Friday, 31 March 2017

वर्ष २०१९-२० पर्यंत भारताचा विकास दर १० टक्क्यांपर्यंत पोहचणार : पद्मश्री मिलींद कांबळे

                  




नवी दिल्ली, ३१ :  केंद्र शासनाच्या मुद्रा, स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, इज ऑफ डूईंग बिजनेस या कार्यक्रमांमुळे देशातील सर्वस्तरातील उद्योजकांना मोठया प्रमाणात फायदा झाला. यामुळे देशाच्या उद्योग क्षेत्रात सकारात्मक बदल झाला असून वर्ष २०१९-२० पर्यंत भारताचा विकास दर १० टक्क्यांपर्यंत पोहचणार, असा विश्वास दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्सचे (डिक्की) संस्थापक तथा प्रसिध्द उद्योजक पद्मश्री मिलींद कांबळे यांनी आज येथे व्यक्त केला.
            श्री. मिलींद कांबळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक श्री. दयानंद कांबळे यांनी श्री. मिलींद कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.          
            श्री. मिलींद कांबळे म्हणाले, केंद्र शासनाच्या मुद्रा योजने अंतर्गत एका वर्षात देशातील ३.५ कोटी छोटया उद्योजकांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. याचा फायदा मुख्यत्वे अगदी छोटया स्तरावर व्यवसाय करणा-या उद्योजकांना झाला. या योजनेच्या माध्यमातून उद्योजकांना ५० हजार ते १० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. स्टँडअप इंडिया योजनेच्या माध्यमातून देशातील  सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँकांच्या जवळपास १ लाख २५ हजार शाखांनी (प्रत्येक शाखा)अनुसूचित जाती-जमातीच्या एका नवोदित उद्योजकाला व सामान्य वर्गातील एका नवोदित महिला उद्योजिकेला अर्थ सहाय्य करून देशाच्या आर्थिक व्यवस्थेत मोलाचे परिवर्तन घडवून आणले आहे. इज ऑफ डुईंगच्या माध्यमातून अनेक नवोदित उद्योजकांना नवे दालन उपलब्ध झाले असल्याचेही श्री. मिलींद कांबळे म्हणाले. केंद्र शासनाने देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी असे अनेक  महत्वाचे पाऊले उचलली असल्याने वर्ष २०१९-२० पर्यंत देशाचा विकास दर १० टक्क्यांपर्यंत पोहचणार असा विश्वास श्री. मिलींद कांबळे यांनी व्यक्त केला.
            डिक्कीच्या माध्यमातून देशभरात उभे राहिलेले अनुसूचित जाती –जमातीच्या उद्योजकांचे जाळे व या मंचाच्या माध्यमातून झालेले सकारात्मक बदल आदींबाबत श्री. मिलींद कांबळे यांनी माहिती दिली. केंद्र व देशातील विविध राज्य शासनाच्या उद्योग विषयक धोरणात अनुसूचित जाती –जमातीच्या उद्योजकांच्या अधिकारांसाठी डिक्कीने दिलेले योगदान याबाबतही त्यांनी यावेळी उदाहरणासहीत माहिती दिली.      

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. दयानंद कांबळे यांनी श्री. मिलींद कांबळे यांना दिली. श्री. मिलींद कांबळे यांना यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना  भेट देऊन श्री. मिलींद कांबळे यांनी माहिती जाणून घेतली. श्री. मिलींद कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.                   

Thursday, 30 March 2017

महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान




                     शरद पवार यांना पद्मविभूषण प्रदान
नवी दिल्ली, दि. ३० : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील ४  मान्यवरांचा यात समावेश आहे.    
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणा-या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून एका मान्यवरास पद्मविभूषण, एका मान्यवरास पद्मभूषण तर एका मान्यवरास पद्मश्री  तर एका मान्यवरास मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
             पद्म पुरस्कारांचे वितरण दोन टप्प्यात करण्यात येते. आज पहिल्या टप्प्यात काही मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पद्म पुरस्कारातील सर्वोच्च मानला जाणारा पद्मविभूषण पुरस्कार  प्रदान करण्यात आला.




            वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी  तेहेमटॉन उडवाडीया यांना महाराष्ट्रातून सन्मानीत करण्यात आले.
या समारंभात  काही मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले पैकी महाराष्ट्रातील २ मान्यवरांचा यात समावेश आहे. कला व संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रसिध्द  गायिका अनुराधा पौडवाल यांना सन्मानीत करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे डॉ. एस.व्ही. मापुसकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता आज त्यांची मुलीने  हा पुरस्कार स्वीकारला.
गणतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला यावर्षी देशातील पद्म पुरस्कार प्राप्त ८९ मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण ८ मान्यवरांचा समावेश आहे, पैकी  तिघांना आज सन्मानीत करण्यात आले तर एका मान्यवरांस मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढच्या टप्प्यातील पुरस्कार ६ एप्रिल २०१७  ला  प्रदान करण्यात येणार आहे.

Monday, 27 March 2017

राजधानीत ‘गुढी पाडवा’ साजरा













लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते गुढी उभारली  

नवी दिल्ली, दि. 28 : लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते गुढी उभारून मराठी नव वर्ष गुढी पाडवा येथील ‍ कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात साजरा करण्यात आला.  श्रीमती महाजन यांनी गुढी उभारुन उपस्थित मंत्री व खासदारांसह मराठी जणांना नव वर्षारंभाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळया शेजारी उभारण्यात आलेल्या गुढीची  श्रीमती महाजन यांनी पुजा केली. यावेळी उपस्थित केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले,  खासदार सर्वश्री आनंदराव अडसूळ, शिवाजीराव अढळराव पाटील, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, राहुल शेवाळे यांनी गुढीचे पुजन केले. राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र  यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी - कर्मचारी  यावेळी  उपस्थित होतेयावेळी सदनात निवासी असणारे कर्मचारी, पाहुणे यांनी गुढीचे पुजन केले.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातही गुढी  पाडवा साजरा करण्यात आला. राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी गुढी उभारून उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना नव वर्षारंभाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी - कर्मचारी  यावेळी  उपस्थित होते.
                                   000000   

Thursday, 23 March 2017

मुंबई हार्बर चॅनल व जेएनपीटी चॅनलच्या खोलीकरण व रूंदीकरणासाठी खर्चास मंजुरी



नवी दिल्ली, 23 : मुंबई येथील हार्बर चॅनल व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) चॅनलच्या(दुसरा टप्पा) खोलीकरण व रूंदिकरणासाठी  २०२९ कोटींच्या खर्चास केंद्रीय कॅबीनेटच्यो बैठकीत मंजुरी देण्यात आली.
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय कॅबीनेटच्या अर्थविषय समितीने मुंबईच्या हार्बर चॅनल व जेएनपीटी चॅनल(दुसरा टप्पा)च्या प्रस्तावीत खोलीकरण व रूंदीकरणाच्या कामासाठी २०२९ कोटींच्या खर्चास मंजुरी दिली. हा खर्च सेवा शुल्क विरहीत असेल. या प्रकल्पांच्या प्रस्तावित कामांसाठी येणा-या खर्चाचे वहन जेएनपोर्ट ट्रस्टच्या अंतरिक वित्तीय स्त्रोतांमधून करण्यात येईल, शिवाय गरज पडल्यास बाजारातून कर्ज घेण्यात येईल असे पत्र सूचना कार्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
            या कामांअर्तगत सध्यस्थितीतील चॅनलची ३७० मिटरची रूंदी वाढवून ४५० मिटर करण्यात येईल. जेएनपीटीची विद्यमान कंटेनर हाताळणी क्षमता ही ५ दशलक्ष टीईयु(ट्वेंटी फीट इक्वालँट युनीट) असून येथे चार टर्मीनल सुरु झाल्यास ही क्षमता वाढून ९.८ दशलक्ष टीईयु होईल. या कामांसाठी जागतिकस्तराहून निवीदा मागविण्यात येणार असून दोन वर्षाच्या कालावधित हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
              प्रस्तावीत खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांमुळे १२,५०० टीईयु क्षमतेचे मोठे जहाज हाताळणे शक्य होणार आहे. याशिवाय आर्थिक लाभही होणार आहे. जहाजासाठी कराव्या लागणा-या प्रतिक्षा वेळ कमी होईल. ट्रांसशिपमेंट खात्यात बचत होणार आहे.  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर कमी होईल, उपभोगकर्त्यासही लाभ होईल आणि जीएनपीटीवरील जहाजांची गर्दी कमी होईल.   

                                     0000000 

नाशिकच्या पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट











नवी दिल्ली, 23 : नाशिक येथील एच.पी.टी कला आणि आर.वाय.के विज्ञान महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी गुरूवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी परिचय केंद्राच्या वैविध्यपूर्ण कार्याची माहिती जाणून घेतली.             
दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या या 36 विद्यार्थ्यांनी, प्राध्यापिका डॉ.वैशाली बालाजीवाले, दै. देशदूत चे संचालक संपादक विश्वास देवकर आणि रमेश शेजवाळ यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी या दिल्ली अभ्यास दौ-याच्या समन्वयक निवेदिता वैंशपायन, परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.    
        यावेळी औपचारिक वार्तालाप झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली. महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, नव माध्यमांचा प्रभावी उपयोग, परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची उदाहरणांसहीत माहितीही श्री.कांबळे यांनी दिली. यावेळी  विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना श्री. कांबळे यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

 उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांना यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली.                                                                 0000000

राजधानीत शहीदांना अभिवादन












नवी दिल्ली दि. 23 :  शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त राजधानीत अभिवादन करण्यात आले.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय ,सहायक निवासी आयुक्त राजीव मलिक, अजित सिंग नेगी  यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  
                महाराष्ट्र परिचय केंद्रात शहीदांना आदरांजली
 स्वातंत्र्य लढयात आपल्या प्राणांची आहुती देणा-या शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  कार्यालयातील कर्मचारी व कार्यालयात उपस्थित अभ्यागतांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000000



Wednesday, 22 March 2017

महाराष्ट्रातील अतुल चौबे आणि दिपक कुभांर यांना राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार







 












नवी दिल्ली, 22 : अंतराराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त व्यवसायीक छायाचित्रकार मुंबईचे अतुल चौबे आणि कोल्हापूरचे दिपक कुभांर यांना आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैंकय्या नायडू यांच्या हस्ते  राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार प्रदान करण्यात आले.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या फोटो प्रभागच्यावतीने राष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये 6 व्या राष्ट्रीय छायाचित्रकार पुरस्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैंकय्या नायडू, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्य मंत्री राज्यवर्धन राठोड, केंद्रीय माहिती विभागाचे सचिव अजय मित्तल, छायाचित्र स्पर्धा समितीचे अध्यक्ष एस.एन. सिन्हा, पत्र सुचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक, फोटो प्रभागचे अभिषेक दयाल मंचावर उपस्थित होते.

यावर्षी फोटो प्रभाच्यातर्फे आयोजित छायाचित्र स्पर्धेचे विषय कौशल्य भारत, तसेच स्वच्छ भारत अभियान हे होते. यासाठी देशभरातील हजारो छायाचित्रकारांनी यामध्ये भाग घेतला. त्यामधून 12 छायाचित्रकारांच्या छायाचित्रांची  निवड करण्यात आली आहे.

                                                   

अतुल चौबे यांच्या जन्म मध्यप्रदेशातील असून त्यांची कर्मभूमी मुंबई आहे. श्री चौबे यांना भारत शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रम कौशल्य भारतचे विविध अंगाने उत्कृष्ट छायाचित्रण केल्याबद्दल पुरस्कृत करण्यात आले.  पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, तसेच 15 हजार रूपये रोख असे आहे. श्री चौबे यांना या आधी 2012 मध्येही फोटो प्रभागच्यावतीने आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रीयेत श्री चौबे म्हणाले, भारत शासनाच्यावतीने मिळणारा हा पुरस्कार मला दुस-यांदा मिळालेला असून यामुळे उत्साह व्दिगुणीत झालेला आहे. श्री चौबे यांना छायाचित्रासाठी आतापर्यंत विविध संस्थेतर्फे जवळपास 150 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.


कोल्हापूरचे दिपक कुभांर यांना भारत सरकारच्या अतिशय महत्वकांक्षी  स्वच्छ भारतया विषयाच्या वर्गात अव्यावसायिक श्रेणीमध्ये विशेष उल्लेख पुरस्कार मिळालेला आहे. या श्रेणीत हजारो छायाचित्रे प्राप्त झाली होती. त्यामधून श्री कुभांरच्या छायाचित्रांची निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्तीनंतर भावना व्यक्त करतांना श्री कुभांर म्हणाले, भारत शासनाच्या फोटो प्रभागकडून मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराचा विशेष आनंद आहे असे मनोगत व्यक्त केले. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, तसेच 10 हजार रूपये रोख असे आहे.  श्री कुभांर मुक्त छायाचित्रकार म्हणुन काम करतात. त्यांना विविध खाजगी संस्थांतर्फे त्यांच्या उत्कृष्ट छायाचित्रणासाठी गौरविण्यात आलेले आहे.
        यासह यावर्षी ज्येष्ठ छायाचित्रकार रघु राय यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार प्राप्त छायाचित्रकारों की महाराष्ट्र सूचना केंद्र को भेंट










                                                                                                 
नई  दिल्ली, 23 : राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार प्राप्त कोल्हापूर के दिपक कुंभार तथा मुंबई के अतुल चौबे ने आज महाराष्ट्र सूचना केंद्र में भेंट दी . 

            आज दिपक कुंभार तथा अतुल चौबे को आज सूचना एवं प्रसारण मंत्रालय की ओर से दिए जाने वाले राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार केंद्रीय सूचना एवं प्रसारण मंत्री वैंकय्या नायडू  के हाथो प्रदान किए गए. श्री. कुंभार तथा श्री. चौबे की इस उपलब्धि के लिए सूचना केंद्र की ओर से उन्हें सम्मानित किया गया. महाराष्ट्र सूचना केंद्र के उपनिदेशक  दयानंद कांबले ने श्री. कुंभार ओर श्री. चौबे को  गुलदस्ता देकर स्वागत किया.

            सूचना एवं  प्रसारण मंत्रालय की ओर से स्किल इंडियाऔर स्वच्छ भारत मिशन विषयों पर आधारित स्पर्धा में देश के १२ छायाचित्रकारों के छायाचित्रों का चयन किया गया. दिपक कुंभार को स्वच्छ भारत मिशन विषयपर  आधारित छायाचित्र के लिए तथा अतुल चौबे को स्किल इंडियाविषय पर आधारित  छायाचित्र के लिए यह पुरस्कार प्रदान  किया गया. सूचना केंद्र में आयोजित कार्यक्रम में  इन छायाचित्रकारोंने अपनी छायाचित्रकारिता  क्षेत्र के अनुभवों को उजागर किया .
                                                    ००००००



0000

दिपक कुंभार आणि अतुल चौबे यांची महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट








                                                                                                  
नवी दिल्ली, 23 : राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार प्राप्त कोल्हापूर येथील दिपक कुंभार आणि  मुंबईचे अतुल चौबे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली .   
            दिपक कुंभार आणि अतुल चौबे  यांना माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. श्री. कुंभार आणि श्री. चौबे यांच्या उत्तमकामगिरीसाठी परिचय केंद्राच्यावतीने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. कुंभार आणि श्री. चौबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  
            माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने स्किल इंडियाआणि स्वच्छ भारत या संकल्पनेवर आधारीत स्पर्धेत  देशातील १२ छायाचित्रकारांच्या छायाचित्रांची निवड झाली . दिपक कुंभार यांना स्वच्छ भारत संकल्पनेवर आधारीत छायाचित्रासाठी तर अतुल चौबे यांना स्किल इंडियासंकल्पनेवरील छायाचित्रासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिचय केंद्रात यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत उभय छायाचित्रकारांनी छायाचित्रकारीता क्षेत्रातील आपले अनुभव मांडले.  
             महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी उभय छायाचित्रकारांना दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशनेही त्यांना सदस्यांना भेट स्वरूपात देण्यात आली. 

0000

Monday, 20 March 2017

मुंबईकरांच्या शिस्तप्रिय वागणुकीमुळे शहराला परिवहनासाठी पुरस्कार : परिवहन मंत्री रावते

  
रस्ते सुरक्षेसाठी सर्वाधिक  4 पुरस्काराला महाराष्ट्राला  

नवी दिल्ली,20 : मुंबईकरांच्या शिस्तप्रिय वागणुकीमुळे मुंबई शहराला गौरविण्यात आल्याचे, गौरवोदगार राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काढले.
 हॉटेल हयात रेसीडेंसी येथे मारूती सुझुकी आणि टाईम्स नाऊच्यावतीने आयोजित कार्यक्रमात रस्ते सुरक्षेविषयी उत्तमरित्या कार्य करण्या-या देशातील विविध राज्यांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी, टाईम्स नाऊच्या नाविका कुमार तसेच मारूती सुझुकीचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

रस्ते सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उत्तम कार्याबद्दल राज्यातील मुंबई आणि पुणे शहराला आज पुरस्कृत करण्यात आले. पुरस्कार वेगवेगळया 11 श्रेणीत दिले गेले. 11 पैकी सर्वाधीक 4 पुरस्कार महाराष्ट्राला प्राप्त झाले आहेत.  राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुरस्काराला उत्तर देताना रावते म्हणाले, मुंबई हे शहर शिस्तबद्ध आहे. तसेच येथील लोकही वाहतुकीच्या नियमांबाबत शिस्तप्रिय आहेत. त्यामुळेच हा पुरस्कार मुंबईला मिळाला आहे. हा पुरस्कार मुंबईकरांचा आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
टाईम्स नाऊ आणि मारूती सुझुकी यांनी केलेल्या पाहणीच्या अहवालामध्ये पादचा-यांच्या हक्क सरंक्षणासाठी मुंबई हे शहर देशात प्रथम ठरले. वाहन व वाहतूक नियंत्रक कायद्याची अंमलबजावनी करण्यातही  मुंबई देशात प्रथम ठरल्याचे नोंदविले आहे. यासह दिव्यांगसाठी उत्तम रस्ते व वाहतूक सुविधा पुरविण्यातही मुंबई देशात अव्वल असल्याचे निरीक्षणात आले आहे.
 प्रदूषण नियंत्रणाच्या श्रेणीमध्ये पुणे शहराने प्रदूषण नियंत्रणात उल्लेखणीय कामगीरी केली असून पुणे शहराला प्रदूषण नियंत्रणसाठी पुरस्कृत करण्यात आले आहे.

अपघात कमी करण्यासाठी मोटार वाहन कायदा करणार : केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी


रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी मोटार वाहन कायदा लवकरच करणार असल्याचे,  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधनी मंत्री नतिन गडकरी म्हणाले. या कायदयाच्या प्रभावी अंमलबजावनीमुळे देशातील 90 % टक्के रस्ते सुरक्षेचे प्रश्न सुटतील, असा विश्वास श्री गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. रस्ते सुरक्षेबाबत मुलांना प्रशिक्षित केले पाहिजे.  त्यासाठी अभ्यासक्रमात रस्ते सुरक्षाविषयाचा समावेश असावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. श्री गडकरी यांच्या हस्ते यावेळी इंडिया सेफ्टी इंडेक्स या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

महाराष्ट्र परिचय केंद्राचे काम इतर राज्यांसाठी उत्तम आदर्शवत

                           
                                                                                                



  
नवी दिल्ली , 20 : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने राज्य शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे करण्यात येणारे कार्य कौतुकास्पद असून इतर राज्यांसाठी एक उत्तम उदाहरण असल्याचे मत, कर्नाटक राज्य माहिती व जनसंपर्क विभागाच्या बळकटीकरण समितीचे अध्यक्ष तसेच माजी सनदी अधिकारी एम.आर. श्रीनिवासमूर्ती यांनी आज व्यक्त केले.

            कर्नाटक राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या बळकटीकरणासाठी एम.आर. श्रीनिवासमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती दिल्ली अभ्यास दौ-यावर असून या समितीने आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली, यावेळी एम.आर. श्रीनिवासमूर्ती यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी या समितीतील सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

            एम.आर. श्रीनिवासमूर्ती म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे दिल्लीस्थित महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयाव्दारे राज्याची  प्रतिमा विस्तारीत रूपात उंचविण्याचे अप्रतिम काम होत असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली.

            या पथकात दैनिक प्रजावाणी चे माजी संपादक राजा शैलेशचंद्र गुप्ता, द विक साप्ताहिकाचे  दिल्लीतील निवासी संपादक सच्चिदानंद मुर्ती, कर्नाटक राज्य माहिती संचालक एन.आर  विष्णुकुमार आणि उपसंचालक एच.बी.दिनेश यांचा समावेश होता.    
           
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी समितीच्या सर्व सदस्यांना दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने समिती सदस्यांना भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन समिती सदस्यांनी कामाची एकूण माहिती जाणून घेतली. समितीने  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.           

माहिती विभागाच्या समितीची महाराष्ट्र सदनालाही भेट



कर्नाटक राज्य माहिती व जनसंपर्क विभागाच्या बळकटीकरण समितीने कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनालाही भेट दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राव्दारे समन्वय करण्यात येणा-या खासदार समन्वय कक्षाची माहिती श्री कांबळे यांनी समिती सदस्यांना दिली. यासह सदनात असणारे परिचय केंद्राच्या ग्रंथालयाच्यावतीने राबविण्यात येणारे उपक्रमांचीही माहिती दिली. तसेच आयोजित पत्रकार परिषदा दरम्यान कार्यालयाव्दारे वहन करण्यात येणा-या जबाबदारीबद्दल श्री कांबळे यांनी समिती सदस्यांना अवगत केले. 

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी




सीएसटीचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरावे

नवी दिल्ली, 17 : मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) या रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्याची मागणी, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली.

गृह मंत्री राजनाथ सिंग यांची आज संसद भवनात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट घेऊन केंद्रीय गृह मंत्री यांना रेल्वे स्थानकांच्या नाव बदलण्याविषयी लेखी निवेदन दिले. यावेळी खासदार अंरविंद सावंत, श्रीरंग बारणे उपस्थित होते.

यासह एल्फिन्स्टन रोड या रेल्वे स्थानकाच्या परिसरात प्रसिद्ध ऐतिहासिक प्रभादेवी मंदिर आहे. या मंदिराला नुकतेच 150 वर्ष पुर्ण झालेले आहे. यासह हा संपुर्ण परिसर प्रभादेवीच्या नावाने ओळखला जातो. येथील स्थानिक लोकांची ब-याच वर्षापासूनची एल्फिन्स्टन रोड नाव प्रभादेवी असावे अशी मागणी आहे. गृह मंत्रालयाने याबाबत लवकर कार्यवाही करावी, अशी विनंती श्री रावते यांनी बैठकीत केली. यावर सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे, केंद्रीय गृहमंत्री यांनी यावेळी आश्वासन दिले.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे महाराष्ट्र कॅबिनेटने या प्रस्तावास मंजूरी दिलेली आहे. राज्यातील दोन्ही सभागृहात विधान सभा आणि विधान परिषदेत रेल्वे स्थानकाच्या नाव बदलाच्या ठरावावर बहुमताने मंजूर मिळालेली आहे. तसेच यासंदर्भातील प्रस्तावही केंद्रीय गृह विभागाला पाठविण्यात आलेला आहे, असे निवेदनात नमूद आहे.

Friday, 17 March 2017

Chief Minister Fadnavis urges the Centre to frame a scheme to bring back farmers into institutional credit system




NEW DELHI, Mar 17:
Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis urged the Centre to frame a scheme to bring back farmers into institutional credit system in such a way that investment in agriculture doesn't get affected, while also assuring about the willingness of the State Government in sharing the financial burden in this regard. Shri Fadnavis called on the Union Finance Minister Arun Jaitley and Agriculture and Farmers’ Welfare Minister Radha Mohan Singh during his visit to New Delhi on Friday. Leading a high power delegation comprising the ministers in his state cabinet along with some public representatives.

                   A delegation of Cabinet Ministers from the State, Maharashtra Ministers & MLAs led by CM Devendra Fadnavis met Union Minister Arun Jaitley and Radha Mohan Singh in New Delhi. The delegation comprised of Union Minister Dr. Subhash Bhamre, Maharashtra Ministers Pandurang Fundkar, Subhash Desai, Divakar Raote, Subhash Deshmukh, Eknath Shinde, Babanrao Lonikar and Ramdas Kadam. MLA Sanjay Kute, Prashant Bamb, Vijay Auty too were present with CM during this meeting in New Delhi. Apart from requesting the Union Government to frame a scheme to bring back farmers into institutional credit system in such a way that investment in agriculture doesn't get affected, Fadnavis assured that in order to achieve sustainability in agriculture, investment is need of the hour and the State too is ready to contribute its share in this scheme to help farmers.
                  CM said that the State Government is determined to free the farmers in the State from all their debts, while informing that there are total 1 crore 18 lakh farmers in the state with a burden of Rs. 1 lakh 5 thousand crore of debts. He told that around 31 lakh farmers out this total have steeped over their returning limits of the loans and they can get out of the limits of getting institutional loans from the credit societies, which are also crucial in the entire chain. If the farmers are drawn out of this chain, they might suffer huge losses and in order to avoid this, the Centre to formulate a scheme to bring the farmers back in the credit limits of the financial institutions, urged the CM.

               Informing that the total burden of farmers in the State amounting to Rs. 30 thousand, 500 crore, Fadnavis, told the union ministers during this meeting that the State Government has increased its investments in the agricultural sector. He told that the State government trying its best to take the agriculture in the state beyond conventional loop of assistance and rehabilitation. He told that the investment worth Rs. 19 thousand, 500 crore has so far been made in the agriculture and allied sectors. Apart from this, an assistance of Rs. 11 thousand, 500 crore has been provided as financial assistance through various schemes to help countering the drought.
                                                                  000000

शेतक-यांना संस्थात्मक पतपुरवठ्याच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राने योजना तयार करावी : मुख्यमंत्री फडणवीस









                                                 

महाराष्ट्र शासनही आर्थिक वाटा उचलेल
राज्यातील मंत्री-लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांना भेटले

नवी दिल्ली , 17 :  शेतक-यांना संस्थात्मक पतपुरवठ्याच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र शासनाने ठोस अशी योजना तयार करावी. ज्यामाध्यमातून शेतक-यांना मदत होईल, अशी मागणी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय वित्तमंत्री  अरूण जेटली आणि केंद्रीय कृषिमंत्री  राधामोहन सिंह यांच्याकडे केली. ही मागणी करतानाच त्यात महाराष्ट्र सरकार सुद्धा आपला आर्थिक वाटा उचलेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
            शेतक-यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ केंद्रीय वित्त मंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांना नार्थ ब्लॉक येथे भेटले. त्यानंतर प्रसार-प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री सुभाष भामरे, महाराष्ट्रातील मंत्री  पांडुरंग फुंडकर, सुभाष देसाई,  दिवाकर रावते,  सुभाष देशमुख,  एकनाथ शिंदे, बबनराव लोणीकर, रामदास कदम, सर्वश्री आमदार संजय कुटे, आमदार प्रशांत बंब, अनिल कदम, विजय औटी  उपस्थित होते.

     यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील शेतक-यांची कर्जमुक्ती करण्यासाठी राज्य शासनाने निर्धार केलेला आहे. राज्यात एकूण 1 कोटी 8 लाख शेतकरी आहेत. या शेतक-यांवर 1 लाख 5 हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे. यापैकी 31 लाख शेतकरी असे आहेत ज्यांच्यावरील कर्जाची मुदत संपलेली आहे. हे शेतकरी संस्थात्मक पत पुरवठयाच्या कक्षेतून बाहेर जाऊ शकतात. शेतक-यांसाठी निर्मित पतपुरवठा संस्थाही  महत्वपूर्ण साखळी आहे. यातून शेतकरी बाहेर काढले  तर शेतक-यांची मोठी हानी होऊ शकते हे टाळण्यासाठी संस्थात्मक पतपुरवठयाच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राने योजना आखावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीमध्ये केली. 

            राज्यातील शेतक-यांवर एकूण 30 हजार 500 कोंटी रूपयांचे कर्ज आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या पुढे मांडलेल्या निवेदनात सांगितले की, राज्य सरकाराने शेतीच्या क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ केली आहे. कृषी क्षेत्राला मदत व पुनर्वसनाच्या पुढे नेऊन या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणुक वाढविण्यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले. 19 हजार 500 कोटी रूपयांची गुंतवणूक कृषी व संलग्न क्षेत्रात झाली आहे. यासह 11 हजार 500 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्य  विविध योजनेच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी केलेले आहे. राज्य शासनाने उचचलेल्या या विविध सकारात्कम पावलांची नोंद केंद्र शासनाच्या अहवालात घेतलेली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 
            शेतक-यांवरील असलेल्या कर्जाची मुक्ती करण्यासाठी केंद्र शासनाकडून आर्थिक मदत हवी आहे. त्यात राज्य शासनही वाटा उचलेल. कारण राज्यातील इतर महत्वपुर्ण योजना राबविण्यासाठी राज्यशासनाकडे निधी असणे गरजेचे आहे. शेतक-यांना कर्जमुक्ती करण्यासाठी तसेच संस्थात्मक पतपुरवठयाच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र शासनाने योजना तयार करावी  असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.