महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, जगविख्यात पॅराशूट जंपर पद्मश्री शितल महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी व ‘जागतिक महिला दिन’, ‘मराठी भाषा गौरव दिन’,‘दिवाळी अंक प्रदर्शन’, ‘लोकराज्य अंक प्रदर्शन’, ‘विशेष मुलाखती’, ‘फेसबुक लाईव्ह’ आदी आयोजन आणि सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग यामुळे परिचय केंद्राने या वर्षात एक वेगळा यशालेख मांडला.
Sunday, 31 December 2017
Saturday, 30 December 2017
नियमांच्या सुलभीकरणामुळे पासपोर्ट आवेदकांच्या संख्येत वाढ
नवी दिल्ली, 30 : नियमांचे सुलभीकरण आणि पासपोर्ट विस्तार कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे 2016 च्या तुलनेत यावर्षी देशात पासपोर्ट आवदेकांची संख्या 20 टक्क्यांनी वाढली, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना दिली.
जटील नियम आणि पोलीस पडताळणीची दीर्घ प्रक्रिया आदि कारणांमुळे देशात पासपोर्टसाठी आवेदन करणा-यांची संख्या रोडावली होती. मात्र, विदेश मंत्रालयाने गेल्या दीड वर्षात ‘नियमांचे सुलभीकरण’ आणि ‘पासपोर्ट विस्तार’ कार्यक्रमांतर्गत देशभरात नव्याने सुरू केलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे पासपोर्ट आवेदकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे श्री. मुळे म्हणाले.
आता पोलीस पडताळणी अडसर कमी
पोलीस पडताळणी हा पासपोर्ट आवेदनात सर्वात मोठा अडसर होता आता हा अडसर कमी त्रासदायक व्हावा यासाठी नियमांचे सुलभीकरण करण्यात आले आहे. यानुसार पॅनकार्ड, आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र असल्यास पोलीस पडताळणीशिवाय लगेच पासपोर्ट उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीनुसार उल्लेख केलेली ओळखपत्र दाखविल्यानंतर लगेच पासपोर्ट उपलब्ध होणार असून यानंतर पोलीस पडताळणीची प्रकिया होणार आहे. पोलीस पडताळणी लवकर व्हावी यासाठी पोलिसांना ‘एम ॲप’ देण्यात आले आहे.
पासपोर्ट आवेदनासाठी असे सुलभ झाले नियम
पासपोर्ट आवेदनासाठी यापूर्वी जन्म तारखेचा सरकारी दाखला अनिवार्य होता आता, हा नियम शिथील करण्यात आला आहे आणि अन्य दाखलेही ग्राहय धरण्यात येतात. एखाद्या व्यक्तीस एकच पाल्य असल्याने अर्थात आई किंवा वडील असल्याने पासपोर्ट आवेदनात अडचण येत असे आता अशा व्यक्तींसाठी सोय करण्यात आली आहे. साधु -सन्यासांना पासपोर्ट सहज मिळावा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, पूर्वी आवेदनासाठी 15 जोडपत्र असायची आता ही संख्या 9 वर आणली आहे.आवेदनासाठी मध्यस्थांचा सहभाग काढून टाकण्यात आला आहे यानुसार, आता कुठल्याही प्रकारचे नोटरायजेशन किंवा अटेस्टेशनची गरज नाही आवेदक हा स्वत:च आपले कागदपत्र अटेस्टेड करू शकतो.
देशात नवीन 251 पासपोर्ट सेवा केंद्र
देशातील नागरिकांना त्यांच्या जिल्हातच पासपोर्ट मिळावा यासाठी विदेश मंत्रालयाने “पासपोर्ट आपल्या दारी” या तत्वानुसार देशभरात 251 पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. पासपोर्ट विस्ताराच्या या कार्यक्रमामुळेही देशभरातून पासपोर्ट आवेदकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे श्री. मुळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
०००००
Friday, 29 December 2017
कोल्हापूर पासपोर्ट वितरणात देशात प्रथम
नवी दिल्ली दि 29
:
देशातील नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने सुरु
झालेल्या नवीन पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील
कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे देशात
पहिल्या पाच मध्ये राज्यातील तीन शहर असून पिंपरी चिंचवड़ दुसऱ्या तर
औरंगाबाद पाचव्या स्थानावर आहे अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव
ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना दिली.
देशात
251 केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने
घेतला असून यातील पहिल्या टप्यात सुरु करण्यात आलेल्या देशातील 59 केंद्रा पैकी पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील तीन शहर पहिल्या पाच मध्ये
आहेत .
कोल्हापुरातून 21 हजार
95 पासपोर्टचे वितरण
कोल्हापूर पासपोर्ट
सेवा केंद्रातून 21 हजार 95 पासपोर्ट चे वितरण करण्यात आले. देशात सर्वाधिक पासपोर्ट वितरणाचा हा
उच्चांक आहे. पिंपरी चिंचवड़ पासपोर्ट वितरण केंद्रातून 20 हजार
83 तर औरंगाबाद केंद्रातून 14 हजार 973
पासपोर्ट वितरित करण्यात आले . कर्नाटकातील म्हैसुरु तिसऱ्या
क्रमांकावर असून या केंद्रातून 16 हजार 446 आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या भुज (गुजरात) केंद्रातून 15 हजार 281 पासपोर्ट वितरित करण्यात आल्याची
माहिती श्री मुळे यांनी परिचय
केंद्रास दिली आहे.
*********
Maharashtra’s 116 Schools To Get Atal Tinkering Labs
New Delhi, 29: Country’s 1504 Schools have been included in the second phase of the 'Atal Tinkering Lab' innovative scheme launched by the Niti Aayog's Atal Innovation Mission. Government of India’s flagship programme. Of which, 116 schools from Maharashtra are included. The NITI Aayog has recently announced in this regard.
With a vision to ‘Cultivate one Million children in India as Neoteric Innovators’, Atal Innovation Mission is establishing Atal Tinkering Laboratories (ATLs) in schools across India. The objective of this scheme is to foster curiosity, creativity and imagination in young minds; and inculcate skills such as design mindset, computational thinking, adaptive learning, physical computing etc
Atal tinkering labs are being set up for the purpose of developing and designing innovative concepts of education for school students and honing their skills. In the first phase, 928 schools of last year were included under this innovative scheme, which included 75 schools of Maharashtra. Now , including both the phases students of 191 schools in Maharashtra will get the benefit of this scheme. In the 388 districts and 79 smart cities across the country, 2 thousand 432 schools have been covered under this scheme.
In order to foster inventiveness among students, ATL would conduct different activities ranging from regional and national level competitions, exhibitions, workshops on problem solving, designing and fabrication of products, lecture series etc. at periodic intervals. For this, a state-of-art laboratory would be set up in these schools to develop new concepts of science, technology, engineering and mathematics in school students, and financial assistance of Rs 20 lakh will be given to each of the schools selected. Students of class 6 to 12 will benefit from this scheme.
Modern laboratories in 116 schools in Maharashtra
The Niti Aayog has declared inclusion of 116 schools in Maharashtra in the second phase. It comprises of 11 schools in Pune district, 10 schools in Mumbai city and 10 schools in Kolhapur district. District wise selection statistics of schools in Maharashtra are as follows.
Ahmednagar-04, Akola-01, Amravati-06, Beed-01, Buldana-04, Chandrapur-01, Dhule-02, Gadchiroli-02, Gondia-07, Hingoli-01, Jalgaon-03, Jalna-01, Kolhapur- 10, Latur-04, Mumbai city-10, Mumbai suburb-04, Nagpur-07, Nanded-01, Nandurbar-01, Nashik-05, Osmanabad-02, Pune-11, Raigad-02, Ratnagiri-02, Sangli- 02, Satara-08, Solapur-02, Thane-03, Wardha-02, Washim-04 and Yavatmal-03.
algaon Should Be Included In The GoI’s 'Prasad' Scheme -MP A.T. Nana Patil
J
New Delhi, 29: Maharashtra’s Member of Parliament, Shri A.T. Nana Patil demanded that the District of Jalgaon should be included in the Central Government’s 'Prasad' scheme for its development of tourism, for, it has various tourist attractions and this would boost up employment to the youth as well.
Mr. Patil urged for the inclusion of Jalgaon district under the Prasad Scheme in the Lok Sabha. He said that there are many religious and tourist attraction places in the District. The ancient Temple of Omkareshwar, Unapdev hot water lakes, ancient Ganesh temple, Parola fort built by the father of Jhansi’s Rani Laxmibai, Shirsoli lake, Rameshwar Temple situated on the confluence of Tapi, Girna and Anjani rivers, have become an attractive tourist destination, attracting national and international visitors from various countries.
Under the ‘PRASAD’ scheme the focus is on development and beautification of the pilgrimage destinations. Provision of adequate infrastructural facilities is necessary to boost up Jalgaon as a tourist destination. Shri Patil urged for considering his demand to include Jalgaon in the ‘Prasad’ Scheme, which would encourage employment to the locals and the development of the tourist destinations as well, he added.
Thursday, 28 December 2017
परिचय केंद्राचे महत्व दिवसेंदिवस वाढते आहे : खासदार संजय जाधव
नवी दिल्ली,28: महाराष्ट्र परिचय केंद्राचे महत्व दिवसेंदिवस वाढते असल्याचे मत परभणी चे खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केले.
श्री जावध यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारीक चेर्चे दरम्यान त्यांनी परिचय केंद्राविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे, दैनिक सामनाचे दिल्ली ब्युरो चिफ निलेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर महाराष्ट्राचा परिचय देश पातळीवर व्हावा यासाठी स्थापीत केलेले हे केंद्र यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीचा परिचय होता. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन अख्ख्या देशाला व्हावे या हेतुने सुरू झालेले या केंद्राचे वर्तमान स्वरूप अधिकच व्यापक असल्याचे सांगुन परिचय केंद्रात आल्यावर आपण महाराष्ट्रातच आहोत असेच येथील वातावरण आहे, असे श्री जावध यांनी बोलुन दाखविले. श्री जाधव यांनी त्यांच्या मतदार संघात होत असलेल्या विकास कामांबाबत माहिती दिली.
यावेळी श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. जाधव यांना दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल श्री जाधव यांनी समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
Wednesday, 27 December 2017
मुख्यमंत्र्यांनी घेतली माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची भेट
नवी दिल्ली,27 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची सदिच्छा भेट घेतली.
नुकताच, श्री. वाजपेयी यांचा 93वा वाढदिवस साजरा झाला. या पार्श्वभूमीवर,
श्री. फडणवीस यांनी श्री. वाजपेयी यांच्या 6 ए- कृष्णमेनन मार्ग या शासकीय
निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिल्या. यावेळी राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत
पाटील उपस्थित होते. या उभय नेत्यांनी श्री. वाजपेयी यांचे आर्शिवाद घेऊन
वाजपेयी यांच्या कुंटुंबातील सदस्यांसोबत चर्चा केली. यावेळी श्री. वाजपेयी यांच्या आठवणीना उभय नेत्यांनी उजाळा दिला.
श्री वाजपेयी यांच्या सार्वजनिक तसेच राजकीय जीवनातील विविध आठवणी व
किस्से यांची यावेळी चर्चा झाली. श्री. फडणवीस यांची सार्वजनिक व राजकीय
जीवनातील वाटचाल व श्री. वाजपेयी यांचा लाभलेला आर्शिवाद व मार्गदर्शन
याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मुख्यमंत्री यांनी दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा
या चर्चेदरम्यान, श्री. फडणवीस यांच्याकडे असलेले श्री.वाजपेयी यांच्या
सेाबतचे बालपणीचे दुर्मिळ छायाचित्र कुंटुंबींयाना दाखवीले. कुंटुंबीयांना
याचा अत्यानंद झाला. श्री. फडणवीस यांच्या बालपणात झालेल्या श्री.
वाजपेयीसोबतच्या भेटी संदर्भात चर्चाही रंगली.अधिकृत माहितीचे स्त्रोत परिचय केंद्र : दयानंद कांबळे
गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाच्या
विद्यार्थ्यांची परिचय केंद्राला भेट
नवी
दिल्ली, 27 : अधिकृत माहितीचे स्त्रोत म्हणून महाराष्ट्र परिचय केंद्राकडे बघितले
जात असल्याचे कार्यालयाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा
करतांना व्यक्त केले.
यवतमाळ जिल्ह्ययातील उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे
महाविद्यालयातील पत्रकारीता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी महाराष्ट्र
परिचय केंद्राला भेट दिली. त्यावेळी उपसंचालक श्री कांबळे विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले. राजधानी दिल्लीत महाराष्ट्र शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे कार्य महाराष्ट्र
परिचय केंद्राकडून कसे केले जाते याविषियी श्री कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी
संवाद साधला. यावेळी महाविद्यालयाचे केंद्र प्रमुख बालाजी लाभशेटवारच्या यांच्यासह
प्राध्यपक लक्ष्मीकांत नंदपवार, प्राध्यापक संतोष मुडे, प्राध्यापक सिद्धेश्वर
जगताप उपस्थित होते.
यावेळी झालेल्या औनपचारिक चर्चेमध्ये महाराष्ट्र
शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या वैविध्यपूर्ण कार्याची माहिती उपसंचालकांनी दिली. यामध्ये दैंनदिन कामकाजात केंद्र शासनाशी, महाराष्ट्र
सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे महाराष्ट्रातील खासदारांशी तसेच
महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वयाबाबत सांगितले. यासह
दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा
संपर्क परिचय केंद्राव्दारे करण्यात
येणारा समन्वय, परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध अभिनव उपक्रम आदींची
माहिती श्री.कांबळे यांनी दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा,
कार्यालयाचे तीन भाषेतील अधिकृत ट्विटर
हँडल, फेसबुक पेजेस, युटयुब चॅनेल, ब्लॉग, व्हॉटसॲप गृप आदींच्या माध्यमातून
प्रभावीपणे करण्यात येणारा शासनाचा जनसंपर्क तसेच प्रसिध्दीविषयीही श्री. कांबळे
यांनी यावेळी सांगितले. विविध सामाजिक माध्यमांसाठी वैविध्यपुर्ण लिखाणाबाबतही
श्री कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या
विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी
शासनाच्या प्रतिमेनिर्मितीसाठी कार्यालयाकडून राबविण्यात येणा-या उपक्रमांबाबते सादरीकरण दिले.
Saturday, 23 December 2017
संपुर्ण ग्रामीण महाराष्ट्र मार्च 2018पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचे नियोजन तयार : बबनराव लोणीकर
नवी
दिल्ली, दि. 23 : संपुर्ण
ग्रामीण महाराष्ट्र मार्च 2018 पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचे नियोजन तयार
करण्यात आल्याची, माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री बबनराव
लोणीकर यांनी आज विज्ञान भवनात आयोजित
कार्यक्रमात दिली.
केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने
विज्ञान भवनात ‘गंगा ग्राम स्वच्छता सम्मेलन’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री लोणीकर यांनी ही माहिती दिली. या
सम्मेलनाची अध्यक्षता केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांनी केली.
याप्रसंगी विविध राज्यांचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मंचावर उपस्थित होते.
यासह केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
देशातील हागणदारी मुक्त ग्रामपंचायतीच्या संख्येत
महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकाचे आहे. राज्यातील 11 जिल्हे, 204 तालुके आणि
22,310 ग्रामपंचायती, हागणदारी मुक्त घोषित करण्यात आलेली असल्याची माहिती श्री
लोणीकर यांनी दिली. उरर्वीत जिल्हा,
तालुके, ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्यासाठी सध्या राज्याला एकूण 3600 कोटी
रूपयांच्या निधीची आवश्यकता आहे. केंद्राकडून 1985 कोटी रूपयांच्या निधीची मागणी श्री
लोणीकर यांनी यावेळी करून, हा निधी राज्याला लवकरात लवकर मिळाल्यास ग्रामीण
महाराष्ट्र पुर्णत: हागणदारी मुक्त होईल,
असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री सुश्री उमा भारती यांनी निधी उपलब्ध
करूनदेण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिली.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्याने
27902 ग्रामपंचायतींमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत पायाभूत सर्वेक्षणाचे काम
पुर्ण केले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे सर्व जिल्ह्यांच्या प्रकल्प अंमलबजावणीचा
वर्ष 2014 ते 2018 पर्यंतचा आराखडा केंद्रशासनास
पाठविलेला आहे. या पायाभुत सर्वेक्षणाच्या आधारेच राज्यामध्ये ग्रामीण भागात शौचालय
बांधकाम व ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले असल्याचे
श्री लोणीकर यांनी सांगितले.
95
% टक्के कुटुंबांमध्ये शौचालय
स्वच्छ
भारत मिशन (ग्रामीण)अंतर्गत डिसेंबर 2017 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात शौचलय
असलेली कुटूंबे 1,06,08,776 इतकी म्हणजेच 95% टक्के आहेत. 5
% टक्के म्हणजे 5,26,257 कुटुंबाना शौचालय सुविधा उपलब्ध
करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी माहिती, शिक्षण व संवाद अंतर्गत विविध
उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती श्री लोणीकर यांनी दिली.
जिल्हा
व राज्य स्तरावर मुख्य संसाधन संस्थांची निर्मिती
संपुर्ण महाराष्ट्र हागणदारी मुक्त करण्यासाठी
राज्य शासनाने विविध अभिनव उपाययोजना आखल्या आहेत. यातंर्गत हागणदारी मुक्त
गावांची सद्यस्थिती माहिती करून घेण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा
स्तरावर 83 व राज्य स्तरावर 22 अशा एकूण 105 मुख्य संसाधन संस्थांची निवड सूची
तयार करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीने हागणदारी मुक्त ग्राम पंचायतीची पडताळणी
करण्यात येते आहे. वर्ष 2017-18 चे पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील
एकूण 27,667 ग्राम पंचायतीपैंकी 22310 ग्रामपंचायती जिल्हास्तरावरून हागणदारीमुक्त
ग्राम पंचायत म्हणून जाहिर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 15,380 ग्राम पंचायतींची 120
तालुक्यांची व 9 जिल्ह्यांची पडताळणी मुख्य संसाधन संस्थाकडून पूर्ण करण्यात आली
आहे. अन्य ग्राम पंचायतींच्या पडताळणीचे काम प्रगती पथावर असल्याचे श्री
लोणीकरांनी सांगितले.
ग्राम
पंचायत नोंदवही व महिना प्रगती अहवाल
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)
अंतर्गत करण्यात येणा-या विविध कामकाजाची नोंद करण्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर नोंदवही
व महिना प्रगती अहवाल रजिस्टर उपलब्ध करण्यात येते. त्याव्दारे गावातील प्रत्येक कुटूंबांची
स्वच्छतेबाबतची माहिती प्राप्त होत आहे. अभियानांतर्गत
होणा-या कामकाजाचा लेखाजोखा जिल्हा व राज्यस्तरावर यामार्फत प्राप्त होतो.
स्वच्छ
महाराष्ट्र रेडियो
माहिती, शिक्षण व संवाद
अंतर्गत अभियानाची माहिती व्हावी यासाठी स्वच्छ
महाराष्ट्र रेडियोची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांचे व विभागाचे तसेच
राज्याचे विविध व्हॉट्सॲप ग्रुप बनविण्यात आलेले आहेत. दररोज या ग्रुपवर
राज्यांमध्ये होणा-या विविध उपक्रमांची माहिती प्रसुत केली जाते.
स्वच्छता
दिंडी
राज्यात दरवर्षी आषाढी एकादशी
चे औचित्त साधून स्वच्छता दिंडी चे आयोजन करण्यात येते. यामुळे दर वर्षी लाखो
भाविकांमध्ये स्वच्छतेचा प्रचार व प्रसार केला जातो. दिंडीमध्ये सर्व जिलह्यांतून स्वच्छतेचे
रथ व कलापथकांमार्फत शौचालय बांधण्याचे व वापर करण्याचे महत्व पटवून देण्यात येते.
अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री श्री लोणीकर यांनी दिली.
महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातंर्गत राज्यात नवीन योजना सुरू करण्याची परवानगी दयावी : बबनराव लोणीकर
नवी
दिल्ली, दि. 23 : राष्ट्रीय पेयजल
कार्यक्रमातंर्गत राज्यात नवीन योजना सुरू करण्याची परवानगी तसेच केंद्राकडून
ठरविण्यात आलेला निधी मिळावा, अशी मागणी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
बबनराव लोणीकर यांनी आज येथे केली.
केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने विज्ञान
भवनात ‘गंगा ग्राम स्वच्छता सम्मेलन’
चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री लोणीकर यांनी ही मागणी केली. सम्मेलनाची अध्यक्षता
केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांनी केली. याप्रसंगी विविध
राज्यांचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मंचावर उपस्थित होते. यासह केंद्रीय
पेयजल व स्वच्छता विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातंर्गत राज्यात पाणी पुरवठा
योजनेची कामे राबविली जातात. मागील तीन वर्षात राज्यात कोणतीही नवीन पाणी पुरवठा
योजना सुरू करण्यात आलेली नसल्याची माहिती लोणीकरांनी यावेळी दिली. 2013 पुर्वीची
छोटे-मोठे 6000 थकित जुनी कामे होती. ज्या मधील जवळपास 5200 काम पुर्ण करण्यात
आलेली आहेत. उर्वरीत कामे पुर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. अशी माहिती देत लोकप्रतिनिधीकडून
नवीन कामांचे प्रस्ताव मोठया प्रमाणात सादर केले जात आहे. मात्र, केंद्राने कुठलीही
नवीन योजना सुरू करण्याची परवानगी न दिल्यामुळे ही कामे करता येत नाहीत. त्यामुळे
केंद्राने नवीन कामे सुरू करण्याची परवानगीसह केंद्राचा 50 टक्के असलेला वाटा
म्हणजे जवळपास 1 हजार कोटी रूपये राज्य सरकारला देण्यात यावे, यामुळे नवीन कामांना
गती प्राप्त होणार, असल्याचे श्री लोणीकरांनी सांगितले.
राज्यातील दुष्काळ सदृश्य जिलह्यात 2015-16 मध्ये एकूण
6 हजार टँकरने पाणी पुरवठा केलेला आहे. केंद्र शासनाने देशभरातील एकूण 905 तालुके
अवर्षण प्रवण घोषित केलेले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील 145 तालुक्यांचा समावेश यामध्ये
आहे. या तालुक्यांमध्ये सतत होणारी पाण्याची टंचाई दुर करण्यासाठी नवीन पाणीपुरवठा
योजना सुरू होणे, गरजेचे असल्याचा आग्रह श्री लोणीकरांनी यावेळी केला.
Friday, 22 December 2017
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्काराठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन
दिल्लीतील
मराठी लेखक / प्रकाशकांनाही संधी
नवी
दिल्ली, दि. 22 : महाराष्ट्र
शासनाच्यावतीने देण्यात येणा-या ‘स्व. यशवंतराव चव्हाण
राज्य वाड:मय पुरस्कारासाठीच्या’ प्रवेशिका महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात मागविण्यात आली आहेत. या पुरस्कारांतर्गत
दिल्लीसह बृह्नमहाराष्ट्रातील मराठी लेखक व प्रकाशकांना ‘सरफोजीराजे
भोसले बृह्ममहाराष्ट्र पुरस्कारासाठी’ महाराष्ट्र परिचय
केंद्र नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार आहे.
मराठी भाषेतील उत्कृष्ट
वाड:मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळाच्यावतीने ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजने’अंतर्गत
विविध साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. प्रकाशन वर्ष 2017 करिता दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 या
कालावधीत प्रकाशित पुस्तके आणि प्रवेशिका या स्पर्धेसाठी दिनांक 1 ते 31 जानेवारी 2018 या
कालावधी दरम्यान पाठविता येणार आहे.
एकूण
4 विभाग ,34 साहित्य प्रकार आणि 29 लाख रूपये पुरस्कार राशी
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजनेअंतर्गत एकूण चार
विभागात 34 साहित्य प्रकारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या
आहेत. प्रोढ वाड्.मय
विभागात काव्यासाठी ‘कवी केशवसुत पुरस्कार’ (पुरस्कार राशी 1,00,000
रूपये), कादंबरीसाठी ‘हरी नारायण आपटे
पुरस्कार’ (पुरस्कार राशी 1,00,000 रूपये) अशा एकूण 22 साहित्य
प्रकारात 22,00,000 रूपयांची पुरस्कार राशी आहे. बाल वाड्.मय विभागात कवितेसाठी
‘बालकवी पुरस्कार’ (पुरस्कार राशी 50,000 रूपये), कादंबरीसाठी
‘ सानेगुरूजी पुरस्कार’ (पुरस्कार राशी 50,000) अशा एकूण 6 साहित्य प्रकारात 3,00,000
रूपयांची पुरस्कार राशी आहे. प्रथम प्रकाशन प्रकारात काव्यासाठी ‘बहिणाबाई चौधरी पुरस्कार’ (पुरस्कार
राशी 50,000 रूपये), नाटकासाठी ‘ विजय तेंडुलकर पुरस्कार’ (पुरस्कार
राशी 50,000) अशा एकूण 6 साहित्य
प्रकारात 3,00,000 रूपयांची पुरस्कार राशी आहे. सरफोजीराजे भोसले बृह्ममहाराष्ट्र पुरस्कार
हा खास बृह्नमहाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार
आहे. साहित्याच्या सर्व प्रकारातील साहित्यकृती या पुरस्कारासाठी पाठविता येणार
असून उत्कृष्ट साहित्यकृतीस ‘सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार’
(पुरस्कार
राशी 1,00,000 रूपये) प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी
प्रवेशिका व पुस्तके महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात
किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली पाठविता येणार आहे.
या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दूसरा
मजला, सयानी रोड, प्रभा देवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच, बृह्ममहाराष्ट्रातील लेखक व
प्रकाशकांसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/8, स्टेट
एम्पोरिया बिल्डींग, बाबाखडक सिंह मार्ग, नवी दिल्ली या कार्यालयातही स्पर्धेची
नियमावली व प्रवेशिका उपलब्ध आहे. याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव
चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2017 नियमावली व प्रवेशिका’
या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. बृहन्महाराष्ट्र
क्षेत्रातील विजेत्यांसाठी सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार (सर्व साहित्य) साठी निवड केली जाईल. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह
सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 31
जानेवारी 2018 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक /
प्रकाशक या स्पेर्धसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.
ज्या
लेखक व प्रकाशकांना या योजनेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी (मुंबईतील लेखक /प्रकाशकांनी) पुस्तकांच्या दोन
प्रतींसह विहित नमून्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400
025 येथे पाठवाव्यात. मुंबई वगळता राज्यातील अन्य ठिकाणच्या लेखक /प्रकाशकांनी
संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, बृह्नमहाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांनी थेट
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मुख्य कार्यालयात किंवा
महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली या कार्यालयाकडे हे साहित्य व प्रवेशिका दिनांक
1 जानेवारी ते 31 जानेवारी 2018 पर्यंत पाठवावे, असे आवाहन
सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.
पुरस्कारासाठीची
प्रवेशिका व नियमावली या कार्यालयास प्राप्त झाली असून इच्छुकांना पाहण्यासाठी व
सहभाग घेण्यासाठी या कार्यालयात उपलब्ध आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
०००००
Subscribe to:
Posts (Atom)