Thursday, 8 August 2019

स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या त्यागामुळेच देशाला सुवर्ण दिवस : केंद्रीय मंत्री अरविंद सावंत






                                                      
नवी दिल्ली, 8 :  ‘छोडोभारत’, ‘गोवा मुक्तीसंग्रामआणिहेद्राबाद मुक्ती संग्रामातजिवाची बाजी लावून ब्रिटीश सत्ते विरोधात बंड पुकारणा-या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या त्यागामुळेच भारतदेशाला सुवर्ण दिवस प्राप्त झाले असे गौरवोद्गगार केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अरविंद सावंत यांनी आज काढले.
            क्रांतीदिनी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सग्राम सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री श्री सावंत  यांनी आज महाराष्ट्र सदनात या स्वातंत्र्यसैनिकांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा सत्कार केला.   त्यांच्यासोबत अनौपचारीक गप्पाही मारल्या. यावेळी श्री. सावंत यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची आस्थेवाईकपणे  विचारपूस केली.  ‘छोडोभारत’, ‘गोवा मुक्तीसंग्रामआणिहेद्राबाद मुक्ती संग्रामातदिलेल्या योगदानाबाबत या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानाबाबत त्यांच्याच शब्दात जाणून घेतले. मुंबई दक्षिणमध्य लोकसभा मतदार संघाचे खासदार राहुल शेवाळे, अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बच्चू कडू, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यावेळी उपस्थित होते.
            भारतदेश पारतंत्र्यात असताना ब्रिटीश सत्ते विरोधात बंड पुकारणा-या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या त्यागाचे महत्व अनन्यसाधारण असल्याच्या भावना श्री. सावंत  यांनी व्यक्त केल्या. जिवाची बाजी लावून ब्रिटीशांविरोधात बंड पुकारणा-या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या त्यागामुळेच भारतदेशाला सुवर्ण दिवस प्राप्त झाले असेही श्री. सावंत म्हणाले. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या लॉबीमध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा आशिर्वाद घेतल्यानंतर  श्री. सावंत यांनीभारत माता की जयअसा जय घोष दिला त्यामुळे देशभक्तीमय वातावरण झाले
यावेळी भंडारा जिल्हयातील भिवाजी अंबुले, नागपूर जिल्हयातील रतनचंद जैन, परभणी जिल्हयातील माधवराव कुलकर्णी, औरंगाबाद जिल्हयातील लक्ष्मण उखडे, लातूर जिल्हातील शिवलींगप्पा इराप्पा उर्फ विरभद्रप्पा सिद्रामप्पा मंडगे, वर्धा जिल्हयातील गणेश बाजपेयी आणि बीड जिल्हयातील बन्सी जाधव या स्वातंत्र संग्राम सैनिकांचा सत्कार श्री. सावंत यांनी  केला.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic  
                                                                00000
 रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१८१ /  दिनांक  .०८.२०१९ 

‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार-2019’ चे लोकार्पण





                         9 नोव्हेंबरला पुरस्कार वितरण
नवी दिल्ली,दि.8 : देशातील प्रतिभावान युवा लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार-2019’ चे लोकार्पण केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते आज झाले. मंत्रालयाच्या स्थापनादिनी यावर्षी 9 नोव्हेंबर ला  पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
            येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार-2019’ चे लोकार्पण झाले. विभागाचे सचिव डॉ. के.पी. कृष्णनन, सह सचिव सुनिता संगी आणि ज्योत्सना सिटलींग यावेळी मंचावर उपस्थित होत्या.
                                                    10 सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज                
        आज पासून या पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यास विधीवत सुरुवात झाली असून 10 सप्टेंबर 2019 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. मंत्रालयाच्या www.neas.gov.in  या संकेतस्थळावर दिलेल्या विहित नमुण्यात या पुरस्कारासाठी अर्ज भरता येणार आहे. पुरस्कारासाठी  कमाल वयोमर्यादा 40 वर्ष आहे.
                                                      दोन श्रेणीत एकूण 45 पुरस्कार
        या पुरस्कारांना ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन श्रेणींमध्ये विभागण्यात आले असून एकूण 45 पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.  अ श्रेणीमध्ये तीन उप श्रेणी करण्यात आल्या असून प्रत्येक श्रेणीत 13 असे एकूण 39 पुरस्कार देण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘अ1’ या उपश्रेणीत 1 लाख रुपयांपर्यंत सुरुवातीची गुंतवणूक असणा-या उद्योजकांना अर्ज करता येणार आहे. ‘अ2’ या उपश्रेणीत 1 लाख ते 10 लाखा पर्यंतची आरंभीची  गुंतवणूक असणा-या उद्योजकांना अर्ज करता येणार आहे. तर ‘अ3’ या उपश्रेणीत 10 लाख ते 1 कोटी पर्यंतची आरंभीची गुंतवणूक असणा-या उद्योजकांना अर्ज करता येणार आहे. कापड, कापड सामुग्री, चर्मा व संबंधीत वस्तू, शेती, अन्न प्रक्रिया, वनोत्पादन, खाद्य वस्तू आदी 13 उद्योग क्षेत्रांचा यात समावेश करण्यात आला आहे. या श्रेणीत महिला व दिव्यांग उद्योजकांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.
            ‘ब’ श्रेणी अंतर्गत  पर्यावरण पुरक वस्तू निर्मात्यांना एकूण 6 पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
            व्यक्तीगत विजेत्याला 5 लाख रुपये, चषक आणि प्रशस्ती पत्र पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे. तर विजेत्या संस्थेला  10 लाख रुपये, चषक आणि प्रशस्ती पत्र पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे. 2016 पासून ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारांची’ सुरुवात झाली आहे.
                 
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000   
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१८१ /  दिनांक  .०८.२०१९ 

Wednesday, 7 August 2019

भारतीय राजकारणातील विद्वान, सुशील व सुसंस्कृत व्यक्तिमत्व हरपले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



नवी दिल्ली, 07 : भारतीय राजकारणातील विद्वान, सुशील सुसंस्कृत व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी परराष्ट्र मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करतांना प्रतिक्रिया दिली.
माजी परराष्ट्र मंत्री तसेच जेष्ठ संसदपटू श्रीमती सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने अकास्मिक निधन झाले. आज बुधवारी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोधी रोड येथील स्मशानभूमीत त्यांचे  पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली.   
श्रीमती सुषमा स्वराज  यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, श्रीमती स्वराज कुशल प्रशासक तसेच त्या खंभीर व्यक्ति होत्या. गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय वाटचालीत त्यांनी संसदीय राजकारणात स्वत:ची वैशिष्ठपूर्ण ओळख निर्माण केली. केंद्रीय मंत्रीमंडाळातील विविध विभागांचा कार्यभार त्यांनी जबाबदारीने सांभाळला होता. विशेषत: त्यांनी गेली पाच वर्ष परराष्ट्र मंत्रालयाची महत्वाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली होती.देशभरात त्यांची प्रतीमा स्वच्छ होती आणि, मध्यमवर्गीय  व गरीबांना आपला  वाटावा असा त्यांचा चेहरा होता तसेच त्यांचा चाहतावर्ग ही खुप मोठा होता.  त्यांच्या निधनाने  आपण ज्येष्ठ नेत्या व मार्गदर्शक गमावल्या आहेत तसेच माझीही  वैयक्तिक हानी झाली आहे.  श्रीमती सुषमा स्वराज यांचे आपल्यामधून असे अचानक निघून जाणे सर्वांसाठी खूप धक्कादायक व दु:ख दायक आहे .
बुधवारी  सकाळी त्यांचे पार्थिव जनपथ येथील त्यांच्या निवासस्थानी तसेच दुपारी दीन दयाळ उपाध्याय मार्ग येथील भाजप पक्षाच्या मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती श्री.एम.वेंकैया नायडू, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासह वरिष्ठ मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी अंतिम दर्शन घेऊन श्रध्दाजंली वाहिली. 
000000000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा 
http://twitter.com/MahaGovtMic   
                                                                00000
 
अमरज्योत कौर अरोरा, जसंअ /
वि.वृ.क्र.170/दि.07.08.2019

Tuesday, 6 August 2019

उत्तराखंड बस दुर्घटनेत मुंबईतील तीन भाविक जखमी




नवी दिल्ली,दि.6:  उत्तराखंडमधील ब्रदिनाथ तिर्थस्थळाहून परतताना चमोली जिल्हयातील लामबगड येथे  भाविकांच्या बसवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मुंबईतील 3 भाविकांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

            ब्रदिनाथ तिर्थस्थळाहून दर्शन घेवून परत येत असलेल्या  14 भाविकांच्या बसवर आज ब्रदीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील लामबगड येथे  सकाळी 10 वाजताच्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत 6 जण मृत झाले असून यापैकी एकाचीच ओळख पटली आहे. ओळख पटलेल्या 20 वर्षीय युवकाचे नाव राजू कुमार असून तो उत्तरप्रदेशातील बिजनोर येथील रहिवासी आहे.

            या दुर्घटनेत 8 जण जखमी झाले आहेत. मुंबईतील शैलेंद्र शुक्ला (40 वर्ष), रवि सिंह(27 वर्ष) आणि सुरज मिश्रा (21 वर्ष) हे भाविक या दुर्घटनेत जखमी झाले असून जोशीमठ येथील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

            राज्य मदत व पूनर्वसन विभाग व पोलिसांनी सायंकाळी 7 वाजेपर्यंत शर्तीचे प्रयत्न करून बस मधील 5  मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले आहे.  शवविच्छेदन सुरु असून मृतांची ओळख पटलेली नाही.
                 
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१७९ /  दिनांक  .०८.२०१९ 




महाराष्ट्रातील 9 स्वातंत्र्य सैनिकांचा क्रांतीदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान



नवी दिल्ली,दि.6:  ‘भारत छोडोआंदोलन’ आणि ‘गोवा मुक्ती’ आंदोलनात मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्रातील 9 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी क्रांति दिनी राष्ट्रपती भवनात सन्मान होणार आहे.
         9,ऑगस्ट  या क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम, यासोबतच देशभरात ब्रिटींशांना हाकलून लावण्यासाठी  झालेल्या विविध आंदोलनात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांचा दरवर्षी राष्ट्रपती भवनात सन्मान सोहळा आयोजित  करण्यात येतो.   
      
शुक्रवारी सन्मान होणा-या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्हयातील भिवाजी अंबुले,  नागपूर जिल्ह्यातील रतनचंद जैन, परभणी जिल्ह्यातील  माधवराव कुलकर्णी , बुलडाणा  जिल्हयातील नारायण खेळकर, कोल्हापूर जिल्ह्यातील  दत्तात्रय मोरे, औरंगाबाद जिल्हयातील लक्ष्मण उखडे,  लातूर जिल्हयातील शिवलींगप्पा इराप्पा उर्फ विरभद्रप्पा सिद्रामप्पा मडगे, वर्धा जिल्हयातील गणेश बाजपेयी आणि बीड जिल्हयातील बन्सी जाधव  या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान होणार आहे. 
                 
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१७८ /  दिनांक  .०८.२०१९ 



                                         

Saturday, 3 August 2019

पुणे विद्यापीठाची प्रतिष्ठित संस्थेच्या दर्जासाठी शिफारस





                देशातील प्रत्येकी 15 सरकारी व खाजगी शैक्षणिक संस्थांची शिफारस

नवी दिल्ली दि. 3 : विद्यापीठ अनुदान आयोगाने(युजीसी) ‘सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे’ ला प्रतिष्ठित संस्थेचा दर्जा  देण्याची शिफारस केली आहे. आधीच प्रतिष्ठित संस्थेचा दर्जा जाहीर झालेली ‘आयआयटी बॉम्बे’ शिफारस करण्यात आलेल्या देशातील  15 सरकारी  शैक्षणिक संस्थांमध्ये प्रथम स्थानावर आहे.

            मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध निकषांच्या आधारे देशातील शैक्षणिक संस्थांना प्रतिष्ठित संस्थांचा दर्जा देण्याची योजना आखली आहे. याअंतर्गत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या  त्रिसदस्यीय सक्षम तज्ज्ञ समितीने शुक्रवारी पार पडलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 542 व्या बैठकीत देशातील15 सरकारी आणि 15 खाजगी अशा एकूण 30 शैक्षणिक संस्थाची शिफारस  प्रतिष्ठित संस्थांचा दर्जा देण्यासाठी केली आहे. केंद्रशासनाकडून प्रतिष्ठित संस्थांचा दर्जा योजनेंतर्गत 10 सरकारी व 10 खाजगी संस्थांना मान्यता दिली असून युजीसीने 15 सरकारी आणि 15 खाजगी संस्थांची शिफारस केली आहे.
                                   
    सरकारी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील दोन तर खाजगी संस्थांमध्ये एका संस्थेचा समावेश
      
            सक्षम समितीने दिलेल्या सरकारी संस्थांच्या यादी मध्ये महाराष्ट्रातील दोन शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. यात,आयआयटी बॉम्बे प्रथम स्थानावर असून सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे 11 व्या स्थानावर आहे. तसेच, आयआयटी बॉम्बे संस्थेला भारत सरकारने याआधीच प्रतिष्ठित संस्थेचा दर्जा बहाल केला आहे.
            ‘शैक्षणिक संस्थांच्या जागतिक क्रमावारी वर्ष-2020’ मध्ये आयआयटी बॉम्बे 152 स्थानावर तर ‘भारत सरकारची शैक्षणिक संस्था क्रमावारी वर्ष-2019’ मध्ये पहिल्या स्थानावर राहीली आहे. ‘जागतिक क्रमावारी वर्ष -2020’ मध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे 801 ते 1000 दरम्यानच्या  स्थानावर आहे. तर ‘भारत सरकारची  शैक्षणिक संस्था क्रमावारी वर्ष-2019’ मध्ये पुणे विद्यापीठ 19 व्या स्थानावर राहीले आहे   
            देशातील 15 खाजगी शैक्षणीक संस्थांची शिफारस प्रतिष्ठित संस्थांसाठी करण्यात आली असून महाराष्ट्रातील रिलायंस फॉऊंडेशनच्या जिओ संस्थेचा यात समावेश आहे. 15 संस्थांच्या यादी मध्ये या संस्थेला तिस-या क्रमांकाचे स्थान प्राप्त झाले असून या संस्थेची प्रतिष्ठित संस्था म्हणून या आधीच निवड झाली आहे.
                शिफारस करण्यात आलेल्या देशातील 15 सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये क्रमश: आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली, आयआयएससी (अभिमत विद्यापीठ), आयआयटी मद्रास, आयआयटी खडकपूर, दिल्ली विद्यापीठ (केंद्रीय विद्यापीठ), हैद्राबाद विद्यापीठ( हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठ), जाधवपूर विद्यापीठ ,कोलकत्ता, अण्णा विद्यापीठ चैन्नई, बीएचयु वाराणसी (केंद्रीय विद्यापीठ), सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, एमयु अलीगड(केंद्रीय विद्यापीठ),तेजपूर विद्यापीठ (केंद्रीय विद्यापीठ), पंजाब विद्यापीठ चंदिगड(केंद्रीय विद्यापीठ), आंध्र विद्यापीठ विशाखापट्टणम चा समावेश आहे.
                        शिफारस करण्यात आलेल्या देशातील 15 खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये क्रमश: बिट्स पिलानी-राजस्थान, मनिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन,जीओ इंस्टिटयूट (रिलायंस फाउंडेशन महाराष्ट्र), अम्रीता विश्वविद्यापीठ-बँग्लोर, व्हिआयटी व्हेल्लोर-तामीळनाडु, जामीया हमदर्द -नवी दिल्ली, कलिंगा इंस्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी-भुवनेश्वर,ओ.पी.जिंदाल विद्यापीठ-हरियाणा, शिव नादर विद्यापीठ- उत्तर प्रदेश, भारती (सत्यभारती फाउंडेशन) दिल्ली, अझीम प्रेमजी विद्यापीठ-बॅंग्लोर, अशोक विद्यापीठ सोनिपत-हरियाणा, केआरइए विद्यापीठ (आयएफएमआर)-चैन्नई तामीळनाडू, आयआयएचएस –बँग्लोर आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ पब्लिक हेल्थ-गांधी नगर यांचा समावेश आहे.
                 
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१७७ /  दिनांक  .०८.२०१९ 



राजधानीत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी







नवी दिल्ली दि. 3 :  क्रांतिसिंह नाना पाटील यांची  जयंती  आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.   
 कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर ,अजीतसिंह नेगी,  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  

महाराष्ट्र परिचय केंद्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकारी - कर्मचारी आणि पत्रकार  यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१७६ /  दिनांक  .०८.२०१९ 




Friday, 2 August 2019

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा निकाल जाहीर ; महाराष्ट्रातील 61 उमेदवार उत्तीर्ण





नवी दिल्ली दि. 2: केंद्रीय सशस्त्र दलात भरतीकरिता घेण्यात आलेल्या परिक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून  देशभरातील 416  उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत, यात महाराष्ट्रातील 61 उमेदवारांचा समावेश आहे.
            केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती-2018’ चा अंतिम निकाल आज जाहीर झाला. सीमा सुरक्षा दल(BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF), भारत-तिबेट सीमा पोलीस(ITBP) आणि सशस्त्र सीमा दल (SSB) मध्ये ‘गट अ’ संवर्गातील  सहायक कमांडेंट पदाकरिता घेण्यात आलेल्या परिक्षेच्या अंतिम निकालात देशभरातील 416 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील एकूण 61 उमेदवारांचा समावेश आहे.
           
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती करिता 12 ऑगस्ट 2018 ला लेखी परिक्षा घेण्यात आली होती. लेखी परिक्षेत उर्तीण झालेल्या उमेदवरांच्या 24 जून ते 24 जुलै 2019 दरम्यान मुलाखती  घेण्यात आल्या. यात यशस्वी झालेल्या उमेदवरांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
                                             पहिल्या शंभरात महाराष्ट्रातील 14 उमेदवार
 महाराष्ट्रातील उमेदवारांनी या निकालात बाजी मारली असून पहिल्या शंभरात राज्यातील 14 उमेदवारांचा समावेश आहे. यात क्रमश: अक्षय पंगारिकर (3),  जयेश पाटील (12), सचिन हिरेमठ(14), प्रशांत करंडे(29), दिनेश लवाटे(34), परमेश्वर सेलुकर(37), अमोल पाटील(39), अभंग जोशी (47), स्नेहा पाटील(50), अविनाश जाधवार(70), विजय भगुरे(79), मयुर इंगळे(87), विक्रम घारड(94), सुमीत भालके(100) असे आहेत.
यासोबतच महेश तेलंगे (101) , संकेत महाडिक(111), संचित जाधव (118), प्रसाद गोरे (132), ओंकार पवार (169), मयुर नागरगोजे(187), मंदार गोडसे (195), गणेश खोडवे (206), अमीत सुरळकर(214),राशी शिखरवार(219),उमाकांत गिरडकर(220),अमित काकडे(223), मनोज पाटील (224), किरण सोनवणे (225), तुषार पालकर (234), शिरीष जगताप(237), रोहन जवंजाळ(245), अशोक आढावे(246), गौरव वाघ (251), उदय जाधव(267), रजत वाळके(273), निखिल शिराळ(279), राहुल निंबाळकर(280), अजय पोटभरे(289), राहुल मोरे(291), प्रशांत हुकारे(295), अश्विन रहाटे(312), विकास गाढवे (315), सागर बोराडे(319), निखिल वानखडे (323), मनिष मोहोड(330), सुरज रामटेके(336), प्रितम मेस्त्री(339), अक्षय गायकवाड(341), वैभव जाधव(348), विनोद येल्मेवाड (349),  सुरज पवार (352), तरूण डोंगरे (361), नितीन इंगळे (368), हर्ष म्हस्के(370), प्रणय साखरे (374), राहुल जाधव (384), अभिजीत बोढारे (385), बापुसाहेब गायकवाड(387), आकाश साबळे(389), बुध्दभुषण निकळजे(391), अक्षय ताकसांडे(394) या महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे.           

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१७५ /  दिनांक  .०८.२०१९ 




                                         



Thursday, 1 August 2019

राजधानीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
















नवी दिल्ली दि. 1: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

 कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर ,अजीतसिंह नेगी,  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  
महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचारी, पत्रकार आणि  अभ्यागत यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१७२ /  दिनांक  .०८.२०१९