंख्य कर्मचा-यांनी आपला सहभाग नोंदविला. तीस-या दिवशी, सर्वांसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर दोन लघुपट सादर करण्यात आले होते.

आज रोजी, निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. ईमानदारी-एक जीवनशैली  या विषयावर उत्कृष्ठ लेख लिहिणा-या विजेत्यांना, निवासी आयुक्त यांच्या हस्ते  ‍रोख बक्षीस देण्यात आले.  सदनात तैनात असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे योगेश   शिंदे,- प्रथम क्रमांक , परमेश्वर  जावळे - व्दितीय  तर  प्रदीप धनगर यांनी तृत्तीय क्रमांक पटकविला. यावेळी सहायक निवासी आयुक्त  ‍विजय कायरकर, महाराष्ट्र सुरक्षा बलचे सहायक सुरक्षा अधिकारी, पी.आर.सुरवसे  उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदनच्या व्यवस्थापक श्रीमती भागवंती मेश्राम यांनी केले.