Wednesday, 31 January 2018

खासदार निधीतून चार वर्षात 465 कोटींची कामे





नवी दिल्ली, 31 : महाराष्ट्रातील लोकसभा खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून गेल्या चार वर्षात ४६५ कोटी २६ लाख रुपये विविध विकास कामांवर खर्च करण्यात आले आहेत.   

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा खासदारांना प्रतिवर्षी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी त्यांच्या मतदार संघातील विविध विकास कामे करण्यासाठी दिला जातो. सन २०१४-१५ ते जानेवारी २०१८ या काळात राज्याला ६१० कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिला आहे, यापैकी ४६५ कोटी २६ लाख रुपये प्रत्यक्ष खर्च करण्यात आले आहेत. खर्चाची ही टक्केवारी ७६.२७ टक्के इतकी आहे. चालू आर्थिक वर्षात १७.५ कोटी रुपयांचा निधी डिसेंबर अखेर राज्याला मिळाला आहे, मार्च २०१८ पर्यंत उर्वरित निधी देण्यात येतो. सन २०१४-१५ याकाळात राज्याला २४० कोटी रुपये मिळाले. २०१५-१६ या वर्षात २२७ कोटी ५ लाख, २०१६ - १७ या काळात १२५ कोटी असे एकूण ६१० कोटी रुपयांचा खासदार निधी महाराष्ट्राला मिळाला आहे. 
खासदारांनी सुचविली १०६५ कोटींची कामे

गेल्या चार वर्षात राज्यातील सर्व खासदारांनी एकूण १०६५ कोटी रुपयांच्या विकास कामांची शिफारस केली होती, त्यापैकी जिल्हा प्रशासनाने ६८७ कोटी ४३ लाख रुपयांची विकास कामे मंजूर केली आहेत, तर प्रत्यक्ष खर्च ४६५ कोटी २६ लाख इतका झाला आहे.
देशाचा खासदार निधी ३९५० कोटींचा

देशातील लोकसभा ,राज्यसभा व नामनिर्देशित खासदारांचा  एकूण खासदार निधी ३९५० कोटी इतका आहे, यामध्ये लोकसभा खासदारांचा निधी २७२५ कोटी तर राज्यसभा व नामनिर्देशित खासदारांचा निधी १२२५ कोटी इतका आहे.   
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा        :  http://twitter.com/micnewdelhi
                                                                     ००००००

Tuesday, 30 January 2018

महाराष्ट्रातून हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे पुर्णत: निर्मुलन करण्यात येईल : सामाजिक न्याय राज्यमंत्री कांबळे

       

नवी दिल्ली, 30 : महाराष्ट्रातून हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे पुर्णत: निर्मुलन करण्यात येईल, असे आश्वासन  सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना आज दिले.
येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने राज्यांमधील ऑट्रासिटी कायदयाच्या अमंलबजावणीची आढावा बैठक तसेच हाताने मैला उचलणा-या प्रथाचे पुर्णत: उच्चाटन करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीची अध्यक्षता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी केली. यावेळी श्री काबंळे बोलत होते. 
याबैठकीस विविध राज्यांचे संबधित विभागाचे मंत्री तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राच्यावतीने राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे उपस्थित होते.
श्री कांबळे म्हणाले, हाताने मैला उचलने ही कुप्रथा असून राज्यातील काही महानगरपालीका तसेच ग्रामीण भागात आजही अशी कुप्रथा सुरू असून याबाबतचे आकडेवारी केंद्राकडे लवकरच सादर केली जाईल. केंद्र शासनातर्फे जी व्यक्ती हाताने मैला उचलते त्यांचे पुर्णवर्सन करण्यासाठी 40 हजार रूपये संबधित व्यक्तींच्या खात्यात जमा केली जातात. त्यासाठी संबधित व्यक्तीची नावे व त्यांच्या बँक खात्याची माहिती केंद्र शासनाकडे देणे आहे. ही माहिती शक्य तीतक्या लवकर सादर केली जाईल, असे श्री कांबळे यांनी सांगितले.
 यासह  राज्य शासनातर्फे हाताने मैला उचालण्याची प्रथा बंद करण्यासाठी राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त यांची नोडल अधिकारी तसेच जिल्ह्य स्तरावर आणि तालुका पातळीवरही नोडल अधिका-यांची  नेमणूक केली असल्याची माहिती दिली. राज्यात कोणी हाताने मैला उचलणार नाही याची खबरदारी राज्य शासन घेईल, असे आश्वसन श्री कांबळे यांनी यावेळी बैठकीत दिले.
महाराष्ट्रामध्ये ॲट्रोसीटीतंर्गत 75% गुन्ह्यांवर आरोपपत्र दाखल केली जाते
                                                    : विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालीद
महाराष्ट्रामध्ये अनुसुचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक)  व नागरी हक्क संरक्षण अधिनियमातंर्गत  अंतर्गत गुन्हा घडल्यास पोलीस स्थानकात अशा गुन्ह्याच्या विरोधात आरोप पत्र दाखल केले जातात. या कायदयाखाली दाखल होणा-या आरोपपत्राची 75% आकडेवारी असल्याची माहिती नागरी हक्क सरंक्षण व महिला अत्याचार प्रतिबंध विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालिद यांनी माहिती दिली.
ऑट्रोसीटी कायदयाशी याविषयांवरही आज केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे 24 वी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्याच्यावतीने श्री खालीद यांनी ही माहिती सादर केली. राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष)  रजनीश सेठ याबैठकीस उपस्थित होते.
महाराष्ट्रामध्ये ऑट्रोसीटीअंतर्गत दरवर्षी 2200 ते 2300 प्रकरणे पोलीस स्थानकामध्ये दाखल होतात. डिसेंबर 2017 पर्यंत महाराष्ट्रमध्ये 2152 प्रकरणे पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेली आहे. राज्य शासन वेळेच्या आता ऑट्रोसीटीअंतर्गत दाखल झालेल्या प्रकराणामध्ये कार्यवाही करण्याचा प्रयत्न करते.
राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये ऑट्रोसिटीअंतर्गत दाखल झालेल्या गुन्हामध्ये दोषींना शिक्षा मिळण्याचे प्रमाण 9 % असल्याचे आढळून आलेले आहे. यामध्ये साक्षीदार, फियार्दी आणि पंच फितुर होत असल्याचे असल्याचे विश्लेषणातंर्गत दिसून येते.
 ऑट्रोसीटी दोषींना शिक्षा मिळावी यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे श्री खालीद यांनी सांगितले यामध्ये पोलीसांमध्ये ऑट्रोसिटी कायदयाविषयीची जागृकता वाढविण्याबाबतचा समावेश आहे.
यासह राज्यामध्ये ऑट्रोसिटीअंतर्गत दाखल गुन्ह्यांच्या निवाडयासाठी एकूण 6 विशेष न्यायालय स्थापित करण्याचे निर्देशीत करण्यात आले होते. सध्या नागपूर, औरंगाबाद आणि  ठाणे येथे हे विशेष न्यायालय काम करीत असून अमरावती, नाशिक आणि पूणे मधेही विशेष न्यायालयांमध्येही ऑट्रोसिटी संदर्भातील प्रकरणांचा निपटारा करण्यात येईल. यासह उपविभागात काही न्यायालयांनाही ऑट्रोसिटीची प्रकरणे हाताळण्याची परवानगी देण्यात येईल. एखादी अंत्यत र्दुदैवी घटना घडल्यास विशेष वकीलाची तरतूद केली आहे. याशिवाय फियार्दीला वेळेतच शासनाकडून निर्धारित निधी प्रदान करण्याची काळजी घेतली जाते.

Distribution of Rs. 2 Lakhs 37 Thousand Crores through "DBT" 3000 Crore deposited under Beneficiaries’s “DBT” Account in Maharastra


New Delhi, 30:  A sum of Rs. 2 lakh 73 thousand 183 crore has been distributed countrywide through ‘Direct Benefit Transfer Scheme’, of which, funds of Rs. 3,210 crore have been deposited in the bank accounts of the beneficiaries through DBT in Maharashtra.
Direct Benefit Transfer Scheme (DBT) started in 2013. This program aims to transfer subsidies directly to the people through their bank accounts with the hope that crediting subsidies into bank accounts will reduce leakages, delays etc.  Through this scheme, 410 schemes of 56 ministries are directly funded by "DBT" in the bank accounts of the beneficiaries. This scheme has saved over Rs 57,000 crore in last 4 years.

Distributed by Maharashtra government, 3,210 crore "DBT"
Till date, a fund of Rs. 3 Thousand 210 crore has been deposited directly into the bank account of beneficiaries through DBT in Maharashtra. In Maharashtra, 18 lakh 35 thousand 364 beneficiaries have been linked to the DBT scheme. 13 lakh 30 thousand beneficiaries have been registered for the benefit of various schemes of Social Justice and Special Assistance Department. 41,310 beneficiaries have been registered in the minority department; 1 lakh 43 thousand in tribal development department, 3 lakh 8 thousand in higher and technical education department, 12 thousand 156 beneficiaries have registered online in the school education department till date.
Distributed by 90 billion Crores DBT in one year
In the financial year 2017-18, a fund of Rs 90 thousand 240 crore 28 lakh rupees have been distributed through DBT to 60 crore 45 lakh beneficiaries till date. In 2013-14, 10.88 lakh beneficiaries were added to the direct benefit transfer scheme and 7 thousand 367 Crores of funds were distributed.
Direct Benefit Transfer: One view
Direct Benefit Transfer Scheme has increased since last four years from 2014 to 2017-18. In the year 2014-15, a fund of Rs. 38,926 crore was deposited in 22 crores 82 lakh beneficiaries’ accounts.  In the year 2015-16, 31.25 lakh beneficiaries with 61 thousand 942 crores were benfited by DBT. In the year 2016-17, 74 thousand 707 crore was deposited in 35 million 7 lakh beneficiaries’ bank accounts and in this year a fund of Rs 60 crore 45 lakh beneficiaries have been distributed with an amount of Rs. 90,240 crore through DBT.

Through this Scheme of DBT, funding has been made for gas subsidy, employment guarantee scheme, scholarship and scheme, national financial aid scheme and social justice schemes.

राज्यमंत्री श्री. दिलीप कांबळे : हाताने मैला उचलण्याची प्रथा पूर्णत: ब...

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी श्री. वनगा यांना श्रध्दांजली व...

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी श्री. वनगा यांना श्र...

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी श्री. वनगा या...

पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांचे निधन





नवी दिल्ली, ३० : पालघरचे  खासदार अॅड. चिंतामण वनगा यांचे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास दिल्ली येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षाचे होते, त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ॲड. वनगा दिल्ली येथे आले होते. आज दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी छातीत दुखू लागल्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांना तातडीने येथील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर सर्व पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

        श्री. वनगा हे उच्च विद्याविभूषित होते. वकील असलेल्या श्री. वनगा यांनी पालघरमधील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठान आदी सामाजिक संस्थांमध्येही त्यांनी काम केले आहे. १९९० ते १९९६ पर्यंत भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. १९९९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले होते. २००९ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर पुन्हा २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.

                                         मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन
            श्री वनगा यांचे पार्थीव आज अंत्यदर्शनासाठी येथील डॉ. राममनोहर लोहिया हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आले होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय संसदीयकार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह  आणि महाराष्ट्राचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराजे अत्राम यांनी श्री. वनगा यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली. महाराष्ट्रातील खासदार सर्वश्री कपील पाटील,डॉ. सुनील गायकवाड, रक्षा खडसे, संजय धोत्रे,अजय संचेती यांनीही श्री. वनगा यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली.   

                                      मान्यवरांनी व्यक्त केला शोक

           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली  आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिवासींच्या उन्नतीसाठी श्री. वनगा गेली अनेक वर्षे निष्ठेने कार्यरत होते.  विधिमंडळ आणि संसदेमध्ये त्यांनी आदिवासी समुदायाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला होता. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या वनगा यांच्या निधनाने एक निस्पृह आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.  

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी म्हणाले, श्री. वनगा हे नि:स्पृह, निस्वार्थी आणि समर्पित कार्यकर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रात अनेक वेळा माझ्या सोबत काम पाहिले आहे. वनवासी समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले. त्यांच्या निधनाने एक सच्चा व समर्पित कार्यकर्ता आम्ही गमावला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, श्री. वनगा हे आदिवासींचे झुंझार नेते होते त्यांच्या निधनाने या समाजाचे मोठे नुकसान झाले. मी त्यांच्या सोबत काम केले आहे. श्री. वगना यांनी ठाणे आणि पालघर जिल्हयातील आदिवासींसाठी तडफेने  काम केले व आदिवासींना एक आवाज मिळवून दिला. वनवासी कल्याण आश्रम शाळा त्यांनी सुरु केल्या. तलासरी येथील आश्रमशाळेत घडलेले श्री. वनगा यांनी त्या भागातील आदिवासींच्या विकासासाठी जीवन समर्पित केले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर  म्हणाले, श्री. वनगा माझ्यासोबतच १९९६ मध्ये पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले, तेव्हापासून माझा त्यांचा परिचय आहे. साधे आणि मनमिळावू नेते म्हणून श्री. वनगा सर्वपरिचीत होते. त्यांनी आपल्या मतदार संघात केलेल्या कामाची पावती म्हणून ते लोकसभेत तीन वेळा निवडून आले. त्यांच्या निधनाने आदिवासींचा एक तडफदार नेता आम्ही गमावला अशा भावनाही श्री. अहीर यांनी व्यक्त केल्या.

    आम्हाला ट्विटर वर फाँलो करा http://twitter.com/mivnewdelhi
                                                 ******

"डीबीटी" द्वारे 2 लाख 73 हजार कोटीचे वितरण : महाराष्ट्रात ३ हजार कोटी "डीबीटी" द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात


नवी दिल्ली दि ३०. थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे आजपर्यंत देशात २ लाख ७३ हजार १८३ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, तर महाराष्ट्रात ३ हजार २१० कोटींचा निधी डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आला आहे.

विविध शासकीय योजनांचा लाभ देताना होणारी गळती थांबविण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजना    ( डीबीटी ) 2013 साली सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सध्या ५६ मंत्रालयांच्या ४१० योजनांचा निधी "डीबीटी" द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. या योजनेमुळे गेल्या ४ वर्षात ५७ हजार कोटींची बचत झाली आहे.

महाराष्ट्रात ३ हजार २१० कोटी "डीबीटी" द्वारे वितरित

महाराष्ट्रात थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत ३ हजार २१० कोटी १३ लाख रुपयांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. महाराष्ट्रात १८ लाख ३५ हजार ३६४ लाभार्थ्यांना डिबीटी योजनेशी जोडण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी १३ लाख ३० हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अल्पसंख्याक विभागात ४१,३१० लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे, आदिवासी विकास विभागात १ लाख ४३ हजार, उच्च व तंत्र शिक्षण विभागात ३ लाख ८ हजार, शालेय शिक्षण विभागात १२ हजार १५६ लाभार्थ्यांची नोंदणी आजपर्यंत ऑनलाईन पद्धतीने झाली आहे.
एका वर्षात ९० हजार कोटी डीबीटी द्वारे वितरित

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात आजपर्यंत ९० हजार २४० कोटी २८ लाख रुपयांचा निधी डीबीटी च्या माध्यमातून ६० कोटी ४५ लाख लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे २०१३ -१४ साली थेट लाभ हस्तांतरण योजनेशी केवळ १० कोटी ८१ लाख लाभार्थी जोडले गेले होते व त्यांना ७ हजार ३६७ कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता.

थेट लाभ हस्तांतरण: एक दृष्टिक्षेप

सन २०१४ ते २०१७- १८ या चार वर्षात थेट लाभ हस्तांतरण योजनेची व्याप्ती वाढली असून २०१४-१५ या वर्षात देशात ३८ हजार ९२६ कोटींचा निधी २२ कोटी ८२ लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला तर २०१५ -१६ या वर्षात ३१ कोटी २५ लाख लाभार्थ्यांना ६१ हजार ९४२ कोटी डीबीटी द्वारे वितरित करण्यात आले. सन २०१६ -१७ या वर्षात ७४ हजार ७०७ कोटी रुपये ३५ कोटी ७ लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले तर २०१७-१८ या वर्षात ६० कोटी ४५ लाख लाभार्थ्यांना ९० हजार २४० कोटी रुपये डीबीटी द्वारे वितरित करण्यात आले आहेत.
डीबीटी च्या माध्यमातुन प्रामुख्याने गॅस सबसिडी,रोजगार हमी योजना, छात्रवृत्ती व शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय साहाय्य योजना, सामाजिक न्याय योजनांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा

National Capital Pays respect to ‘Martyrs’

















New Delhi, 30:  In a mark of respect and honor to all those who sacrificed their lives for the Nation, a two- minute silence was observed at Maharashtra Sadan and Maharashtra Information Centre, Delhi.
          A program was organized at Maharashtra Sadan’s Conference Hall. Resident Commissioner and Secretary Smt. Abha Shukla was present along with Investment and Protocol Commissioner Lokesh Chandra, Additional . Resident Secretary Sameer Sahai, Asstt. Resident Commissioner Ishu Sandhu and other official.
The Father of the Nation, ‘Mahatama Gandhi’ was remembered fondly on his 70th death anniversary, which is observed as ‘Martyrs Day’.
Tributes paid to ‘Martyrs’ at Maharashtra Information Centre

A two-minute silence was observed at Maharashtra Information Centre as well. Dy.Director Shri Dayanand Kamble and other officials were present during this time. 

Monday, 29 January 2018

राजधानीत हुतात्म्यांना आदरांजली













नवी दिल्ली, 30 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणा-या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून महाराष्ट्र सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात मंगळवारी हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

कोपर्निकस स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त इशु संधू यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

  महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली

 महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे  यांच्यासह  कार्यालयातील अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.

    आम्हाला ट्विटर वर फाँलो करा http://twitter.com/mivnewdelhi
                                                 ******                                                                                              


वस्तू व सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात अव्वल



                          आर्थिक सर्वेक्षण पाहणीतील निष्कर्ष      

नवी दिल्ली, 29 :  वस्तू व सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. देशाच्या एकूण वस्तू व सेवा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 22.3 टक्के इतका आहे.

देशाचा आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2017- 2018 आज प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार वस्तू व सेवा निर्यातीमध्ये देशातील महाराष्ट्र ,गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा ही पाच राज्य अग्रेसर ठरली आहेत. या पाच राज्यांचा वाटा देशाच्या एकूण निर्यातीपैकी 70.1 टक्के इतका आहे. या पाच राज्यांपैकी महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे 22.3 टक्के इतका आहे. गुजरात राज्य 17.2 टक्के निर्यातीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटक 12.7,तिसऱ्या स्थानावर, तामिळनाडू 11.5 टक्क्यासह  चौथ्या तर तेलंगणा 6.4 टक्के निर्यातीसह पाचव्या स्थानावर राहिले आहे. 
आंतरराज्य व्यापारात महाराष्ट्र प्रथम
देशातील राज्यांतर्गत व्यापारात महाराष्ट्र,गुजरात, हरियाणा, ओडिशा आणि तामीळनाडू ही राज्य अग्रेसर ठरली आहेत. महाराष्ट्र आंतरराज्य व्यापारात 15.7 टक्के निर्यात तर 13.7 टक्के आयातीसह अव्वल ठरले आहे. 
  जीएसटी नोंदणीत महाराष्ट्र टॉप 4 राज्यात

वस्तू व सेवा कर नोंदणीमध्ये देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश ,तामीळनाडू ही चार राज्य अग्रेसर ठरली आहेत. 

आम्हाला ट्विटर वर फाँलो करा http://twitter.com/mivnewdelhi
                                                          ******

विजय गोखले यांनी स्वीकारला विदेश सचिव पदाचा पदभार


             
नवी दिल्ली, 29 : मूळचे पुण्याचे असणारे विजय केशव गोखले यांनी आज विदेश सचिव पदाचा पदभार स्वीकारला, हा बहुमान मिळवीणारे ते दुसरे महाराष्ट्रीय व पुणेकर आहेत.

        केंद्र शासनाच्यावतीने  1  जानेवारी  2018  रोजी  विजय गोखले यांचे नाव नवीन विदेश सचिव म्हणून जाहीर करण्यात आले होते. रविवार दिनांक 28 जानेवारी 2018  रोजी  विदेश सचिव डॉ. एस. जयशंकर यांचा कार्यकाल संपला असून विजय गोखले यांनी आज या पदाचा पदभार स्वीकारला.  पुढील  2 वर्षांपर्यंत ते या पदावर राहणार आहेत.
             श्री गोखले हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1981 तुकडीचे अधिकारी आहेत. चीन आणि भारत यांच्यात निर्माण झालेला डोकलाम वाद  सोडवण्यात विजय गोखले यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांनी जर्मनीत भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. हाँगकाँग, चीन आणि अमेरिका या देशांमध्येही त्यांनी काम केले आहे. विदेश सचिव पदाचा पदभार स्वीकारण्याआधी ते विदेश मंत्रालयाच्या आर्थिक संबंधाचे सचिव म्हणून काम करीत होते.
           यापूर्वी  पुण्याचे राम साठे यांनी 1979 ते 1982 या कालावधीत  विदेश सचिव पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्यानंतर एका महाराष्ट्रीय व पुणेकराला  दुस-यांदा या पदाचा बहुमान मिळाला आहे.  

    आम्हाला ट्विटर वर फाँलो करा http://twitter.com/mivnewdelhi

                                                 ******                                                                                              

सर्वेश नावंदे याला सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्ण पदक


















नवी दिल्ली, 29 : पुण्यातील सर्वेश नावंदे याला वायुदल विंगचा सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्ण पदक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी प्रधानमंत्री रॅली मध्ये आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
          दिल्लीतील छावनीभागातील करीअप्पा परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी  पंतप्रधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कॅडेट्सना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री निर्मला सितारमन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, वायुसेना प्रमुख ऍडमिरल सुनील लांभा, नौसेना प्रमुख चिफ मार्शल बिरेंद्र सिंग  धनोआ आदी मंचावर  उपस्थित होते
एसीसीच्या श्रेणी अंतर्गत  पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास वायुदल विंगचा सर्वोत्कृष्ट कॅडेटच सुवर्ण पदक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सर्वेश हा  १९ वर्ष असून तो  मॉडर्न कॉलेज पुणे येथे बी.एस.सी  द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक दिन 2018 च्या राजपथावरील पथसंचलनासाठी सहभागी होण्यासाठी पुणे येथे नाव नोंदविले.  नोव्हेंबर  2017 मध्ये पुणे विभागातून सर्वेश ची निवड पुढील शिबीरासाठी औरंगाबाद येथे झाली. यानंतर एनसीसी शिबीरामध्ये होणा-या विविध अंतर्गत स्पर्धांमध्ये तो उत्तीर्ण होत गेला. अंतिमत: तो प्रधानमंत्री रॅलीसाठी पात्र ठरला. सर्वेशची उत्कृष्ट कॅडेट म्हणून निवड झाली. त्याने भारतातून वायुदल विंग मध्ये सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्ण पदकही  प्राप्त केले.   एनसीसीचे महासंचालक यांनीही सर्वेशचा ट्रॉफी देऊन सत्कार केला.

             प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी या कार्यक्रमात उपस्थित देशभरातील कॅडेटसना संबोधित केले.           कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रधानमंत्री यांना मानवंदना देण्यात आली. मानवंदना देण्या-या देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाच्या चार दलातील निवडक कॅडेटसचा समावेश होता. प्रधानमंत्री यांनी मानवंदना देणा-या एनसीसी पथकाची पाहणी केली. यानंतर शिबीरात सहभागी प्रत्येक राज्यांच्या निवडक पथकांचे पथ संचलन झाले.
        एनसीसी महासंचालनालय आणि दिल्ली संचालनालयाच्यावतीने येथील करीअप्पा परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी शिबिराचे आयोजन करयात येते. 6 जानेवारी पासून या शिबिराला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाट्न झाले. तर प्रधामंत्रीरॅलीने रविवारी या शिबिराची सांगता झाली. देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाचे कॅडेट्स यात सहभागी झाले. महाराष्ट्रातील ११2 एनसीसी कॅडेटस या शिबिरात  सहभागी झाले. यातील काही कॅडेटसची  प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी तर काही कॅडेटसची  प्रधानमंत्री रॅलीमधे मानवंदना देण्यासाठी  निवड झाली.   
            या शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ड्रिल कॉम्पीटीशन, राष्ट्रीय एकात्मता जागृकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, प्रधानमंत्री रॅलीसाठी मानवंदना निवड स्पर्धेत महाराष्ट्रातील कॅडेटसनी उत्तम कामगिरी बजावली.महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

              http://twitter.com/micnewdelhi

                                                                     ००००००

     सूचना : सोबत छायाचित्र जोडले आहे.

Saturday, 27 January 2018

महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार : संचालक संजय पाटील यांची प्रत...

महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार : संचालक संजय पाटील यांची प्रत...

महाराष्ट्राचा शिवराज्याभिषेक सोहळा चित्ररथ ठरला देशात प्रथम

शिवराज्याभिषेक सोहळा चित्ररथ ठरला देशात प्रथम











नवी दिल्ली, 28: महाराष्ट्राच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील पथ संचलनात प्रदर्शित 'छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा' चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांनी आज हा पुरस्कार स्वीकारला.
      नुकताच येथील राजपथावर  राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि आशियान देशांच्या 10 राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत भारत देशाचा 69 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात पार पडला. या निमित्त आयोजित पथसंचलनात देशातील विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शित करण्यात आले. 14 राज्य व केंद्रीय मंत्रालयाचे 9 चित्ररथ यावर्षी प्रदर्शित झाले, यामध्ये महाराष्ट्राच्यावतीने प्रदर्शित करण्यात आलेला 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा' या चित्ररथाची  पथसंचलनातील सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवड झाली. येथील कॅटॉन्मेट भागातील रंगशाला शिबिरात आज आयोजित शानदार कार्यक्रमात संरक्षण मंत्री यांच्या हस्ते  राज्याला गौरविण्यात आले.  मानपत्र आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. नरेंद्र विचारे, कला दिग्दर्शक नितीन देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आसाम राज्याने यावर्षी  दुसरा तर छत्तीसगड़ राज्याने तिसरा क्रमांक पटकविला. या राज्यांनाही यावेळी गौरविन्यात  आले.
  
शिवराज्याभिषेक सोहळा ठरला देशात पुन्हा प्रथम

       महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्टय दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. यापूर्वी 1980 मध्येही राज्याच्यावतीने शिवराज्याभिषेकदर्शविणारा चित्ररथ प्रदर्शीत केला होता यास प्रथम पारितोषीक मिळाले होते. 1983 मध्ये बैल पोळाया चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर 1993 ते 1995 असा सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. 2015 मध्ये प्रदर्शित पंढरीची वारीया चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला ही उल्लेखनीय बाब आहे.                            
यावर्षी 'शिवराज्याभिषेक सोहळा'  चित्ररथाची बांधणी जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली. चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती जे.जे.स्कुल ऑफ आर्ट चे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी तयार केले.  चित्ररथावर शिवराज्याभिषेक सोहळा दर्शविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सोयराबाई, संभाजी राजे आदी 10 भूमिका साकारण्यात आल्या. मुंबई येथील भैरी भवानी गृपच्या कलाकारानी  या भूमिका साकारल्या.

नागपूरच्या दक्षिण-मध्य केंद्राला प्रथम पुरस्कार

राजपथावरील पथ संचलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात नागपूर येथील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राला प्रथम पुरस्काराने आज गौरविण्यात आले. या केंद्राचे संचालक इंद्रजित ग्रोवर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या केंद्राच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्याचे बरेदी लोकनृत्य सादर करण्यात आले होते.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

                           http://twitter.com/micnewdelhi

                                                                *****