Wednesday, 11 October 2017

तुर डाळ आणि खाद्य तेलाच्याबाबतीत घेतलेल्या निर्णयांचा शेतक-यांना लाभ : पाशा पटेल





नवी दिल्ली 11 : तुर डाळ आणि खाद्य तेलाच्या आयात-निर्यातीबाबत केंद्र शासनाने  घेतलेल्या निणर्यांचा लाभ शेतक-यांना होत असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
            महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.  वेगवेगळया कारणांनी तुर, मूग आणि उडीद या डाळींच्या निर्यातीवर बंदी आणण्यात आली होती. यासह परदेशातून मोठया प्रमाणात खादय तेल आयात करण्यात येत होते, त्यामुळे देशांतर्गत उत्पादन होणा-या तेलाचे भाव पडायचे. यामुळे डाळ, तेल  उत्पादक शेतक-यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते.
            तुळ डाळ आणि खाद्य तेल उत्पादक शेतक-यांची यामुळे होणारी कुंचबणा थांबविण्यासाठी श्री पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री पटेल यांनी सविस्तर माहिती दिली.  मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डाळी तसेच खाद्य तेलाबाबतची एकूण परिस्थितीती अवगत केली.  
प्रधानमंत्री श्री मोदी यांनी या संदर्भातील तथ्य लक्षात घेऊन  याबाबत  केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार प्राप्त समिती नेमली ज्यात केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितिन गडकरी आणि केंद्रातील अन्य मंत्र्यांचा समावेश होता. या समितीने केलेल्या अभ्यासातंर्गत शेतक-यांचे नुकसान होणार नाही असे धोरण आखले असून यातंर्गत 5 ऑगस्ट 2017 रोजी  केंद्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला तुर डाळी संदर्भात घेतला असून यामध्ये 2 लाख मेट्रीक टन पेक्षा अधिक तुर डाळ आयातीवर बंदी आणली.  11 ऑगस्ट 2017 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार आयात होणा-या खाद्यान्न तेलावर 10% टक्के आयात शुल्क लावायचे. 21 ऑगस्ट 2017 रोजी केंद्र शासनाने अधिसूचना काढून मूग, उडीद या डाळी 1 लाख मेट्रीक टना पेक्षा जास्त आयात करण्यात येऊ नये असा निर्णय घेतला. 15 सप्टेंबर 2017 रोजी निघालेल्या अधिसूचनेनुसार तुर, मूग आणि उडीद या डाळीवर असणारी 12 वर्षापासूनची निर्यात बंदी उठवून देशातील शेतक-यांना निर्यात करण्याची परवानगी दिली. या निर्णयांमुळे शेतक-यांना आर्थिक लाभ मिळण्याचे मार्ग मोकळे झाले असल्याचे श्री पटेल यांनी स्पष्ट केले.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री पाशा पटेल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी  श्री.पटेल यांना दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने श्री. पटेल यांना भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. पटेल यांनी यशस्वी वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.       


माजी कॅबीनेट सचिव स्व. बी.जी देशमुख यांना मरणोपंरात उत्तम प्रशासकाचा पुरस्कार


नवी दिल्ली 11 : माजी कॅबीनेट सचिव स्वर्गीय भालचंद्र गोपाल देशमूख यांना मरणोपंरात उत्तम प्रशासकाचा पॉल एच.एप्ली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून पुरस्कार राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी स्वीकारला.
येथील भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्वर्गीय भालचंद्र गोपाल देशमुख यांनी केंद्र शासनामध्ये विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी ‘ए कॅबिनेट सेक्रेटरी थिंक्स ए लॉउड’, ‘ए कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स अराउँड’, ‘ए पूना टू प्राइम मिनीस्टर ऑफीस’, ‘ए कॅबिनेट सेक्रेटरी लूक्स बॅक’ ही आणि इतर महत्वपुर्ण पुस्तके लिहीलेली आहेत.
त्यांनी कॅबीनेट सचिव म्हणून केलेल्या कारर्कीदीत लोक प्रशासनात नवीन पायंडे पाडले आहेत. त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त, केंद्र शासनात विविध पदांवर काम केलेले आहे, यासह महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून निभावलेली भुमिका निभावली आहे.
श्री देशमुख यांनी राजीव गांधी, व्हि.पी.सिंग, आणि चंद्रशेखर या तीन माजी प्रधानमंत्र्यांसोबत काम केलेले आहे. यासह अंतराराष्ट्रीय कामगार संगठनेतही काम केले आहे.1985-86 दरम्यान श्री देशमुख हे भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्रामध्ये असणा-या क्षेत्रीय संस्थेवरही होते. त्यांनी या संस्थेला 10 लाख रूपयांचे दान दिले होते. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून दरवर्षी या संस्थेत बी.डी. देशमुखांच्या स्मृती प्रीत्यर्थ वार्षिक व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याशिवाय निबंध स्पर्धेचे आयोजनही केले जाते.
निवृत्तीनंतर श्री देशमुख हे पुण्यात स्थायिक झाले होते तेथे त्यांनी अनेक सामाजिक कामे केली. शासनावरील जनतेचा विश्वास वाढावा यासाठी ‘पब्लीक कॅन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा आहे. ते जनवाणीचे अध्यक्ष होते, यासह अनेक स्वयंसेवी संस्थेत अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून काम पाहिले.

Former Cabinet Secretary, Late Shri B.G.Deshmukh Conferred Paul H.Appleby Award


New Delhi, 11: The prestigious Dean Paul H. Appleby Award was conferred today to the Former Cabinet Secretary, Government of India, Late Shri Bhalchandra Gopal Deshmukh posthumously, today.  This Award was given at the Hands of the Vice-President, Shri Venkaiah Naidu here today.
This Award is instituted by Indian Institute of Public Administration (IIPA), annually since, 1998. In a major function held at IIPA, New Delhi, Shri Swadheen Kshatriya, Former Chief Secretary of Maharashtra and presently State Chief Commissioner, Right To Service and Chairman of IIPA Maharashtra Regional Branch received this prestigious Award on his behalf.  IIPA Chairman, Shri T.N.Chaturvedi and Director, Shri T.Chatterjee were also present on the occasion.
The Executive Council of the Institute unanimously recommended conferring this award to Former Distinguished IAS Officer Late Shri B.G. Deshmukh.  He was one of the senior most Members of IIPA Institute and an accomplished statesman who contributed significantly to the art and discipline of public administration in the country.
Better known as Shri B.G. Deshmukh, he held a distinguished service record with very important professional contributions in the process of development of public administration in India.  Shri Deshmukh also holds the record of being the first IAS Officer from Maharashtra in the Year 1951.  He distinguishably served in various capacities in the States of Maharashtra.  He was Secretary to the Chief Minister,the Municipal Commissioner of Mumbai and Chief Secretary of Maharashtra.
Subsequently, he was called by the Prime Minister, Late Shri Rajiv Gandhi to Delhi in 1986 and appointed as the Cabinet Secretary.  In 1989, Shri Rajiv Gandhi appointed him as Principal Secretary, a post he went on to hold even under the Prime Ministership of Shri V.P.Singh and Shri Chandrashekhar.
Shri Deshmukh worked actively post retirement as well.  He took up several social causes. He co-founded the ‘Public Concern for Governance Trust’ dedicated to ensuring the enactment of laws and policies which promote ethical governance.  He was also the Chairman of Janwani, an NGO and the President and Trustee of Chhatrapti Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya.
He served on the Board of several companies including the TATAs, SEBI Mutual Funds and IDBI Mutual Funds.  He productively occupied himself by associating with social and developmental organizations such as Bombay Natural History Society, KEM Hospital, National Institute for the Blind.  Shri Deshmukh has many books to his credit.  Some of them prominently popular like, “A Cabinet Secretary Thinks Aloud”, “A Cabinet Secretary Looks Around” and “Poona to Prime Minister’s Office- A Cabinet Secretary Looks Back”.   

Monday, 9 October 2017

लोककलेला प्राधान्य दयावे : मंगला बनसोडे











नवी दिल्ली 9 : लोककला ही समाजाची कला असून लोककला आणि लोक कलावंत यांना प्राधान्य दयावे, अश्या भावना ‘वयोश्रेष्ठ सम्मान’ पुरस्कार प्राप्त मंगला बनसोडे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज मंगला बनसोडे यांच्या सृजनात्मक कलेच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना ‘वयोश्रेष्ठ सम्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमानंतर श्रीमती बनसोडे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.  त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोककला ही पीढयान-पीढया चालविण्याचे काम केले जाते. ती टिकून राहावी, समृद्ध व्हावी यासाठी आपल्याकडून आपण जीवंत असे पर्यंत प्रयत्नरत राहूच मात्र, जनतेने, शासनाने यासाठी मदत करावी,  असे केल्यानेच लोककला जीवंत राहील, असे त्या म्हणाल्या.
श्रीमती बनसोडे यांनी आपल्या एकूण कारर्कीदी बद्दल सांगितले. ‘आईला पाहूनच मोठे झाले आणि आई सारखेच नृत्य करायचे अजाणत्या वयातच मनात निश्चित केले.’  आज त्या 65 वयाच्या असूनही कार्यक्रम सादर करतात.  त्यांच्या कुटूंबाला कलेच्या जोपासणेसाठी  हा तीसरा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.  श्रीमती बनसोडे यांची ही पाचवी पीढी आहे जी लोकनाटय, लावणी, वगनाटयाच्या माध्यमातून मनोरंजन तसेच समाजप्रबोधनाचे काम करते.
प्रेक्षकांनी दिलेल्या दादेतूनच आजही नृत्य करण्याची  प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी कथन केले. यावेळी ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची’ या लावणीच्या काही ओळी त्यांनी म्हणून  दाखविल्या.
उपसंचालक दयानंद कांबळे यांनी मंगला बनसोडे यांचा पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ देऊन गौरव केला. यावेळी कार्यक्रामास त्यांच्या कुटूंबातील सदस्य त्यांचा मुलगा नितिन बनसोडे, नातु उपस्थित होते. यासह पत्रकार, कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी ही उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना उपसंचालक श्री कांबळे यांनी केले तर सुत्रसंचलन आणि आभार माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी मानले.


महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना वयोश्रेष्ठ सम्मान


 








नवी दिल्ली 9 : महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज ‘वयोश्रेष्ठ सम्मान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या मंगला बनसोडे, नागपूर जिल्ह्याचे डॉ.महादेवराव मेश्राम, आणि कोल्हापूरच्या मनोरमा कुलकर्णी यांचा समावेश आहे.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने ‘वयोश्रेष्ठ सम्मान 2017’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री क्रिष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, सचिव जी. लता कृष्णराव या उपस्थित होत्या.
सृजनात्मक कलेसाठी मंगला बनसोडे यांचा सन्मान
सृजनशील कलेच्या क्षेत्रात श्रीमती मंगला बनसोडे यांना आज ‘वयोश्रेष्ठ सम्मान’ प्रदान करण्यात आला. श्रीमती बनसोडे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका लोकनाटय तसेच लावणीला समर्पीत कुटूंबात झाला. त्यांची ही पाचवी पीढी आहे जे लोकनाट्य तसेच लावणी सादर करते. श्रीमती बनसोडे या लावणी आणि तमाशाच्या माध्यमातून लोकजागृती, सामाजिक संदेश पोहोचविण्याचे काम करतात. वयाच्या 7 व्या वर्षापासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘लावणीचे संरक्षण तसेच संवर्धन गरजेचे असून या माध्यमातून सकारात्मक सामाजिक संदेश देण्याचा आपला सदैव प्रयत्न राहील तसेच आपण जीवंत असेपर्यंत ही कला जोपासू’ असे त्यांनी पुरस्कार प्राप्तीनंतर व्यक्त केले.  
डॉ.महादेवराव मेश्राम यांना जीवन गौरव पुरस्कार
        डॉ. महादेवराव मेश्राम यांना त्यांच्या आरोग्य सेवेत अतुलनिय योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री मेश्राम हे नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालूक्यातील आहेत. त्यांनी नागपूरातील रोबर्टसन मेडीकल स्कूलमधून आरोग्य विषयी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण केला. आणि 1958 पासून आरोग्य अधिकारी म्हणून रूजु झाले होते, त्यांनी रुग्णांना प्राधान्याने तपासले आहे. यासह आपत्ती काळात पुरग्रस्त क्षेत्रातील पिढीत लोकांसाठी, कुष्ठ रोग्यांसाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान महाराष्ट्र शासनाने ही केला असून त्यांना 1982-85 मध्ये प्रशस्ती पत्राने सन्मानित करण्यात आले आहे. ते आजही रूग्णांना  तपासतात. त्यांच्या या सर्व कामाचा सन्मान म्हणुन त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
मनोरमा कुलकर्णी यांचा क्रीडा क्षेत्रासाठी वयोश्रेष्ठ सन्मान
मनोरमा कुलकर्णी या कोल्हापूरच्या आहेत. त्यांनी महानगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून 35 वर्ष सेवा दिली आहे. त्यांना खेळाची अंत्यत आवड आहे. विशेषत: धावणे या खेळात त्यांनी निवृत्तीनंतर विशेष लक्ष दिले. धावण्यात त्यांना राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी 1500 मीटर मैराथनमध्ये आपले कौशल्य दाखविले आहे. आतापर्यंत त्यांना अंतराराष्ट्रीय आयोजनात 1 रजत, 2 कांस्य, राष्ट्रीय स्तरातील स्पर्धेत 25 स्वर्ण, 4 रजत,3 कांस्य आणि राज्यस्तरावील स्पर्धेत 13 स्वर्ण, 2 रजत,  पदके जींकली आहेत.  श्रीमती कुलकर्णी सध्या 71 वर्षाच्या असून त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील या विशेष कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘वयोश्रेष्ठ सम्मान’  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 यावर्षी वयोश्रेष्ठ सम्मान हा विविध 11 श्रेणीमध्ये 22 लोकांना प्राप्त झालेला आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र हे आहे.

Thursday, 5 October 2017

राजधानीत महर्षि वाल्मिकी जयंती साजरी








नवी दिल्ली, 05 : महर्षि वाल्मिकी यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी महर्षि वाल्मिकी  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त श्रीमती सूमन चंद्रा, इशु संधू , विजय कायरकर, अजितसिंग नेगी  यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात महर्षि वाल्मिकी जयंती साजरी
महाराष्ट्र परिचय केंद्रात महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी कार्यालयातील कर्मचा-यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Tuesday, 3 October 2017

Award Winning Short Film ' Drushti' Artist Master Zishan Jammer Attar's ...

“दृष्टी” या शॉर्ट फिल्मच्या चमूची परिचय केंद्रास भेट












नवी दिल्ली, 3 :    देशपातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेली ‘दृष्टी’ या शॉर्ट फिल्मच्या चमूने आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट  दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या फिल्मला “स्वच्छता ही सेवा” या पुरस्काराने 2 ऑक्टोबर रोजी एका विशेष समारंभात गौरविण्यात आले होते.

            ‘दृष्टी’ या शॉर्ट फिल्मसाठी ज्यांनी लेखन संहीता व संकल्पना तयार केली ते जमीर अत्तार व या फिल्मचे तांत्रिक बाजू सांभाळणारे शार्दूल आफळे, अक्षय हिरवे व बाल कलाकार मास्टर झिशान जमीर अत्तार  यांनी आज आवर्जून महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. स्वच्छता हीच ईश्वर सेवा या भावनेतून जनजागृतीसाठी ही फिल्म तयार केली व माझ्या या संकल्पनेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचा मनस्वी आनंद आहे अशी भावना जमीन अत्तार यांनी यावेळी बोलून दाखवली. या फिल्मचा बाल कलाकार झिशान अत्तार यांनी यावेळी स्वच्छेतचा अप्रतिम संदेश दिला. तो म्हणाला “भारत हा आपला केवळ देश नसून ते आपले घर आहे. ज्याप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे  आपण आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे”.


            यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे यांनी “दृष्टी”  या टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  


Monday, 2 October 2017

महाराष्ट्राला “स्वच्छता ही सेवा”पुरस्कार स्वच्छतेत ठरले देशातील सर्वोत्कृष्ट राज्य













नवी दिल्ली, 2 :   स्वच्छतेच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला ‘स्वच्छता ही सेवा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्लीत आयोजित स्वच्छ भारत दिवस या विशेष संमारभात हा गौरव करण्यात आला. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल व नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
            येथील विज्ञान भवनात आज  गांधी जंयतीनिमित्त स्वच्छ भारत दिवस व स्वच्छ भारत अभियानाचा तिसरा वर्धापन दिन तसेच ‘स्वच्छता ही सेवा’ पंधारवाड्याचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास  केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री सुश्री उमा भारती, गृहनिर्माण व नगर विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री हरदीप सिंह पुरी, पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री श्री एस एस अहलुवालिया  व राज्यमंत्री श्री रमेश चंदप्पा जिगाजीनागी यावेळी उपस्थित होते.
            महाराष्ट्राने स्वच्छतेच्या बाबतीत शहर व ग्रामीण भागात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल या समारंभात घेण्यात आली. ‘संकल्प से सिध्दी’ या पंधरवाड्यात राज्याने जे विविध उपक्रम राबविले व जनजागृती केली त्यामुळे देश पातळीवर सर्वाधिक गुण महाराष्ट्राला मिळाले. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व नगर विकास विभागाने शहर व ग्रामीण भागात स्वच्छ महाराष्ट्रासाठी राबविलेला उपक्रम देशपातळीवर सर्वोत्कृष्ट ठरला. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल, उपसचिव रुचेश जयवंशी  व नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर व मिशन प्रमुख उदय टेकाळे यांना राज्यमंत्री पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री श्री एस एस अहलुवालिया   व गृहनिर्माण व नगर विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.



साताऱ्याच्या प्रशांत पांडेकर ला शॉर्ट फिल्मसाठी पुरस्कार
स्वच्छेतेसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्म स्पर्धेत सातारच्या प्रशांत पांडेकर यांनी दिग्दर्शित व निर्मित केलेली “दृष्टी” ही शॉर्ट फिल्म सर्वोत्कृष्ट ठरली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रशांत पांडेकरला “स्वच्छता ही सेवा” या पुरस्काराने गौरविण्यात आले.
            स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरी भागात उल्लेखनीय काम करणा-या शाळा व महाविद्यालयांनाही यावेळी गौरविण्यात आले. अमरावतीच्या प्रा.राम मेघे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयास स्वच्छतेसाठी केलेल्या जनजागृती बद्दल ‘स्वच्छता ही सेवा’पुरस्काराने गौरविण्यात आले. गृहनिर्माण व नगर विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री हरदीप सिंह पुरी यांचा हस्ते महाविद्यालयास पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील रोझलॅण्ड गृहनिर्माण सोसायटीला त्रीस्तरीय  कचरा विलगीकरणाबद्दल ‘स्वच्छता ही सेवा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

Sunday, 1 October 2017

महाराष्ट्र सदनात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी





नवी दिल्ली, 2 :   महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे  साजरी करण्यात आली.  

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गुंतवणुक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर, अजित सिंग नेगी  यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.