Saturday, 30 January 2016

विजीट महाराष्ट्र” वर्ष 2017 का दिल्ली में शुभारंभ : महा-मेले का समापन




नई दिल्ली, 30 : महाराष्ट्र के विराट किले, समंदर किनारे, लोक संस्कृती, समृद्ध परंपरा को देशने के लिए आईयें  इन शब्दों मे महराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने, देश तथा विदेशी पर्यटकों को खुला आमंत्रण देकरविजीट महाराष्ट्र वर्ष -2017 का शुभारंभ आज दिल्ली हाट में किया.

        दिल्ली हाट मे राज्य सरकारद्वारा पिछले पंधरा दिनों से महा-मेलेका आयोजन किया गया था. इस महा-मेले के समापन कार्यक्रम में मुख्यमंत्री बोल रहे थे. पर्यटन व सांस्कृतिक निदेशालय के सचिव वल्सा नायर, महाराष्ट्र सदन के निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, निवेश व राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, महराष्ट्र लघु उद्योग विकास महानिगम के प्रबंधकिय निदेशक शिवाजीराव दौंड साथ ही वरीष्ठ अधिकारी तथा गणमान्य व्यक्ती उपस्थित थे.

        मुख्यमंत्री ने कहा, देश के अग्रणी राज्य के रूप में इस अवसरपर महाराष्ट्र की पहचान है. महाराष्ट्र के विविध विभागों के सहयोग से राज्य की हस्तकला, लघु उद्योग तथा विविधता पुर्ण लोक संस्कृति का दर्शन महा-मेले के अर्तंगत आयोजन सफलता पुर्वक किया गया. राज्य ने प्रथमत: इतने बडे पैमाने पर राजधानी दिल्ली मे महा-मेले का आयोजन किया. दिल्ली हाट मध्यवर्ती व्यापर केंद्र है. यहा दिल्लीवासी के साथ देशी-विदेशी पर्यटक आते है. राज्य के पर्यटन को आकर्षीत करने का प्रयत्न महा-मेले के तहत किया गया है, ऐसा श्री.फडणवीस ने कहा. महाराष्ट्र सरकार ने वर्ष -2017विजीट महाराष्ट्र 2017 वर्ष घोषीत किया है. जिसकी शुरवात आज से हुई ऐसा मुख्यमंत्री ने इस समापन कार्यक्रम मे कहा.
पुरन पोली को बढ़ावा देंगी महाराष्ट्र सरकार वल्सा नायर
महाराष्ट्र का लोकप्रीय लजीज मीठा व्यजंन पुरन पोली को महाराष्ट्र सरकार अधिक बढ़ावा देगी. इसके लिए महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय अंतराराष्ट्रीय स्तर के हॉटल्सेस, कॅटरींग संस्थायें, हॉटेल मॅनेजमेंट संस्थाओं से  बातचीत कर रहे है. पुरन पोली के साथ वडा पाव को भी नई पहचान देनी की कोशीश की जायेंगी, ऐसा पर्यटन तथा सांस्कृतिक सचिव वल्सा नायर ने कहा. आयोजित इस महा-मेले से महाराष्ट्र में अधिक पर्यटक्‍ बढ़ने में सहायत मिलेंगी. पिछले वर्ष करीब 7 लाख विदेशी पर्यटकों ने महाराष्ट्र देखा है. तथा देशी पर्यटकों की संख्या में काफी वृध्दी हूई है, ऐसा भी श्री नायर ने कहा.
महा-मेले में सहभागी लघु उद्यमी तथा कलाकरों का मुख्यमंत्री के हाथों सम्मान
विविध प्रतिमा व प्रतिकों के माध्यमा से दिल्ली हाट में महाराष्ट्र का दर्शन जिन्होंने किया वे निर्देशक नितीन देसाई, इस महा-मेले में पर्यटका कों महाराष्ट्र की पैठणी, नऊवारी (साड़ी) बुनाने का तथा परिधान करने का प्रशिक्षण देनेवाले जितेंद्र राजपूत, राजेंद्र अंकम ने महा-मेले में हस्तकला का प्रशिक्षण दिया. महिला उद्यमी श्रीमती विजया, महाराष्ट्र के लजीज व्यंजनों का स्टॉल चलानेवाली शुभांगी चिपळुणकर इनका प्रातिनिधीक रूप में इस समय सत्कार किया गया.
     मुख्यमंत्री फडणवीस इनका पांरपारिक रूप से स्वागत किया गया. प्रवेशव्दारा पर मुख्यमंत्री के हाथों गणेश आरती की गई. छत्रपती शिवाजी महाराज  की प्रतिमा को अभिवादन किया गया. मुख्यमंत्री ने इस समय  विविध भागों से आयें लघु उद्यमी के स्टॉल्स को भेट दि.
राज्य की सांस्कृतिक धरोहर की प्रस्तुती
महाराष्ट्र के सांस्कृतिक धरोहर दर्शानेवाली लोक कला की प्रस्तुती इस समय कि गई. विशेष लोक नृत्य लावणी को हिंदी मे प्रस्तुत कर दर्शकों की खुप वाह वाह लुटी. राज्य की लोक कला मे गणपती गाण, वासुदेस (कृष्णगाण), व्हलगरी, कहार नृत्य, ठाकर नृत्यृ आदीवासी नृत्य का प्रस्तुतीकरण किया गया. मर्दानी खेलों द्वारा प्रदर्शन कर दिल्लीवालों तथा विदेशी पर्यटकों का दिल जीत लिया. चारों और जय महाराष्ट्रजय शिवाजी का उदघोष हो रहा था. श्रीमती नायर ने इस मौके पर गणपती की बुनकरोंव्दारा बनाई गई प्रतिमा भेट दि. महारार्ष्ट लघु विकास महानिगम के प्रबधंकिय संचालक शिवाजीराव दौंड ने राजवस्त्र देकर मुख्यमंत्री फडणवीस का सत्कार किया. कार्यक्रम का आभार प्रदर्शन सांस्कृतिक निदेशालय के संचालक अजय अंबेकर ने किया.

“MAHARASHTRA VISIT YEAR 2017” STARTS TODAY : ‘MAHA JATRA FESTIVAL’ CONCLUDED TODAY WITH CM OF MAHARASHTRA



   
NEW DELHI, 30 : Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis announced   “Maharashtra Visit Year 2017” at ‘Delhi Haat’ today  to promote Maharashtra Tourism . He invited  the tourist to visit glorious Maharashtra.

Maharashtra is a region of  remarkable diversity, it is as one of India’s most industrialized state, it has always been at the forefront of the country’s progress, said CM of Maharashtra, at his speech on the closing day of Maha Jatra,”cultural yatra of Maharashtra”.

The state  has a glorious history. it is a land of natural beauty as oceans hills, ghats ,forest, wildlife. It consist of many historical forts, religious places, temples, water fall , beaches, museum. It is the third largest state in the country.

He announced “2017 “as” “Maharashtra visit Year”  to attract tourist spot in Maharashtra on Domestic and International Level, he welcomed everyone to visit the state to capture the life of Maharashtra,he offered to discover years of history and varied heritage.

     Maharashtra government organized maha jatra for two weeks to promote the culture and varied heritage of the state at Delhi haat. On Saturday Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis visited Delhi haat, on the crowning day of Maha Jatra which was conducted from 17th of January till 31st of January at Delhi haat. It was to promote small scale industries like handy crafts, handlooms, paintings and many more.

Chief minister was the part of closing ceremony with Valsa Nair Singh,  Secretary ,Tourism &  Cultural Affairs. The performances that started with Ganpati vandana and went on to include many dance forms from maharashtra like kohli,kala,lavani,left audience spellbound.at end group performed a danace on the stage by making a multi level human pyramid with a child on top.

           State promoting Puran Poli & Wada Pav
On the last day of event Valsa Nair conveys the main intention of this maha mela was to promote art, craft, culture,and special cusines of Maharashtra. About 118 small stalls in mela reflected the real beauty of this state to entire world. She later tells snacks like puran poli, had become favorite with Delhihites, with the little spectacular colorful journey of Maharashtra with a bite of hot vada pao. In her welcome remark she said,” we will tie up  with large and small hotel industries,&caterers to promote ‘puran poli and vada paav’nation and world wide.

 The CM was welcomed by tourism and cultural secretary Nayar  .‘Maha jatra’ received an encouraging response and was very successful .Artiste and entrepreneur was honoured by the  CM .On this grand Occasion  the CM awarded few entrepreneur and artiste who participated in “MAHA JATRA”
CM felicitated the renown Art Director Nitin Desai, Paithani maker Jitendra Rajput, Handloom artist Rajendra Ankam, Women entrepreneur      Smt. Vijya  and the owner of ‘Maha food’ stall Shubhami Chipalumkar.
                                                             *****

‘ व्हिजीट महाराष्ट्र’ वर्षाचा दिल्लीत शुभारंभ :दिल्ली हाट येथील ‘महाजत्रेचा’ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप



              
नवी दिल्ली, 30 : राज्यातील गड, किल्ले, समुद्र किनारे, लोकसंस्कृती बघण्यासाठी आमच्या राज्यात या  अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीकर, देश व विदेशातील पर्यटकांना आज खुले निमंत्रण देत व्हिजीट महाराष्ट्र वर्षाचा शुभारंभ केला.

            दिल्ली हाट येथे राज्य शासनाच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या महाजत्रा या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , हस्तकला व लघु उद्योगाचे दर्शन घडविणा-या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्य पर्यटन व सांस्कृतिक संचालनालयाच्या सचिव वल्सा नायर , महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,  महाराष्ट्र शासनाने २०१७ हे वर्ष व्हिजीट महाराष्ट्र वर्षघोषित केले आहे. देशातील अग्रणी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. राज्याच्या विविध भागातील हस्तकला, लघु उद्योग आणि राज्याच्या वैविध्यपूर्ण लोक सांस्कृतीचे दर्शन घडविणा-या महाजत्रा महोत्सवाचे यशस्वी आयोजन राज्य शासनाच्या विविध विभागांनी केले आहे.राज्य सरकारने प्रथमच राजधानी ‍दिल्लीतील दिल्ली हाट या मध्यवर्ती व्यापार केंद्रात या महोत्सवाचे आयोजन करून दिल्लीकर,देश व विदेशातील पर्यटकांना राज्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यशासनाचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या व्हिजीट महाराष्ट्र वर्षा ची सुरुवात  आज  झाली  आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

                            पुरणपोळीचे मार्केटींग करणार – वल्सा नायर

महाराष्ट्राचे खास व्यंजन म्हणून ख्याती असलेली पुरणपोळी आणि वडापावया जिन्नसाला देश -विदेशात पोहचवू त्यासाठी देश विदेशातील हॉटेल्स कॅटरींग इन्स्टीटयूटस सोबत करार करू. देश विदेशात ज्या प्रमाणे इडली दोसा या व्यंजनांना मागणी आहे तशीच पुरणपोळी व वडापावला देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. महाजत्रेला दिल्लीसह देश विदेशातील पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. लघु उद्योजक व लोककलांना उत्तम व्यासपीठ मिळाले. या महोत्सवामुळे महाराष्ट्रातील पर्यटन व उद्योगाला चालना मिळण्यास मदत होईल  असे  राज्य पर्यटन व सांस्कृतिक संचालनालयाच्या सचिव वल्सा आर. नायर सिंह यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.                     
                                   बहारदार  सांस्कृतिक कार्यक्रम

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा या काव्य पंक्तीचा अनुभव करून देणा-या व महाराष्ट्रच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर झाला. महाराष्ट्राच्या मराठमोळया कलाकारांनी कधी अंगावर रोमांच उभे केले तर कधी लावणीने रसिकांना खुलवून टाकले. महाराष्ट्राच्या लोककलांमधील वासुदेव, व्हलगरी दादा, कोळी नृत्य, ठाकर नृत्य, आदिवासी नृत्याच्या सादरीकरणाने रसिकांना खिळवून ठेवले. मर्दानी खेळाचे प्रात्याक्षिक तर दिल्लीकरांचा ठेका चुकवणारा ठरला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणा-या बहारदार नृत्य, उत्तम सादरीकरण यामुळे  दिल्लीकर, देश विदेशातील पर्यटक  सुखावून तर गेले आणि  जय महाराष्ट्र गजर करायला मात्र ते विसरले नाहीत.

                 महाजत्रेत सहभागी लघुउद्योजक व कलाकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
 विविध प्रतिमा व प्रतिकांच्या माध्यमातून दिल्ली हाटमधे महाराष्ट्र उभे करणा-या प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई, पैठणी तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन या कलेचा प्रचार व प्रसार करणारे  जितेंद्र राजपूत, राजेंद्र अंकम यांचे महाजत्रा महोत्सवातील हस्तकला प्रदर्शनात सहभागी कलाकारांचे प्रातिनीधी म्हणून प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. महिला उद्योजक व अरोमा थेरपीच्या स्टॉल प्रतिनिधी श्रीमती विजया , महाजत्रेला भेट देणा-या पर्यटकांना महाराष्ट्र फुड या स्टॉलच्या माध्यमातून राज्याच्या व्यंजनांचा आस्वाद देणा-या शुभांगी चिपळुणकर यांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मराठमोळया पांरपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारावर त्यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली व  शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून  मुख्यमंत्र्यांनी  विविध स्टॉल्सला भेट दिली. 

राज्य पर्यटन व सांस्कृतिक संचालनालयाच्या सचिव वल्सा नायर यांनी गणराची प्रतिमा देवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. राज्य सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक अजय अंबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.                                               
                                           00000



         

राजधानीत हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली, 30 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणा-या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून महाराष्ट्र सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात शनिवारी हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त संजय आघाव, सहायक निवासी आयुक्त अजित सिंग नेगी, यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून पाळली जाते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली

महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना मौन पाळूण आदराजंली वाहण्यात आली. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.



Thursday, 28 January 2016

‘सोंगी मुखवटा लोकनृत्या’ला प्रथम पुरस्कार






नवी दिल्ली, 28 : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर आयोजित पथसंचलनात शालेय विद्यार्थ्यांव्दारे सादर करण्यात आलेल्या लोकनृत्य श्रेणीत महाराष्ट्रातील सोंगी मुखवटा लोकनृत्याला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात भारताच्या भुदळ,  नौदळ, वायुदळ, विविध मंत्रालयातर्फे, तसेच विविध राज्यातील चित्ररथ, विविध राज्यातील लोकनृत्य सादर केली जातात. यामध्ये विविध गटातील स्पर्धेचे आयोजनही केले जाते.  विविध राज्यातील लोकनृत्यामध्ये दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्यावतीने सोंगी मुखवटा लोकनृत्य सादर करण्यात आले होते. या नृत्याला शालेय विद्यार्थ्यांच्या श्रेणीतील यंदाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे राजपथावरील पथसंचलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोंगी मुखवटा लोकनृत्याचे छायाचित्र ट्विट केले आहे.

सोंगी मुखवटा लोकनृत्यहे आदिवासी लोकनृत्य आहे. हे लोकनृत्य नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील धाब्याचा पाडा येथील आहे. राजपथावर नृत्य सादर करताना नाशिक येथील स्थानिक कलाकांरानाही भाग घेतला होता. एकूण 166 कलाकारांच्या चमुने राजपथावरील पथसंचलनात सोंगी मुखवटा लोकनृत्य सादर केले होते. 

Maharashtra’s Pune and Solapur in the first list of Smart City



New Delhi, 28  : The Union Government on Thursday unveiled first batch of 20 cities for the ambitious Smart City Mission. The List of Smart City was declared by Union Urban Development Minister Venkaiah Naidu.
          Bhubaneswar topping the list, Pune and Solapur coming second and ninth places respectively in the list.
          Pune proposed to invest in retrofitting selected local area. In order to become one on the top ten cities in ease of doing business and e-governance. Pune will be developed to have basic infrastructure through water and power supply, sanitation and solid based management and public transport and IT connectivity and it will be focus on creating sufficient high end jobs to leverage Pune’s human capital and building city attractiveness further.
          Solapur with a vision to make clean and efficient progressive city. The objective is to create attractive and sustainable environment citizens. It proposes for the initiatives to drive visitor to spend more time in core city area through urban design and pedestrianziation, farmer markets etc.
                                                             *****


महाराष्ट्र एनसीसीला देशातील तिस-या सर्वोत्तम संचालनालयाचा मान




नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कोर्प्स(एनसीसी)ला देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा तिस-या क्रमांचा मान मिळाला आहे. पंतप्रधान बॅनरचा मान पंजाब,चंदीगढ, हरियाणा व हिमाचल प्रदेश या संयुक्त संचालनालयाला  तर उपविजेतेपदाचा मान कर्नाटक व गोवा या संयुक्त संचालनालयाला मिळाला आहे.

              येथील छावनीभागातील गॅरीसन परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पंतप्रधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पुरस्कारांची घोषणा व पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह, संरक्षण सचिव जी.मोहन कुमार, लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंह, वायुसेना प्रमुख एअरचिफ मार्शल अरूप राह, नौसेना प्रमुख ॲडमीरल आर.के.धवन आणि एनसीसीचे महासंचालक  लेफ्टनंट जनरल अनिरुध्द चतुर्वेदी मंचावर उपस्थित होते.
               पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात उपस्थित देशभरातील २१०० एनएसएस कॅडेटसना संबोधित केले.ते म्हणाले, देशात नुकताच प्रजासत्ताक दिन साजरा झाला. स्वतंत्र भारत देशाने राज्यघटना स्वीकारली म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला राज्यघटना दिली ज्यामुळे विविध भाषा, संस्कृतीने नटलेला भारत देश एकसंध राहीला आहे. तूम्ही देशाच्या विविध भागातून प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी आला.याठिकाणी आयोजित महीनाभराच्या शिबीरात चांगल्या गोष्टी शिकलात.  विविध भागातून आलेल्या देश -विदेशातील मित्रांशी तूमचा संवाद झाला. हा अनुभव तुम्हाला आयुष्याची शिदोरी ठरेल. सर्वजन आपआपल्या गावी जाताना स्वच्छता व देशप्रेमाचा संदेश आपल्या परिसरात विस्तार करा व देशसेवेचे व्रत कायम पाळा असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

           तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधानांना मानवंदना देण्यात आली. मानवंदना देण्या-या देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाच्या चार दलातील निवडक कॅडेटसमधे महाराष्ट्रातील ९ कॅडेटसचा  सहभाग होता. यावेळी पंतप्रधानांनी मानवंदना देणा-या एनसीसी पथकाची पाहणी केली. यानंतर शिबीरात सहभागी प्रत्येक राज्याच्या निवडक पथकांचे पथ संचलन झाले. ५० एनसीसी कॅडेटसचा सहभाग असणा-या महाराष्ट्राच्या पथकाचे नेतृत्च महेश पांडव ने तर ध्वजवाहन देवयानी पागीरे ने केले. बांग्लादेश, भुटान, कझाकीस्तान, नेपाळ, रशिया,श्रीलंका आणि व्हिएतनाम येथील एनसीसी कॅडेटसनेही या पथसंचालनालयात भाग घेतला. यावेळी पथसंचलनात सहभागी एनसीसीच्या लष्कर, वायूदल, नौदल, क्रीडा आणि स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणा-या आकर्षक चित्र रथांना उपस्थितांनी टाळयांच्या गजरात दाद दिली. दिल्ली एनसीसी संचालनालयाच्या कॅडेटसनी यावेळी परॉसेलींगचे तर विविध संचालनालयाच्या ६०० कॅडेटसनी योगासनांचे प्रात्याक्षीक सादर केले. पंतप्रधानांच्या हस्ते  पंतप्रधान बॅनर पुरस्कार वितरण करण्यात आला. त्यानंतर पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. हमसभ भारतीय है या एनसीसीगीतानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

          एनसीसी महासंचालनालय आणि दिल्ली संचालनालयाच्यावतीने येथील गॅरीसन परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी शिबिराचे आयोजन केले. १ जानेवारी पासून या शिबिराला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. तर पंतप्रधान रॅलीने आज या शिबिराची सांगता झाली. देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाच्या २१०० कॅडेट्स यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील ११४ एनसीसी कॅडेटस या शिबिरात  सहभागी झाले. यातील २५ कॅडेटसची  प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी तर 9 कॅडेटसची  पंतप्रधान रॅलीमधे मानवंदना देण्यासाठी  निवड झाली.   

          या शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ड्रिल कॉम्पीटीशन, राष्ट्रीय एकात्मता जागृकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, पंतप्रधान रॅलीसाठी मानवंदना निवड स्पर्धेत महाराष्ट्रातील कॅडेटसनी उत्तम कामगिरी केली. गेल्या 25 वर्षांपैकी 17 वेळा पंतप्रधान बॅनरचा बहुमान मिळवणा-या महाराष्ट्राला यावर्षी तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले.महाराष्ट्राच्या संघाचे प्रमुख कर्नल निखिल कुलकर्णी आणि उपप्रमुख मेजर आर.आर.शिंदे हे आहेत .                 

                                                                     ००००००

स्मार्टसिटीच्या पहिल्या टप्प्यात पुणे व सोलापूर शहरांची निवड



नवी दिल्ली, 28 : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्टसिटी योजनेंतर्गंत घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर शहारांनी बाजी मारली आहे. पहिल्या टप्प्यासाठी निवड झालेल्या देशातील पहिल्या २० शहरांच्या यादीत पुणे शहराने दुसरा तर सोलापूर शहराने नववा क्रमांक पटकवला आहे.

                   केंद्रीय शहरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरांचा विकास करण्यासाठी देशातील १०० शहरांची निवड करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश आहे. निवड झालेल्या शहरांना आपल्या शहराचा विकास नियोजन आराखडा तयारकरण्यासाठी प्रत्येकी २ कोटी रूपये देण्यात आले. त्यानंतर केंद्राकडे आलेल्या राज्यांच्या नियोजन आराखडयांची एक स्पर्धा घेण्यात आली. त्यानुसार  स्मार्टसिटी योजनेअंतर्गत  पहिल्या टप्प्यात २० शहरांची निवड करण्यात आली.

                   पुणे शहराची निवड करताना शहराच्या नियोजन आराखडयात भविष्याच्यादृष्टीने तयार करण्यात आलेल्या मध्यवर्ती पायाभूत सुविधांचे नियोजन, दिर्घकालीन पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करण्याबाबतचे नियोजन, पुणे शहराला देशातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनविण्याचे नियोजन, रोजगार  उपलब्ध करून देत शहराला मनुष्यबळाच्यादृष्टीने नवी ओळख निर्माण करून देणे, शहरातील सौदर्यीकरणात भर टाकण्याच्यादृष्टीने नदीकिनारे विकासीत करण्याच्या नियोजनासह विविधबाबींचा विचार करण्यात आला आहे.
                सोलापूर शहराच्या नियोजनात स्वच्छ, कार्यक्षम आणि विकसीत शहर तयार करण्यासाठी महत्वाच्या बाबी मांडण्यात आल्या आहेत. शहरवासियांसाठी  पायाभूत सुविधांनी सुसज्ज शाश्वत वातावरण तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. शहराचा गौरवशाली इतिहास येथे भेटदेणा-या प्रत्येकाच्या आकर्षणाचा बिंदू बनविण्यासाठी शहरातील १०४० एकराचा परिसर चिन्हीत करण्याचे नियोजन देण्यात आले आहे. यासोबतच  आकर्षक नगर रचना, पादचा-यांसाठी करून देण्यात आलेल्या रस्त्यांवरच शेतीमालाच्या विपणनाची व्यवस्था आदी बाबीं उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहराने तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहरातील सेवाक्षेत्राचा विकास , जल संवर्धनासाठी मागणी व्यवस्थापन मापनव्यवस्था तयार करणे, शहर विकासासाठी विविध क्षेत्रांतून निधी उपलब्ध करणे आदी महत्वपूर्ण  नियोजनाच्या आधारावर या शहराची देशातील  स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे.     
                      स्मार्टसिटी योजनेअंतर्गत देशातील उर्वरीत शहरांचा टप्याटप्याने विकास करण्यात येणार आहे .


                                                                        ००००००

मनमाड-इंदोर रेल्वेमार्गासाठी येत्या रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद : केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु



नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्रातील मनमाड-इंदोर रेल्वेमार्गासाठी येत्या रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी आज सहाकर राज्यमंत्री दादाजी भुसे यांना दिले.
        रेल्वे भवन येथे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्या सोबत झालेल्या भेटीमधे ब-याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मनमाड-मालेगाव-धुळे-नरधना-इंदोर या 339 किलोमीटर रेल्वेमार्गासाठी चर्चा करण्यात आली. हा रेल्वे मार्ग झाल्यास स्थानिक विकासाला गती येईल तसेच मनमाड-इंदोर अंतरही कमी होईल. महाराष्ट्रासोबत या रेल्वे मार्गाबाबत रेल्वे मंत्रालयाशी करार झालेला आहे. मध्यप्रदेश शासनासोबत कराराची पुर्तता होणे बाकी असून लवकरच हा करार पुर्ण होईल, असे केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी यावेळी सांगितले. तसेच येत्या रेल्वे अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गाकरिता तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी यावेळी दिले. या बैठकीस खासदार हरीशचंद्र चव्हाण उपस्थित होते.
            केंद्रीय भुपृष्ठ व रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्याशी झालेल्या भेटीत राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 (मुंबई-आग्रा) टेहरे तालुका मालेगाव, लळींग पुरमेपाडा, अवधान जिल्हा धुळे येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत उड्डाणपूल बांधण्याबाबतची मागणी श्री भुसे यांनी केली. यासह मालेगाव येथील रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अंत्यत महत्वाचे आहेत. येथील रस्ते आशियाई मार्ग क्रमांक 47 धुळे जिल्हा यांना जोडणारे व नवापूर मार्गे गुजरातकडे जाणारे आंतरराज्य वाहतुकीसाठी सोयीचे मार्ग आहेत. या रस्त्यांना केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून मिळावा, अशी मागणी श्री भुसे यांनी केली. या मागणीचा योग्य विचार केला जाईल, असे श्री गडकरी यावेळी म्हणाले.

            याशविाय राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेतून धुळे जिल्ह्यातील पांझरा व मालेगाव तालुक्यातील मोसम या नदयांना प्रदुषण मुक्त करण्याबाबतचे निवदेन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मंत्रालयात सादर केले.

Wednesday, 27 January 2016

महाराष्ट्रात राखीव बटालीयन स्थापन करण्यास केंद्राची मंजुरी

                                                 
                        
नवी दिल्ली, 27 : नक्षलवादाचा सामना करण्यासाठी  महाराष्ट्रात दोन भारतीय राखीव बटालीयन (आयआरबटालीयन) स्थापन करण्यास  केंद्रीय मंत्रिमंडळाने  मंजुरी दिली.

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्षलवाद व डाव्या कडव्या विचारसरणीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांमधे १७ भारतीय राखीव बटालीयन उभारण्यास मंजुरी दिली आहे. यानुसार महाराष्ट्रात २, ओरीसात ३, झारखंडमधे ३, छत्तीसगढ मधे ४ तर जम्मू आणि काश्मीरमधे ५ बटालीयन उभारण्यात येतील.

            महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागात स्थापन करण्यात येणा-या या बटालीयनमधे स्थानिक युवकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार राज्यसरकार शिक्षण व वयोमर्यादेमधे सूट देऊ शकते. देशात १९७१ पासून भारतीय राखीव बटालीयन योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार विविध राज्यांमधे १५३ बटालीयन उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून  त्यापैकी १४४ बटालीयन स्थापन करण्यात आल्या आहेत.


                                                            000000

Tuesday, 26 January 2016

राजपथावर महाराष्ट्राचे शानदार प्रदर्शन ; 67 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



नवी दिल्ली, 26 : देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रांसिस्को ओलांद यांच्या उपस्थितीत मंगळवारी राजपथावर पार पडलेल्या 67 व्या प्रजासत्ताक दिन सोहळयात महाराष्ट्राचे शानदार प्रदर्शन बघायला मिळाले. राजपथावर देशाच्या समृध्द सांस्कृतिक वारसा व शस्त्रसज्जते सोबतच महाराष्ट्राच्यावतीने सादर ‘सौंगी मुखवटाया लोकनृत्याच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील 3 बालके, राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करणारा आसीफ शेख हे ही या पथसंचलनाचे खास वैशिष्टय ठरले.
  
        प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी देशाच्या राजधानीत पसरलेले धुके, जोडीला असलेली कडाक्याची थंडी यास न जुमानता दिल्लीकर व देश-विदेशातून राजपथावर अलोट जनसमुदाय जमला. 10 वाजताच्या सुमारास राजपथावर सुर्यकिरणांच्या आगमनाने वातावरण निवडले यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजपथावर आगमन झाले. देशासाठी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या स्मरनार्थ सदैव तेवत राहणा-या इंडियागेटस्थितअमर जवान ज्योतीलापंतप्रधानांनी देशवासीयांच्यावतीने आदरांजली वाहिली. यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनाचे विशेष पाहुने फ्रांसचे  राष्ट्राध्यक्ष फ्रांसिस्को ओलांद आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे राजपथावर आगमन झाले. उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ध्वजारोहण केले यानंतर, राष्ट्रगीत व त्यासोबतच 21 तोफांची सलामी देण्यात आली. भारतीय पॅराशुट रेजीमेंटचे लांसनायक मोहननाथ गोस्वामी यांच्या अभुतपूर्व शौर्य व बलीदानासाठी मरणोत्तर जाहीर सर्वोच्च शौर्यपदक अशोक चक्र त्यांच्या पत्नी भावना गोस्वामी यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 
       
                   राजपथावर प्रथमच विदेशी सैन्याचे आणि श्वान पथकाचे पथसंचलन

यानंतर राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनास सुरूवात झाली. राजपथावरील पथसंचलनाच्या इतिहासात प्रथमच विदेशातील सैन्यांनी पथसंचलन केल्याचा अनुभव देशावासीयांना आला.सांद्रानील ची धून वाजवणा-या फ्रांस सैन्याच्या बँड पथकाचे राजपथावर सर्वप्रथम आगमन झाले व उपस्थितांनी टाळयांच्या गजरात त्यांना दाद दिली.त्यानंतर फ्रांस सैन्याच्या 75 सैनिकांचा समावेश असणा-या शिस्तबध्द सैन्य पथकाचे पथसंचलन झाले. लष्कराच्या विविध रेजीमेंटच्या पथसंचलनानंतर राजपथावर लष्कराच्या श्वान पथकाचे शानदार पथसंचलन झाले. या दोनही पथसंचलनाने राजपथावर इतिहास रचला.  
               
भारताची शस्त्र सज्जता दर्शविणा-या सेनेच्या तीनही दळांचे आकर्षक चित्ररथ , सेनेच्या सैनिकांचे आणि बॅड पथकांचे पथसंचलन, सिमा सुरक्षा दळाचे घोडदळ, उंटदळ यांचे पथसंचलन आणि बायकर्सच्या चित्तथरारक कसरती उपस्थितांच्या टाळया मिळवत होते.

              वैशिष्टयपूर्ण व वैविध्यपूर्ण संस्कृती दर्शविणा-या 16 राज्यांचे आणि केंद्रांतील मंत्रालयांनी तयार केलेल्या आकर्षक चित्ररथांच्या पथसंचलनाने उपस्थितांचा उत्साह टिपेला पोचल्याचे चित्र होते.
           
असामान्य शौर्य दाखविणा-या देशभरातील राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त 25 मुला-मुलींनी यावेळी उघडया जिप्सीमधून उपस्थितांना अभिवादन केले. शौर्याचा परिचय देणा-या व मरणोत्तर भारत पुरस्कार जाहीर नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्देची आई रेखा सहस्त्रबुध्दे यांच्यासह जळगांव जिल्हयातील कोथळी येथील निलेश भील, वर्धा जिल्हयातील सिंदी रेल्वेचा वैभव घंगारे आणि मुंबईतील वाळकेश्वरचा मोहीत दळवी या महाराष्ट्रातील शूर बालकांचा यात समावेश होता. 

             राष्ट्रीय सेवा योजनेच्या(एनएसएस)पथकाच्या राजपथावरील पथसंचलनाचे नेतृत्व करणारा  डॉ.बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या औरंगाबाद येथील शासकीय कला व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख आसीफ ने महाराष्ट्राला नेतृत्वाचा मान मिळवून दिला. महाराष्ट्र व गोव्यातील  स्वयंसेवकासह देशातील 160 सदस्यीय एनएसएस पथकाचे आसीफ ने नेतृत्व केले. ही महाराष्ट्राने सलग तिस-यांदा  मिळवलेली उपलब्धी आहे. याआधी वर्ष 2014 मधे धनजराज मुंडे याने राजपथावर एनएसएस पथकाचे तर धनराज लहाने याने एनसीसी पथकाचे नेतृत्व केले होते. वर्ष 2015 मधे खुशबू जोशी हीने राजपथावर एनएसएस पथकाचे तर अमन जगताप याने एनसीसी पथकाचे नेतृत्व केले होते.

            नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या शालेय मुला-मुलींनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या प्रसिध्द सौंगी मुखवटालोक नृत्याच्या सादरीकरणाला यावेळी उपस्थितांच्या जोरदार टाळयांचा प्रतिसाद मिळाला. पांरपारिक वेशाभुषेतील या मुलींनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. सीमा सुरक्षा दळाच्या बायकर्स आणि वायुदळाच्या चित्तथरारक कसरतीनंतर राष्‍ट्रगीताने राजपथावरील पथसंचलनाची सांगता झाली.   
0000
सूचना- सोबत छायाचित्र जोडले आहेत.


Monday, 25 January 2016

पद्म पुरस्कार जाहीर : महाराष्ट्राला १ पद्म विभूषण, ५ पद्मभूषण तर १० पद्मश्री ;धिरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण


नवी दिल्ली, दि. २५ : केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने सोमवारी वर्ष २०१६च्या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या देशातील ११२ मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांमधे १ पद्म विभूषण, ५ पद्मभूषण तर १० पद्मश्री असे एकूण १६ पद्म पुरस्कार महाराष्ट्रातील मान्यवरांना जाहीर झाले आहेत. देशातील उद्योग व व्यापार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या  धिरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला.

            देशातील प्रतिष्ठीत नागरी पुरस्कार म्हणून गणल्या जाणा-या पद्मपुरस्कारांची यादी आज केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केली. कला, व्यापार,उद्योग, सामाजिक कार्य, सार्वजनिक क्षेत्र, विज्ञान–अभियांत्रिकी, औषध,साहित्य–शिक्षण, क्रीडा, नागरीसेवा इत्यादी क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देणा-या देशातील ११२ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. तीन श्रेणींमध्ये जाहीर झालेल्या या पुरस्कारात १० पद्मविभूषण,१९ पद्मभूषण आणि ८३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महीलांचा तर १० अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. ४ मान्यवरांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.

             प्रजासत्तादिनाच्या पूर्व संध्येला जाहीर  महाराष्ट्रातील पद्मपुरस्कार विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे.                                                    
पुरस्काराचे नांव
पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नांवे
कार्यक्षेत्र



पद्मविभूषण
धिरूभाई अंबानी (मरणोत्तर)
व्यापार आणि उद्योग



पद्मभूषण
अनुपम खैर
कला चित्रपट

उदित नारायण झा
कला- पार्श्व गायन

प्रा.एन.एस.रामानुज टाटाचार्य
साहित्य - शिक्षण

स्वामी तेजोमयानंद
अध्यात्म

हाफिज कॉन्ट्रक्टर
वास्तूशास्त्र



द्मश्री
अजय देवगण
कला चित्रपट

प्रियंका चोपडा
कला चित्रपट

मधुर भांडारकर
कला चित्रपट दिग्दर्शन व निर्मिती

पियुष पांडे
जाहिरात व संवाद

सुभाष पालेकर
शेती

ॲड.उज्वल निकम
सार्वजनिक  क्षेत्र

प्रा.(डॉ.) गणपती दादासाहेब यादव
विज्ञान व अभियांत्रिकी

सुधाकर  ओलवे
समाजसेवा

दिलीप संघवी
व्यापर आणि उद्योग

डॉ.केकी होरमुसजी घरडा
व्यापर आणि उद्योग

                                         0000000