Thursday, 25 January 2018

नाशिकचे वीरपुत्र मिलींद खैरनार यांना मरणोत्तर शौर्य चक्र





नवी दिल्ली 25 : नाशिकचे वीर जवान मिलींद खैरनार यांनी दाखविलेल्या अदम्य साहस व विलक्षण धाडसाची दखल घेत त्यांना आज मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे.

संरक्षणमंत्रलयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज सेना दलाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जम्मू काश्मीर मध्ये बांदिपोरा जिल्हयात राष्ट्रीय रायफलचे जवान खैरनार यांनी १० ऑक्टोबर २०१७ च्या रात्री झालेल्या दशतवादी हल्यामध्ये जिकराने लढा दिला. हाजीन गावामध्ये रात्री झालेल्या शोध मोहिमेत त्यांनी भाग घेतला. या शोध मोहिमे दरम्यान ११ ऑक्टोबर २०१७ च्या मध्यरात्री पाच ते सहा दहशतवाद्यांनी अचानक या जवानांनावर हल्ला चढवला. याला प्रत्युत्तर खैरनार यांनी कडवा प्रतिकार केला, त्यांनी एका दहशतवाद्याला ठार मारले. या चकमकीत खैरनार यांना गोळी लागून ते घायल झाले व त्यांचा मृत्यू झाला.

खैरनार यांनी अदम्य साहस दाखवत दहशतवाद्यांचा केलेला प्रतिकार व भारत भूमीच्या संरक्षणासाठी दिलेल्या बलीदानासाठी त्यांना मानाचे शौर्यचक्र आज जाहीर झाले. मिलींद खैरनार हे मुळचे नंदुरबार जिल्हयातील बोराळा तालुक्यातील रनाळे येथील रहीवाशी तर नाशिक येथे स्थायिक होते.

पुणे येथील मनोज कुमार अंछोर यांना प्रधानमंत्री ‘श्रमश्री’ पुरस्कार



           
नवी दिल्ली 25 : शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सेवेसाठी आज प्रधानमंत्री श्रम पुरस्कार 2016’ ची घोषणा करण्यात आली. देशभरातील 5o कामगारांना हा पुरस्कार जाहीर झाला असून यामध्ये पुणे येथील टाटा मोटर्स कंपनीचे मनोज कुमार अंछोर यांचा समावेश आहे.

         प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आस्थापनेवर 500 कामगारांपेक्षा जास्त कामगार असणा-या देशातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील उपक्रमांतील कामगारांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली.
           
पुणे येथील पिंपरी भागातील टाटा मोटर्स लिमीटेड चे मनोज कुमार अंछोर यांना श्रमश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ४० हजार रूपये, सनद असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

            श्रमरत्न, श्रमभूषण, श्रम वीर/वीरांगना आणि श्रमश्री/श्रमदेवी अशा चार श्रेणीत हे पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी श्रमरत्न पुरस्कारासाठी देशभरातून कुणाचीच निवड झालेली नाही. तर सेल, भेल आणि टाटा स्टीलच्या एकूण 12 कामगारांना श्रमभूषण पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय 18 जणांना श्रमवीर/श्रमवीरांगणा पुरस्कार तर 20  कामगारांना श्रमश्री/श्रमदेवी पुरस्कार जाहीर झाला आहे.   

                                                                               ००००००


रईसा शेख यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट


                     
           
नवी दिल्ली 25 :  शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणाचा लाभ घेऊन स्वावलंबी झालेल्या पुणे  येथील रईसा शेख यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.

        महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन रईसा शेख यांचे स्वागत केले. रईसा यांचे पती, परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यावेळी उपस्थित होते.

             केंद्र व राज्य शासनाच्या ई-गव्हर्नन्स योजनेच्या माध्यमातून पुणे येथील कोंढवा येथे रईसा यांनी कॉमन सर्वीस सेंटरच्या माध्यमातून सुरु केलेले कार्य याविषयी त्यांनी यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान माहिती दिली. रईसा यांनी पुणे परिसरातील गावा-गावांमध्ये जाऊन लोकांना संगणक साक्षर करण्यासाठी केलेले , केंद्र शासनाच्या डीजीधन मेळाव्याअंतर्गत त्यांनी पुणे येथे लावलेला स्टॉल व त्यास मिळालेला प्रतिसाद आदी अनुभव त्यांनी यावेळी सांगीतले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या बहुआयामी कार्याविषयी श्री. कांबळे यांनी रईसा शेख यांना यावेळी माहिती दिली.
              
                                                                               ००००००
'> 

Pune’s Manoj Kumar Vitthal From TATA Motors To Get PM’s Shram Award 2016 50 workers to be conferred with Shram Awards



New Delhi, Jan 25: Pune’s  Manoj Kumar Vitthal from TATA Motors will be conferred the prestigious Prime Minister’s Shram Award for the Year 2016. These Awards are conferred in recognition of their distinguished performance, innovative ability, outstanding contribution in the field of productivity and exhibition of exceptional courage and presence of mind.
The Government of India today announced the Prime Minister’s Shram Awards for the year 2016 to be awarded to 50 workers employed in the Departmental undertakings and PSU’s of the Central and State Governments and Private Sector units employing 500 or more workers.
Although, the total number of Shram Awards conferred this year are 32 but the number of workers receiving the Awards are 50 including 3 women. 34 workers from Public Sector and 16 workers from Private Sectors have won the Awards.
Shri Manoj Kumar Vitthal Anchor works for TATA Motors at Pimpri, near Pune. He has been awarded under Shram Shree category for the year 2016. He will be given a cash award of Rs 40,000 and a ‘Sanad’ as Shram Shree/Shram Devi Award. 19 more awardees from from Cement Corporation of India, Naval Ship Repair Yard, TATA Motors, Surat Lignite Power Plant, Larsen & Toubro Ltd. would be felicitated under this category.

Shram Awards are given in four categories namely ‘Shram Ratna Award’, ‘Shram Bhushan Award’, ‘Shram Vir/Shram Virangana’ and ‘Shram Shree/Shram Devi Awards’. 12 workers from SAIL, BHEL and TATA Steel Ltd. have been awarded ‘Shram Bhushan’ which carries cash award of Rs. 1,00,000 and a Sanad. 18 workers from Naval Dockyard, Ordinance Factory, Rashtriya Ispat Nigam, TATA Steel, Hindalco Industries, Paradeep Phosphates Ltd., Brahmos Aerospace will receive Rs. 60,000 and a ‘Sanad’ as Shram Vir/Shram Veerangana Award.

Wednesday, 24 January 2018

Maharashtra’s 7 Officers to receive Correctional Service Medals for Meritorious Service


New Delhi, 24: Maharashtra’s seven police officers would be conferred with Correctional Service Personnel on this Republic Day. The President of India has approved the conferment of Correctional Service Medals to the prison personnel on the occasion of Republic Day, 2018:

The names of these officers announced include: Shri Dharmaraj Namdevrao Naghate , Subedhar, Nagpur Centre Prison, Shri Sunil Nivrutti Dhamal , Deputy Superintendent, IG Prison and  Correctional Service Office, Shri Aananda Shankar Hirve, Subedar, Yerwada Central Prison, Shri Jagannath Pandurang Khupse, Havildar, Jalana District Prison, Shri Sanjiv Sakharam Ghanekar Havildar, Kolhapur District Prison, Shri Gajanan Digamber Kshirsagar, Havildar, Amaravati Central Prison and Shri Subhash Totaram Tayade, Sepoy, Aurangabad Central Prison.

Maharashstra’s Seven Officers To Receive Presidential Award of Appreciation Certificate of the Customs & Central Excise on the Eve of RD- 2018



New Delhi, 24: Maharashtra’s seven Officers from Central Board of Excise & Customs (CBEC) have been declared for Presidential Award of Appreciation Certificate for ‘exceptionally meritorious service rendered at the risk of life’ and for Presidential Award of Appreciation Certificate for ‘specially distinguished record of service’ on their achieving and maintaining excellence in the discharge of their duties. A total of 44 Officers will be felicitated with this prestigious Award.
Of the total seven from the State, six Officers are from Mumbai and one officer from Pune District. They include Ms. Seema Jere Bisht, Additional Director General, Directorate General of Analytics and Risk Management (DGARM), Prashant Kumar, Additional Director, Directorate General of Revenue Intelligence (DGRI), Zonal Unit, Bharat Laxmanrao Gade, Superintendent, Mumbai Customs Zone-I, Mubeen Ahmed Juvale, Senior Intelligence Officer, Directorate General of Revenue Intelligence (DGRI), Zonal Unit, Mumbai, Akif Hussain Raja, Superintendent, Central Excise/Tax & GST Zone, Mumbai, M.I. Ramachandran, Senior Intelligence Officer, Directorate General of Revenue Intelligence (DGRI), Zonal Unit, Mumbai and Shri Ripu Sudan Kumar, Senior Intelligence Officer, Directorate General of Goods and Service Tax Intelligence (DGGSTI), Zonal Unit, Pune.
Every year, the officers and staff of the Central Board of Excise & Customs (CBEC) Department are considered for grant of these awards, which are announced on the eve of Republic Day. This year, 44 officials have been selected for grant of Presidential Award of Appreciation Certificate for ‘Specially distinguished record of service’.

These Awardees have been selected on the basis of their exemplary and flawless performance in their respective field of services over the years. The awardees selected this year include the officers and staff working as Principal Commissioners/ Commissioners, Directors/Additional Directors/Additional Commissioners, Deputy/Assistant Commissioners, Superintendents/SIOs, Sr. Private Secretary/ Private Secretary, Inspectors/IOs, Drivers who have been consistently and fully committed to the Department in various fields.

सीमाशुल्क आणि अबकारी विभागाच्या महाराष्ट्रातील ७ अधिका-यांना राष्ट्रपती प्रशंसा प्रमाणपत्र


नवी दिल्ली 24 : सीमाशुल्क आणि अबकारी विभागामधील विशेष उल्लेखनीय सेवेसाठी आज राष्ट्रपती प्रशंसा प्रमाणपत्रांची घोषणा करण्यात आली. देशभरातील ४४ अधिका-यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील ७ अधिका-यांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाच्यावतीने आज सीमाशुल्क आणि अबकारी विभागामधील विशेष उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती प्रशंसा प्रमाणपत्रांची घोषणा करण्यात आली.

प्रधान आयुक्त कार्यालयांच्या श्रेणीमध्ये मुंबई येथील ॲनालेटिक्स अँड रिक्स मॅनेजमेंट संचालनालयाच्या अतिरीक्त महासंचालक सिमा बीस्ट, संचालक/अतिरीक्त संचालक/ अतिरीक्त आयुक्त आणि सहायक आयुक्त या श्रेणीमध्ये मुंबई येथील रेव्हीन्यु इन्टालीजन्स कार्यालयाचे अतिरीक्त संचालक प्रशांत कुमार यांचा समावेश आहे.

अधिक्षक /वरिष्ठ इन्टलिजन्स ऑफीसर श्रेणी मध्ये मुंबई सीमाशुल्क विभाग १ चे अधिक्षक भारत गाडे, डायरेक्टर जनरल ऑफ रेव्हेन्यु इन्टालीजन्स सिनीयर इन्टालिजन्स अधिकारी मुबीन जुवळे, मुंबई सेंट्रल एक्साईज/टॅक्स अँड जीएसटी झोन कार्यालयाचे अधिक्षक अकिफ हुसैन राजा, डायरेक्टर जनरल ऑफ रेव्हेन्यु इन्टालीजन्स विभागीय कार्यालयाचे सिनीयर इन्टालिजन्स अधिकारी एम.आय.रामचंद्रन आणि डायरेक्टर जनरल गुड्स अँड सर्वीस टॅक्स इन्टालीजन्स विभागीय कार्यालय पुणे चे सिनीयर इन्टालिजन्स अधिकारी रिपु सुधान कुमार यांचा पुरस्कार यादीत समावेश आहे.

००००

महाराष्ट्रातील 3 पोलीसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ महाराष्ट्राला एकूण 49 पदक






नवी दिल्ली 24 : राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 49 पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये 3 पोलीसांना राष्ट्रपती पोलीस पदक, जणांना पोलीस शौर्यपदक तर 39 जणांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी देशातील पोलीसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केली जातात. यावर्षी यातंर्गत 107 पोलीसांना पोलीस शौर्य पदक(पीएमजी), 75 पोलीसांना उत्कृष्ट सेवा राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएमडीएस ) आणि 613 पोलिसांना पोलीस पदक (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण 49 पदकांचा समावेश आहे.

राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये प्रशिक्षण आणि विशेष विभाग, मुंबईचे अतिरीक्त महासंचालक श्री. एस जगन्नाथ, वागळे इस्टेट ठाणेचे सहायक पोलीस आयुक्त श्री. बाजीराव भोसले आणि नंदुरबार येथील पोलिस अधिक्षक कार्यालयाचे उपनिरीक्षक श्री. विनायक राजपूत यांचा समावेश आहे.
पोलिस शौर्य पदक  
            महाराष्ट्रातील पोलिसांना पोलीस शार्ये पदक जाहीर झाले आहेत, त्यांची नावे खालील प्रमाणे.
1)      श्री.एम राजकुमार, आपीएस, अतिरिक्त पोलिस अधिक्षक                        
2)     श्री.संदिप पुंजा मंडलिक, पोलिस उपनिरिक्षक
3)      श्री.रमेश ज्ञानोबा खांडवे, पोलिस उपनिरिक्षक
4)    श्री.नानगासू पंजामी उसेंडी, नाईक
5)     श्री.निलेश जोगा मडवी, पोलिस शिपाई
6)     श्री.रमेश नटकू अतराम, पोलिस शिपाई
7)    श्री.बबलू दादूराम पुनगाडा, पोलिस शिपाई

यासह महाराष्ट्रातील 39 पोलीसांना पोलीस पदक जाहीर झाले आहेत. त्यांची नावे पूढील प्रमाणे आहेत.

1.       श्री.ज्ञानेश्वर सदाशिव चव्हाण,पोलीस उपायुक्त,परिक्षेत्र -2,दक्षिण विभाग मुंबई.
2.      श्री.महेश उदाजी पाटील.पोलीस अधिक्षक,ठाणे ग्रामीण.
3.      श्री.रविद्र कुसाजी वाडेकर.सहाय्यक पोलीस आयुक्त.डोंबिवली विभाग,ठाणे शहर.
4.     श्री.शांताराम तुकाराम अवसरे.सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा,ठाणे शहर.
5.     श्री.विश्वेश्वर प्रभकर नांदेडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी,नांदेड.
6.      श्री.जर्नाधन जगन्नाथ घाडगे,सहाय्यक समादेशक,राज्य राखीव पोलीस बल गट -3 जालना.
7.     श्री.संजीवकुमार विश्वासराव पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी,कोल्हापूर.
8.     श्री.नेहरू दशरथ बंडगर,पोलीस निरिक्षक,राज्य राखीवपोलीस दल(प्रशिक्षण),दौंड.
9.      श्री.बाळासाहेब रामचंद्र घाडगे,पोलीस निरीक्षक,उत्तर पोलीस नियंत्रन कक्ष,मुंबई शहर
10.   श्री.भीम वामन छापछडे,पोलीस निरीक्षक (बिनतारी संदेश),पोलीस संचालक (बिनतारी संदेश),पुणे.
11.   श्री.प्रकाश कचरू सहाणे,पोलीस निरीक्षक,विशेष शाखा,बुलढाणा.
12.  श्री.प्रकाश नागप्पा बिराजदार,पोलीस निरीक्षक,वसई-पालघर.
13.   श्री.संजय रामराव देशमुख,पोलीस निरीक्षक,स्थनिक गुन्हे शाखा,यवतमाळ.
14. श्री.शाम सखाराम शिंदे,पोलीस निरीक्षक,मुंबई शहर.
15.  श्री.पांडूरंग नारायण शिंदे,पोलीस निरीक्षक,कुलाबा,मुंबई शहर.
16.  श्री.सुधीर प्रभाकर असपत,पोलीस निरीक्षक,पोलीस मुख्यालय,पुणे.
17.  श्री.सायरस बोमन ईरानी,पोलीस निरीक्षक,मुंबई शहर.
18.  श्री.अविनाश लक्ष्मीनारायण आघाव,पोलीस निरीक्षक,औरंगाबाद.
19.   श्री.सुनिल दशरथ महाडीक,पोलीस निरीक्षक,नागपूर शहर.
20.  श्री.ज्ञानेश्वर रायभान वाघ,पोलीस निरीक्षक,विशेष शाखा,मुंबई शहर.
21.  श्री.सुनिल विष्णुपंत लोखंडे,मुख्य सर्तकता अधिकरी,नागपूर.
22. श्री.चंदन शंकरराव शिंदे,पोलीस उपनिरीक्षक,गुन्हे अन्वेषण विभाग,मुंबई शहर.
23.  श्री.लहु परशुराम कुवारे,पोलीस उपनिरीक्षक,आतंकवाद निरोधी पथक,मुंबई शहर.
24.श्री.अब्दुल गफुर गफार खान,पोलीस उपनिरीक्षक,राज्य राखीव पोलीस दल गट-14,औरंगाबाद.
25. श्री.शिवमुर्ती अप्पय्या हुक्केरी,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,ट्रॉम्बे पोलीस ठाणे,मुंबई शहर.
26. श्री.युवराज मोतीराम पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,विभागीय गुन्हे शाखा,जळगाव.
27. श्री.विक्रम निवृत्ती काळे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पुणे शहर.
28. श्री.जयसिंगराव खाशाबा संकपाल यादव,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पुणे शहर.
29.  श्री.दिलीप पुंडलिक पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,राज्य राख्रीव पोलीस बल गट-6,धूळे.
30.  श्री.माताप्रसाद रामपाल पांडे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,नागपूर शहर.
31.   श्री.सुरेश गुणाजी वारंग,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सिंधुदूर्ग.
32.  श्री.विलास दगडू जगताप,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सातारा.
33.  श्री.चतुर डागा चित्तेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,नंदुरबार.
34. श्री.प्रदिप काशिराम पाटीलसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,धुळे
35. श्री.सोमनाथ रामचंद्र पवारसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पुणे शहर.
36.  श्री.राशीद उस्मान शेखसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सांगली.
37. श्री.दिलीप वासुदेव वाघमारेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,अमरावती शहर.
38. श्री.दिलीपकुमार बब्रुवान सवानेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सोलापूर ग्रामीण.
39.  श्री.नंदकिशोर काशिनाथ सावखेडकर,पोलीस शिपाई,पोलीस नियंत्रन कक्ष,नाशिक.



महाराष्ट्रातील 7 तुरंग अधिकाऱ्यांना सेवा पदक


नवी दिल्ली दि 24: देशातील ४० तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील ७ जणांचा यात समावेश आहे.
तुरंगसेवेत कैद्याच्या जीवनात चांगला बदल घडुवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सेवा पदक देण्यात येते. 
          पोलीस उपअधीक्षक, पोलीस महानिरीक्षक,तुरुंग आणि सुधारात्मक सेवा कार्यालय श्री सुनील निवृत्ती धामल यांना यावर्षीचे सेवा पदक जाहीर झाले आहे.नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार धर्मराज नामदेव नाघाटे, येरवडा कारागृहाचे सुभेदार श्री आनंद शंकर हिरवे, जालना जिल्हा कारागृहाचे हवालदार श्री जगन्नाथ पांडुरंग खपसे, कोल्हापूर जिल्हा कारागृहाचे हवालदार श्री  संजय सखाराम घाणेकर, अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार श्री गजानन दिगंबर क्षीरसागर आणि औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई श्री सुभाष तोताराम तायडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
0000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा

प्रधानमंत्री यांच्या हस्ते नदाफ इजाज अब्दुल रौफ ला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार









            
नवी दिल्ली, दि. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नांदेड जिल्हयातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ इजाज अब्दुल रौफ ला यंदाचा (वर्ष २०१७) राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रधानमंत्री यांच्या 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी आयोजित शानदार सोहळयात आज ७ मुली आणि ११ मुले अशा एकूण १८ बालकांना वर्ष २०१७ च्या राष्ट्रीय बाल शौर्यपुरस्कारांचे प्रधान मंत्री यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यातील ३ बालकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला होता, त्यांच्या नातेवाईकांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री मनेका गांधी, मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव ,भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिध्दार्थ यावेळी उपस्थित होत्या. एकूण चार श्रेणींमध्ये प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानपत्र आणि रक्कम असे आहे.
            याप्रसंगी प्रधानमंत्री मोदी यांनी उपस्थित बालकांना संबोधित केले. ते म्हणालेपुरस्कार प्राप्त बालकांच्या प्रसंगावधान व साहसामुळे इतरांचे प्राण वाचलेराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांची घोषणा झाल्यापासून या शूर बालकांचे धाडसी कार्य प्रसार माध्यमांद्वारे देशभर पोहचले. देशभरातील बालकांसह संपूर्ण देशवासीयांसाठी या बालकांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी देशासाठी उत्तमोत्तम काम करावे असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी  केले. मनेका गांधी यांनीही उपस्थित बालकांना मार्गदर्शन केले.
 नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील इजाज अब्दुल रौफ ला यावेळी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने प्रसंगावधान व धाडस दाखवून 2मुलींना तलावात बुडन्यापासून वाचविले. त्याच्या या कामगिरीची नोंद घेऊन हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणा-या पथसंचलनात ही शूर बालके सहभागी होणार आहेत. पुरस्कार प्राप्त बालकांनी  यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अन्य गणमान्य व्यक्तींची  भेट घेतली आहे.         
भारत देशाच्या विविध भागातील अतुल्य शौर्य दाखविणा-या ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अधिनस्त राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिना आधी प्रधान मंत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रीकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्ती अंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते. 
         00000
सूचना : सोबत छायाचित्र आहे.