Thursday, 31 January 2019

डॉ.आंबेडकरांनी सकारात्मक पत्रकारिता केली : थावरचंद गहलोत



 

 


शानदार समारंभात "मूकनायक" पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 31 :  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले काम सर्वव्यापी होते, त्यांनी केलेली पत्रकारिता सकारात्मक होती, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी आज प्रथम मुकनायक सामाजिक पत्रकारितापुरस्कार वितरण समारोहात व्यक्त केले.

येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात मूकनायक सामाजिक पत्रकारिता  पुरस्काराचे  वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय आणि डॉ.बाबासाहेबआंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन  केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर,  सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे, विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर, खासदार हरीशचंद्र चव्हाण, विकास महात्मे आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनिशनचे महासंचालक के.जी.सुरेश, महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाचे  प्रधान सचिव दिनेश वाघमारे व अन्य वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री गहलोत म्हणाले, बाबासाहेब आयुष्यभर सामाजिक समतेसाठी लढले, आवाज नसलेल्या समाजाचा आवाज म्हणून मूकनायक पाक्षिक सुरू केले. त्यावेळी उचलेले क्रांतीकारी पावलाने आजचा समाज घडला आहे. बाबासाहेबांचे सर्वच क्षेत्रात केलेले काम अतुलनीय आहे. बाबासाहेबांचा  सामाजिक समतेचा विचार देशातील अंतीम व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम भारत सरकार करीत असल्याचेही श्री गहलोत यावेळी म्हणाले.

सामाजिक समतेची कास धरणा-या चार पत्रकारांना मुकनायक पत्रकारिता पुरस्कार

सामाजिक समतेची कास धरणा-या महाराष्ट्रातील चार पत्रकारांना  मुकनायक सामाजिक पत्रकारिता  पुरस्काराने गौरविण्यात आले. झी 24 तास चे संपादक ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री कुवळेकर यांनी गाव पातळीवरच्या समस्यांना वाचा फोडली. राज्यातील पाण्याचा प्रश्न मांडला, समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न विजय कुवळेकरांनी केला. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून त्यांना प्रथम मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने  गौरिवण्यात आले.

पुरस्काराला उत्तर देतांना श्री कुवळेकर म्हणाले,  हा पुरस्कार स्वीकारतांना अंत्यत आनंद होत आहे. बाबासाहेबांनी मांडलेला विचार हा अंतीम माणसाला न्याय, समता देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यात माणूस सर्वात महत्वाचा होता, अशा भावना श्री कुवळेकर यांनी व्यक्त केल्या. पुरस्कार स्वरूप 1 लाख रूपये रोख, शॉल, श्रीफल आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

लोकसत्तेचे सहायक संपादक मधु कांबळे यांनाही, त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून केलेल्या पत्रकारितेसाठी मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराला उत्तर देतांना श्री कांबळे म्हणाले, हा पुरस्कार पत्रकारितेशी संबंधित असल्यामुळे स्वीकारतांना आनंद होत आहे. बाबासाहेबांनी लिहीलेली राज्यघटना हीच पत्रकारीतेचा  चौथ्या स्तंभाचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले. यांनाही 1 लाख रूपये रोख, शॉल, श्रीफल आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

प्रोत्साहनपर पुरस्कारांमध्ये तरूण भारत वर्तमानपत्राच्या उपसंपादक योगीता साळवी आणि जय महाराष्ट्रवृत्त वाहिनीचे पत्रकार  गोंविद तुपे यांना सन्मानित करण्यात आले.  51 हजार रूपये रोख, शॉल, श्रीफल, आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरिवण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायकहे पाक्षिक सुरु केले या घटनेस  १०० वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी  पहिला 'मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कार' आज वितरीत करण्यात आला. शोषितांच्या व्यथा आणि आवाज सरकार व जनसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सुरु झालेल्या मूकनायक पाक्षिकाच्या नावाने देण्यात येणार हा पुरस्कार शतकारनंतरही समाजातील शोषितांचा आवाज आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचे काम करणा-या पत्रकारांना देण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब वंचितांचा आवाज बनले : सुरेश प्रभु
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे  वंचितांचा आवाज बनुन मुकनायक या पाक्षिकातून मांडत गेले, असल्याच्या भावना केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांनी व्यक्त केल्या.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेरीत असणारा विचार हा सार्वकालिक आहे. तो विचार रूजविण्याचा प्रयत्न सरकारव्दारे होत असून भविष्यात न बोलताही प्रश्न सुटतील, अशी अशाही श्री प्रभु यांनी व्यक्त केली.
मुकनायक पुरस्कार सामाजिक न्याय रुजविण्यात भर पडणार : राजकुमार बडोले
मुकनायक पुरस्कार सामाजिक न्याय रुजविण्यात भर पडणार,असे प्रतिपादन राजकुमार बडोले यांनी केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्यायाचे प्रतिक असून त्यांनी केलेले सामाजिक, धार्मिक, आंदोलने हे भारतीय समाजाला सदैव प्रेरणादायी राहतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायकाची सुरूवात करून इतिहास घडविला. जगातील प्रतिष्ठीत विद्यापीठात  उच्च शिक्षण घेऊन त्यांनी संपूर्ण जीवन हे सामाजिक न्यायासाठी व्यतीत केले. मुकनायक हे अस्पृश्य समाजासाठी दिपस्तंभ ठरला असून या पाक्षिकाला शंभर वर्षे झाली आहेत. त्यामुळे या पुरस्काराचे विशेष महत्व आहे. या पुरस्कारामुळे सामाजिक न्याय समाजात रूजविण्यात भर पडणार श्री बडोले म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता संशोधन अध्यासन सुरू करणार : के. जी. सुरेश

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी अध्यासन सुरू करणार असल्याची घोषणा, संस्थेचे महासंचालक के.जी. सुरेश यांनी आजच्या कार्यक्रमात केली. बाबासाहेबांनी  सुरू केलेले पाक्षिक मुकनायक पुनर्जिवीत करण्याचे काम आयआयएमसीच्या माध्यमातून केले जाईल, असेही श्री सुरेश म्हणाले. बाबासाहेबांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून मागास समाजात  नवचेतना  जागृत केली होती. बाबासाहेबांचा विचार हा सर्व समावेशी विचार होता. समाजात नवीन विचार देणे ही पत्रकारांची महत्वाची  भुमिका असते. ही भुमिका शंभर वर्षापुर्वी बाबासाहेबांनी दिली होती.  त्याला पुनर्जिवीत करण्याचे काम आयआययएमसीव्दारे केले जाईल, असे श्री सुरेश यावेळी म्हणाले.

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज्य अहीर,  सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केले, तर आभार बार्टीचे महासंचालक श्री कैलास कणसे यांनी मानले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘सुरजकुंड मेळयाचे’ आज उद्घाटन गड-किल्ले, छत्रपती शिवरायांचा पराक्रम यांच्यासह राज्याच्या संस्कृतीचे होणार दर्शन





















नवी दिल्ली, 31 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते हरियाणातील फरिदाबाद येथे आयोजित 33 व्या ‘सुरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळयाचे’ 1 फेब्रुवारी 2019 रोजी उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्राला या मेळयाच्या थीम स्टेटचा मान मिळाला असून, महाराष्ट्रातील गड-किल्ले, छत्रपती शिवरायांचा पराक्रम तसेच महाराष्ट्राचे सण-उत्सव व गौरवशाली परपंरा दर्शविणारे विविध देखावे आणि रेखाचित्रांनी सुरजकुंड सज्ज झाले आहे. या मेळयात राज्याची हस्तकला, व्यंजन व संस्कृती बघायला मिळणार आहे.
सुरजकुंड येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत हरियाणा पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा सुरजकुंड मेला प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विजय वर्धन यांनी मेळ्याच्या उद्घाटनाबाबत व संपूर्ण सज्जतेबाबत माहिती दिली .केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी , महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी विजय वर्धन यांनी सांगितले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते या मेळ्याचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, हरियाणाचे पर्यटन मंत्री रामबिलास शर्मा, भारतातील थायलंड चे राजदूत चुटिन टॉर्न गांटा यावेळी उपस्थित राहतील.
सुरजकुंड मेळ्यात अवतरला महाराष्ट्र
या मेळ्याचे मुख्य कार्यक्रम स्थळ असणा-या चौपाल रंगमंचाला ऐतिहासिक रायगड किल्ल्याचे स्वरुप देण्यात आले आहे. येथेच उभारण्यात आलेल्या मातीच्या छोट्या- छोट्या घरांवर हत्तीवर आरुढ छत्रपती शिवाजी महाराज तसेच गडावर लढणारे शूर मावळे चित्ररुपाने दर्शविण्यात आले आहेत. शेजारीच मराठमोळी गुढी उभारण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील दिवाळी सणाचे मुख्य आकर्षण असणारा आकाशकंदिल या मेळ्यात ठिक ठिकाणी लावण्यात आले आहेत. मेळ्याच्या मुख्यद्वाराच्या कडेलाच राज्यातील गड किल्ले यांच्या मोठमोठ्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई शेजारील जगप्रसिध्द एलिफंटा गुंफेतील त्रिमृती ही आकर्षकरीत्या सजविण्यात आली आहे. महाराष्ट्राची समृध्द लोककलाही या मेळयात ठिकठिकाणी पहायला मिळणार आहे. वासुदेवाच्या वेशातील कलाकार या मेळयात भेट देणा-या देश-विदेशातील पर्यटकांना जनजागृती पर संदेश देण्यास सज्ज झाले आहेत. तसेच या मेळयात सांस्कृतिक कार्यकम व मनोरंजानासाठी उभारण्यात आलेल्या विशेष कट्टयावर महाराष्ट्रातील कलाकार भारूड, लावणी आदि लोककलाही सादर करणार आहेत.
महाराष्ट्राने केले देशाचे संरक्षण – विजय वर्धन
यावर्षीच्या सुरजकुंड मेळ्याची थीम स्टेट असणारे महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य असून इतिहासात देशाच्या संरक्षणासाठी या राज्याने घेतलेला पुढाकार चिरस्मरणीय आहे. भारत देशाच्या संरक्षणासाठी दोन लाख मराठा सैनिक हजारो मैल हरियाणातील पानीपत येथे अहमदशाह अब्दालीचा सामना करण्यासाठी आले होते. या लढाईत मराठ्याचा पराभव झाला मात्र देश संरक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान अन्नय् साधारण असल्याचे विजय वर्धन यावेळी सांगितले. एवढेच नव्हे तर दक्षिण हरियाणात मराठ्यांचे राज्य होते हा गौरवशाली इतिहास असलेला महाराष्ट्र 33 व्या सुरजकुंड मेळ्याचे थीम स्टेट आहे. सतरा दिवस चालणा-या या मेळ्यात महाराष्ट्राची हस्तकला, व्यंजन आणि वैविध्यपूर्ण संस्कृती देश व जगातील पर्यटकांना अनुभवायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुरजकुंड मेळयाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती देश व जगात पोहचेल :विनीता सिंघल
या मेळयात महाराष्ट्राचे 75 स्टॉल्स उभारण्यात आले असून सर्वोत्तम 100 हस्तकलाकार विविध हस्तकलेच्यावस्तू विक्रीसाठी ठेवणार आहेत. राज्यातील 100 कलावंताचा चमू येथे दाखल झाला असून हे कलाकार महाराष्ट्राची वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणा-या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण व मर्दानी खेळांचे प्रात्याक्षिक दाखविणार आहेत. राज्याचे वैशिष्टयपूर्ण खाद्यपदर्थही याठिकाणी येणा-यांना चाखायला मिळणार आहेत. या मेळयाच्या माध्यमातून महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती व पर्यटन स्थळ देश व जगात पोहचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेळयात मुख्य चौपालावर दररोज सायंकाळी विविध राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून महाराष्ट्राला महत्वाचे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची धुरा देण्यात आली आहे. मेळाव्याच्या उद्घाटनाच्या दिवशी 1 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण सांस्कृतिक वारशासह ‘शिवाजी महाराजांचा गनीमा कावा’ सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे. 7 व 9 फेब्रुवारी रोजीही महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतिचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय या सर्व कार्यक्रमाचे संयोजन व समन्वय करणार आहे.
सुरजकुंड मेळा प्राधिकरण व हरियाणा राज्य पर्यटन विभाग, केंद्र शासनाचे पर्यटन विभाग, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक विभाग, परराष्ट्र व्यवहार विभाग यांच्या संयुक्त् विद्यमाने 1 ते 17 फेब्रुवारी 2019 दरम्यान 33 व्या सुरजकुंड मेळयाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील 29 राज्य् आणि 7 केंद्रशासित प्रदेश तसेच एकूण 30 देश या मेळयात सहभागी होत आहेत. या मेळयात थायलंडला सहयोगी देशाचा मान मिळाला आहे.

Surajkund All Set To Welcome Maharashtra As The ‘Theme State’















New Delhi, 31: The 33rd Surajkund International Crafts Mela is all geared up to welcome the State of Maharashtra as the ‘Theme State’ this year.

A press meet was organized by the Surajkund Mela Authority and Haryana Tourism in Collaboration with Ministry of Tourism at the ‘Surajkund’ Mela venue. Present on the occasion was Shri Yogendra Tripathi, IAS, Secretary, Ministry of Tourism, Govt. of India and Chairman, Surajkund Mela Authority, Shri Vikas Yadav, IAS, MD, Haryana Tourism Corporation & Chief Administrator, Surajkund Mela Authority, Shri Vijai Vardhan, IAS, Add. Chief Secretary, Department of Tourism, Govt of Haryana & Vice Chairman, Surajkund Mela Authority, and Maharashtra Tourism Department’s Principal Secretary Smt Vinita Singhal.

Speaking to Media after the Conference, Smt Singhal said that, ‘We as a State of Maharashtra are privileged that this year, we are participating as a ‘Theme State’ in the Surajkund Mela. This Mela is internationally acclaimed for its richness and diversity of the handicrafts, handlooms and cultural heritage of India.

We have created a replica of the historic Raigad Fort because it is most interesting and occupies a place of pride in our History. Artisans all over Maharashtra will be here to display their handicrafts and handlooms. The ‘Apna Ghar’ at Surajkund Mela, which will host a family from Maharashtra will depict the ‘Wada’ style existing and showcase how rural people live, she informed. Adding further, She said we have brought our traditional cuisine which the North Indians would definitely relish. We call, ‘Maharashtra Unlimited’ because we have Beaches, Tiger Reserves, Forts, Bollywood and there is nothing in the world that is not available in Maharashtra.

Maharashtra will show case its unique heritage and rich culture through various art forms and handicrafts from the State. Traditional Dances, Ballets of Shivaji Maharaj, a replica of ‘Maha Dwar or Maha Darwaja’ will definitely enthrall the audience. The Surajkund Mela will be held till 17th February.

The Surajkund Mela will be inaugurated a the hands of Maharashtra Chief Minister, Shri Devendra Fadanavis and Haryana Chief Minister, Shri Jagdish Khattar on Friday, 1st of February 2019.

********

महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी 17 हजार 817 घरे मंजूर

नवी दिल्ली, 27 : केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी 17 हजार 817 घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण 4 लाख 78 हजार 670 घरे मंजूर करण्यात आली आहेत.
केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या झालेल्या 42 व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

राज्याला आतापर्यंत 6 लाख 29 हजार घरे मंजूर

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) अंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्राला 6 लाख 29 हजार घरे केंद्राकडून मंजूर झाली आहेत. केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या 42 व्या बैठकीत महाराष्ट्रासह (17,817) आंध्रप्रदेश (1,05,956) , पश्चिम बंगाल (1,02,895), उत्तरप्रदेश (91,689), तामिलनाडू (68,110), मध्यप्रदेश (35,377), केरळ (25,059), ओडिशा (12,290), बिहार (10,269), आणि उत्तराखंड (9,208) या 10 राज्यांसाठी या बैठकीत एकूण 4 लाख 78 हजार 670 घरे मंजूर करण्यात आली आहेत.

या बैठकीत एकूण 22 हजार 942 कोटी खर्चाच्या 940 प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने 7,180 कोटींचा सहायता निधी मंजूर केला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने आतापर्यंत देशभरात विविध राज्यांकरिता 72 लाख 66 हजार घरांना मंजुरी दिली आहे.

Tuesday, 29 January 2019

राजधानीत हुतात्म्यांना आदरांजली





                                          
नवी दिल्ली, ३० : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणा-या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आज महाराष्ट्र सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कोपर्निकस स्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त(अ.का.)समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
   महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली
 महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे , जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह  कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते.                                                          
              आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                                        00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.48/दि.30.01.2019


महाराष्ट्रातील डॉ. मधुकर पाटील आणि रहमान अब्बास या दोन साहित्यिकांना प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान






नवी दिल्ली,  29 :  महाराष्ट्रातील प्रसिध्द मराठी चिंतनशील लेखक डॉ. धुकर पाटील लिखित 'सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध' या समीक्षा ग्रंथास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृती आणि रहमान अब्बास यांच्या रोहज़ीनया उर्दू कांदबरीला  वर्ष २०१८ साठीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज  प्रदान करण्यात आला.
येथील कमानी सभागृहात एका शानदार कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उडीया लेखक  मनोज दास, श्रीलंकेचे प्रसिद्ध लेखक संनथन अयाथ्युराय, साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर खंबार, उपाध्यक्ष माधव कौशिक, सचिव के. श्रीनिवासराव यावेळी मंचावर उपस्थित होते.  देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांना यावेळी पुरस्कृत करण्यात आले.
सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध या समीक्षा कृती विषयी
            मौज प्रकाशनाने १८ एप्रिल २०१३ मध्येसर्जनप्रेरणा आणि कवित्वशोधया ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली. या ग्रंथात डॉ. .सु.पाटील यांनी कलानिर्मितीच्या आदिम प्रेरणा, त्या प्रेरणांशी अनुबंध असणारे छंद, लय, आत्माविष्कार, भावक्रीडा इत्यादी विविध पैलूंचा मानसशास्त्रीय अंगाने मागोवा घेतला आहे. सर्जनशक्तीचे विकसन कसकसे होते याचा धांडोळा घेतानाच विचार, तत्वज्ञान, सौंदर्य आणि कलामीमांसा यांचे वेचक कवी आणि त्यांच्या कविता यांच्या उदाहरणांतून अभिजात आणि रोमँटिक काव्यविचाराशी निगडित असलेले नातेही ते उलगडून दाखवतात. त्याची व्याप्ती विसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वातील नवकवीच्या काहीशा वास्तवनिष्ठ आणि बुध्दिनिष्ठ कवितांपर्यंत पोचते.
            डॉ. पाटील यांच्या पी.एच.डी वर आधारित हे तिसरे पुस्तक आहे. यापूर्वी २००४ मध्ये तुकाराम :अतंर्बाहय संघर्षाची अनुभवरूपे  आणि  २००६ मध्ये  ज्ञानेश्वरीचा काव्यबंधही दोन पुस्तके मुंबई येथील शाब्दल प्रकाशनाने प्रसिध्द केली आहेत. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या काव्याचा अभ्यास करताना कोणता काव्य विचार उपयुक्त ठरेल याचा अभ्यास करण्याच्या शोधातून या तिस-या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. भरतमुनी आणि प्लेटो-ॲरिस्टॉटल यांच्या पासून गेल्या शतकाच्या साठ-सत्तरच्या दशकापर्यंत झालेल्या काव्यविचारांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या ग्रंथात एकूण सात प्रकरणे असून यात सर्जनाच्या प्रेरणा, कविमन, काव्यात्म अनुभव आदिंचा समावेश आहे.
रहमान अब्बास लिखित रोहज़ीन उर्दू कांदबरी
रहमान अब्बास यांना त्यांच्या रोहज़ीन या उर्दु भाषेतील कांदबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्यावर दिलेल्या प्रतिक्रीयेत  श्री अब्बास यांनी कांदबरीचे वर्णन करतांना सांगितले,  रोहज़ीन ही कांदबरी मुंबईच्या जीवनावर आधारित आहे. मागील चाळीस वर्षात मुंबईमध्ये जे सामाजिक, राजकीय  परिवर्तन झालेले आहेत त्याचा मागोवा यामध्ये घेण्यात आलेला आहे. कांदबरीत मुंबादेवी हे चरित्र घेऊन लिहीलेले आहे. ही कांदबरी प्रेमावर आधारित असून यामध्ये 26 जुलै 2005 मध्ये मुंबईमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या परिणामांची मीमांसा कांदबरीत करण्यात आलेली असल्याचे श्री अब्बास यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत पहिला ‘मूकनायक पुरस्कार’ वितरण सोहळा



नवी दिल्ली, २९ : केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात येणा-या  पहिल्या मूकनायक पुरस्काराचे वितरण  ३१ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे.
येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित पुरस्कार वितरण समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभु, सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री  दिलीप कांबळे, केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनिशनचे महासंचालक के.जी.सुरेशही यावेळी उपस्थित राहणार आहेत. ३१ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा  होणार आहे
              डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक हे पाक्षिक सुरु केले या घटनेस  १०० वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय आणि डॉ.बाबासाहेबआंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्यावतीने पहिला 'मूकनायक पुरस्कार' वितरीत करण्यात येणार आहे. शोषितांच्या व्यथा आणि आवाज सरकार व जनसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सुरु झालेल्या मूकनायक पाक्षिकाच्या नावाने देण्यात येणार हा पुरस्कार शतकारनंतरही समाजातील शोषितांचा आवाज आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचे काम करणा-या पत्रकारांना देण्यात येत आहे.
                                       पुरस्कार व पुरस्काराचे स्वरूप 
         मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रत्येकी एका पत्रकारास मुकनायक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, या दोन्ही माध्यमातून प्रत्येकी एका पत्रकाराला प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १ लाख रूपये रोख आणि सन्मानपत्र असे मुख्य पुरस्काराचे तर ५१ हजार रूपये आणि सन्मानपत्र असे प्रोत्साहन पर पुरस्काराचे स्वरूप आहे.
              आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                                       00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.46/दि.29.01.2019