Thursday, 4 January 2018

देशातील 113 कर्तृत्ववान महिलांना "फर्स्ट लेडी" पुरस्कार










महाराष्ट्रातील 15 महिलांचा होणार सन्मान

नवी दिल्ली, 4 : क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 113 कर्तृत्ववान महिलांना "फर्स्ट लेडी" हा सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 15 महिलांचा समावेश आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने "फर्स्ट लेडी" हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दि. 20 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती भवनात या महिलांना "फर्स्ट लेडी" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दुर्गाबाई कामत व अबन मिस्त्री याना मरणोत्तर"फर्स्ट लेडी सन्मान

महाराष्ट्रातील 15 कर्तृत्ववान महिला "फर्स्ट लेडी" पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या महिला नायिका दुर्गाबाई कामत व देशातील पहिल्या महिला तबला वादक डॉ.अबन मिस्त्री यांना मरणोत्तर हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

साताऱ्याच्या सुरेखा यादव ठरल्या "फर्स्ट लेडी"

1988 साली सर्वप्रथम रेल्वे चालविण्याचा विक्रम करण्याऱ्या सुरेखा यादव यांना फर्स्ट लेडी पुरस्कार जाहीर झाला आहे. मध्य रेल्वेची पहिली ‘महिला स्पेशल’ लोकल ट्रेन त्यांनी चालविली आहे. प्रसिध्द बुद्धिबळपटू व पाच वेळा बुद्धिबळात भारतीय महिला चॅम्पियनशीप मिळविणाऱ्या भाग्यश्री ठिपसे, देशातील पहिल्या महिला अग्निशामक अधिकारी हर्षींनी कण्हेकर ( नागपूर) , देशातील पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक परभणी जिल्ह्यातील शिला डावरे यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आमदार डॉ.भारती लव्हेकर ठरल्या "फर्स्ट लेडी"

वर्सोवा, मुंबई येथील विद्यमान आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी देशातील पहिली सॅनिटरी नॅपकिन बँक सुरु करून नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्याच्या अरुणा राजे पाटील या भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ आहेत, त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबई येथील डायना एडलजी यांनी सर्वप्रथम भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाचे नेतृत्व केले व महिला क्रिकेटला दिशा दिली, त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. देशातील पहिली कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करणाऱ्या मुंबई येथील स्नेहा कामत यांचाही या पुरस्कार यादीत समावेश आहे.


पहिल्या गुप्तहेर रजनी पंडित- फर्स्ट लेडी

पालघर येथील रजनी पंडित यांनी खासगी गुप्तहेर म्हणून कार्य केले आहे, त्या देशातील पहिल्या महिला नोंदणीकृत गुप्तहेर आहेत, त्यांच्या कार्याची दखल पुरस्काराच्या रूपाने घेण्यात आली आहे. मुंबई येथील स्वाती परिमल या ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया’ (असोचेम) च्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती करणाऱ्या मुंबईच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.इंदिरा हिंदुजा व अंधांसाठी देशातील पहिले ‘लाईफ स्टाइल’ मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित करणाऱ्या मुंबई येथील उपासना मकाती आणि डिजिटल आर्ट द्वारे भारतातील महिला योध्यांचा परिचय करून देणारी मुंबईची अठरा वर्षीय तरुणी तारा आनंद यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

भारतरत्न मदर तेरेसा, कल्पना चावला, बचेंद्रि पाल, ऐश्वर्या रॉय बच्चन, पी.व्ही सिंधु, सानिया मिर्जा, गीता फोगट, सायना नेहवाल,साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मिताली राज आदी अनेक कर्तृत्ववान महिलांचा "फर्स्ट लेडी" पुरस्कार यादीत समावेश आहे.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा. http://twitter.com/MahaGovtMic

Wednesday, 3 January 2018

महाराष्ट्राला सिंचन व्यवस्थापनासाठीचा प्रथम पुरस्कार











नवी दिल्ली, 3 :  देशात सर्वात जास्त पाणी वापर स्ंस्था स्थापन करुन विक्रमी सिंचन व्यवस्था निर्माण करणा-या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला  केंद्र शासनाच्या केंद्रीय सिंचन व उर्जा मंडळाच्या वतीने उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांच्या हस्ते राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे सचिव च.आ. बिराजदार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

            केंद्र शासनाचा हा पुरस्कार प्रथमच महाराष्ट्राला मिळाला आहे.  येथील स्कोप कॉम्प्लेक्स च्या सभागृहात केंद्रीय सिंचन व उर्जा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांच्या हस्ते सिंचन व उर्जा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे  राज्य व संस्थांचा विविध श्रेणीत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाचे सचिव यु.पी. सिंह, केंद्रीय उर्जा मंत्रालयाचे सचिव पुष्पेंद्र सिंह, केंद्रीय सिंचन व उर्जा मंडळाचे अध्यक्ष रविंद्र वर्मा मंचावर उपस्थित होते.
महाराष्ट्राची सिंचन क्षमता दुप्पट करणार – गिरीश महाजन
केंद्र शासनाच्या केंद्रीय सिंचन व उर्जा मंडळाच्या वतीने आज मिळालेला पुरस्कार हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे मी मानतो. यापुढे महाराष्ट्राची सिंचन क्षमता दुप्पट करण्याचा प्रयत्न राहील अशा भावना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या. ते म्हणाले, राज्यात सुमारे 13 लक्ष लाभक्षेत्रावर 3 हजार 242 पाणी वापर संस्था  स्थापन झाल्या आहेत. याचीच नोंद आजच्या पुरस्कारासाठी घेण्यात आली. राज्यात 225 लक्ष हेक्टर क्षेत्र लागवडी लायक असून पाटबंधारे प्रक्ल्पांतर्गत   आतापर्यंत निर्माण झालेल्या 49.50लक्ष हेक्टर क्षेत्रात सिंचन क्षमतेचा पूर्णपणे वापर करुन जास्तीत-जास्त क्षेत्र प्रत्यक्ष सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. यावर्षी राज्यात जवळपास 40 लक्ष हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली हा राज्याच्या इतिहासातील उच्चांक आहे. केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन लाभत असून राज्याची सिंचन क्षमता दुप्पट करु असा विश्वास श्री. महाजन यांनी व्यक्त केला.
महावितरणचाही सन्मान
क्षमता वृध्दी व उत्तम प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाच्या उर्जा विभागाच्या महावितरण या कंपनीचाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महावितरणच्या मुख्य अभियंता रंजना पगारे आणि दिल्लीस्थित निवासी संचालक प्रफुल्ल पाठक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महावितरण ने आपल्या नाशिक येथील  प्रशिक्षण व सुरक्षा संस्थेच्या माध्यमातून व प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणी असणा-या प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून आपल्या अधिकारी व कर्मचा-यांना विविध प्रकारच्या नव-नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले.  या कार्याची नोंद घेऊन केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते केंद्रीय सिंचन व उर्जा मंडळाचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi

00000

सूचना : सोबत फोटो जोडले आहे. 


‘भारत के राजनेता’ पुस्तकातुन रामदास आठवले यांचे चरित्र जगासमोर येईल : उपराष्ट्रपती



नवी दिल्ली, 3 :  “‘भारत के राजनेता रामदास आठवलेया पुस्तकाच्या माध्यमातुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे चरित्र जगासमोर येईल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु यांनी केले.
       “‘भारत के राजनेतारामदास आठवले या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम  कॉन्स्टीटयूश्न कल्बमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. भारत के राजनेता रामदास आठवले या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती एम.वैंकय्या नायडु यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पुस्तकाचे संपादक राजीव सुमन उपस्थित होते.
      श्री नायडु म्हणाले, नामवंत चांगल्या व्यक्तींचे व्यक्तीचित्रे पुस्तकांच्या स्वरूपात जगासमोर येणे आवश्यक आहे. अशा पुस्तकांच्या माध्यमातुन त्या व्यक्तींचे जीवनातील संघर्ष कळते. त्यावरून प्रेरणा घेता येते. अशी पुस्तके हे भविष्यात महत्वपुर्ण दस्ताऐवज म्हणुनही उपयोगी होतात. ही पुस्तके नेहमीच वाचली जातात.    
       रामदास आठवले यांचे व्यक्तीमत्व महाराष्ट्रासह देशभर लोकप्रिय आहे. ते अनुसूचित जातीतील असून कधीही संकुचित विचार त्यांनी केलेला नाही. त्यांची सामाजिक तसेच  राजकीय क्षेत्रातील वाटचाल अतीशय खडतर आणि संघर्षशील अशीच राहीलेली असूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीही असमानता किंवा कटूता दिसली नसल्याचे उपराष्ट्रपती नायडू म्हणाले. या पुस्तकानिमित्त त्यांची जीवन यात्रा सामान्य जनतेपर्यंत पोहोचले.
      श्री आठवले यांनी नेहमीच सामाजिक समतेचा विचार मांडलेला आहे. देशात सामाजिक तेड निर्माण होईल असे वक्तव्य श्री आठवले यांच्याकडुन झालेले नसल्याचे कौतुकही श्री नायडु यांनी यावेळी केले. लोकप्रतिनिधी म्हणुन सर्वच वर्गाच्या समस्यांना वेळोवेळी श्री आठवले यांनी मांडले आहे. त्यांनी लोकसभेत तसेच आता राज्यसभेत अनेक लोकोपयोगी निणर्यात सहभाग नोंदविला असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. या सर्व घटनांचा उल्लेख या पुस्तकांत केलेला असल्याचे श्री नायडु म्हणाले.
     “‘भारत के राजनेतारामदास आठवले”  या पुस्तकामध्ये रामदास आठवले यांच्या जीवनातील संघर्षाचा 80 ते 90 च्या काळाविषयी उल्लेख केलेला आहे. त्यांची सविस्तर अशी मुलाखत, त्यांनी लोकसभेत राज्यसभेत आणि महाराष्ट्र विधानसभेत दिलेली भाषणे विचारलेले प्रश्नांविषयी या पुस्तकांत उल्लेखित केले आहे.

  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

                                                     http://twitter.com/micnewdelhi

राजधानीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी



नवी दिल्ली, 3 :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  साजरी करण्यात आली.   

            कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

  महाराष्ट्र परिचय केंद्रात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
           महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                     http://twitter.com/micnewdelhi
                                                                *****



Tuesday, 2 January 2018

महाराष्ट्रात जन धन योजनेच्या 2 कोटी बँक खात्यात 4 हजार कोटीच्या ठेवी



नवी दिल्ली, 2 : प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत डिसेंबर 2017 अखेर  देशभरात 30 कोटी हून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. या बँक खात्यात 71 हजार कोटीहून अधिक ठेवी जमा झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 4 हजार 32 कोटी रुपयांचा आहे. 

प्रत्येक कुटुंबात किमान एक बँक खाते असावे या उद्देशाने प्रधानमंत्री जन धन योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली. आर्थिक समावेशन हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. 

                                 देशात 30 कोटी जन धन बँक खाती

       देशभरात प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत डिसेंबर 2017 अखेर 30 कोटी 79 लाख 51 हजार 262 बँक खाती उघडण्यात आली आहेत.यामध्ये ग्रामीण व निमशहरी भागातील बँक खात्यांची संख्या 18 कोटी 11 लाख 56 हजार 759 इतकी आहे तर शहरी व महानगरामधील बँक खात्यांची संख्या 12 कोटी 67 लाख 94 हजार 503 इतकी आहे. या सर्व बँक खात्यात एकूण 71 हजार 501 कोटी 17 लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या ठेवींमध्ये महाराष्ट्राचा वाटा 4 हजार 32 कोटी 99 लाख रुपयांचा आहे.

                              महाराष्ट्रात 2 कोटीहून अधिक जन धन बँक खाती

         ‘प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत डिसेंबर 2017 अखेर महाराष्ट्रात 2 कोटी 17 लाख 69 हजार 324 बँक खाती उघडण्यात आली आहेत, यामध्ये ग्रामीण व निमशहरी बँकांमध्ये 1 कोटी 47 लाख 1 हजार 657 बँक खाती तर शहरी व महानगरातील बँकांमध्ये 1 कोटी 29 लाख 7 हजार 667 बँक खाती उघडण्यात आली आहेत. या बँक खात्यात एकूण 4 हजार 32 कोटी 99 लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. 

                            महाराष्ट्रात 1 कोटीहून अधिक रूपे कार्डचे वितरण

देशभरात 23 कोटी 22 लाख 60 हजार 470 रुपे कार्ड वितरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात 1 कोटी 51 लाख 53 हजार 63 इतकी रूपे कार्ड वितरित करण्यात आली आहेत.

           महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

                                                     http://twitter.com/micnewdelhi

Maharashtra’s Chhatrapati Shivaji Rajyabhishek Tableau To run on Wheels at RD Parade


New Delhi, 1: The historic Chhatrapati Shivaji Maharaj’s Rajyabhishek “Coronation” will be this year’s attraction as Maharashtra’s Tableau to be showcased at Rajpath on 26th of January. The team led by renowned art director Nitin Desai has moved to Delhi for the construction of the Tableau.
This year, tableaus of 14 states will be displayed on the 69th Republic Day celebration of India Gate on the Rajpath. A total of 30 states from across the country had claimed for displaying pictures on Rajpath. After various tests, the selection of tableaus of Maharashtra's has been done for this prestigious program.
The Directorate of Cultural Affairs, Government of Maharashtra, organizes the work of concept and designs of the tableau every year. The Prime Minister, Shri Narendra Modi on Sunday, in his Mann Ki Baat, said Republic Day celebration in 2018 would be "remembered through the ages" because the government for the first time in India's history would host leaders of 10 Asean countries as chief guests on 26 January. He said, "The Republic Day will be celebrated with leaders of all 10 (Association of Southeast Asian Nations) Asean countries coming to India as chief guests. This time, not one but 10 chief guests would grace the Republic Day. This is unprecedented in India's history," the Prime Minister said.
The parade, held annually on January 26, starts from Rajpath and ends at Red Fort in Delhi. Every year on Republic Day, India invites a visiting head of state, who is the state guest of honour (chief guest) for the ceremony. Various States and Union Territories showcase their tableau, and the event concludes with the announcement of best three tableaus. Taking ahead this glorious tradition, this year, Maharashtra will display pictures of 'Shivraji Rajyabhishek' on the Rajpath.
Sir J.J.School of Arts’s retired Prof. Shri Narendra Vichare has designed the tableau with a 3D replica. Under the able guidance of world renowned art director Nitin Desai, the tableau would be constructed and the work in progress is going on at the Delhi Cantonment Area. The replica of 'MeghDambri' (Magnificent Canopy) which was set up at Raigad and the ‘Royal Coronation’ will be presented live at Rajpath. There will be 10 artists performing this royal act.
The Directorate of Cultural Affairs of Maharashtra State has a long tradition of displaying showcasing excellent tableaus. This tableau has already been showcased in the year 1980 and it received the first prize. In 1983, the tableau of 'Bail Pola' (worship of Bull by the farmers) won the first prize. After this, Maharashtra consecutively from 1993 to 1995 bagged first prize. Recently, in 2015, the State of Maharashtra bagged first prize for its tableau, “Pandharichi Wari”.

Will Pursue Agenda Of Creating Indian Culture And Civilization On Global Level -MP, Dr. Vinay Sahasrabuddhe















New Delhi, 02: ‘Pursuing the agenda of creating greater understanding about India and its civilization in the global community, would be focussed upon meticulously ’, said Member of Parliament,  Dr Vinay Sahastrabuddhe, after taking over as the Chairman of Indian Council for Cultural Relations, here today.
Recently, Dr. Sahasrabuddhe was elected as the President of the Indian Council for Cultural Relations (ICCR), which is a distinguished body of the central government, and on Tuesday he took charge in the presence of the Director General of the Council Riva Ganguly Das and senior officials.
Addressing the media after his taking over, Dr. Sahasrabuddhe said, the 70-year-old ICCR is an old and distinguished institution. Various distinguished dignitaries have been elected as the President of this organization. While taking this legacy forward, there is a need to pursue the agenda of creating greater understanding about India and its civilization, in the global community of academicians, men of letters, artistes and thinkers to a higher level through multiple efforts in a structured manner. Adding further he said, the institutional strength of ICCR needs to be consolidated through its more pronounced footprint all over the world, in a scientific manner through evolving a more result oriented work culture towards further translating popular global goodwill into a more vibrant diplomatic relationship.
The Indian traditions and social life of different types of Indian culture beyond music, dance, yoga, need to be showcased on an international level, for which Dr. Saharsrabuddhe said, he along with his team of ICCR would ensure that the wider concept of culture and civilization encompassing a wide range of subjects from food to fabric, handicrafts to folk-art and diversity of traditions to emerging varieties of tourism would be on his agenda. 
President Ram Nath Kovind on Friday appointed MP, Dr. Vinay Sahasrabuddhe as the President of Indian Council of Cultural Relations.ICCR, which was founded in 1950 by India's first Education Minister Maulana Abul Kalam Azad, who also served as its first President and. Former Presidents’ Dr Shankar Dayal Sharma and K.R. Narayanan, Former Prime Ministers P.V. Narasimha Rao and Atal Bihari Vajpayee have also held this prestigious post. 
The ICCR's main objectives are to actively participate in the formulation and implementation of policies and programmes pertaining to India's external cultural relations and to foster and strengthen cultural relations and mutual understanding between India and other countries.

भारतीय संस्कृती व समाजाची ओळख जगापुढे आणणार :डॉ. सहस्त्रबुध्दे











    
नवी दिल्ली, 2 : भारतीय संस्कृती व समाजाच्या वैशिष्टयांची ओळख जगाला करून देणार असून यासाठी कार्यक्रम आखला असल्याची माहिती खासदार डॉ विनय सहस्त्रबुध्दे यांनी आज भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिली.

             नुकतेच डॉ. सहस्त्रबुध्दे यांची केंद्र शासनाच्या प्रतिष्ठीत अशा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली, आज त्यांनी परिषदेच्या महासंचालक रिवा गांगुली दास आणि वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.

          यावेळी डॉ. सहस्त्रबुध्दे म्हणाले, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद 70 वर्ष जुनी व प्रतिष्ठीत संस्था आहे. अनेक नामवंतानी या संस्थेचे अध्यक्षपद भुषविले आहे. हाच वारसा पुढे घेऊन जाताना संगीत, नृत्य, योग या पलीकडे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय असलेल्या विविध प्रथा ,परंपरा, येथील लोकशाही परंपरा, समाज जीवन हे विविध दालनांद्वारे जगापुढे आणण्याची  गरज आहे. कला, साहित्य आणि वाड्मय या माध्यमातून भारतीय संस्कृतीची उत्तम जान जगात पोहचविण्याच्या दिशेने कार्य करण्यात येईल त्यासाठी त्रिसुत्री कार्यक्रम आखला असल्याचे त्यांनी सांगितले.
                                               काय आहे त्रिसूत्री कार्यक्रम    
      भारतीय सांस्कृतिक परिषदेचे संस्थात्मक जीवन समृध्द करणे व येथे चांगली कार्यसंस्कृती निर्माण करणे. भारतीय संस्कृतीची माहिती सक्षमपणे पोचविण्यासाठी जगातील 37 देशांमधे असलेल्या परिषदेच्या शाखा गतीशील करणे. हा त्रिसुत्रीतील पहिला कार्यक्रम असणार. विदेशातील कलाकार, शैक्षणीक क्षेत्रातील नामवंत, विचारवंत, साहित्यिकांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचे संदर्भ मांडले जावे भारताचा परिचय जगाला व्हावा यासाठी  भारतीय संस्कृतीसंबंधी माहिती प्रभावीपणे या घटकांपर्यंत पोचविणे हे या त्रिसुत्रीतील दुसरे सूत्र आहे. भारतीय लोकजीवन, ग्रामीणांचे व आदिवासींचे जीवन येथील पारंपरिक तंत्रज्ञान या माध्यमातून भारतीय संस्कृतीची व्यापक संकल्पना जगापुढे मांडणे हे तिसरे सूत्र असल्याचे  डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले.

            आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक जगतात या परिषदेला मानाचे स्थान आहे. विविध देशांबरोबरील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतुने कार्यरत या परिषदेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डॉ. सहस्त्रबुध्दे यांची  दिनांक 28 डिसेंबर 2017 रोजी  अध्यपदी निवड केली होती . यापूर्वी  माजी राष्ट्रपती सर्वश्री डॉ. मौलाना अबुलकलाम, डॉ. शंकरदयाळ शर्मा, डॉ. के.आर. नारायणन व माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे या नामवंतानी या प्रतिष्ठीत संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते.  
           महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                     http://twitter.com/micnewdelhi
                                                                *****
ont-weight:normal'>सूचना : सोबत छायाचित्र जोडली आहेत.

Monday, 1 January 2018

खासदार विनय सहस्त्रबुध्दे स्वीकारणार सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्षपद



नवी दिल्ली, 1 : महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांची नुकतीच केंद्र शासनाच्या प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) अध्यक्षपदी निवड झाली असून  मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2018 रोजी ते  पदभार स्वीकारणार आहेत.

                 आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक जगतात या परिषदेला मानाचे स्थान आहे. विविध देशांबरोबरील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतुने कार्यरत या परिषदेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डॉ. सहस्त्रबुध्दे यांची  दिनांक 28 डिसेंबर 2017 रोजी  अध्यपदी निवड केली होती . यापूर्वी  माजी राष्ट्रपती सर्वश्री डॉ. मौलाना अबुलकलाम, डॉ. शंकरदयाळ शर्मा, डॉ. के.आर. नारायणन व माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी या नामवंतानी या प्रतिष्ठीत संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते. वर्ष  2014 पासून या परिषदेचे अध्यक्षपद रिक्त होते.   

            डॉ. सहस्त्रबुध्दे हे मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता येथील आयपीइस्टेट परिसारातील आझाद भवानात स्थित आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत.

                                                                            ******



राजपथावर अवतरणार ‘शिव राज्याभिषेक’



नवी दिल्ली, 1 : राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने शिवराज्याभिषेका वर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. चित्ररथ बांधणीसाठी प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील चमू दिल्लीत दाखल झाला आहे.

यावर्षी भारतदेशाच्या 69 वा प्रजासत्ताक दिनी इंडियागेट वरील राजपथावर देशातील 14 राज्यांचे चित्ररथ प्रदर्शित होणार आहे. देशभरातून एकूण 30 राज्यांनी  राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती पैकी विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील 14 राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे. 
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राच्यावतीने प्रदर्शित होणा-या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते. दरवर्षी राजपथावर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुणे यांच्यासह गणमान्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्टये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. पथसंचलानात बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने शिवराज्याभिषेक दर्शविणारा चित्ररथ राजपथावर प्रदर्शित होणार आहे.

   राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती जे.जे.स्कुल ऑफ आर्ट चे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी तयार केले आहे. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देखना चित्ररथ उभारला जात असून या चित्ररथाच्या बांधणीचे कार्य येथील कॅन्टॉनमेंट भागातील रंगशाळेत सुरु आहे. चित्ररथावर रायगड किल्यावर असलेली मेघडंबारी उभारण्यात येणार असून शिवराज्याभिषेक दर्शविण्यासाठी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीकेतील कलाकारासह चित्ररथावर एकूण 10 कलाकार असतील. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजुला विविध प्रतिमांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व सोहळा  दर्शविण्यात येणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणा-या गिताची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे.

       महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्टय दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. यापूर्वी 1980 मध्येही राज्याच्यावतीने शिवराज्याभिषेक दर्शविणारा चित्ररथ प्रदर्शीत केला होता यास प्रथम पारितोषीक मिळाले होते. 1983 मध्ये बैल पोळा या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर 1993 ते 1995 असा सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. 2015 मध्ये प्रदर्शित पंढरीची वारी या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला ही उल्लेखनीय बाब आहे.   
                         
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                     http://twitter.com/micnewdelhi
                                                                *****