Saturday, 31 December 2016

‘महाजनको’ ला सर्वोत्तम ऊर्जा निर्मितीसाठी पुरस्कार





नवी दिल्ली, 31 : महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजनको)ला सर्वोत्तम ऊर्जा निर्मितीसाठी वज्रया विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
        एनरेशिया फाऊंडेशन या ऊर्जा क्षेत्रातील अभ्यास करणा-या आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीने नुकतेच ‘10 व्या एनरेशिया 2016’ पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या भारतातील तसेच दक्षिण आशियातील शासकीय, निमशासकीय व अशासकीय संस्थांचा विविध पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव उपेंद्र त्रिपाठी यांच्या हस्तेमहाजनकोला वज्र या विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.  महाजनकोच्यावतीने दिल्ली स्थित महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  
ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापीत करण्यात महाराष्ट्र अग्रगण्य
विविध क्षेत्रात अग्रेसर असणा-या महाराष्ट्र राज्याने ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापीत करण्यातही देशात अग्रगण्य स्थान मिळवले आहे. राज्याने 39 गीगा वॅट ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापीत करून देशात ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापीत करण्यात आघाडी घेतली आहे. या ऊर्जेपैकी १० गीगा वॅट अर्थात २५ टक्के ऊर्जा निर्मिती ही निव्वळ नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून करण्यात येते. नवीकरणीय ऊर्जा निर्मिती  क्षेत्रातही देशात महाराष्ट्राने अव्वल स्थान मिळविले आहे. राज्याने पवन ऊर्जेच्या माध्यमातून ५.४ गीगा वॅट ऊर्जा निर्मिती क्षमता  स्थापीत केली आहे. त्यामुळे पवन ऊर्जा निर्मिती क्षमतेतही महाराष्ट्र देशात दुस-या क्रमांवर असल्याचे पुरस्कार निवड समितीने नोंदविले आहे.

 राज्य विद्युत मंडळाअंतर्गत कार्यरत महाजनकोची ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महत्वाची भूमिका राहीली आहे. राज्यात अन्य ऊर्जा निर्मिती संस्थाच्या तुलनेत महाजनको ब-याच काळापासून उत्तम व कार्यक्षमपणे कार्य करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. सद्या देशात ऊर्जा निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असणा-या केंद्र शासनाच्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन(एनटीपीसी) नंतर राज्यांच्या श्रेणीत महाजनको या महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा निर्मिती संस्थेचा अव्वल क्रमांक लागतो. या कामगिरीसाठी महाजनकोला हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

Friday, 30 December 2016

Chief Secretary of Maharashtra Shri Swadheen Kshatriya inaugurated Healt...

आरती कडाडबेकर यांना‘भाग्यवान ग्राहक योजनेचे’ चे बक्षीस


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित डिजीधन मेला कार्यक्रमात महाराष्ट्राच्या आरती कडाडबेकर यांनाभाग्यवान ग्राहक योजनेचे चे बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, राज्यमंत्री पी.पी. चौधरी उपस्थित होते.

जबाबदा-या स्वीकारतांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य गरजेचे : स्वाधीन क्षत्रिय











 








नवी दिल्ली, 30 : विविध क्षेत्रात जबाबदा-या स्वीकारतांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य गरजेचे असते, त्यासाठी व्यायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज येथे केले.
            श्री. क्षत्रिय यांच्या हस्ते आज कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात अद्यावत हेल्थ क्लबचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  केंद्रीय गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव बिपीन मल्लीक, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव जयश्री मुखर्जी, सचिव  तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला, राजशिष्टाचार व गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, श्री. क्षत्रिय यांच्या पत्नी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी  उपस्थित होते.
     हेल्थ क्लबच्या उदघाटनानंतर बोलताना श्री.क्षत्रिय म्हणाले, महाराष्ट्र सदनामध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक हेल्थ क्लब, मसाज सेंटर आदी सुविधा सुरू झाल्याने सदनाच्या सुरेख वास्तुला साजेसे स्वरुप प्राप्त झाले आहे. विविध क्षेत्रात काम करताना चांगल्या आरोग्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य गरजेचे आहे. वेळ मिळताच मी, स्वत: वॉकींग, स्वीमिंग करतो तसेच टेनिस खेळतो असे श्री.क्षत्रिय यांनी यावेळी सांगितले.
            महाराष्ट्र सदनात निवासास राहणा-या अभ्यागतांसाठी अत्याधुनिक हेल्थ क्लब उभारण्यात आला आहे. या हेल्थ क्लबमध्ये मल्टी स्टेशन, आर्च ट्रेनर, अपराईट सायकल, रिकमंड बाईक, ट्रेड मिल आदी अत्याधुनिक यंत्र आहेत.

०००००




Monday, 26 December 2016

महाराष्ट्र को सिंचाई परियोजना के लिए मिला 756 करोड़ का चेक




नई दिल्ली, 26: प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना के तहत महाराष्ट्र की 26 सिंचाई परियोजनाओं के लिए 756 करोड रुपये की पहली किस्त जारी की गई है। केन्द्रीय वित्त मंत्री अरुण जेटली ने सोमवार को इस राशि का चेक राज्य के सिंचाई मंत्री गिरीश महाजन को सौंपा है। 

इंडिया हैबिटेट सेंटर में जल संसाधन मंत्रालय की ओर से आयोजित कार्यक्रम में वित्त मंत्री अरुण जेटली के हाथो महाराष्ट्र समेत गुजरात और आंध्रप्रदेश राज्यों को परियोजनाओं को पूरा करने के लिए पहली किस्त के तौर पर चेक सौंपे गए। इस मौके पर केन्द्रीय शहरी विकास मंत्री वेंकैया नायडु, जल संसाधन मंत्री उमा भारती, राज्यमंत्री संजीव कुमार बालयान और विजय गोयल, आंध्रप्रदेश के मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडु, महाराष्ट्र के सिंचाई मंत्री गिरीष महाजन और नाबार्ड के अध्यक्ष हर्ष कुमार भारद्वाज मौजूद थे।

गौरतलब है कि केन्द्र सरकार ने प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना के तहत राज्यों की बड़ी और मध्यम वरीयता प्राप्त 99 परियोजनाओं को अगले चार साल में पूरा करने का लक्ष्य रखा है। इनमें महाराष्ट्र की 26 सिंचाई परियोजनाएं भी शामिल है। इसके मद्देनजर इन परियोजनाओं को पूरा करने के संबंध में गत 6 सिंतबर, 2016 को दिल्ली में केन्द्रीय जल संसाधन मंत्रालय तथा नाबार्ड के बीच एक समझौता किया गया था। इस समझौते के मुताबिक महाराष्ट्र को 26 प्रकल्पों के लिए नाबार्ड 12 हजार 600 करोड़ रुपये की ऋण मुहैया करेगा।




महाराष्ट्र के लिए ऐतिहासिक दिन

राज्य के सिंचाई मंत्री गिरीष महाजन ने चेक प्राप्त होने पर खुशी जाहिर करते हुए राज्य की सिंचाई योजनाओं को पूरा करने के लिए नाबार्ड की ओर से पहली बार इतनी बड़ी रकम प्राप्त होने को महाराष्ट्र के लिए यह एक ऐतिहासिक दिन बताया। उन्होने बताया कि पीएमकेवाईएस योजना में शामिल राज्य के 26 प्रकल्पों को पूरा करने केलिए नाबार्ड 12 हजार 600 करोड़ और केन्द्र सरकार 3 हजार 800 करोड़ रुपये की आर्थिक सहायता करेगी। इसके तहत 2018 तक राज्य के 26 सिंचाई परियोजनाओं के माध्यम से साड़े पाच लाख हेक्टर जमीन सिंचाई के दायरे में आएगी। राज्यमंत्री ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केन्द्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, केन्द्रीय जल संसाधन मंत्री उमा भारती का आभार व्यक्त किया है।

राज्य के इन सिंचाई परियोजनाओं का होगा विकास


महाराष्ट्र के वाघुर, बावनथडी, निम्न दुधना, तिलारी, निम्न वर्धा, निम्न पांजरा, नांदुर मधमेश्वर चरण :२, गोसिखुर्द राष्ट्रीय प्रकल्प,  ऊर्ध्व पैनगंगा, बेंबला, तारली, धोमबलकवडी, अर्जुना, ऊर्ध्व कुंडलिका, अरुणा, कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना, गड नदी, डोंगरगांव, सांगोला  शाखा कालवा, खडक पूर्णा, वारणा, मोरणा( गु-हेरघर), निम्न पेढी, वांग, नरडवे (महंमद वाडी), कुडाली आदि शामिल है। 

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७५६ कोटींचा धनादेश प्राप्त











            
नवी दिल्ली, 26 : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत (पीएमकेएसवाय) महाराष्ट्रातील २६ सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून सोमवारी ७५६ कोटी ९ लाख रूपयांचा धनादेश प्राप्त झाला. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते हा धनादेश स्वीकारला.

 इंडिया हॅबीटॅट सेंटर येथे केंद्रीय जलसंधारण, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि गुजरात राज्यांना पीएमकेएसवाय अंतर्गत सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून आज धनादेश प्रदान करण्यात आले. माहिती व प्रसारण तथा नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू,केंद्रीय जलसंधारण, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री  उमा भारती, राज्यमंत्री द्वय डॉ. संजीव कुमार बालयान आणि विजय गोयल,आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार भारद्वाज यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत (पीएमकेएसवाय) २०१८ पर्यंत महाराष्ट्रातील २६ सिंचन प्रकल्पांसह देशातील ९९ मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाने नाबार्ड सोबत ६ सप्टेंबर २०१६ रोजी महत्वाचा करार केला होता. या करारानुसार महाराष्ट्रातील २६  प्रकल्पांना नाबार्ड १२ हजार ६०० कोटी रूपयांचे कर्ज देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते नाबार्डच्यावतीने पहिला हप्ता म्हणून आज ७५६ कोटी ९ लाखांचा धनादेश राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना प्रदान करण्यात आला .
                   
               महाराष्ट्रासाठी  ऐतिहासिक दिवस- गिरीष महाजन
                                                                                                      राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी पीएमकेएसवाय अंतर्गत नाबार्डकडून प्रथमच एवढी मोठी रक्कम मिळत असून महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी सांगितले. राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्ड कडून १२ हजार ६०० कोटी आणि केंद्र शासनाकडून ३ हजार ८०० कोटींचे अर्थ सहाय्य मिळणार आहे. या माध्यमातून २०१८ पर्यंत राज्यातील २६ सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून साडे पाच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. श्री. महाजन यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, केंद्रीय जलसंधारण,नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती यांचे आभार मानले.                                         
                     महाराष्ट्रातील  २६ सिंचन प्रकल्पांचा होणार विकास 

           महाराष्ट्रातील वाघूर, बावनथडी, निम्न दुधना, तिलारी, निम्न वर्धा, निम्न पांझरा, नांदुर मधमेश्वर टप्पा :२, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा, बेंबळा, तारळी, धोमबलकवडी, अर्जुना, ऊर्ध्व कुंडलिका, अरुणा, कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना, गड नदी, डोंगरगांव, सांगोला  शाखा काळवा, खडक पूर्णा, वारणा, मोरणा( गु-हेरघर), निम्न पेढी, वांग, नरडवे(महंमद वाडी), कुडाळी या सिंचन प्रकल्पांचा विकास होणार आहे.   

Friday, 23 December 2016

PM Narendra Modi to lay foundation stone of Chatrapati Shivaji Maharaj memorial Today in Mumbai



New Delhi, 23: The Prime Minister Shri. Narendra Modi, will lay the foundation stone of an international standard  memorial of  Chatrapati Shivaji Maharaj at a programme to be held at  MMRDA Ground ,  in Mumbai near Raj Bhavan tomorrow.  He will also perform ‘Bhumipujan’ and   ‘Jalpujan’ of the proposed memorial which is likely to be completed in next three years at an estimated cost of Rs. 2300 crore.
For the memorial which is in the sea bed, water from over 70 rivers of the State besides the soil of all the historic forts of Maharashtra is being brought there for the foundation stone ceremony
The Maharashtra Chief Minister, Shri Devendra Fadanvis  has exhorted the people to come and attend  the function in large number. The memorial will be a symbol of  bravery and a fitting tribute to a great warrior  who brought fame to Maharashtra .
World’s Tallest Memorial
Initially planned at 192 meters, the height of the statue may well now be 210 meters, making it to be the tallest statue in the world and it will be spread over an area of 15.96 hectares in the sea. It may be recalled that the proposal to build this memorial was brought in 2002 but for various reasons could not see light of the day. But after taking over as chief minister in 2014Mr. Fadanvis took up the issue on priority level and obtained clearance from different departments of the Center and State government, thereby paving the way for the memorial.

The memorial would have a well-equipped library, garden, visitors’ gallery, helipad and adequate security arrangements. The Memorial will also attract tourists from the country besides abroad. 

Thursday, 22 December 2016

कोल्हापूर महापालिकेचा हागणदारीमुक्तीसाठी राष्ट्रीय सम्मान




नवी दिल्ली-दि. 22: स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला हागणदारीमुक्त शहर म्हणून  आज केंद्रीय नगर विकास मंत्री श्री. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.  
येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात  आज केंद्रीय नगर विकास विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी कोल्हापूर  महानगरपालिकेला हागणदारीमुक्त शहरासाठी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले हे प्रमाणपत्र कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी  स्विकारले.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत देशातील सर्व महानगरपालिका हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम कोल्हापूर महानगरपालिका हागणदारीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आले. याबाबत केंद्र शासनाच्या समितीने कोल्हापूर शहराची ऑक्टोंबरमध्ये पाहणी करुन शिफारस केली होती.
       हागणदारीमुक्त कोल्हापूर शहर होण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक, सामुदायिक व पे ॲण्ड युज तत्वावरील शौचालये उपलब्ध करुन दिली. तसेच खराब व नादुरुस्त शौचालये दुरुस्त केली,  झोपडपट्टी भागामध्ये खाजगी संस्थांचे सहभागातून रेडिमेड शौचालये उपलब्ध केलीत. केंद्र, राज्य व महानगरपालिका यांच्या निधीतून वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत 750 इतकी शौचालये बांधून पुर्ण झाली आहेत. तसेच नागरिकांनी उघडयावर शौचास बसू नये म्हणून विविध प्रकारे जनजागृतीचा उपक्रम सुरु केला आहे. 

सरंक्षण राज्यमंत्री श्री भामरे यांच्या प्रयत्नांमुळे शेतक-यांना जमीनी परत मिळणार



नवी दिल्ली 22 : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांमुळे नाशिक जिल्हयातील शेतक-यांना जमीनी परत मिळणार आहेत.
       
वर्ष 1964 मध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने रेल्वे सायडिंग बांधण्यासाठी नाशिक जिल्हयातील  ओझर, कोकणगाव, दिक्षी, जिवाळे, थेरगाव, कसबे-सुकेणे आणि पिंपळस(रामाचे) या गावांमधील जवळपास 196 एकर जमीन अधिग्रहीत केली होती. या जमीनीवर अद्यापर्यंत काहीही बांधकाम झाले नसल्यामुळे त्यांच्या जमीनी परत मिळाव्या अशी, स्थानीक शेतक-यांची मागणी होती. यासाठी सरंक्षण राज्यमंत्री श्री भामरे यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिडेट ही कंपनी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. शेतक-यांना त्यांच्या
 जमीनी परत मिळण्याबाबत एचएएल कार्यवाही करीत आहे.

सावित्रीच्या लेकींची’ महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट












नवी दिल्ली 22 : राज्यातील ग्रामीण तसेच शहरातील बालकांना संस्कारीत तसेच सदृढ करण्याची महत्वाची भुमिका निभावणा-या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चार अंगणवाडी सेविका यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैलजा वंळजू, अमरावती जिल्ह्यातील रत्नमाला शिवहरी ब्राम्हने तसेच सुनीता नथीले आणि ठाणे जिल्ह्यातील बबिता प्रभाकर भुजबळ यांना आज अशोका हॉटेलमध्ये केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने वर्ष 2014-15 व 2015-16 या वर्षासाठी अंगणवाडी सेविकांना केंद्रीय माहिला व बाल कल्याण मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते  राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांचा छोटेखानी सत्कारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पुणे विभागाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी कांबळे, संध्या नगरकर, अमरावती विभागाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी राजीव पाटील, अमरावती विभागाच्या पर्यवेक्षिका सुजाता देशमुख पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविकांचे कुटूंब सदस्य, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुपोषण दूर करण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे त्या कुडळ येथील अंगणवाडी क्रमांक 85 च्या अंगणवाडी सेविका शैलजा वंळजू यांनी आपल्या अनुभव कथनात सांगितले, सुरूवातील विनामुल्य बालवाडी घरातच सुरू केली. त्यानंतर वर्ष 2000 मध्ये त्या अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्त झालया. त्यांची अंगणवाडी क्षेत्र हे आदीवासी भागात मोडते तिथे सुरूवातीला कुपोषित बालकांचे प्रमाण मोठया प्रमाणात होते, मात्र शासनाच्या पोषक आहारामुळे तसेच त्यांच्या विशेष प्रयत्नांनी याभागातील कुपोषणाचे प्रमाण सध्या फार कमी झाले आहे. श्री शैलजा यांना वर्ष 2014-15 साठीचा उत्कृष्ट अंगणवाडी सेविकेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील अंगणवाडी क्रमांक 34 च्या रत्नमाला शिवहरी ब्राम्हने या जीतक्या चांगल्या अंगणवाडी सेविका आहेत तेवढयाच त्या उत्तम कवीयत्रीही आहेत. त्या अंगणवाडीमधील बालकांना स्वरचित कवीतांच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने बालकांना संस्कारीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. श्रीमती रत्नमाला यांनी आधी आपल्या घरातच 1986 मध्ये बालवाडी सुरू केली होती. 1996 मध्ये त्या अंगणवाडी सेविका म्हणुन नियुक्त झाल्यात. त्या अंगणवाडीच्या माध्यातून आवश्यक असणारे राष्ट्रीय कार्यक्रम राबवितात. त्यांना विभागीय स्तरावर महिला दिनाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील सुनिता नथीले अंगणवाडी क्रमांक 92 च्या अंगणवाडी सेविका आहेत. यांच्या अंगणवाडी अंतर्गत येणारे गाव हे दोन हजार लोकसंख्येचे आहे. इथे त्या लोकसभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवितात. बालकांना कॉनवेंट सारखे बालशिक्षण अंगणवाडी प्रदान करू शकते हे त्यांनी त्यांच्या अंगणवाडीतून दाखवून दिले आहे. त्यांनी अंगणवाडी या शब्दाचा विग्रह करून सांगितला.  अं-अंगणातबसून, ग-गगणभरारी घेण्याचे धडे, ण-लसीकरणाचा बाण चालविणे, वा-वाल्याचा वाल्मीकी करविणे, डी-डिवचणा-या रोंगापासून संरक्षण करणे, अशा पद्धतीने जागृकता निर्माण करण्याची महत्वपूर्ण भुमिका त्या निभावतात.

ठाणे जिल्ह्यातील सेहरी येथील अंगणवाडी क्रमांक 52 च्या बबिता प्रभाकर भुजबळ या 1991 पासून अंगणवाडी सेविका आहेत. आकार’ या कार्यक्रमातंर्गत बालकांना घडविण्याचे कार्य त्या करतात त्या म्हणाल्या, बालकांना संस्कारीत, कुपोषण मुक्त करण्याच्या क्षेत्रात मी कामकरित असल्यामुळे माझे जीवन हे ख-या अर्थाने सार्थक झाले आहे.  

देशाच्या राजधानी मराठमोळया पद्धतीने झालेल्या सत्काराने अंगणवाडी सेविका अभिभूत झाल्याचे मनोगत सर्वांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना उपंसचालक दयानंद कांबळे यांनी केली, सुत्रसंचालन माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी केले.