Wednesday, 17 August 2016

Bharat Parv: Youngster keen to visit Maharashtra












New Delhi, 17 : The Maharashtra Pavilion at the Bharat Parb here in the capital is attracting a lot of foreigners besides the local visitors, especially the youngsters who seem to be quite impressed with the various exhibits at its stalls. And this augurs well for the state tourism as the Chief Minister Devendra Fadnavis had earlier this year declared 2017 as Visit Maharashtra Year.
Whether it is Alex from Spain or Sam from Chicago, the USA, or Pratibha Seth and Neeraj Bharti, both Delhi University students besides 6-7 others from the university, the common refrain from them after visiting the pavilion was that they would make it a point to visit Maharashtra, “a happening state and a great tourist destination”.

Both  Sam and Alex said it was a great experience visiting the pavilion as they came to know a lot about “this beautiful state of India we would love to visit as early as possible “.  It was quite interactive as we came to know about various aspects of the state through modern gadgets on display here, they said.  And it augurs well for the state as Mr Fadnavis had announced about visit Maharashtra year from Dilli haat here in the capital itself earlier
.
In fact, keeping this in mind, these visitors were presented Maharashtra turban with the slogan Visit Maharashtra Year 2017 written on it to promote the campaign.  Earlier, many of these students stood in front of the LED screen to wear typical Maharashtrian turbans while others solved the E-puzzle to know about great freedom fighters and social reformers from the state.
Virtual Tourism was another point of attraction with these youngsters knowing through giant screen about the rich flora and fauna of the state, particularly tigers of Tadoba tiger reserve near Nagpur and were quite fascinated to see different movements of the tiger.


भारत पर्व : देश-विदेशातील तरुणांना ‘व्हिजीट महाराष्ट्र’ चे आकर्षण












नवी दिल्ली, 17:  महाराष्ट्र दालनास भेट  दिल्यावर देश-विदेशातील तरुणांनी राज्यातील पर्यटन स्थळांना  भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या निमित्ताने राज्य शासनाने घोषित केलेल्या व्हिजीट महाराष्ट्र-2017 ला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.   
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने देशाचा गौरपूर्ण इतिहास व वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणा-या भारत पर्वप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पारशी नववर्ष दिनामुळे शाळा, महाविद्यालय, खाजगी व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने दिल्लीकर आणि दिल्लीस येणा-या  पर्यटकांची मोठी गर्दी भारत पर्व प्रदर्शनात बघायला मिळाली. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनाचा आजचा पाचवा दिवस असून इथे भेट देणा-या देश–विदेशातील तरुणांनी  महाराष्ट्र दालनात एकच गर्दी केली. इथे डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाबाबत, पर्यटन स्थळांबाबत आणि राज्यातील महापुरुषांचे  स्वातंत्र्य चळवळ व देश विकासातील योगदानाचे उत्तम सादरीकरण करण्यात आले आहे. आणि हे दालन तंत्रज्ञान युगात वावरणा-या  देश विदेशातील तरुण पिढीचे आकर्षण ठरत आहे.
अमेरिकेतील शिकागो शहरात राहणारा सॅम आणि स्पेन मधील त्याचा मित्र ॲलेक्स सध्या भारत भेटीवर असून आज त्यांनी भारत पर्व मध्ये महाराष्ट्र दालनास भेट दिली. दालनाबद्दल सांगताना सॅम सांगतो, या ठिकाणी तंत्रज्ञानाचा प्रयोग करुन दर्शविण्यात आलेला महाराष्ट्र मला खूप आवडला. एलइडी वॉल वर दिसणारा ताडोबा जंगलातील वाघ आणि त्याच्या सोबत सेल्फी घेण्याचा अनुभव फारच छान  होता.  तर ॲलेक्स सांगतो, इथे ठेवण्यात आलेला पझल गेम मी खेळलो आणि लोकमान्य टिळक या महापुरुषाचे चित्र यशस्वीरित्या तयार केले. पुणेरी पगडी आणि फेटा परिधान केला. येथील विविध स्क्रीनवर दर्शविण्यात आलेली महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांविषयची माहिती अप्रतिम आहे. ॲलेक्स आणि सॅम यांनी या दालनात महाराष्ट्रा विषयी उत्तम माहिती मिळाल्याचे सांगून आम्ही लवकरच महाराष्ट्राला भेट देणार असल्याचे सांगितले. या दोघांना महाराष्ट्रातील प्रसिध्द लोणावळा चिक्की आणि व्हिजीट महाराष्ट्र ची कॅप भेट स्वरुपात देण्यात आली.  
दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चमुने महाराष्ट्र दालनास भेट दिली. त्यांना हे दालन फार आवडले. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला निरज कुमार भारत सांगतो, व्हर्च्यअल टुरीच्या माध्यमातून  शिर्डी  येथील साई बाबा मंदीर, बीबी का बरा,अंजीठा-वेरूळ लेण्या आणि ताकर्ली समुद्र किना-याची सफर ा दालनात करायला मिळाली. महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या सामाजिक सुधारणेतील योगदान तसेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदानबद्दल उपयुक्त माहिती मिळाल्याचे तो सांगतो. याआधी आपण वर्धा येथील सेवाग्राम आश्रमला भेट दिली असून महाराष्ट्र दालनातील प्रदर्शनामुळे मी प्रभावित झालो आहे व लवकरच महाराष्ट्राला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली  प्रतिभा सेठ सांगते, एलइडीवरफेस रिकग्नेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडी, महाराष्ट्राचा फेटा परिधान करण्याचा आनंद घेता आला. विशेष म्हणजे, याची छायाचित्रे ब्लूटूथ वायफायच्या माध्यमातून मला व माझ्या मैत्रिणींना मोबाईलमध्ये घेण्याची  इथे सोय करून देण्यात आली त्यामुळे आंनदात आणखी भर पडली. ऑगमेटीक रियॅलीटी या तंत्रज्ञानाचा प्रयोग करून राज्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाला कुरवाळण्याचा अनुभवही मजेशीर होता असे तीने सांगितले.आम्हा सर्व मैत्रिणींना महाराष्ट्र दालनातील प्रदर्शन खूप आवडले असून आम्ही सर्व महाराष्ट्राला लवकरच भेट देणार असल्याचे तीने सांगितले. 
 यावर्षी जानेवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या वतीने दिल्ली हाट येथे आयोजित महाजत्रा प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीट महाराष्ट्र-2017 ची घोषणा केली. आणि राज्यातील गड, किल्ले, समुद्र किनारे, लोकसंस्कृती बघण्यासाठी महाराष्ट्रास भेट द्या अशा शब्दात दिल्लीकर, देश व विदेशातील पर्यटकांना  खुले निमंत्रण दिले होते. त्यास भारत पर्व मधे  देश विदेशातील पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. 

Tuesday, 16 August 2016

Maharashtra pavallion exactly the way as Envisioned – Dr. Bhamre




New Delhi , 16 : The Minister of State for Defence , Dr Subhash Bhamre today said that, the Maharashtra Pavilion at the ongoing ‘Bharat Parv’ reflects the overall vision of India.
While, visiting the pavilion this evening at the India gate lawn, the minister said that, the state pavilion beautifully reflect the contribution made by its great leaders during the freedom movement of the country and in bringing revolutionary reform in the society. Earlier Dr Bhamre went around the pavilion and took keen interest in various exhibits and also lauded the great stride that the state has made in the field of IT and Industrial development with help of modern technology. In fact Dr. Bhamre was quite appreciative of the state progress as shown by modern gadgets at the pavllion. The minister was escorted to the pavilion by Deputy Director of Maharashtra Information Centre (MIC) Dayanand Kamble, who presented the minister with a copy of ‘Maharashtra Ahead’ and ‘Lokrajya’ the state publication highlighting the development and progress that the state has made in different fields.
Dr. Bhamre also visited the Handicraft and handloom stall beside the food stall at the pavilion and spoke to their owner. 

भारत पर्वची अपेक्षित संकल्पना महाराष्ट्र दालनात-डॉ.सुभाष भामरे





नवी दिल्ली16:  महाराष्ट्रातील क्रांतीकारक, समाजसुधारक आणि थोर महापुरुषांची माहिती, तसेच  राज्याने विविध क्षेत्रात केलेला विकास महाराष्ट्र दालनात मांडण्यात आला असून भारत पर्वची अपेक्षित संकल्पनाच येथे प्रत्यक्ष बघायला मिळाली अशी भावना संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.
डॉ.भामरे  यांनी आज भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्र दालनास भेट दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दिल्लीतील प्रतिनिधी सुनिल कुगिंरी  यांनी डॉ. भामरे यांचे स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी उपस्थित होते.  
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने येथील राजपथ लॉनवर भारत पर्वचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीन दालने उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेणारे आणि देश विकासात राज्याचे योगदान दर्शविणा-या डिजीटल दालनास डॉ. भामरे यांनी भेट दिली. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा उपयोग करुन घडविण्यात आलेले महाराष्ट्राचे दर्शन कौतुकास्पद असल्याचे गौरोद्‌गार त्यांनी यावेळी काढले. तसेच राज्यातील क्रांतीकारक, समाजसुधारक आणि थोर महापुरुषांची माहिती आकर्षक पध्दतीने येथे मांडण्यात आली आहे. यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील जनतेला महाराष्ट्राती थोर पुरुषांची माहिती मिळते.  देशातील विविध राज्यांचा गौरवपूर्ण इतिहास व महापुरुषांचे योगदान सर्वसामान्यां पर्यंत पोहचविण्याचा उद्देश भारत पर्व या प्रदर्शनाचा असून महाराष्ट्र दालनात ही संकल्पना प्रत्यक्षात मांडण्यात आली आहे. याबद्दल त्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले. 
येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील हस्तकला दालनासही डॉ.भामरे यांनी भेट दिलीराज्यातील लघु उद्योजकांच्या पैठणी साडया,वारली पेटींगलाखाच्या बांगडयाकोल्हापूरी चपला आदी वस्तू येथे प्रदर्शनास व विक्रीस मांडण्यात आल्या आहेत. डॉ. भामरे यांनी  या दालनातील प्रत्येक स्टॉल ला भेट देऊन लघु उद्योजकांशी संवाद साधला व त्यांची आस्थेने चौकशी केली.   
महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंकाचे कौतुक
संरक्षण राज्यमंत्री  डॉसुभाष भामरे यांनी आज महाराष्ट्र दालनातील महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंकाच्या स्टॉल ला  भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दालनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र लोकराज्य अंकाच्या स्टॉलची आवर्जून पाहणी केली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी डॉ. भामरे यांना महाराष्ट्र अहेड व  लोकराज्य अंक भेट स्वरूपात दिले.  डॉ.भामरे यांनी यावेळी महाराष्ट्र फूड स्टॉल ला भेट देऊन मिसळपावचा आस्वाद घेतला.

Good Response for state artists at Bharat Parv














New Delhi, 15 : Artists engaged in small scale industry who have put up their stall at the Bharat Parv’s Maharashtra pavilion here in Delhi are getting tremendous response    , thanks to their own talent and logistic support  from the Maharashtra Small Scale Industrial development Corporation (MSSIDC).
Be it the Kolhapuri footwear or Paithan sarees or  Warli paintings or bangles made of lac, people coming to this pavilion are not only liking these items but buying them too.
Mohd. Iqbal Lakhera, from Achalpur, Amravati district of the state, said he has been getting tremendous response as people are visiting his stall in large number and buying lac bangles. Women members of his family have been engaged and helping in his job, he has been doing for over ten years now. He also was appreciative about MSSIDC with which he has been engaged for past one year. I am here for the first time and am thankful to the corporation for providing me with all the logistics, he said. Overall, its been a good experience so far, he said adding he would even like to participate now in the Delhi trade fair and Dilli haat.
Rajinder Shinde from Kagal tehsil of Kolhapur said for him it was like a dream come true. So far i had only heard about Rajpath or seen it on Tv that 26th January parade starts from here. But now i am sitting here,in my stall selling Kolhapuri chappals and getting huge response, said an elated Shinde  who is here with his ‘guru’Ananda  Ravan who had taught him the art of making Kolhapuri chappals.
Vitthal  Dagle from district Palghar, who has been in the business of making Warli paintings for over four years now, said children are especially liking his kiticen set item with warli painting on its back side. I am thrilled at the response i am getting  and the MSSIDC with which i have been associated for the past two years, has been of great help, he added.

Other than Puneri sarees, the Paithan sarees are in big demand here and i am glad sale has been good so far,said Jitender Pradhan from Aurangabad who has been associated with the corporation for years. By now, i have known the taste and liking of people as i have been to several parts of the country for this work and now i would like to go abroad for exhibition and sale of Paithan sarees, said he rather confidently.  

भारत पर्व : महाराष्ट्रातील लघु उद्योजकांच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री






नवी दिल्ली16: भारत पर्व मध्ये महाराष्ट्राच्या  लघु उद्योजकांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्यांच्या वस्तूंची मोठया प्रमाणात  विक्री होत असल्याचे चित्र आहे.  
             केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देशाचा गौरपूर्ण इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृती, हस्तकला दर्शविणा-या भारत पर्व’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहेविविध राज्यांनी या प्रदर्शनात आपल्या राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण हस्तकलेच्या वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवल्या आहेत.  महाराष्ट्र दालनात  महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून लघु उद्योजकांच्या हस्तकलेचे प्रदर्शन व विक्री येथे सुरु आहे.  राज्यातील लघु उद्योजकांना या माध्यमातून उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या उद्योजकांच्या वस्तूचीं मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याबद्दल ते समाधान व्यक्त करीत आहेत. प्रदर्शनाचा आजचा चौथा दिवस असून प्रदर्शनास भेट देणा-यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनात गर्दी केली .
       पैठणीसह अन्य साड्या येथे प्रदर्शन व विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत. या विषयी राज्याच्या औरंगाबाद जिल्हयातील पैठणचे हस्तकलाकार जितेंद्र परदेशी सांगतात, पैठणीसह महाराष्ट्रातील साडयांचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून या प्रदर्शनांमध्ये राज्य शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाने आम्हाला सहभागाची संधी दिली आहे. महाराष्ट्र दालनास भेट देणा-या महिलांची पुणेरी कॉटन साडीला विशेष मागणी आहे. साडीची रंगसंगती , रचना उत्तम असल्याने आणि ही साडी परिधान करण्यास खूपच सोयीची असल्याने ही साडी महिलांना पसंत पडत आहे. दिल्लीतील प्रदर्शनात सहभागी होताना आम्ही येथील बाजार पेठेचे आणि महिलांच्या आवडी-निवडीचा आधी अभ्यास करून सज्जतेने या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.      
सेालापूरचे लघु उद्योजक  राजेंद्र अंकम  गेल्या 36 वर्षापासून विणकर  क्षेत्रात आहे. महाराष्ट्र दालनात  त्यांनी वॉल हॅकींगच्या वस्तु प्रदर्शन व विक्रीस ठेवल्या आहेत. कटवर्क, बॅग, पोट्रेट ,  सुतापासून तयार केलेली विवेकानंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींची तयार केलेली व्यक्ती चित्रे येथे आहेत. श्री.अंकम  महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाशी गेल्या 7 वर्षापासून जुळले असून प्रगती मैदान, दिल्ली हाट नंतर आता राजपथवर आपल्या वस्तुंची प्रदर्शन व विक्री करत आहेत. याठिकाणी आपल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळल्याबद्दल ते समाधानी आहेत.  
अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे महम्म्द इकबाल लखेरा आणि अफझल जावेद लखेरा यांचा लाखाच्या बांगड्यांचा व्यवसाय आहे. त्यांनी ही महाराष्ट्र दालनात वैविध्यपूर्ण   बांगड्या  प्रदर्शन व विक्रीसाठी महाराष्ट्र दालनात ठेवल्या आहेत. गेल्या 10 वर्षापासून ते या व्यवसयात आहेत. घरातील महिलाही या व्यवसायात मदत करीत असल्याचे ते सांगतात. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडाळाशी ते मागील वर्षी जुळले आहेत. पहिल्यांदाच ते दिल्लीतील प्रदर्शनात भाग घेत आहेत. त्यांना येथे मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत  असल्यामुळे ते आनंद व्यक्त करत आहेत. या प्रदर्शनाच्या उर्वरित  दिवसांत  मोठ्या प्रमाणात  विक्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी  व्यक्त केला आहे. प्रगती मैदान आणि दिल्ली हाट येथे होणा-या प्रदर्शनात  सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.  
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बानगे येथील लघु उद्योजक  राजेंद्र शिंदे  यांचा कोल्हापुरी चप्पल व अन्य पादत्राणांचा स्टॉल येथे आहे. गणतंत्र दिवसाचे पथसंचलन ज्या राजपथावर होते आणि प्रत्येक भारतीयांचे मन स्वाभिमानाने भरुन येते. तेथे कोल्हापूरी चप्पल  विक्री व प्रदर्शन करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य समजतो, असे ते म्हणतात. कोल्हापुरी चप्पलला प्रचंड मागणी असून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात  होत असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट व दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून कोल्हापूरी चप्पलीची माहिती ग्राहकांना मिळाली असल्याचे ते सांगतात. या ठिकाणी  कोल्हापूर जिल्ह्यातील मडीलगे येथील त्यांचे गुरु आनंदा रावण त्यांच्या सोबत आहेत.    
पालघर जिल्ह्याच्या मोखाळा तालुक्यातील वासाळा  येथील लघु उद्योजक विठ्ठल डगळ यांच्या वारली पेंटींग चा स्टॉल येथे बघायला मिळतो. गेल्या चार वर्षापासून ते या व्यवसायात आहेत. महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाशी गेल्या  दोन  वर्षापासून ते जोडले गेले आहेत.  या आधी दिल्ली हाट येथे त्यांनी प्रदर्शनात भाग घेतला व त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.  राजपथावरील  भारत पर्व या प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनात ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे श्री डगळ सांगतात. 

Monday, 15 August 2016

MAHARASHTRA PAVILION: HANDLOOM-HANDICRAFTS STEAL THE SHOW





New Delhi, 15 : The Maharashtra pavilion at the ongoing Bharat Parv here at India Gate lawns has seen more than fifteen thousand visitors so far, thanks to it's rich art and handicrafts. Be it handloom items or footwear, they are in big demand.
Other than Paithani, the Puneri cotton saris are attracting lots of people. "The color combination is awesome as is the design and so I bought two of them", said Dr. Renu from Trivandrum who is a district coordinator in the distance education department.
Equally in demand are Kolhapuri chappals, Warli paintings and bangles made of lac.
Neha Raheja who is a class 11th student and lives in Delhi's Shakti Nagar area said," I bought a kitchen set with Warli paintings on the back side.
Kolhapuri chappals was another item in which lots of visitors seemed to be taking interest."I had seen it or heard about it only in the movies and now when I actually saw them I ended up buying two pairs of them.",said Amarprakash Joshi from Uttam Nagar.
Similarly bangles made of lac were the cynosure of all eyes, obviously women."They are very attractive, with good hue mix and that too at reasonable prices", said an excited Lata Prashar from RK Puram who, like many other women, also bought a dozen of them.

महाराष्ट्राच्या हस्तकलेला पर्यटक व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद




नवी दिल्ली, 15: भारत पर्व मध्ये महाराष्ट्र दालनास पर्यटक व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून तीन दिवसात महाराष्ट्राच्या दालनास 15 हजाराहुन अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या. कोल्हापुरी चप्पल, वारली पेंटीग, पुणेरी कॉटन साडी, लाखाच्या बांगड्या आदी महाराष्ट्रातील हस्तकलांना दिल्लीत येणारे पर्यटक व दिल्लीकर ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने देशाचा गौरपूर्ण इतिहास व वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणा-या भारत पर्वप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनामुळे शाळा, महाविद्यालय, खाजगी व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे दिल्लीकर आणि दिल्लीस येणा-या  पर्यटकांची मोठी गर्दी भारत पर्व प्रदर्शनास बघायला मिळाली. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनाचा आजचा तिसरा दिवस असून प्रदर्शनास भेट देणा-यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनास गर्दी केली. इथे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने राज्यातील लघुउद्योजक  व हस्तकलाकारांच्या कामांचे प्रदर्शन व विक्रि सुरु आहे. पुणेरी कॉटन साडी, लाखाच्या बांगड्या, वारील पेंटीग आणि कोल्हापुरी चप्पल स्टॉलवर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे  चित्र होते.
केरळ राज्यातील त्रिवेंद्रम जिल्हयाच्या दुरस्थ शिक्षण समन्वयक डॉ रेणू सांगतात, त्यांना पुणेरी पॅटर्नची कॉटन साडी फार आवडली. त्या सध्या दिल्लीत फिरायला आल्या असून भारत पर्व प्रदर्शनीत त्यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनास भेट दिली. या दालनात महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या पैठणीसह राज्यातील साडयांचे प्रदर्शन व विक्री सुरु आहे. डॉ रेणु सांगतात, पुणेरी पॅटर्न कॉटन साडीचा रंग संगती आणि रचना उत्तम असल्याने ही साडी आवडली म्हणूनच मी ही साडी खरेदी केली. महाराष्ट्राच्या साडयांबददल नेहमीच आकर्षण वाटत असून महाराष्ट्र दालनात प्रत्यक्ष खरेदीची संधी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीतील आर.के.पुरम भागातील रहिवाशी लता पाराशर यांनी मोठ्या प्रमाणात लाखाच्या बांगड्या  खरेदी केल्या. त्यांच्या सेाबत त्यांच्या अन्‌य तीन मैत्रिणींनीही बांगड्या घेतल्या. श्रीमती पाराशर म्हणाल्या, लाखाच्या बांगड्यांची गुणवत्ता भावली. उत्तम रंग, कलाकुसर आणि परवडणारी किंमत यामुळे या बांगड्या आम्ही सर्व मैत्रिंनीनी विकत घेतल्या आणि आमच्या नातेवाईकांना भेट म्हणून देण्यासाठीही  या बांगड्यांची विशेष खरेदी करुन घेतली. भारत पर्वच्या निमित्ताने विविध राज्यांच्या कलावस्तु खरेदी करायला मिळत आहे त्यात महाराष्ट्रातील हस्तकला आम्हाला विशेष भावल्याचे त्यांनी सांगितले.
शाळकरी मुला-मुलींची मोठी गर्दीही हस्तकला दालनास बघायला मिळाली. दिल्लीती शक्तीनगर भागातील 11 वीत शिकणा-या नेहा रहेजा ला या दालनात वारली किचन भावले आणि तीने या किचनवर नाव लिहुन घेतले व किचन विकत घेतले. आयुष्यात कला पहिल्यांदाच वारली पेटींग म्हणजे काय हे कळले. वारली आकृत्या मला फार आवडल्या म्हणूनच मी येथील स्टॉलवरील वारली किचन वर कलाकाराकडून स्वत:चे नाव लिहुन घेतले. आता माझ्याजवळ किचन स्वरुपात वारली पेटींग राहील असे नेहा सांगते.
दिल्लीतील उत्तमनगर येथे राहणारे अमरप्रकाश जोशी यांनी कोल्हापूरी चप्पल खेरदी केली. हिंदी चित्रपटामधून मला कोल्हापूरी चप्पलची माहिती मिळाली आणि महाराष्ट्रातील कोल्हापूरी चप्पलबाबत माझ्या  वाचनातही आले होते. आज महाराष्ट्र दालनात कोल्हापूरी चप्पल खरेदी करण्याची संधी मिळाली त्याचा आनंद असल्याचे ओमप्रकाश  सांगतात.   



Sunday, 14 August 2016

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा






















नवी दिल्ली, १५ : भारताचा ७० वा स्वातंत्र्य दिन’ राजधानीतील महाराष्ट्र सदन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांच्या हस्ते कस्तुरबा गांधीमार्ग तथा कोपरनिकस मार्गावरील दोन्ही महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहनानंतर राष्ट्रगीत झाले. महाराष्ट्र सुरक्षा पोलीसांच्या तुकडीने यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमास राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त भारती झाडे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. सदनात निवासी अतिथी तसेच, महाराष्ट्र शासनाचे दिल्लीस्थित विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारीही यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
राजधानीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
0000

kids are enjoying puzzle of Maharashtras leader