Thursday, 21 December 2017

Maharashtra’s Shrikant Deshmukh And Sujata Deshmukh Win Akademi Award


























New Delhi, 21:  Maharashtra’s famous poet Shrikant Deshmukh and eminent author, Ms Sujata Deshmukh have been selected for the prestigious Sahitya Akademi Award 2017.  The Awards will be presented to them for Marathi short story collection and for extensive translation work by the latter. Sahitya Akademi announced its Annual Sahitya Akademi Awards 2017 in 24 Languages on Thursday to the outstanding writers contributing substantially to the Indian literature.
            Shri Shrikant Deshmukh has been selected for his outstanding Poetry Collection, ‘Bolave Te Aamhi’ and Ms Sujata Deshmukh has been chosen for her extensive translation work, “Gauhar Jaan Mhantat Mala”, meaning ‘They call me Gauhar Jaan’. This is the translation of Vikram Sampath’s English Book, ‘My Name is Gauhar Jaan: The life and Times of a Musician’.
The Sahitya Akademi’s annual awards were announced at Ravindra Bhavan, New Delhi. The best books were announced in different material categories in 24 regional languages. The Awards would be conferred on 12th of February, 2018 at New Delhi during the Festival of Letters organized by Sahitya Akademi.   
The books for translation were selected on the basis of recommendations made by the selection committee and the prize relates to the year immediately preceding the year of Prize for Translation between 1 January 2011 and December 2015.
            The Award would be in the form of a casket containing an engraved copper-plaque, a shawl and a cheque of Rs 1,00,000/- and the Translation Award would comprise of a copper-plaque and an amount of Rs 50,000/- The award's purpose is to recognize and promote excellence in Indian writing and also acknowledge new trends.  The Award

These Awards were recommended by distinguished Jury members representing 24 Indian languages and approved by the Executive Board of the Sahitya Akademi under the Chairmanship of Dr. Vishwanath Prasad Tiwari, President of the Sahitya Akademi. 

श्रीकांत देशमुख आणि सुजाता देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार




नवी दिल्ली, दि. 21 : प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष 2017 साठी मराठी साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला आहे. प्रसिध्द अनुवादक सुजाता देशमुख यांच्या ‘गौहर जान म्हणतात मला !’ या पुस्तकास मराठीतील सर्वोत्तम अनुवादीत पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला.
               रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी देशातील 24 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावाची घोषणा केली. प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘ बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.
             ‘बोलावे ते आम्ही..’ हा श्रीकांत देशमुखांचा जुन्याच पिडीतील नवा कवितासंग्रह आहे. गावगाडयाचा बदलता अवकाश अतिशय व्यामिश्र रूपात कवेत घेणारा हा नव्वदोत्तर कालखंडातील एक महत्वाचा काव्यसंग्रह आहे. कृषीजन व्यवस्थेला वेढून टाकणारी, आक्रमित आणि संस्कारित करणारी बाहय व्यवस्था ही देखील या काव्य संग्रहाच्या चिंतनाचा विषय आहे. या संग्रहात पाच विभाग आहेत. 68 कवितांचा हा संग्रह खोलवर विचार करायला लावणारा आहे. प्रस्तुत संग्रहात भौतिकतेपेक्षा पिंडधर्माकडे लक्ष वेधले आहे. जन्मजात सोशिकता हाच बळिवंताचा पिंडधर्म आहे, हे कवीने सांगीतले आहे. जन्म, मरण, अब्रू, बाप, पाटील, झाड, डुक्कर, मोर, समुद्र, मुंबई, अडत, अडत्या, गाडय़ा, समाधी या गोष्टी कवीच्या कथनपर कवितेत येतात. माती, रेत यांद्वारा विश्वाच्या पोकळीमध्ये अविरत नवसर्जन घडते. ‘उजळमाथ्यानं भूमिपुत्र’ या भागात कवीला भविष्याविषयीचं दु:स्वप्न पडतं. उंदरा-कोल्ह्यानं हंगाम नष्ट करू नये म्हणून शेतकरी डोळय़ांत तेल घालून पहारा करतो. पण त्याची पुढची पिढी मातीपासून दूर होत आहे, हे ही या काव्यसंग्रहात सूचकपणे आविष्कृत केले आहे.
               श्रीकांत देशमुख हे मराठी साहित्यविश्वाला कवी म्हणून परिचित आहेत. ‘बळीवंत’, ‘आषाढमाती’, ‘बोलावे ते आम्ही’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. ‘महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ’, ‘कुडाळवाडी भूषण शिवराय’ हे वैचारिक ग्रंथलेखन तसेच काही ग्रंथांची संपादनेही त्यांनी केली आहेत. ‘पडझड वा-याच्या भिंती’ हा त्यांचा ललितगद्याचा संग्रहही प्रसिध्द आहे.
              सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीच्या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी 12 फेब्रुवारी 2018 रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक जयंत पवार, पुष्पा भावे आणि सदानंद देशमुख यांचा समावेश होता.
 
साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला याचा अत्यानंद : सुजाता देशमुख

              सुजाता देशमुख अनुवादित ‘गौहर जान म्हणतात मला’ या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाच्या पुरस्कार जाहीर झाला आहे. विक्रम संपथ लिखित ‘माय नेम इज गौहर जान’ या इंग्रजी पुस्तकाचा तो अनुवाद आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना सुजाता देशमुख म्हणाल्या, ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा अत्यानंद झाला आहे. लेखक हा पुरस्काराची अपेक्षा न करता लिहीत असतो. साहित्य अकादमीचा पुरस्कार ही माझ्या अनुवादासाठी मोठी पावती असून यानिमित्ताने ‘गौहर जान म्हणतात मला’ हे पुस्तक पुन्हा वाचकांसमोर येणार आहे.’
             एक साक्षेपी संपादक, अनुवादक आणि पत्रकार म्हणून श्रीमती सुजाता देशमुख यांचा लौकिक आहे. त्या ’इंडियन एक्स्प्रेस’मध्ये वार्ताहर आणि ’यूनायटेड न्यूज ऑफ इंडिया’मध्ये सहसंपादिका होत्या. ’मिळून सार्या्जणी’ या मासिकाचं संपादकपद त्यांनी यापूर्वी भूषवलं आहे. राजहंस प्रकाशनाच्या संपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं. , ’गौहरजान म्हणतात मला!’, ’माझंही एक स्वप्न होतं’, ’बाइकवरचं बिर्हाुड’, ’तिची मोहिनी’, ’नीलची शाळा’, ’देश माझा, मी देशाचा’ (श्री. लालकृष्ण अडवाणी यांचं आत्मचरित्र), दहशतीच्या छायेत’ यांसह आदी अनुवादित पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत.
             अनुवादीत पुस्तकाच्या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असून पुढीलवर्षी(२०१८) साहित्य अकादमीच्या विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
             मराठी साहित्यातील अनुवादित पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक अनुराधा पाटील, मकरंद साठे आणि डॉ. नरेंद्र जाधव यांचा समावेश होता.
 
०००००























Thursday, 14 December 2017

महाराष्ट्र परिचय केंद्रामुळे महाराष्ट्राची नवी ओळख : खासदार चंद्रकांत खैरे






नवी दिल्ली, १४ : विविध राज्यांतील जनतेला व महाराष्ट्रातील व्यक्तींना राजधानीत उपयोगी ठरणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे दिल्लीत महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करीत असल्याचे मत औरंगाबाद चे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज व्यक्त केले.
            श्री. खैरे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चे दरम्यान श्री. खैरे बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे, दैनिक सामनाचे दिल्ली ब्युरो चिफ निलेश कुलकर्णी, दैनिक केसरीचे दिल्ली विशेष प्रतिनिधी कमलेश गायकवाड यावेळी उपस्थित होते.  
        श्री. खैरे म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठीचा प्रचार, प्रसार व परिचय व्हावा म्हणून  दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करून महत्वपूर्ण कार्य केले. श्री. चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या कार्यालयाचे महत्व आजही कायम आहे. या केंद्राच्या माध्यमातून राजधानीत महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम राबविणे, मराठी संस्कृतीचे संवर्धन करणे आदी महत्वपूर्ण कार्य होत आहे. नवमाध्यमांच्या युगात परिच केंद्रानेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. परिचय केंद्र राजधानीत महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करण्याचे कार्य उत्तम प्रकारे करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. खैरे यांनी दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल श्री. खैरे यांनी समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :      http://twitter.com/micnewdelhi               


महाराष्ट्रला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनाचे तीन पुरस्कार






नवी दिल्ली 14 : महाराष्ट्रातील चंद्रपुर, औरंगाबाद आणि नागपूर येथील ऊर्जा प्रकल्पांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ऊर्जा दक्षता ब्युरोच्यावतीने  राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्त साधून कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान भवनात करण्यात आले. यावेळी ऊर्जा संवर्धन पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री राकेश सिंग यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            उद्योग क्षेत्रातील श्रेणीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जीएमआर वरोरा ऊर्जा केंद्र या औष्णिक ऊर्जा प्रकल्पास प्रथम क्रंमाकाचा पुरस्कार प्राप्त झाला असून हा पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाने मोठया प्रमाणात ऊर्जेची बचत केलेली आहे.
परिवहन क्षेत्रातील श्रेणीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथील एन्डूर्रन्स टेक्नॉलॉजी मर्यादीत या ऑटोमोबाईल कंपनीला प्रथम क्रंमाक प्राप्त झाला. राष्ट्रीपती यांच्या हस्ते हा पुरस्कार युनिटच्या उपाध्यक्षाने स्वीकरला. या युनिटने 127 लाख रूपयांच्या ऊर्जेची बचत केलेली आहे.
उद्योग क्षेत्रातील श्रेणीमध्ये व्दितीय पुरस्कार नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील सुपर औष्णिक ऊर्जा केंद्र प्रकल्पाला प्राप्त झाला. हा पुरस्कार केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रकल्प समुहाचे महाव्यवस्थापक राजकुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या युनिटने वर्षभरात 405 लाख रूपयांची ऊर्जेची बचत केली.

नियत कालावधीत सर्वांना 24 तास वीज उपलब्ध व्हावी : राष्ट्रपती

नवी दिल्ली 14: सर्वांना 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असून नियत कालावधीमध्ये हे ध्येय पुर्ण करावे, अशी सूचना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी आज राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात केली.
 ‘वीज गरीब लोकांसाठी आर्थिक सुरक्षा कवचाचे काम करते. गरीब, शेतकरी, मजदूर आणि आदिवासी अथवा वंचिताच्या झोपडीमध्ये ऊर्जा प्रदान करण्याची शासनाची जबाबदारी आहे.  ऊर्जा संवर्धन जीवनात बदलाचे माध्यम बनत चाललेले आहे. या दिशेने आणखी पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे श्री कोंविद म्हणाले.
मागील तीन वर्षांमध्ये भारत देश पॉवर सरप्लस राष्ट्र झाले आहे. मात्र, यामध्येच समाधान मानुन चालणार नाही, तर गरजा वाढत चाललेल्या आहेत, त्यानुसार विविध ऊर्जा निर्मितीही करणे गरजेचे आहे. औद्योगिकरणासाठी वीज तितकीच महत्वपुर्ण आहे, जेवढे शेतीसाठी पाणी यामध्ये कुठलाही समझोता करून चालणार नाही. त्यासाठी ऊर्जा संवर्धनासह सतत ऊर्जा मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकताही राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
सरकारव्दारे राबविण्यात येणा-या विविध उपायायोजनांव्दारे ऊर्जा बचत केली जात आहे. यासह शासनाव्दारे योग्य किमतीत एलईडी बल्बचे वितरण केले जात आहे, या प्रोत्साहामुळेही वीजेची बचत होत आहे, जे प्रशसंनीय कार्य असल्याचे, राष्ट्रपती म्हणाले.
मेक-इन-इंडिया पासून ते स्मार्ट सिटी पर्यंत ऊर्जा दक्षता विषय सर्वच प्रमुख कार्यक्रमांशी जोडलेले आहे. भारतात वीजेचा एक तृतीयांश भाग हा वाणिज्यिक आणि निवासी भवनांसाठी उपयोग होत असतो. त्यामुळे निवास निर्माण क्षेत्रात ऊर्जा दक्षता खुप आवश्यक असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

ऊर्जा संवर्धना या विषयावर आधारित आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरविण्यात  आले. 

Monday, 11 December 2017

कामाप्रती प्रामाणिक राहिल्यास कामाचा आनंद मिळतो : श्री. सत्यानंद गायतोंडे





नवी दिल्ली, ११ : कोणत्याही व्यवसाय किंवा विभागात असलात तरी तुम्ही आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहिल्यास कामाचा खरा आनंद मिळतो असे मौलिक विचार कॅनडातील पोलीस अधिकारी सत्यानंद गायतोंडे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात मांडले.
        मुळचे महाराष्ट्रातील मुंबईचे रहीवाशी असलेले श्री. गायतोंडे यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी श्री. गायतोंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
            श्री गायतोंडे म्हणाले, कोणतेही कार्य हे छोटे किंवा मोठे नसते. मुळात आपण जे कार्य करायचे निश्चित केले त्या कामाप्रती प्रामाणिक राहील्यास खरा आनंद घेता येतो. पोलीस, पत्रकारिता, खाजगी क्षेत्र, शासनाचे विभाग आदिंमध्ये कार्य करीत असताना घ्यायची काळजी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रात कार्यकरताना वाणीतील मृदुता, जनतेशी सुसंवाद, इतरांना समजून घेण्याची वृत्ती आदी गुण विकसित करण्याची गरज आदींबाबत त्यांनी यावेळी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. कॅनडासह, अमेरिका, इंग्लड, भारत या देशांमधील पोलीस आणि त्यांची कार्य शैली आदींवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.
श्री गायतोंडे सध्या भारतात आले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील पोलीस विभागासह अन्य शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविला आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात ७२ मार्गदर्शन सत्रांना संबोधित केले आहे. श्री. गायतोंडे यांनी आज दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील महाराष्ट्र पोलिसांना मार्गदर्शन केले व त्यानंतर दुपारी महाराष्ट्र परिचय केंद्रातही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, कार्यालयाला भेट देणारे पाहुणे उपस्थित होते.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, उपसंपादक रितेश भुयार यांनी सुत्रसंचालन केले तर माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                               http://twitter.com/micnewdelhi                              
                                         000000                                        
सूचना : सोबत छायाचित्र जोडली  आहेत

मुंबईच्या गुरुनानक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट






नवी दिल्ली, ११ : मुंबई येथील गुरुनानक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या  राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सोमवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची माहिती जाणून घेतली.    
दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या या २१ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी राज्यशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक सुमीत खरात यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. खरात यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यावेळी उपस्थित होत्या.
        यावेळी झालेल्या औनचारिक वार्तालापामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविध्यपूर्ण कार्याची माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली. महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम आदींची माहितीही  श्री.कांबळे यांनी  दिली.
            महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे  तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युटयुब चॅनेल, ब्लॉग, व्हॉटसॲप गृप आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात येणारी शासनाची प्रसिध्दी याविषयीही श्री. कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.                    
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक रितेश भुयार यांनी केले तर गुरुनानक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे  सहायक प्राध्यापक  सुमीत खरात यांनी आभार मानले.   

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi                 

Friday, 8 December 2017

पॅरा वर्ल्ड स्विमिंग: महाराष्ट्राच्या कांचनमालाचे ऐतिहासिक सुवर्ण!











               

नवी दिल्ली, ८ : नागपूरच्या कांचनमाला पांडे हीने मेक्सिको येथे सुरू असलेल्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप-२०१७ स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले आहे. या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी कांचनमाला भारताची पहिली जलतरणपटू ठरली असून तिची ही ऐतिहासिक कामगिरी आहे.
पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धा २०१७ मध्ये एस-११ श्रेणीत २०० मीटर इंडीव्युजल मिडले प्रकारात कांचनमालाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. कांचनमाला ही भारताकडून पात्र ठरलेली एकमेव महिला जलतरणपटू होती. या स्पर्धेतील इतर प्रकारात तिला थोडक्यात अपयश आले. १०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात तिला पदकाने हुलकावणी दिली. ब्रेस्टस्ट्रोक आणि बॅकस्ट्रोक प्रकारात तिला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.
               जन्मांध असणा-या कांचनमालाने हे जग बघीतले नाही मात्र जगाला तिच्या कार्याचा हेवा वाटावा अशी तिची कामगिरी आहे. कांचनमाला ही मुळची अमरावतीची. अमरावती  मध्यवर्ती कारागृहाशेजारील आनंद स्टेट बँक  कॉलनीत तीचे वास्तव्य. कांचनमाला ने येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात जलतरणाचे धडे गिरवीले.
कांचनमालाने जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली व मग तिने मागे वळून पाहीलेच नाही. ती यशा मागून यश पदरात पाडत होती. तीने जवळपास १० हून अधिवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले यात मुख्यत्वे. कॉमनवेल्थ गेम २००६, एशियन गेम २००६, जर्मन ओपन स्विमींग चॅम्पीयनशिप २००८, एशियन गेम २०१० चिन, वर्ल्ड गेम २०११ तुर्की, डॅनीश ओपन स्विमींग चॅम्पीयनशिप २०१२. ज्यात तिने १० हून अधि सुवर्ण तर ५ रजत पदक पटकाविली आहे. अंधाच्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पीयनशिप मध्ये तिने जवळपास १०० हून अधिक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. कांचनमाला ही दहावी व बारावी मध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षण पूर्ण करीत असतानाच ती बँकींगची तयारी करित होती. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या परिक्षेत ती उत्तीर्ण झाली व बँकेच्या नागपूर शाखेत गेल्या २ वर्षांपासून सहायक पदावर कार्यरत आहे.
जलतरणासाठी  वडील ज्ञानेश्वर पांडे,  प्रशिक्षक लक्ष्मीकांत खंडागळे आणि  पती विनोद देशमुख यांनी कांचनमालाला सतत योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
             कांचनमाला ४ धाकटया बहीणी व १ धाकटा भाऊ आहे. यापैकी जयमाला ही हॉकी खेळते व ती राष्ट्रीय चॅम्पीयन आहे. दिपमाला व राजमाला याही  जलतरणपटू आहेत  व त्यांनी जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळविली आहेत. सर्वात धाकटा भाऊ अक्षय हा वाटरपोलो खेळतो व तो वाटरपोलोचा राष्ट्रीय खेळाडू  आहे.
            कांचनमालाचे वडील श्री. ज्ञानेश्वर पांडे यांनी या मुलांना पांरपारिक शिक्षणासोबतच खेळासाठी प्रोत्साहन दिले आणि पदोपदी मुलांच्या पाठीशी उभे राहिले आहे. कांचनची आई हिरूताई पांडे याही लंगडी आणि आटयापाटया या देशी खेळांमध्ये अग्रेस होत्या. त्यांनीही मुलांना घडविण्यात मोलाची जबाबदारी उचलली आहे.  
         महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :          http://twitter.com/micnewdelhi                                           
                                         000000                                        



                                                                 



                 

महाराष्ट्रात 16 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार



नवी दिल्ली दि 8 :  मार्च 2018 पर्यंत देशात 251 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असून महाराष्ट्रात 16 केंद्र लवकरच सुरू करण्यात येतील अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे. 
देशातील नागरिकांना  त्यांच्या जिल्हातच पासपोर्ट मिळावा यासाठी विदेश मंत्रालयाने पासपोर्ट आपल्या दारी या तत्वानुसार देशभरात 251 पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रात 20 पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.   मागील 6 महिन्यात देशभरात 62 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात आले आहेत. यातील 4 पासपोर्ट सेवा केंद्र महाराष्ट्रातील सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर व पिंपरी चिंचवड येथे सुरू करण्यात आली आहेत. गेल्या 70 वर्षात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पासपोर्ट केंद्र उभारण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

ही असतील राज्यातील 16 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र
महाराष्ट्रात जी नवीन 16 पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत यामध्ये सिंधुदुर्ग, वर्धा, जालना, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सांगली, बीड, मुंबई नॉर्थ सेन्ट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, घाटकोपर, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड व जळगाव या जिल्यांचा समावेश आहे. या 16 नवीन पासपोर्ट केंद्रामुळे राज्यात पासपोर्ट केंद्रांची  एकूण संख्या 27 होणार आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :   
http://twitter.com/micnewdelhi  
       000000

6 New Passport Seva Kendras To Be Started In Maharahtra Shortly- MEA Secretary, Dnyaneshwar Mulay

1
New Delhi, 08:  In a bid to expedite the process of ensuring passport facility to one and all in the Country, 251 New passport Seva Kendras would be started throughout India with 16 new centres opening up in Maharashtra shortly, said the Foreign Affairs Secretary, Dnyaneshwar Mulay, here today.

The government has decided to set up a new passport service centre with the objective of providing quick service facility, “Passport at Your Doorstep” to all the citizens by March 2018, said Mulay. Going by this deadline, we have to ensure that 251 Seva Kendras go operational in the country and 16 seva kendras in Maharashtra by March end, informed the Secretary.  A total of 20 passport Seva Kendras were to be opened in the State, however, 4 have already gone operational in the Districts of Aurangabad, Solapur, Kolhapur and one at Pimpri-Chinchwad in Pune.

The centres where the new offices would come up include, Sindhudurg, Wardha, Jalna, Latur, Ahmednagar, Pandharpur, Sangli, Beed, Mumbai North Central, Mumbai South Central, Ghatkopar, Navi Mumbai, Dombivili, Panvel, Nanded and Jalgaon.  With this the score of the Passport Seva Kendras would reach to 27 in the State.


Thursday, 7 December 2017

भारताचा कुंभमेळा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत






















नवी दिल्ली, ७ : भारताचा कुंभमेळा हा युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage ) म्हणून जाहीर केला आहे. जगभरातल्या ११ देशातील विविध पारंपरिक वाद्य,पारंपरिक खेळहस्तकला आदींचा या यादीत समावेश आहे.
भारताच्या कुंभमेळा हा पृथ्वीतलावरचा एक सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहेदर तीन वर्षांनी एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षात अलाहाबाद ( प्रयाग)उज्जैननाशिक ( त्र्यंबकेश्वर),हरिद्वारया चार वेग-वेगळ्या ठिकाणी कुंभ मेळे भरत असतात. भारतातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यास हजेरी लावत असतात. या उत्सवाची दखल युनेस्को ने घेतली आहे.

भारताच्या कुंभमेळ्या बरोबरच कझाकिस्तान चा पारंपरिक खेळ अस्यक ( Assyk), पोर्तुगाल या देशाची इस्ट्रेमोज ( Estremoz clay figures) , जर्मनी या देशाचे ऑर्गन हस्तकला व संगीत तर मलावी या देशाची मातीची भांडी ज्याला सीमा (Nsima) याचा समावेश आहे.  किरगिस्तान या देशाचा कोकबोरू या घोडस्वारीच्या खेळाचा तसेच इटली या देशाच्या नेओपोलिटीन या कलेचा समावेशही अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत आहे. इराण या देशातील चोगण (Chogan) या घोडेस्वारी खेळाने सुद्धा या  यादीत स्थान पटकाविले आहे. अझरबैजन या देशातील संगीत वाद्य कमांचा( Kamancha) तर ग्रीस या देशाचे रेबीटीको या संगीत वाद्याचा तर आयर्लंड या देशाचे उईलेन ( Uilleann ) हे संगीत वाद्य अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आले आहे. 
        महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :          http://twitter.com/micnewdelhi