Friday, 12 August 2016

Maharashtra Showcases Development At Bharat Parv




 









New Delhi, 12 : The six -day Bharat Parv got off to a colorful start at the Rajpath Lawns, India Gate, New Delhi today with the Defence Minister, Shri Manohar Parikkar, inaugurating it.
There are 17 Theme State Pavilions showcasing there achievements and initiatives, tourism destination and handicrafts besides cuisines with Maharashtra taking part in it in a big way. Performances from different regions of the country including Delhi based cultural organizations and associations of different states are taking part in it.
The State of Maharashtra has put up an impressive stall highlighting its culture, role played by great Maharashtrian leaders in freedom movement of the country and the rapid strides it has made in industrial development and information technology infrastructure over the past two years. It highlights the role played by Bal Gangadhar Tilak and Vasudev Balwant Phadke in the independence movement of the country. It also showcases the great role played by social reformers like Shau Maharaj and Dr. B.R. Ambedkar besides Mahatma Jyotirao Phule.
Maharashtra has given the country two of the greatest artistes in Pt. Bhimsen Joshi and Lata Mangeshkar, both Bharat Ratna whose photographs have been put up at the stall. Besides the pavilion also focuses on the Saint tradition which has been a great traditional aspect of the state.
In the field of industrial development the state has made a great progress in the last two years, something which has been aptly highlighted at the stall with slogans like Make in India and Make in Maharashtra being displayed on the board there boldly.
The state is rich in Paithani sarees and bangles made of lac, Warly paintings and Kolhapuri foot wear which is on display there and for sale as well. As for the typical food of Maharashtra, you can savour the taste of Puran Poli, Vada Pav, Modak, Junka Bhakri, Pithla, etc. at the food court here.
Maharashtra also happens to be a great tourist destination, thanks to its varied topography. It has attractive tourist spots like Matheran, Mahabaleshwar, Ajanta & Ellora caves on one hand and a rich flora fauna on the other hand. All this has been well depicted here at the stall which is bound to attract any nature lover towards the state
The Union Tourism Minister, Dr. Mahesh Sharma, visited the Maharashtra Stall and evinced keen interest in various exhibits there. He was later presented a copy of “Lokrajya”, the state’s mouthpiece. 





Thursday, 11 August 2016

महाराष्ट्र के ४५ लाख किसानों का प्रधानमंत्री फसल बीमा योजना में सहभाग


                     लातूर तथा अमरावती विभाग के सबसे ज्यादा किसान सहभागी
नई दिल्ली, ११ अगस्त :  प्राकृतिक आपदा, जलवायु परिवर्तन जैसे संकटों सें किसानों को आर्थिक कवच प्रदान करने वाली प्रधानमंत्री फसल बीमा  योजना के तहत खरीफ सत्र के लिए महाराष्ट्र के ४५ लाख किसानों ने सहभागिता दर्शायी है. लातूर विभाग से सबसे ज्यादा १६ लाख ६५ हजार किसानों ने तथा अमरावती विभाग के १४ लाख किसानों ने इस योजना में भाग लिया है. राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस योजना में ज्यादा से ज्यादा किसानों की सहभागिता बढाने हेतु १० अगस्त तक योजना की अवधी बढादी है तथा इस संदर्भ में बीमा कंपनियों को निर्देश दिये है.  
केंद्र सराकर ने  खरीफ सत्र २०१६ से राष्ट्रीय कृषि बीमा योजना को हटा कर प्रधानमंत्री फसल बीमा योजना के  क्रियान्वयन का निर्णय लिया गया. महाराष्ट्र के किसानों को इस योजना में भाग लेने के लिए २ अगस्त तक अंतिम तिथी तय की गयी थी. लेकिन, इस योजना को किसानों से अच्छा सहयोग मिल रहा था तथा आवेदन हेतु जगह जगह पर किसानों की कतारे लगी हुई थी. इस योजना से ज्यादा से ज्यादा किसान लाभान्वित हो इस कारण से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने राज्य में इस योजना की अवधी बढाने के संदर्भ में केद्र सरकार से सतत सिधा संवाद किया. अपने सरकारी आवास पर मुख्यमंत्री फडणवीस ने ३० जुलाई २०१६ को बीमा कंपनियों के प्रतिनिधियों से बैठक की.                                       योजना की अवधी बढाने के लिए मुख्यमंत्री का प्रयास
राज्य में नियुक्त की गयी बीमा कंपनियों द्वारा अंतिम समय पर आवेदन उपलब्ध होने के कारण राज्य के ज्यादातर जिलों में किसानों की बडी भिड हो रही थी. इस योजना में सहभागी होने के लिए किसानों के पास कम समय बचा था. अपितु, ज्यादा से ज्यादा किसानों को इस योजना में सहभागी होना था. इस वजस हे बीमा कंपनियों को किसानों का सहयोग कर अवधी बढा देना चाहिऐ अन्यथा उन्हें किसानों के विरोध का सामना करना पडसकता है ऐसा इशारा मुख्यमंत्री ने बीमा कंपनियों के साथ हुयी बैठक में दिया था. इस स्थिती में केंद्र सरकार ने महाराष्ट्र सरकार को इस योजना के लिए १० अगस्त तक का अवधी बढा कर दिया.
इस योजना में सहभागी हुए किसानों की अंतिम सांख्यिकी कृषी  आयुक्त कार्यालय ने प्रस्तुत की है. इस सांख्यिकी के अनुसार कोकण विभाग के ३७ हजार किसान, नाशिक विभाग के 6 लाख 22 हजार, पुणे विभाग के 3 लाख 74 हजार, कोल्हापूर विभाग के  51 हजार, औरंगाबाद विभाग के  7 लाख 99 हजार, लातूर विभाग के  16 लाख 65 हजार, अमरावती विभाग के  14 लाख, नागपूर विभाग 1 लाख 93 हजार  ऐसे महाराष्ट्र के कुल 45 लाख 18 हजार किसान  प्रधानमंत्री फसल बीमा योजना में सहभागी हुए है.   

                                         00000

लघु उद्योग नोंदणीची देशव्यापी मोहीम राबविण्यात यावी - सुभाष देसाई

















नवी दिल्ली, दि.11 : देशातील लघु उद्योगांची नोंदणी करण्यासाठी देशव्यापी  मोहीम हाती घ्यावी अशी सूचना  राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केली.  
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित संचालक मंडळाच्या १४ व्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते लघु उद्योगाची संपूर्ण डेटा बँक असलेल्या पोर्टलचे उदघाटन झाले. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री कलराज मीश्र आणि  सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राज्य मंत्री द्वय गिरीराज सिंह व हरीभाई चौधरी  यावेळी उपस्थित होते. या बैठकीस विविध राज्यांचे उद्योग मंत्री उपस्थित होते.  
यावेळी श्री. देसाई म्हणाले, देशात मोठया प्रमाणात लघु उद्योग आहेत, मात्र त्यांची एका ठिकाणी नोदंणी नाही. ही बाब लक्षात घेता लघु उद्योग नोंदणीची देशव्यापी मोहीम राबविण्यात यावी अशी सूचना त्यांनी मांडली. नोंदणी झालेल्या लघु उद्योगांचे वर्गीकरण करण्यात यावे.आणि अशा उद्योगांना कौशल्य विकास, तंत्रज्ञान सहाय्य उपलब्ध करून दिले पाहीजे असेही श्री. देसाई म्हणाले. राज्यातील लघु उद्योगांना केंद्रशासनाकडून अर्थ सहाय्य व्हावे अशी मागणी श्री. देसाई यांनी केली. रिझर्व्ह बँकेने लघु उद्योगांना अर्थ सहाय्य करण्याच्या मार्गदर्शक सूचना राष्ट्रीयकृत बँकाना दिल्या आहेत. मात्र, लघु उद्योगांना कर्ज देताना या बॅका टाळाटाळ करतात. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने बँकाना या संदर्भात सक्त सूचना द्याव्यात असे श्री. देसाई म्हणाले.  
 केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्य शासनाच्या समूह विकासा(क्लस्टर डेव्हलपमेंट) च्या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळावी अशी मागणीही त्यांनी  यावेळी केली.  केंद्र शासनाच्या लघु उद्योगासंदर्भातील योजनांची प्रभावी अमंलबजावणी राज्यात सुरु आहे. लघु उद्योगासंदर्भातील सर्वच योजनांची अमंलबजावणी करण्यात राज्याने देशात अग्रस्थान मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.

                                                                   000000 

Wednesday, 10 August 2016

महाराष्ट्रातील कांदा खरेदी लवकरच सुरु होणार


                          
नवी दिल्ली, दि.10 : केंद्र आणि राज्य सरकार मिळून ५०-५० टक्के कांदा खरेदी करणार असून यासंदर्भात केंद्राकडे महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव आला आहे. त्यास ताबडतोब मंजुरी देवून राज्यात कांदा खरेदी सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राजधानीत केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.                                       
             राज्यात कांदा खरेदी सुरु करण्यासंदर्भात मंत्री व लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत आज परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत बैठक आयोजित करण्यात आली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तथा  ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार ,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाशिव खोत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राज्यातील खासदार,आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व शेतक-यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.              
या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना श्री. गडकरी यांनी सांगितले, राज्यात बंद पडलेली कांदा खरेदी सुरु करण्यासाठी  नाफेड आणि राज्य शासन यांनी ५०-५० टक्के कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाने या संदर्भात केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून या प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी देण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी यावेळी  सांगितले. बाजारपेठेत पडून असलेला कांदा अजून जास्त वेळ पडून राहिल्यास शेतक-यांचे मोठे नुकसान होईल ही बाब यावेळी राज्यातील मंत्र्यांनी निर्दनशास आणून दिली. म्हणूनच राज्य शासनाच्या प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी देवून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
    कांदा खरेदी करताना शेतक-यांना प्रति क्विंटल मागे काही रक्कम अनुदान स्वरूपात देण्याची बाब पुढे आली. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने सवीस्तर प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा. त्यास केंद्रीय मंत्रिमंडळ व अर्थमंत्रालयातर्फे मंजुरी देण्यासंदर्भात सकारात्मक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले. राज्यात कांदा खरेदी- विक्री करताना उद्भवणारे प्रश्न दूर करण्यासंदर्भात शासनाने महत्वाची उपाय योजना केली असल्याचे यावेळी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर आणि सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी  सांगितले.  
जागतिक व देशांतर्गत बाजारपेठेचा अभ्यास करून शेतक-यांनी पीक पध्दती बदलण्याचा विचार या बैठकीत मांडण्यात आला. एकाच प्रकारचे पीक घेतल्याने शेतमालाचे अतिरीक्त उत्पादन होऊन शेतमालाचे भाव पडतात शेतमालाचे नुकसान होते. त्याऐवजी बाजारपेठेचा अभ्यास करून शेतक-यांनी ज्या शेतमालाची बाजारात मागणी आहे अशा शेतमालाचे उत्पादन करण्याची गरज असण्यावर या बैठकीत एकमत झाले. केंद्र शासन राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे असून आजच्या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय व मांडण्यात आलेल्या सूचनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना माहिती देण्यात येणार असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.       
            याबैठकीस राज्यातील खासदार सर्वश्री राजू शेट्टी, दिलीप गांधी, हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, संजयकाका पाटील, रक्षा खडसे, हिना गावीत, उपस्थित होते. 
                                                         000000


Tuesday, 9 August 2016

महाराष्ट्रातील ५ स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान


   

 नवी दिल्ली दि. 09 : भारत छोडो आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन आणि हैद्राबाद मुक्तीसंग्रामात मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्रातील ५ स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते आज सन्मान करण्यात आला.
         क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या 74 व्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र चळवळीत योगदान देणा-या  देशाच्या विविध भागातील स्वातंत्र्य सैनिकांचा यावेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यातील नागपूरचे शेषराव बडवाइक, चंद्रपूरचे डॉ.शेषराव इंगोले, नांदेड जिल्हयातील देगलुरचे कृष्णराव देशपांडे, मुंबई उपनगरचे नागेश साळगांवकर आणि जळगांव जिल्ह्यातील जामनेरचे एकनाथ माळी या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
            भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही देशाच्या काही भुभागावर भारतीय तिरंगा फडकला नव्हता, त्याकरिता आंदोलने झाली. या जनआंदोलनामध्ये काही लोक हुतात्मा झाले. काही स्वातंत्र्य सैनिक आजही हयात असून समाज व देशाला मार्गदर्शन करीत आहेत. या स्वातंत्र्य सैनिकांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून 2003 पासून क्रांतिदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी 9 ऑगस्टला देशाच्या विविध भागातील स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानीत करण्यात येते.
                महाराष्ट्रातून सन्मानीत झालेले शेषराव बडवाइक हे मुळचे अमरावती जिल्हयातील सावनेरचे. १९४२ साली महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली देशभर ‘भारत छोडो आंदोलन’ने जोर पकडला. त्यावेळी १६ वर्षांच्या शेषराव बडवाइक यांनी या आंदोलनात उडी घेतली. ‘चरखा चला चला के लेंगे स्वराज लेंगे’ अशा घोषणा देत त्यांनी आपल्या मित्रांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच, त्यांच्या शाळेचे शिक्षक फरकाडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजी शिक्षणावर बहिष्कार टाकला. त्यांनी प्रभात फे-या काढून अमरावती  शहरात आणि आजुबाजुच्याभागात ‘भारत छोडो आंदोलनाचा’ प्रचार केला.अमरावतीमध्ये माजी केंद्रीय कृषीमंत्री दिवंगत पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्चाखाली झालेल्या आंदोलनात श्री. बडवाइक यांना अटक झाली आणि त्यांना १ वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला.
            मुळचे अकोला जिल्हयातील उंबरडा(बाजार)चे रहिवासी  डॉ. शेषराव इंगोले यांनी नागपूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला. भारतदेश स्वतंत्र झाला असला तरी गोवा, दिव आणि दमन अजूनही पोर्तुगिजांच्या जोखडात असल्याचे दु:ख त्यांना सारखे सलत होते. नागपूरच्या रॉबर्टसन मेडिकल स्कुल मेयो हॉस्पीटलचे  तत्कालीन मानद प्राध्यापक डॉ. आरपी द्विवेदी यांच्या पुढाकाराने  ‘गोवा मेडिकल मिशन नागपूर’ ची स्थापना झाली. डॉ. शेषराव इंगोले यांनी या मिशनच्या झेंडयाखाली कोकणातील सावंतवाडी येथून आरोंदा, गार्डी  टेंपल मार्गे गोव्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण, पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना रोखले व बेदम मारले. मग त्यांनी अरोंदा येथे आरोग्य शिबीर उभारून गोवा मुक्ती आंदोलनात जखमी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची सुश्रृषा करण्याचे काम केले.
            नांदेड जिल्हयातील देगलूर येथील कृष्णराव देशपांडे यांनी हैद्राबाद मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान दिले. भारत देश स्वातंत्र झाला तरी हैद्राबाद हे निजामाच्या अधिपत्याखाली होते. स्वामी रामनंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या हैद्राबाद मुक्ती संग्रामात श्री. देशपांडे यांनी सहभाग घेतला. यावेळी मराठवाडयातील देगलूर, बिलोली, मुखेड या परिसरात निजामा विरुध्द वातावरण तयार झाले होते. त्यावेळी नांदेड जिल्हा संघटक म्हणून श्री. देशपांडे यांनी महत्वाची भूमिका बजावली. हेद्राबाद मुक्ती संग्रामाला गती देण्यासाठी त्यांनी नाशिक जिल्हयातील येवला येथे आपल्या सहका-यांसह सशस्त्र आंदोलनात सहभाग घेतला. मराठवाडयाच्या विकासाच्या प्रश्नावर त्यांनी विविध मोर्च काढले आणि सत्याग्रहात भाग घेतला. १९५५ मध्ये श्री. देशपांडे यांनी गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी  तरूणांची मोठी फळी उभी केली.
            जळगाव जिल्हयातील जामनेर तालुक्यातील गणेशवाडी येथील एकनाथ माळी यांनी गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग घेतला. जनशक्ती वृत्तपत्राचे संपादक ब्रिजलाल पाटील यांच्या प्रेरणेने श्री. माळी यांनी वयाच्या २५  व्या वर्षी या आंदोलनात उडी घेतली. सावंतवाडी येथे मोडक गुरूजींच्या नेतृत्वाखाली ‘स्वतंत्रता का मुल्य प्राण है..’ असे प्रेरक गीत म्हणत त्यांनी मध्यरात्रीच गोवा राज्याच्या पेडने गावात प्रवेश केला. मात्र, पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अडवले त्यांना बेदम मारले आणि गाडीत बसवून महाराष्ट्राच्या हद्दीत परत सोडले. त्यांनी या भागात गोवा मुक्ती आंदोलनाला गती देण्यासाठी जनजागृती केली.
गोव्यातील म्हापसा येथे जन्मलेले आणि आता मुंबईत स्थायीक झालेले नागेश साळगांवकर यांनी  वयाच्या १६ व्या वर्षीच गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग घेतला. म्हापसा हायस्कुल मधील विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत ‘पोर्तुगीज गोवा छोडो’ अशा घोषणा देत त्यांनी विद्यार्थी आंदोलनाची धुरा सांभाळली. त्यांच्या आंदोलनाचा वाढता प्रभाव पाहता १६ सप्टेंबर १९५४ मध्ये त्यांना आल्टीनो येथे बंदीवान करण्यात आले. त्यांना ८ महीने बंदिवान ठेवण्यात आले. पीटर आलवारीस यांच्या नेतृत्वाखालील ‘गोवा लिब्रेशन आर्मीमध्ये’ सहभागी होऊन श्री साळगांवकर यांनी ‘पोर्तुगीज चलेजाव आंदोलनात’ सहभाग घेतला. चौगुले कोळसा खान ध्वस्त करणे, पोर्तुगिजांची रसद अडविणे अशा कारवायांमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांना अटक करून मडगावच्या तुरुंगात डांबण्यात आले यावेळी त्यांना ५ महिन्यांचा तुरूंगवास झाला.            
                 आजच्या कार्यक्रमात इतर राज्य तसेच केंद्रशासीत प्रदेशातील स्वातंत्र्य सेनानींचाही सन्मान करण्यात आला.
                                                                     000000 

Thursday, 4 August 2016

सिंधुदूर्ग जिल्हयातील पत्रकारांची परिचय केंद्राला भेट












नवी दिल्ली दि. 04 : दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या सिंधुदूर्ग जिल्हयातील पत्रकारांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. 
            परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे आणि माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी या पत्रकारांचे पुष्प देऊन स्वागत केले.यावेळी  छोटेखानी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले. पत्रकार दौ-याचे समन्वयक तथा सिंधुदूर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मिलींद बांदिवडेकर यांनी प्रास्ताविकात दिल्ली अभ्यास दौ-या मागील भूमिका स्पष्ट केली.
यावेळी  श्री. कांबळे यांनी परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने, दिल्लीसह अन्य राज्यातील महाराष्ट्र मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय याबाबत माहिती दिली. कार्यालयाची एसएमएस सेवा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार माध्यमांना देण्यात येणारी माहिती व साधण्यात येणारा  समन्वय आदींची माहिती दिली.
यावेळी मुक्त पत्रकार अनिल जोशी यांनी ‘दिल्लीतील पत्रकारीता’ या विषयावर माहिती दिली. राज्यातील वर्तमानपत्र, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून काम करताना संबंधित वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनी व वाचकांच्या आणि दर्शकांची अभिरूची लक्षात घेऊन करावे लागणारे वार्तांकन, वार्तांकनासाठी विविध क्षेत्राचा असावा लागणारा अभ्यास व त्याचा उचित उपयोग याबाबत त्यांनी माहिती दिली.
दैनिक पुढारीच्या सिंधुदूर्ग आवृत्तीचे प्रमुख गणेश जेठे यांनी आभार प्रदर्शन केले. परिचय केंद्रात आल्यावर दिल्लीतील महाराष्ट्राची माहिती कळली अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित पत्रकारांना महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन या पत्रकारांनी  माहिती घेतली .  
                                                                     000000


इंदू मिलची जमीन राज्य शासनास हस्तांतरीत








नवी दिल्ली दि. 4 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबईतील इंदू मिलची १२ एकर जमीन महाराष्ट्र शासनाला हस्तांरीत करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी रात्री पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार नियम आणि अटींच्या अधिन राहून राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ आपल्या मालकीची इंदू मिलची १२ एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईतील चैत्यभूमी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणस्थळा शेजारी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची इंदू मिलची जागा आहे. या ठिकाणी डॉ.आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी मोठया प्रमाणात होत होती. महाराष्ट्र शासनाने तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून त्याचा यशस्वी पाठपुरावा केला आणि केंद्राने त्यास मान्यता दिली. वस्त्रोद्योग सुधारणा कायदा १९९५ च्या ‘कलम ११अ’ अंतर्गत महाराष्ट्र शासन या जागेच्या मोबदल्यात आवश्यक रक्कम राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला अदा करेल असा निर्णयही घेण्यात आला होता. यासंदर्भात भारत सरकार, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ आणि महाराष्ट्र शासन यांच्यात करारही झाला आहे.
 
000000

Wednesday, 3 August 2016

राजधानीत क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी










नवी दिल्ली दि. 3 :   क्रांतीसिंह नाना पाटील यांची  116 वी जयंती  महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त भारती झाडे, डॉ. किरण कुलकर्णी, संजय आघाव,अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 महाराष्ट्र परिचय केंद्रात क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन

 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यालयातील कर्मचारी कमलेश पाटील यांनी क्रांतीसिंह नाना पाटील  यांच्या योगदानाबाबत माहिती दिली. यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

         000000

Monday, 1 August 2016

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणार - रामदास आठवले

      

                                                       
नवी दिल्ली, 1 : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  केली.   
              शास्त्रीभवन स्थित सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात श्री. आठवले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहीली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  
            यावेळी श्री. आठवले म्हणाले, केंद्रात मंत्री झाल्यानंतर प्रथमच सामाजिक न्याय मंत्रालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. सांगली जिल्हयातील वाटेगांव या छोटयाशा गावात जन्मलेले अण्णाभाऊ साठे यांनी हलाकीच्या परिस्थितीचा सामना करून प्रतिभेच्या जोरावर साहित्यक्षेत्रात मोठा लौकीक मिळविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनामध्ये अण्णाभाऊंनी सक्रीय सहभाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या सिमा ओलांडून त्यांनी रशियाचे तत्कालीन प्रमुख लेनीन गार्द यांच्यावर  पोवाडा लिहीला जो रशियन भाषेतही प्रसिध्द असल्याचे श्री. आठवले म्हणाले.  

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक आणि वाड:मयीन योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा व त्यांचे कार्य येणा-या पिढयांपर्यंत पोहचविण्यासाठी आपल्या मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्रात त्यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

अण्णाभाऊंचे लिखान वैश्विक उंचीचे – डॉ आवाड ; राजधानीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी











                    
नवी दिल्ली, 1 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची वैचारिक आणि वाड:मयीन मांडणी वैश्विक उंचीची असल्याचे प्रतिपादन डॉ. मिलींद आवाड यांनी केले.
            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, वरिष्ठ पत्रकार आणि विविध क्षेत्रातातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.   
            यावेळी  डॉ. आवाड म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे लिखान हे वर्ग,जाती, लिंग,भाषा या सर्व जाणीवांतून येते. स्त्री, शुद्र आणि शुद्रातीशुद्र यांचे दु:ख मांडणारे अण्णाभाऊंचे लिखान वर्गीय जाणीवेतून जातीय जाणीवा उलगडते. त्यामुळेच अण्णाभाऊंचे वाड:मय हे वैश्विक उंचीचे ठरते. ‘माझी मैना गावाकडे राहिली....’या कलाकृतीतून अण्णाभाऊ असंघटीत कामगारांचे दु:ख मांडतात. जात आणि वर्गाची सांगड घालणा-या भारतातील विचारवंतामध्ये अण्णा भाऊंचे नाव सन्मानाने घेतले जाते. सांस्कृतिक जीवनामुळे होणारे भौतिक शोषण हा महात्मा फुलेंच्या वाड:मयीन लिखानाचा धागा पकडत त्याचा विस्तार अण्णाभाऊंनी केल्याचे डॉ.आवाड म्हणाले.
            श्री. दयानंद कांबळे यावेळी म्हणाले,अण्णाभाऊ साठे यांनी जातीयतेच्या भितीं तोडण्याचे काम आपल्या लिखानातून प्रभावीपणे केले आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी लेखनीचा प्रभावी वापर केल्याचे सांगून अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला.
            माहिती अधिकारी अंजू कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांसह कार्यालयात उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले .
             
महाराष्ट्र सदनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र,सहायक निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, भारती झाडे यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.   

00000