Monday, 19 September 2016

महाराष्ट्रातील ९ सहकारी साखर कराखान्यांना राष्ट्रीय पुरस्कार








नवी दिल्ली, १९ : कोल्हापुर जिल्ह्यातील यलगुड येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारख्यान्याला सर्वोत्तम कागगिरीसाठी वसंतदादा पाटील पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय राज्यातील अन्य ८ सहकारी साखर कारखान्यांनाही विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्काराने गौरविन्यात आले. 
      येथील सीरी इंस्टिट्यूशन भागातील एनसीयुआय सभागृहात आयोजित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या(एनएफसीएसएफ) संचालक मंडळाच्या ५७ व्या बैठकीत हे पुरस्कार संघाचे अध्यक्ष दिलीप  वळसे पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष अमीत कोरे आणि व्यवस्थापकीय संचालक एम.जी.जोशी यावेळी उपस्थित होते.
यावर्षी देशभरातून ९० सहकारी साखर कारखान्यांनी पुरस्कारासाठी अर्ज केले होते. पैकी २१ कारखान्यांची निवड पुस्कारासाठी करण्यात आली त्यात महाराष्ट्रातील ९ कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 राज्यातील पुरस्कार प्राप्त कारखान्यांमधे देशातून सर्वोत्तम कामगिरिसाठी वसंतदादा पाटील पुरस्कार प्राप्त करणारा कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणगले तालुक्यातील यलगुड येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाण्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष कलप्पांण्णा आवाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यानी पुरस्कार स्वीकारला.
देशात उच्च प्रतिच्या साखर उत्पादनासाठी सांगली जिल्हयातील पलूस तालुक्यातील कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष अरूणअण्णा लाड यांच्यासह पदाधिका-यांनी पुरस्कार स्वीकारला.
देशात ऊस विकास कार्यक्रमात उत्तम कामगिरीसाठी प्रदान करण्यात आलेले दोनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले. प्रथम पुरस्कार  कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील दत्तनगर येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारख्यान्याला प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासह पदाधिका-यांनी पुरस्कार स्वीकारला. द्वितीय पुरस्कार पुणे जिल्हयातील अंबेगाव तालुक्यातील पारगांव येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत ढगे यांच्यासह पदाधिका-यांनी पुरस्कार स्वीकारला.
तांत्रिक कार्यक्षमता श्रेणीतील द्वितीय पुरस्कार सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यातील शिरपूर येथील श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांच्यासह पदाधिका-यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातातील उत्तम कामगिरीसाठी जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील समर्थ सहकारी साखर कारखान्याला प्रथम पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कारखान्याचें व्यवस्थापकीय संचालक  बाजीराव पावसे यांच्यासह पदाधिका-यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
साखर निर्यातीत उत्तम कामगिरीसाठी प्रदान करण्यात  आलेले दोनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले. प्रथम पुरस्कार सोलापूर जिल्हयातील माढा तालुक्यातील गंगामाईनगर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.धनवडे यांच्यासह पदाधिका-यांनी पुरस्कार स्वीकारला.  द्वितीय पुरस्कार कोल्हापूर जिल्हयातील कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विजय औताडे यांच्यासह पदाधिका-यांनी पुरस्कार स्वीकारला.
देशात सर्वाधिक उता-यासाठी सांगली जिल्हयातील वाळवा येथील पद्मभूषण क्रांतीवीर डॉ नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहीर सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्यासह पदाधिका-यांनी पुरस्कार स्वीकारला.
                                                             *********

Wednesday, 14 September 2016

आमदार नरहरी झिरवाळ यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट








                                
नवी दिल्ली दि. १४ : दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ  यांनी बुधवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.

            परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. झिरवाळ यांचे स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी दिली. श्री. झिरवाळ  यांना महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना श्री. पाटील  यांनी भेट देऊन माहिती  जाणून घेतली .                                           

            000000 

Thursday, 8 September 2016

भारतीय भूमि भूंकपामुळे दरवर्षी 5 से.मी. वायव्य दिशेकडे सरकते



नवी दिल्ली, 8 : भारतीय भूमि(प्लेट) भूंकपामुळे दरवर्षी 5 से.मी. वायव्य दिशेकडे सरकत आहे. या नैसर्गिकरित्या सरकणा-या प्रक्रियेची नोंद जीपीएस च्या सहाय्याने केली जाते. यासह या सर्व बाबींचा बारीकाईने अभ्यास केला जात असल्याचे माहिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान तथा पृथ्वी विज्ञान राज्य मंत्री वाय.एस.चौधरी यांनी दिली.

 पावसाळी या अधिवेशन काळात भंडारा-गोंदिया मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी भौगोलिक क्षेत्राशी संबधित अतिशय महत्वपुर्ण प्रश्न विचाराला. यावर केंद्रीय मंत्रालयाने लेखी उत्तरात, ही माहिती दिली आहे.

        केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबतच्या स्पष्टीकरण देतांना सांगितले, भारतीय प्लेट ही यूरेशियन प्लेट्सना घर्षीत करते. त्यांच्या या घर्षणामुळे दोन प्लेट्स वरखाली होतात आणि त्यामुळे हिमालय पर्वत रांगेत भूंकप येतो. यामुळेच भारतीय भूमि दरवर्षी 5 से.मी. वायव्यकडे दिशेने सरकत आहे.
       
जमीनीच्या आत होणा-या या भुकंपांपासून  सरंक्षणासाठी भारतीय मानक ब्यूरोने ठरविलेच्या मापदंडाचे पालन करून निर्माणाधीन बांधकामात भूकंप विरोधी रचना करने तसेच अस्तित्वात असणा-या इमारतींमध्ये रिट्रोफिटिंगचा उपयोग करण्याचे निर्देशीत केलेले आहे. त्याप्रमाणे जनसामान्यांमध्ये तसेच भूकंप प्रवण क्षेत्रात भूकंप विरोधी रचनेचा उपयोग करण्याबाबत केंद्रीय पृथ्वी विज्ञान  विभागाकडून जागरूकता निर्माण करण्यात येत आहे.

भुकंपापासून होणारे नुकसान थांबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय यासह सर्व राज्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सामान्य नागरीकांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये  जनजागृतीचे काम करते. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया बळ देखील  नैसर्गिक तसेच मानव निर्मित आपत्ती रोखण्याचा प्रयन्त करीत आहे.


बाजारात, शाळांमध्ये, रुग्णालयात, रेल्वे स्थानक, विमानतळ अशा ़इबअनेक महत्वाच्या ठिकाणी आपत्तीच्या काळात कशा पद्धतीने बचाव केला जावे, यासाठी मॉक ड्रिलव्दारे प्रशिक्षणातून जनजागृती केली जाते.

देश में भूकंप की आशंका के संदर्भ में सांसद नाना पटोले के महत्वपूर्ण सवाल


नवी दिल्ली-०८ : महाराष्ट्र के भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्र से सांसद नाना पटोले के सवाल के जवाब में  पृथ्वी विज्ञान मंत्रालय ने माना की भारतीय भूमि प्रतिवर्ष पूर्वोत्तर की ओर खिसक रही है. जिससे हिमालय क्षेत्र में भूकंप की घटनाएं होती है तथा इस संदर्भ में सतत अध्ययन कर देश के अन्य हिस्सों में इन घटनाओं से बचने हेतु लोगों को सचेत करने का कार्य सरकार कर रही है.
              हांलही में संपन्न हुऐ संसद के मान्सुन सत्र के दौरान श्री. पटोले ने यह गंभीर सवाल सदन में उठाया. भारतीय भूमि उत्तर की ओर झुकने की जानकारी है.  इस संबंध में सरकार कोई अध्ययन कर रही है क्या ऐसा पुछने पर सरकार की ओर से आए जबाब में भारतीय भूमि प्रति वर्ष लगभग ५ सें.मी. की दर से पूर्वोत्तर की ओर खिसकने की बात सामने आयी. ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (जीपीएस) मापनों के माध्यम सें इस संदर्भ में अध्यय चल रहा है यह भी  मंत्रालय की ओर से बताया गया.
            भूमि के अंदर होने वाली हलचलों से देश में भूंकप आने के खतरे के बारे में श्री. पटोले ने सवाल करने पर जवाब हां में आया. देश के उत्तर में भारतीय भूमि यूरेशियाई भूमि से टकराने की बात सामने आयी. जिससे इन दोनों भूमियों के बिच होने वाले टकराव से हिमालय क्षेत्र में भूकंप आने की  जानकारी मंत्रालय ने दी है.   
            देश में भूकंप के आसार देखते हुए सरकार क्या कदम उठा रही है यह सवाल श्री पटोले ने पुछने पर बहुत सरकार द्वारा उठाये गए महत्वपूर्ण उपायों की जानकारी मिली. जिस में कहा गया है की, भूकंप रोधी ढांचो के निर्माण तथा मौजूदा भवनों की रिट्रोफिटिंग हेतु भारतीय मानक ब्युरो(बीआईएस) ने विभिन्न दिशा –निर्देश प्रकाशित किए है. राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरण (एनडीएमए), गृहमंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय तथा अन्य राज्यों के आपदा प्रबंधन प्राधिकरणों ने भी भूकंपो के सामान्य पहलुओं, उनके प्रभावों तथा उनसे होने वाली हानि को कम करने हेतु उपायों के बारे में जनसामान्य तथा स्कूली बच्चों को शिक्षित करने तथा उनमें जागरूकता बढाने हेतु अनेकों प्रयास प्रारंभ किए है. बाजारों, विद्यालयों, अस्पतालों तथा रेलवे और बस स्टेशनों, हवाई अड्डो इत्यादि में , आपदा प्रतिक्रिया, राहत और बचाव अभियानों से संबंधित मॉक ड्रिल आयोजित करके नियमित रूप से जागरूकता उत्पन्न की जाती है.                                                                                           
                                                               *******

Wednesday, 7 September 2016

नागपुरातील बुध्दिस्ट सर्कीटसाठी केंद्र देणार १०० कोटी : डॉ. महेश शर्मा










नवी दिल्ली, 7 : दिक्षा भूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोली या भागांना जोडणारा नागपुरात प्रस्तावीत असलेल्या बुध्दिस्ट सर्कीटसाठी केंद्रशासनाच्या स्वदेश दर्शन योजनेतून 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी दिली.
            परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत बुध्दिस्ट सर्कीट संदर्भात बैठक झाली. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, उर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकरी यावेळी उपस्थित होते.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह धर्मांतर केलेले नागपुरातील दिक्षा भूमी हे ठिकाण, जपानीस्थापत्य शैलीवर आधारीत नागपुर-कामठी मार्गावरील ड्रॅगन पॅलेस आणि नागरपूर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय असलेले चिंचोली यांना जोडण्यासाठी बुध्दीस्ट सर्कीट उभारण्यात येणार आहे. नागपुरात देश-विदेशातून येणारे पर्यटक व बुध्द धर्माचे अनुयायी यांना दिक्षा भूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोलीला सुलभरित्या  भेट देता यावी यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. बुध्दीस्ट सर्कीटसाठी  राज्य सरकार  आर्थिक मदत करणार असून केंद्र शासनानेही या प्रकल्पास मदत करावी अशी मागणी यावेळी राज्यशासनाच्यावतीने करण्यात आली. ही मागणी मान्य करत डॉ. महेश शर्मा यांनी पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत बुध्दिस्ट सर्कीटसाठी 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
            केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने दिनांक 21 ते 23 सप्टेंबर 2016 दरम्यान आयोजित करण्यात येणा-या अतुल्य भारत गुंतवणूक परिषदेतमहाराष्ट्र शासनाच्यावतीने बुध्दिस्ट सर्कीटबाबत मांडणी करावी.त्यामुळे परदेशी कंपन्यांकडूनही आर्थिक मदत मिळेल अशी सूचनाही डॉ. महेश शर्मा यांनी यावेळी केली.      
                 
                                                         00000    

सूचना : सोबत फोटो जोडले आहेत. 

केंद्र शासनाने कांदा उत्पादक शेतक-यांच्या अनुदानाचा 50 टक्के वाटा उचलावा : सहकार व पणन मंत्री सुभाष देशमूख

                      
नवी दिल्ली, 07 : केंद्र शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांच्या अनुदानाचा 50 टक्के वाटा उचलावा, अशी मागणी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमूख यांनी केंद्रा शासनाकडे केली.
येथील परीवहन भवनात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षेतेत बैठक झाली. यावेळी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंह, केंद्रीय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल उपस्थित होते.
        सुभाष देशमूख यांनी बैठकीत शेतक-यांची होणारी होरपळ मांडून राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतक-यांना रू 100 प्रति क्विंटल अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. यामधला 50 टक्के वाटा हा केंद्र शासनाने उचलावा, अशी मागणी केली. यावर केंद्रीय कृषी मंत्री श्री सिंह आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री श्री पासवान यांनी अशी योजना केंद्र शासनात नसल्यामुळे याबाबत येत्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडला जाईल व यावर सकरात्मक निर्णय घेऊ असे, आश्वासन दिले.
ही योजना त्याच शेतक-यांसाठी असणार आहे ज्यांनी आपला कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला आहे. कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति क्विंटल रूपयें 100/- व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान राज्यशासनातर्फे मंजूर करण्यात येईल. परराज्यातून आवक झालेल्या व व्यापा-यांच्या कांदयास ही योजना लागू राहणार नाही.

कांदा निर्यात वाहतूकीस केंद्राकडून अनुदान मिळावे : श्री देशमूख
कांदा नाशवंत असल्यामुळे त्यांची वाहतूक तातडीने होणे आवश्यक असते. कादयांची नासाडी टाळणे तसेच शेतक-यांना योग्य भाव मिळण्यासाठी कांदा वाहतूकीवर केंद्राने अनुदान दयावे, अशी मागणी श्री देशमूख यांनी बैठकीत केली.

        या विषयावर चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिले.

कोल्हापूरच्या शिवाजी पुलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी केंद्राची २ दिवसात अधिसूचना











नवी दिल्ली, 7 : कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावरील जवळपास दिडशे वर्ष जुन्या शिवाजी पुलास समांतर असणा-या पुलाचे थांबलेले बांधकाम सुरु करण्यासाठी केंद्र शासन येत्या 2 दिवसात अधिसूचना काढणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी  दिली.
            परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत शिवाजी पुल प्रश्नासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री डॉ. महेश शर्मा ,महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.             
            कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर शिवाजी पुल हा जवळपास दिडशे वर्ष जुना पुल आहे. हा पुल वाहतुकीसाठी योग्य नसल्याने त्याच्या शेजारीच समांतर पुल बांधण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतले आहे. मात्र,या भागात प्राचीन अवशेष असल्याचे सांगून काही सामाजिक संस्थांनी पुरातत्व विभागाकडे हे बांधकाम थांबविण्याची मागणी केली होती. त्यामुळे पुरातत्व विभागाने या बांधकामावर बंदी आणली होती. आजच्या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्यावतीने पुलाच्या भागातील प्रत्यक्ष चित्र मांडणारे सादरीकरण करून या जागेत कोणतेही प्राचीन अवशेष नसल्याचे सांगण्यात आले. तसेच, हा पुल जुना झाला असून वाहतूक सुरुच राहील्यास मोठी मनुष्य हानी होण्या संदर्भातील महत्वाची बाब  मांडण्यात आली. तसेच, चार जिल्हयांना जोडणारा शिवाजी पुल या भागातील महत्वाचे संपर्क साधन असल्याची बाब मांडण्यात आली.  
             या सर्व बाबींचा विचार करून येत्या दोन दिवसात शिवाजी पुलाला समांतर पुला संदर्भात अधिसूचना जारी करणार असल्याचे डॉ. महेश शर्मा यांनी या बैठकीत  सांगितले. तसेच, येत्या  सात दिवसात कॅबीनेटपुढे हा विषय मांडून बंद पडलेल्या पुलाचे काम सुरु करण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलण्यात येईल असे आश्वासन डॉ. शर्मा यांनी यावेळी दिले.     

Tuesday, 6 September 2016

‘पीएमकेवायएस’ अंतर्गत महाराष्ट्रातील २६ सिंचन प्रकल्प पूर्ण होणार









नवी दिल्ली, 6: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत (पीएमकेवायएस) येत्या चार वर्षात महाराष्ट्रातील २६ सिंचन प्रकल्पांसह देशातील ९९ मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने नाबार्ड सोबत मंगळवारी महत्वाचा करार केला .
        पीएमकेवायएस के अंतर्गत देशातील ९९ प्राथमिकतेच्या सिंचन प्रकल्प येत्या चार वर्षात पूर्ण करण्या संदर्भात केंद्रीय नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालय आणि नाबार्ड यांच्या मध्ये आज सामंजस्य करार झाला. या सामंजस्य करारानुसार देशातील पीएमकेवायएस योजनेतील ९९ अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७७ हजार कोटींचे कर्ज नाबार्ड देणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील पीएमकेवायएस  योजनेतील समाविष्ठ २६ प्रकल्पांना १२ हजार ७७३ कोटी मिळणार आहेत. द्रुतगती सिंचन लाभ कार्यक्रम(एआयबीपी) अंतर्गत १८ राज्यांतील सर्व दुष्काळ प्रभावीत जिल्हयांचा यात समावेश असणार आहे.
            केंद्रीय जलसंधारण नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती, महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, छत्तीसगडचे जलसंपदा मंत्री ब्रजमोहन अग्रवाल आणि तेलंगनाचे जलसंपदा मंत्री टी हरीश राव आणि निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पांगडीया उपस्थित या करारावर स्वाक्ष-या झाल्या .
                   महाराष्ट्रातील खालील सिंचन प्रकल्पांचा होणार विकास
           महाराष्ट्रातील वाघूर, बावनथडी, निम्न दुधना, तिलारी, निम्न वर्धा, निम्न पांझरा, नांदुर मधमेश्वर टप्पा :२, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा, बेंबळा, तारळी, धोमबलकवडी, अर्जुना, ऊर्ध्व कुंडलिका, अरुणा, कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना, गड नदी, डोंगरगांव, सांगोला  शाखा काळवा, खडक पूर्णा, वारणा, मोरणा( गु-हेरघर), निम्न पेढी, वांग, नरडवे(महंमद वाडी), कुडाळी या सिंचन प्रकल्पांचा विकास होणार आहे.  

                                                              00000  

Monday, 5 September 2016

महाराष्ट्रातील 29 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार



नवी दिल्ली, 5: महाराष्ट्रातील 29 शिक्षकांना आज राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याहस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आले.
            येथील विज्ञान भवनात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, उच्च शिक्षण राज्यमंत्री डॉ. महेंद्र पांडे, शालेय शिक्षण राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, शालेय शिक्षण सचिव सुभाष चंद्र खुटिया उपस्थीत होते.
            भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारांची सुरूवात 1958 पासून करण्यात आली. यावर्षी देशभरातील एकूण 378 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र, 50 हजार रूपयें रोख असे आहे.
 महाराष्ट्रातील एकूण 29 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार - 2015 प्रदान करण्यात आले. यामध्ये 20 प्राथमिक शिक्षकांपैकी  2 शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत.  9 माध्यमिक शिक्षकांपैकी  1 शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत.  
20 प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
शर्मीला मोहन पवार, जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय, कुसेलवाडी, (शिराळा),  सुदाम ईश्वर होळमुखे, जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय (कडेगांव), अनिल देवदन मोहिते जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय  क्रमांक 3 इमानधामनी (मिरज ), श्री संजीव पांडूरंग चौगूले, श्रीमती एम.डी. बर्वे प्राथमिक विद्यालय,अभयनगर (मिरज) हे सर्व शिक्षक सांगली जिल्ह्यातील आहेत.
 संभाजी गोंविद पाटील, केंद्रीय विद्यालय, दाजीपूर, (राधानगरी), विमल गुंडूराव चौगुले, श्री शंकर लींग विद्या मंदिर, मदीलागे,अजरा, सुहास अर्जुन शिंतरे, जीवन शिक्षण विद्या मंदीर, वदरागे, (गडहिंग्लज) सर्व शिक्षक कोल्हापूर जिल्ह्यातील  आहेत.
दत्तात्रे बबनराव वारे, जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय, वाबळेवाडी, (शिरूळ), सोमनाथ पांडूरंग म्हेत्रे, जिल्हा परीषद प्राथमीक शाळा, संगरूण हवेली, शिवाजी दत्तू सोनावणे, जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय, नंदेलावले मुळशी, हनुमंत श्रीरंग जाधव जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय कातेवाडी, बारामती सर्व शिक्षक हे पुणे जिल्ह्यातील आहेत.
विशेष श्रेणी अंतर्गत पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये पुणे जिल्ह्यातील शिवाजी कालूराम कलाने, जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय, मांडाकी, पुरंदर, संदीप मुरलीधर आढाव, जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय, शिरसगांव, काता, शिरूळ यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 यासह श्रवण वामन जाधव, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, थाळेवाडी, सीपीएस, अवहाना, (भोकरधन) जालना, प्रदीप मारोती मांजरेकर, जिल्हा परीषद  प्राथमिक शाळा, वारवाडी, क्रमांक 1 (कणकवली) सिंधूदुर्ग,  मच्छींद्रनाथ वासूदेव पाटील, पंकज प्राथमिक विद्यालय, चोपडा, बोरोले नगर क्रमांक 1 चोपडा, जळगाव,  बाळासाहेब संदीपन वाघ, जिल्हापरीषद प्राथमीक विद्यालय, अकोले, सोलापूर, माधव पुंडलिक वैचळ, जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय, पींपळखूटा, सीपीएस, बासंबा, हिंगोली, सूधाकर जगन्नाथ मडावी जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय, हीरापूर, केंद्र अवलपूर, कोरपना, चंद्रपूर, नागदेव सखाराम धामणे, जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय, खडकी, खंडाळा, अहमदनगर या शिक्षकांनाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

9 माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

माध्यमीक शिक्षकांमध्ये डॉली गेविन हेन्र्‍ी, वाणी विद्यालय, जे.एन. रोड, मुलुंड (पश्चीम), मुंबई. पांडूरंग रंगराव संकपाल, शाहपूर उच्च विद्यालय, शाहपूर इंचलकंरजी, हातकंगले, कोल्हापूर.  बीना रौनी लोबो, भारत शिक्षण सामाजिक कार्तिका, उच्च विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, न्यू हॉल रोड, कुर्ला(पश्चिम), मुंबई. कमलाकर मुरलीधर महामुनी, रयत शिक्षण संस्था, अण्णा साहेब, कल्याणी विद्यालय, सातारा. विठ्ठल मारोती भोर, भैरवनाथ विद्यालय डोंडे, खेड राजगुरू नगर, पुणे.  समीता गौतम पाटील, शांती निकेतन, माध्यमीक आणि उच्च प्राथमिक विद्या मंदीर, सांगली. नरेंद्र भागवत पाठक, एस.के. सोमय्या विनय मंदीर उच्च विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विद्यानगरी, विद्याविहार, मुंबई. अरूण बहरजी सुलगेकर, पृथ्वीराज कपूर मेमोरीयल, उच्च विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, लोणी, काळभोर, हवेली, पुणे, यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विशेष श्रेणी अंतर्गत निवास यशवंत शेवाळे, प्रभादेव बी.एम.सी. प्राथमिक विद्यालय, मुरारी घाग मार्ग, प्रभादेवी,मुंबई यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. 

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापणा : राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन









नवी दिल्ली,नवी दिल्ली , 05 : महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपरनिक्स मार्गस्थित महाराष्ट्र सदनात सोमवारी गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळातही उत्साहाच्या वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली.
              महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितिच्यावतीने आयोजित गणेशोत्सवात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला आणि राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी गणरायाची सपत्निक पुजा केली. अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त अजितसिंह नेगी यांच्यासह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठया संख्येन उपस्थित होते.
        तत्पूर्वी, आज सकाळी येथील कोपरनिक्स मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया”, “मंगल मूर्ती मोरया” या घोषणा, ढोल ताशांचा गजर व अबीर गुलालाची उढळण यामुळे संपूर्ण वातावरणात भक्तीमय झाले. मिरवणुकीनंतर शासकीय पुजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होवून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.       दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३६ मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी शांततामय मार्गाने ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष करण्यात आला.
                                      परिचय केंद्राच्यावतीने गणेश मंडळांची एकत्रीत कार्यक्रम पत्रिका
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीतील विविध गणेश मंडळांच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमांची एकत्रीत पत्रिका प्रकाशित करण्यात आली. त्यामुळे दिल्लीकर गणेश भक्तांना जवळच्या गणेश मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन गणेशोत्सवाचा आंनद घेता येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त दिल्लीतील विविध गणेश मंडळांमधे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शण घडविणा-या वैविद्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.