Saturday, 14 August 2021


  महाराष्ट्रातील 8 अग्निशमन अधिका-यांना अग्निशमनशौर्यपदक जाहीर

नवी दिल्लीदि. 14 : अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 8 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्निशमन शौर्य पदक जाहीर झाले आहेत.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साध केंद्रीय गृह मंत्रालयाने आज उल्लेखनीय सेवेसाठी देशातील अग्निशमन सेवेच्या ८६ अधिकारी कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये अग्निशम पदक जाहीर केली आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 8 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्निशमन शौर्य पदक जाहीर  झाले आहे.       

अग्निशमन शौर्य पदक जाहीर महाराष्ट्रातील 8 अधिकारी –कर्मचारी खालील प्रमाणे

1. श्री. प्रभात सूरजलाल रहांगडाले,  डी.एम.सी आणि संचालक (अ.का.) महाराष्ट्र अग्निशमन सेवा.

2. श्री. हेमंत दत्तात्रय परब, मुख्य अग्निशमन अधिकारी.

             3. श्री. आत्माराम जगदंबाप्रसाद मिश्रा, विभागीय अग्निशमन अधिकारी.

4.श्री. कृष्णांत रामचंद्र यादव, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी.

         5. श्री. बाळासाहेब बन्सी नेटके, सहाय्यक स्टेशन अधिकारी.

6. श्री. पंकज अशोक पवार, फायरमन.

            7. श्री. संदीप धर्मराज आसेकर, फायरमन.

8. श्री. राजेंद्र बाळकृष्ण राजम, फायरमन.



 

उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ : राज्याला एकूण 74 पोलीस पदक


 

नवी दिल्ली, दि. 14 : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ४ पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ पोलीस शौर्य पदक तसेच प्रशंसनीय सेवेकरिता ४५ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी शौर्य पदक श्रेणीमध्ये ६३० व सेवा पदक श्रेणींमध्ये ७५० असे एकूण १ हजार ३८० पोलीस पदक जाहीर झाली आहेत. शौर्य पदक श्रेणीत २ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’(पीपीएमजी), तर ६२८ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि सेवा पदक श्रेणीत विशेष सेवेसाठी ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ७४ पदक मिळाली आहेत.

शौर्य पदक श्रेणीत २ आणि सेवा पदक श्रेणीत ८८ अशा देशातील एकूण ९० पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश असून त्यांची नावे पुढील प्रमाणे. शौर्य पदक श्रेणीत महाराष्ट्राला एक ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ 1. सुनील दत्तात्रय काळे, हेडकॉन्स्टेबल, केंद्रीय राखीव पोलीस दल. (मरणोत्तर) सेवा पदक श्रेणीत महाराष्ट्राला एकूण तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ 1 श्री आशुतोष कारभारी डंबरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि आयुक्त, स्टेट इंटेलिजन्स विभाग, मुंबई. 2 श्री अशोक उत्तम अहिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर, ओझर एअरपोर्ट सुरक्षा, नाशिक ग्रामीण. 3 श्री विनोदकुमार लल्ताप्रसाद तिवारी, पोलीस उप निरीक्षक, एच.एस.पी. यवतमाळ. शौर्य पदक श्रेणीत राज्यातील एकूण २५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ 1. लिंगनाथ नानैय्या पोर्टेट, पोलीस हेडकॉन्स्टेबल 2. मोरेश्वर पत्रू वेलाडी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल 3. बिच्छू पोच्या सिदम, पोलीस कॉन्स्टेबल 4. श्यामसे ताराचंद कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल 5. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल 6. गोवर्धन धनाजी कोळेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त 7. हरी बालाजी एन, आयपीएस, अतिरिक्त पोलीस आयुक्त 8. प्रविण प्रकाशराव कुलसम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल 9. सडवली शंकर आसम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल 10. योगेश देवराम पाटील, पोलीस उपनिरिक्षक 11. सुदर्शन सुरेश काटकर, पोलीस उपनिरिक्षक 12. रोहिदास शिलुजी निकुरे, हेडकॉन्स्टेबल 13. आशिष देवीलाल चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल 14. पंकज सीताराम हलामी, पोलीस कॉन्स्टेबल 15. आदित्य रवींद्र मडावी, पोलीस कॉन्स्टेबल 16. रामभाऊ मनुजी हिचामी, पोलीस कॉन्स्टेबल 17. मोगलशाह जीवन मडावी, पोलीस कॉन्स्टेबल 18. ज्ञानेश्वर देवराम गावडे, पोलीस कॉन्स्टेबल 19. राजेंद्र कुमार परमानंद तिवारी, सहाय्यक पोलीस निरिक्षक ‍ि 20. विनायक विठ्ठलराव आटकर, पोलीस कॉन्स्टेबल 21. ओमप्रकाश मनोहर जामनिक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल 22. मंजुनाथ हुचप्पा सिंगे, अतिरिक्त पोलीस निरिक्षक 23. नवनाथ ठकाजी ढवळे, उप विभागीय पोलीस अधिकारी 24.अरिंदकुमार पुराणशाह मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल 25.शिव पुंडलिक गोरले, पोलीस कॉन्स्टेबल सेवा पदक श्रेणीत महाराष्ट्रातील एकूण ४५ पोलिसांना ‘पोलीस पदक’ 1. श्री मधुकर किसनराव सतपुते, कमांडन्ट, औरंगाबाद. 2. श्री शेखर गुलाबराव कुऱ्हाडे, उप पोलिस आयुक्त (तांत्रिक), पोलिस मोटर वाहतूक विभाग, नागपाडा, मुंबई. 3. श्री सुरेंद्र मधुकर देशमुख, सहाय्यक आयुक्त पोलिस, गुन्हे शाखा, पुणे शहर. 4. श्रीमती. ज्योत्स्ना विलास रसम, पोलिस सहाय्यक आयुक्त, डी.एन. नगर विभाग, नवीन लिंक रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई. 5. श्री ललित रामकृपाल मिश्रा, सहाय्यक कमांडन्ट, नागपुर 6. श्री मधुकर गणपत सावंत, पोलीस निरीक्षक (सहाय्यक आयुक्त), स्टेट इंटेलिजन्स विभाग, एस.बी. मार्ग, कुलाबा, मुंबई 7. श्री राजेंद्र अंबादासजी राऊत, सशस्त्र पोलीस निरीक्षक, अमरावती. 8. श्री संजय देवराम निकुंबे, पोलीस निरीक्षक, खेरवाडी पोलिस स्टेशन, मुंबई. 9. श्री दत्तात्रय रघुनाथ खंडागळे, पोलीस निरीक्षक, फोर्स वन, गोरेगाव पूर्व मुंबई. 10. श्री कल्याणजी नारायण घेटे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, ठाणे शहर. 11. श्री चिमाजी जगन्नाथ आढाव, पोलीस निरीक्षक, भायखळा पोलिस स्टेशन, मुंबई. 12. श्री नितीन प्रभाकर दळवी, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, डीएन रोड मुंबई. 13. श्री मोतीराम बक्काजी मडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, इंटेलिजन्स सेल, गडचिरोळी. 14. श्री उल्हास सीताराम रोकडे, पोलीस उपनिरीक्षक, डीजीपी कार्यालय कुलाबा, मुंबई. 15. श्री सुनील जगन्नाथ तावडे, पोलीस उपनिरीक्षक, उत्तर नियंत्रण कक्ष, मुंबई. 16. श्री सुरेश नामदेव पाटील, पोलीस उप निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर. 17. श्री हरिश्चंद्र गणपत ठोबरे, पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी), स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, एस.बी. रस्ता, कुलाबा मुंबई. 18. श्री संजय वसंत सावंत, पोलीस उपनिरीक्षक, रिडर ब्रॉंच, रायगड. 19. श्री संतोष सीताराम जाधव, पोलीस सब-इन्स्पेक्टर रिझर्व्ह, पोलिस प्रशिक्षण केंद्र, ननवीज दौंड, पुणे. 20. श्री बाळू भीमराज कानडे, सहाय्यक उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, औरंगाबाद ग्रामीण. 21. श्री विष्णू मैनाजी रकडे, सहाय्यक उप निरीक्षक, अँटी करपशन ब्यूरो, औरंगाबाद. 22. श्री पोपट कृष्णा आगवणे, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा -1, मुंबई. 23. श्री सुभाष श्रीपत बुरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलिस हेड क्वार्टर, नागपुर ग्रामीण. 24.श्री विजय नारायण भोसले, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर. 25.श्री पॉल राज अँथनी, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर. 26.श्री विनोद आत्माराम विचारे, सहाय्यक उप निरीक्षक, वरळी पोलिस स्टेशन, मुंबई. 27.श्री भारत कोंडीबा शिंदे, सहाय्यक उप निरीक्षक, एमआयडीसी स्टेशन, अंधेरी पूर्व, मुंबई. 28.श्री अनंत साहेबराव पाटील, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक शहर. 29.श्री ज्ञानदेव रामचंद्र जाधव, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, ठाणे शहर. 30.श्री सुभाष लाडोजी सावंत, सहाय्यक उप निरीक्षक, व्ही.आर.रोड पोलिस स्टेशन, मुंबई. 31.श्री नितीन बंडू सावंत, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई. 32.श्री युवराज मानसिंह पवार, सहाय्यक उप निरीक्षक, पोलिस प्रमुख क्वार्टर, ठाणे शहर. 33.श्री दीपक नानासाहेब ढोणे, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, औरंगाबाद शहर. 34.श्री सुरुअकांत तुकाराम गुलभिले, सहाय्यक उप निरीक्षक, पी.सी.डब्यू.सी. बीड. 35.श्री विष्णू बहिरू पाटील, हेड कॉन्स्टेबल (इंटेलिजन्स ऑफिसर), राज्य इंटेलिजन्स विभाग, नाशिक ग्रामीण. 36.श्री संतु शिवनाथ खिंडे, हेड कॉन्स्टेबल/211, पोलिस नियंत्रण कक्ष, नाशिक ग्रामीण. 37.श्री आनंदा हरिभाऊ भिल्लारे, हेड कॉन्स्टेबल/5412, गुन्हे शाखा, ठाणे शहर. 38.श्री प्रतापकुमार प्रमोथा रंजन बाला, हेड कॉन्स्टेबल/1945, रीडर ब्राँच, चंद्रपूर. 39.श्री रशीद रहिम शेख, हेड कॉन्स्टेबल/226, दहशतवाद विरोधी पथक, जालना 40. डॉ. दिनेश कुमार मिश्रा, सीएमओ (एसजी), सीटीसी, मुदखेड, सीआरपीएफ, नांदेड 41. श्री गणेशा लिंगाय, पोलीस निरीक्षक, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई. 42.श्री मनोज नारायण पाटणकर, कॉन्स्टेबल, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई 43.श्री संतोष महादेव पवार, कॉन्स्टेबल, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई 44.श्री सुधीर पांडुरंग शिंदे, निरीक्षक, एम/ओ रेल्वे, पुणे. 45.श्री भीमप्पा देवप्पा सागर, उप निरीक्षक, एम/ओ रेल्वे, पुणे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा . http://twitter.com/MahaGovtMic
000000 रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१७९/ दिनांक १४.०८.२०२१

मौखिक लोकवाङ्मय हे सर्व सामान्यांच्या जगण्याचे तत्वज्ञान : डॉ. अरूणा ढेरे

 


नवी दिल्ली , 14 :मौखिक लोकवाङ्मय हे सर्व सामान्यांच्या जगण्याचे तत्वज्ञान असल्याचे मत डॉ. अरूणा ढेरे यांनी मांडले. 

   महाराष्ट्राचे लोकसाहित्य व स्त्रियांचे योगदान विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 59 वे पुष्प गुंफताना डॉ. अरूणा ढेरे बोलत होत्या.

     डॉ. ढेरे पुढे म्हणाल्या,   मौखिक लोकवाङ्मय हे माणसांना माणसांशी जोडते, आधार देते. माणसांच्या जन्मापासून ते मृत्यपर्यंतची संबंध मौखिक परंपरेमध्ये गाणी आहेत.  बारश्यापासून सुरू होणारी  गाणी मरतीकांच्या गाडयापर्यंत आहेत. संपूर्ण आयुष्याला सोबत करणारे हे लोकवाङ्मय आहे. माणसाच्या आयुष्याच्या  प्रत्येक टप्प्यावर आधार देणारे, त्याला योग्य दिशेने पुढे नेणारे, एकूण समाज जीवनात, सार्वजनिक जीवनात भलेपणाची पेरणी करणारे असे हे मौखिक लोकवाङ्मय महाराष्ट्राला मिळालेली मोठी देणगी असल्याचे, डॉ. ढेरे म्हणाल्या.

          लोकपरंपरा आणि तिच्यातील वाङ्मय ही एक समृध्द्ध  परंपरा आहे. ही परंपरा केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातील सर्वच भाषांमध्ये मौखिक लोकवाङ्मयाची हजारो वर्षांची परंपरा चालत असल्याचे डॉ. ढेरे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील या लोकवाङ्मयातून अनेक प्रकारचे लोकसाहित्य, तसेच अभिजात साहित्यालाही लोकवाङ्मयातून प्रेरणा म‍िळाली,  असल्याचे डॉ. ढेरे यावेळी म्हणाल्या.  

         लोकवाङ्मय लोप पावू नये, म्हणुन  वाङ्मयाच्या अभ्यासाची  गरज भासू लागली.  हे वाङ्मय शब्दबद्ध करण्याची गरज भासू लागली. राजवाडे, चाफेकर, दुर्गाबाई भागवत, सरोजनी बाबर, डॉ. रा.चि.ढेरे, प्रभाकर मांडे यांच्या सारख्या अभ्यासकांनी महाराष्ट्रातील लोकवाङ्मय समृद्ध असल्याची  जाणीव  करून दिली.

        लोकगीतांचा विचार केला तरी महाराष्ट्रातच कितीतरी लोकगीते आहेत. कोळयांची, भारल्यांची इतर जातीतील लोकगीते आहेत. आदीवासी समाजातील लोकगीते आहेत.  सर्व ग्रामजीवन लोकगींतामध्ये ओवले गेले असल्याचे डॉ. ढेरे म्हणाल्या. लोकगीताप्रमाणाचे लोककथाही मराठी मातीत मोठयाप्रमाणात आहे. यामध्ये ऐतिहासिक कथा, अद्भुत  भुता- खेतांच्याकथा, दंतकथा, रहस्यकथा, पौराणिक कथा अशा अनेक प्रकारांच्या लोककथा येथे दिसतात. यासोबतच स्त्रोत, भूपाळया, पाळणे, आरत्या, पद त्याबरोबर उबाळया, लावण्या आहेत. त्याप्रमाणे लोकनाटयांना आधार देणारे गीतांचे प्रकारही आहेत.  किर्तन परपंरेचाही प्रवाह येथे आहे. आख्याने ही सुद्धा लोकवाङमयाचीच देणगी असल्याचे डॉ. ढेरे म्हणाल्या.

      लोकसाहित्य जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासन पुढे आले आणि या संदर्भात लोकसाहित्य समिती नेमली असल्याचे डॉ. ढेरे यांनी सांगितले. महाराष्ट्र संस्कृतीची सर्व अंगे ही या लोकवाङमयातून आल्याचे डॉ. ढेरे म्हणाल्या.

         लोकदैवतांचेही फार मोठी मौखिक लोकसाहित्य आहे. हे ही या लोकवाङ्मयाचाच भाग असल्याचे डॉ. ढेरे म्हणाल्या. हे मौखिक साहित्य हजारो वर्षापासून एका पिढीकडून दूस-या पिढीकडे मौखिकरित्या आले असल्याचा उल्लेख डॉ ढेरे यांनी केला. या सर्व लोकसाहित्यांच्या नोंदी आज महत्वाच्या आहेत. त्यातून त्या-त्या काळातील लोकजीवनाचा अदांज घेता येतो. तसेच सवांदाचे माध्यम म्हणून याचा होणारा वापर किती महत्वाचा होता हे लक्षात येत असल्याचे डॉ. ढेरे म्हणाल्या.   

        स्त्रियांना जेव्हा काहीच अधिकार प्राप्त नव्हते त्याकाळात स्त्रियांनी लोकवाङ्मयाच्या माध्यातूनच आपले सुख, दु:ख, आनंद, सल, आलेले अनुभव, शहाणपणा त्या ओव्यातून  मांडत असत आणि तेच त्या आपल्या पुढच्या पिढीला देत असत,  संस्कारित करीत असे, या स्त्रिया त्या काळात पुरोगामी असल्याचे डॉ.ढेरे यांनी सांगितले.  आपल्याकडील जे लोकवाङमय आहे ते निर्सगाशी संबंधित आहे. झाडे, पक्षी, प्राणी यांचे असणारे मनुष्याशी नाते. एकमेकांना सृष्टीचे घटक मदत करीत  असतात. या सगळया सृष्टीचा आपणही एक घटक आहोत याबद्दलही लोकवाङ्मयातून व्यक्त होत गेल्याचे डॉ. ढेरे यांनी सांगितले.  पौराणिक कथेतून प्रेरणादायी प्रसंगही लोकवाङ्मयातून आल्याचे दिसते. यावेळी त्यांनी महालक्ष्मी, विष्णु, लाकूडतोडयाची गोष्ट,  विठ्ठल, संत नामदेव, यांच्या प्रसंगानुरूप कथा ऐकवल्या, या कथामागील उद्देश महात्म्य डॉ. ढेरे यांनी यानिमित्त सांगितले.  

               

Friday, 13 August 2021

माहिती विभागाचे सचिव तथा महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांच्या भाषणाने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा समारोप



 


 

नवी दिल्ली, दि. १३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या भाषणाने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा रविवार, १५ ऑगस्ट २०२१ रोजी  समारोप होणार आहे .

 

            महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु आहे. व्याख्यानमालेत एकूण ६० व्याख्यान पूर्ण होत असून १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता  डॉ. दिलीप पांढरपट्टे हे व्याख्यानमालेचे समारोपीय भाषण करणार आहेत.

                   महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा विविध विषयांवर नामवंत मान्यवरांचे व्याख्यान झाली आहेत. व्याख्यानमालेच्या पूर्वाधात ४४ आणि उत्तरार्धात १४ असे एकूण ५८ व्याख्यान पूर्ण झाले असून उद्या या व्याख्यानमालेचे ५९ वे व ६०वे  पुष्प गुंफण्यात येणार आहे.  

                               डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या विषयी   

                    डॉ  दिलीप पांढरपट्टे हे प्रथितयश लेखक आणि कवी आहेत. त्यांनी एलएलएम, एमबीए या पदव्यांसह पीएचडी प्राप्‍त केली आहे. सनदी अधिकारी म्हणून निवासी जिल्हाधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी,उपायुक्त आणि उपसचिव पदावर त्यांनी काम पाहिले आहे.  

              प्रशासकीय सेवा बजावताना डॉ. पांढरपट्टे यांनी आपली वांड्मयीन व साहित्यिक सर्जनशीलता फुलवीत ठेवली आहे. घर वाऱ्याचे, पाय पाऱ्याचेहा ललित लेखसंग्रह , कथा नसलेल्या कथा हा कथासंग्रह, बच्चा लोग ताली बजाव हा विनोदी लेखसंग्रह ,उर्दू शायर आणि शायरीचा परिचय देणारे शायरी नुसतीच नाही , शब्द झाले सप्तरंगी हा मराठी गजल संग्रह , सव्वाशे बोधकथा हा बोधकथा संग्रह, डॉ. राम पंडित संपादित मराठी गजल तसेच कुळकायद्यातील घरठाण हक्काबाबत माहिती देणारे राहील त्याचे घर आदी पुस्तके प्रकाशित आहेत.

                     डॉ.पांढरपट्टे हे २२ जानेवारी २०२० पासून  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

                                     रविवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण    

          रविवार,  १३ ऑगस्ट 2021 रोजी  सकाळी 11 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे.

          हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.    

                                 

 आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :  https://twitter.com/MahaGovtMic

                                                         ००००

वृत्त वि. क्र.१७८  /दिनांक  १३.०८.२०२१

 

 

 

आधुनिक मराठी वांड्मयाने मराठी भाषा व संस्कृती समृध्द केली - प्रसिध्द साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे


 


नवी दिल्ली ,१३ : आधुनिक मराठी वांड्मय हे  स्वाभिमानाने पेटलेले, हक्कांच्या जाणिवांनी प्रेरित झालेले व मानवाच्या मुक्तीसाठी उच्चरवाने बोलणारे आहे. याच वांड्मयाने मराठी भाषा व संस्कृती समृध्द केली,असे मत प्रसिध्द साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे  यांनी आज व्यक्त केले.

              आधुनिक महाराष्ट्रातील मराठी वांड्मयाची ओळख विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ५८वे पुष्प गुंफताना डॉ. लिंबाळे बोलत होते.

                  मराठी भाषेमध्ये निर्माण झालेले विभिन्न व महत्वपूर्ण वांड्मय प्रवाह अन्य कोणत्याही प्रादेशिक भाषेमध्ये नाही. वैशिष्टयपूर्ण वांड्मय प्रवाहांमुळेच स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य अतिशय जीवंत, रसरसित व मानवी अधिकारांची भाषा बोलणारे ठरले आहे. नवसाहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, मुस्लिम मराठी साहित्य, ख्रिस्ती,जैन, विरशैव साहित्य आदीं वांड्मय प्रवाहांच्या माध्यमातून आधुनिक महाराष्ट्राच्या मानसिकतेचे भरण-पोषण झाले. या वांड्मयाने वाचकांना अभिरूची संपन्न केले व त्यांना जगाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली असेही डॉ. लिंबाळे यांनी सांगितले.

                मराठी साहित्यात भाषिक, वांड्मयीन व शैलीचे प्रयोग झाले आहेत. मराठी साहित्याकडे देशाचे    जगाचे लक्ष्य लागून राहिले असून याचे श्रेय स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यात निर्माण झालेल्या विविध वांड्मय प्रवाहाला जाते. मराठीत निर्माण झालेले महत्वपूर्ण वांड्मय प्रवाह अन्य कोणत्याही प्रादेशिक भाषेमध्ये नसल्याचे डॉ. लिंबाळे यांनी अधोरेखित केले.

          नव साहित्य या वांड्मय प्रवाहाने मराठीतील चाकोरीला हादरे देण्याचे काम केले. नवसाहित्याचे पुरस्कर्ते दिलीप चित्रे, भाऊ पाद्ये यांसारख्या लेखकांनी पारंपरिक साहित्याचे दरवाजे खिळखिळे केले. यानंतर अभिव्यक्तितील बंडखोरपणा सर्वदूर पसरला आणि अनेक सामाजिक वर्गातून लेखक नव्याने लिहू लागले.  यातून दलित साहित्य चळवळ पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.

            दलित साहित्याने स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक प्रश्नांचे भान करून देण्याचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेवून लेखकांनी दलित साहित्याच्या माध्यमातून आपल्या मागण्या  जनतेसमोर ठेवल्या. या साहित्याने वेगळा माणूस ,वेगळा समाज, वेगळा नायक-नायिका असे अनेक वेगळे विषय साहित्यात आले. मराठीतील दलित साहित्य हे भारतासह जगात कुतुहलाचे ठरले आहे. दलित साहित्याने बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ, दया पवार,अर्जुन डांगळे यांसारखे महान साहित्यिक दिले. दलित साहित्याचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात सहभाग झाला आणि त्यावर संशोधनही  झाले. आज या साहित्याची दखल घेवून अन्य भाषेत दलित साहित्य निर्माण होत असल्याचे डॉ. लिंबाळे म्हणाले.

                       मराठी वांड्मय प्रवाहात ग्रामीण साहित्याचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील ग्रामीण साहित्याचा चेहरा मोहरा बदलला. शेती आणि शेतकऱ्यांसमोरचे प्रश्न मोठ्या प्रमाणात  ग्रामीण बोलीतून ग्रामीण साहित्यात मांडले गेले. प्रा. नागनाथ कोतापल्ले, आनंद यादव, रा.रा.बोराळे या सारख्या मान्यवरांनी ग्रामीण साहित्याचा प्रवाह नेटाने पुढे नेला. ग्रामीण माणूस व त्याचे जीवन व त्यांची  व्यथा समोर आणण्याचे काम या साहित्याने केले आहे.

             स्त्रीमुक्तीचे साहित्य मराठीत मोठया प्रमाणात लिहिले गेले. छाया दातार, विद्या बाळ या मराठीतील बिनीच्या स्त्री लेखिका आहेत. रीटा वेलणकर ही शांता गोखले यांची कांदबरी महत्वपूर्ण आहे. स्त्रियांच्या व्यथा, स्त्रीमुक्तीचे प्रश्न समाजात स्त्रियांना असलेले दुय्यमस्थान याबाबत विपूल लेखन झाले. मराठीतील स्त्रीवादी  लेखन हे महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच पाश्चात्य विचाराने प्रेरित झाल्याचेही त्यांनी सांगितले.

            जंगलामध्ये राहणा-या माणसांविषयी त्यांच्या प्रश्नांविषयी बोलणारे आदिवासी साहित्य, मुस्लिम समाजाच्या वाटेला आलेला न्यूनगंड  व त्यांचे मन व्यक्त  करणारे मुस्लिम मराठी साहित्य तसेच ख्रिस्ती ,जैन, विरशैव आदी अल्पसंख्यांक समाजाने आपले वेगळेपण साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे डॉ. लिंबाळे म्हणाले. समाजाची वैज्ञानिक मानसिकता निर्माण करण्यास पोषक ठरणारे विज्ञान साहित्य, बालकांचे प्रश्न समजून घेवून निर्माण झालेली बाल साहित्याची चळवळ, राज्यातील विविध सामाजिक चळवळींनी निर्माण केलेले बदलाचे वातावरण तसेच अहिराणी, कोकणी ,वऱ्हाडी भाषेला प्रतिष्ठा देणारे प्रादेशिक साहित्य यावर डॉ. लिंबाळे यांनी प्रकाश टाकला.

             महाराष्ट्रातील साहित्य परिषदा, साहित्य विषयक संघटना राज्यातील लेखकांना वाढविण्याचे कार्य करीत आहे. राज्यात मोठा जाणकार  वाचक वर्ग असून मराठी साहित्यावर त्याने उदंड प्रेम केले आहे. वाचक, प्रकाशक, ग्रंथपाल, ग्रंथविक्रेते, दिवाळीअंक, वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्या यामुळे मराठी लेखकाला मोठे व्यासपीठ व संधी मिळते. मराठीला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान सन्मान मिळत आहे. अनुवादाच्या माध्यमातून मराठीतील साहित्य देश व जगात पोहचले आहे.

                आधुनिक तंत्रज्ञानाच्या गतीमुळे मराठी साहित्याचा चेहरामोहरा आणखी बदलेल ,लेखकांना नवीन विषय मिळतील व आधुनिक मराठी साहित्याचे स्वरूपही बदलेल, असा विश्वास डॉ. लिंबाळे यांनी यावेळी व्यक्त केला.              

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा:http://twitter.com/micnewdelhi

                                                   ०००००    

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.१७७/दिनांक १३.०८.२०२     

 

कृतीशील सेनानी साने गुरूजींचे चरित्र महाराष्ट्राला प्रेरणादायी : सुभाष वारे

 

नवी दिल्ली, दि. 13 : कृतीशील सेनानी साने गुरूजींचे चरित्र महाराष्ट्राला सदैव प्रेरणादायी राहील असल्याचे मत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी आज मांडले.

         महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत सेनानी साने गुरूजी   विषयावर 57 वे पुष्प गुंफताना श्री वारे  बोलत होते.

         श्री वारे पुढे म्हणाले, महाराष्ट्राला 60 वर्षे झालेली आहेत. महाराष्ट्राच्या मातीची मशागत संतानी, समाज सुधारकांनी, क्रांतीका-यांनी केलेली आहे.  या यादीमध्ये अत्यंत महत्वाचे नाव साने गुरूजी यांचे आहे. साने गुरूजी यांचे स्मरण करताना श्यामची आई या पुस्तकाचा उल्लेख आणि  खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..... याचा उल्लेख केल्याशिवाय पुर्णत्व प्राप्त होत नाही. मात्र,  साने गुरूजी एक चांगले साहित्यिक ही होते. त्यांनी बालकांसाठीचे  साहित्य  मोठया प्रमाणात निर्माण केले. यासह त्यांनी  इस्लामी संस्कृती  आणि भारतीय संस्कृती या पुस्तकांमधून तत्वचिंतक साने गुरूजींचे दर्शन घडते. साने गुरूजी यांनी मांडलेली आंतर भारती संकल्पनेची महती श्री वारे यांनी यावेळी सांगीतली. सेनानी साने गुरूजीबद्दल फार कमी लोकांना माहिती असल्याचे श्री वारे यावेळी म्हणाले.

        मुळात साने गुरूजी संवेदनशील असल्यामुळे सृजनशील होते, असे सांगत श्री वारे पुढे म्हणाले,   त्यामुळेच नवनीर्मिती करण्याची  क्षमता साने गुरूजी मध्ये होती. संवेदनशीलतेतूनच अवरूध्द झालेल्या वाटा  साने गुरूजी  यांनी दूर केल्या.    त्यामुळे साने गुरूजी हे सेनानी साने गुरूजी झाले. असे, श्री वारे यांनी सांगीतले.

        शेतक-यांना हमी भाव मिळावा कष्टकरी शेतक-यांचे प्रश्न देशापुढे यावे म्हणून साने गुरूजी यांनी 1936 मध्ये  शेतक-यांसाठी  कामक-यांसाठी, लावु पणाला प्राण आता उठवु सारे रान आता पेटवु सारे रान....... हे गाणे लिहीले होते. अशी माहिती श्री वारे यांनी यावेळी दिली.  साने गुरूजी यांचा जन्म हा कोकणाचा मात्र, त्यांची कर्मभूमी ही उत्तर महाराष्ट्र ठरली. जळगावच्या एका वसतिगृहाचे ते काम करीत असल्याचे श्री वारे यांनी सांगितले. 

        जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील कारखान्यातील कामगारांना न्याय मिळावा म्हणुन साने गुरूजींची आंदोलन केले होते या आंदोलनाला महात्मा गांधीजींनी ही पाठिंबा दिला होता, असे सांगून श्री वारे पुढे म्हणाले, कामगार शक्ती, कामगार वर्ग जे काम करीत असतो त्याच्या कामाला, घामाला  न्याय मिळावा यासाठी लढताना भूमिका मांडतांना कारखान्यातून उत्पादन होणा-या मालात कारखान्याच्या मालकाने भांडवल गुंतले असते, ज्याची जमीन  कारखान्यासाठी वापरली त्याची गुंतवणूक असते.  कारखान्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री, बुद्धीचेही एक महत्व असते. यासर्वांमध्ये कामगार घाम गाळून जे उत्पादन तयार करतात त्याचेही महत्व असते हे विसरता कामा नये, म्हणुन नफ्यातील योग्य हिस्सा कामगारांना मिळायला हवा. असा आग्रह साने गुरूजी यांचा होता. कामगारांचे कुंटूंब जर आनंदात राहिले तर कारखान्यात उत्पादन होणा-या उत्पादनाच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल . अशी व्यापक भूमिका साने गुरूजींची कामगा-यांच्या लढया‍ निमित्त मांडलेली असल्याचे आपल्याला दिसते.  या आंदोलनाच्या निर्वाणीच्या वेळी साने गुरूजींनी आपले आयुष्य पणालाही लावले असल्याचे श्री वारे यांनी सांगितले.  

          महाराष्ट्राच्या हीरक मोहोत्सवी वर्षात साने गुरूजींची आठवन करीत असताना त्यांनी केलेल्या कामातून प्रेरणा घेऊन असंघटित क्षेत्रात काम करणा-या कामगांरासाठी योग्य निर्णय घ्यावे असा सल्ला ही श्री वारे यांनी यावेळी दिला.

              मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून  8 ऑगस्ट  1942  ला चलेजाव आंदोलनची सुरूवात झाली. त्याच रात्री ब्रिटीश पोलिसांनी नेत्यांची धरपकड सुरू केली. महात्मा गांधी, डॉ राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, जगजीवनराम अशा सगळ्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातील समाजवादी नेत्यांनी हे आंदोलन पुढे ठेवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. उत्तरभारतातून डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण तसेच महाराष्ट्रातून साने गुरूजी, शिरूभाऊ लिमये,  एस. एम. जोशी,  यांनी आंदोलन पुढे नेले होते. त्याकाळात साने गुरुजी भूमिगत राहून, संकेत वजा शब्द वापरून जनतेमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्याचे कार्य करीत राहीले. यादरम्यान ब्रिटीश पोलीसांकडून त्यांचा अमानुष छळ केला. या सर्वांना झुगारूनही त्यांनी चलेजाव चे आंदोलन  पुढे नेले. ज्या माऊलीने साने गुरूजींना समाजिक समतेचे संस्कार घडविले. त्याच माऊलीने संघर्षशीलतेची वृत्तीही साने गुरूजी यांच्यामध्ये रूजवली असल्याचे यावरून दिसते, असे श्री वारे म्हणाले.

          साने गुरूजी यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्वाची घटना म्हणजे, पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्यासाठीचे आंदोलन. यावेळी सेवादलाचे  प्रमुख एस.एम. जोशी यांनी साने गुरूजी यांना उपषोण पुढे ढकलण्यात यावे असा सल्ला दिला होता. दरम्यान लोकांमध्ये जागरूकता  निर्माण करण्याचे काम सेवादलाच्या कलापथकाव्दारे करण्यात आल्याची माहिती श्री वारे यांनी यावेळी दिली. 

        साने गुरूजी यांनी पंढरपुरातून उपोषण सुरू केले.  यावेळी उपोषणादरम्यान त्यांनी जनतेला स्वतंत्र भारत कसा असावा याची भूमिका मांडली होती. यामध्ये सर्व जाती, जमाती, वर्गाचे प्रतिनिधीत्व त्यामध्ये असणार आहे यातुनच  बलसागर राष्ट्र होऊ शकणार असल्याचे साने गुरूजी म्हणाले होते. साने गुरूजींच्या उपोषणाचे परिणाम म्हणुन विठ्ठल मंदिर संर्वासाठी खुले करण्यात आले होते. हे यश सेनानी साने गुरूजींना मिळाले, असल्याचे श्री वारे यावेळी म्हणाले.