Monday, 25 January 2016

‘पोलीस पदक २०१६’ ची घोषणा : महाराष्ट्राला ५ विरता पदक, ४ राष्ट्रपती पोलीस पदक तर ४१ पोलीस पदक ; सुरज मोहीते यांना मरणोत्तर राष्ट्रपती विरता पदक


नवी दिल्ली, दि. २५ : यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमीत्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देशातील ८४१ पोलीसांना पोलीस पदक जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातून ५ विरता पदक, ४ राष्ट्रपती पोलीस पदक तर ४१ पोलीस पदक विजेत्यांचा यात समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कॉन्सटेबल सुरज मोहीते यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
 
        केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील पोलीसांच्या शौर्यासाठी ३ राष्ट्रपती पुलिस पदक (पीपीएमजी) , १२१ पुलिस पदक (पीएमजी) तर उत्कृष्ट सेवेसाठी ८९ पोलीसांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि  देशातील ६२८ पोलीसांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात महाराष्ट्रातील ५१ जणांचा समावेश  आहे.  

 प्रजासत्तादिनाच्या पूर्व संध्येला जाहीर  महाराष्ट्रातील पोलीस पदक विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे.                                                    
                         राष्ट्रपती उत्कृष्ठ सेवा पोलिस पदक जाहीर पोलीस अधिका-यांची नावे
  1. श्री.अतुलचंद्र मधुकर कुलकर्णी, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे विभाग, पोलिस आयुक्त कार्यालय, मुंबई
  2. श्री.रविंद्र गणेश कदम, विशेष पोलिस महानिरिक्षक, नागपूर विभाग,
  3. श्री. श्रीकांत दत्तात्रय सुर्वे, सहायक  पोलिस आयुक्त कुलाबा विभाग, मुंबई शहर
  4. श्री.नागेश शिवदास लोहार,  सहायक पोलिस आयुक्त , पोलिस आयुक्त कार्यालय, ठाणे शहर
         प्रजास्ताक दिनी शौर्य पदक प्राप्त झालेल्या अधिका-यांची नावे
  1. मनोहर हिरालाल कोरटी, सहायक पोलिस निरीक्षक
  2. चंद्रय्या  मदनय्या गोदारी (1st Bar to PMG)  हेड कॉन्सटेबल
  3. गंगाराम मदनय्या सीदम, (1st Bar to PMG) नाईक
  4. नागेश्वर नारायण कुमारन, नाईक
  5. बापू शितय्या सुरामवर, कॉन्सटेबल
                   पोलीस सेवा पदक प्राप्त पोलीस अधिका-यांची नावे
1.         श्री. विनय महादेव कारगांवकर, विशेष पोलिस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, विक्री कर विभाग, मुंबई,
2.         डॉ. चेरींग दारजे, अतिरिक्त आयुक्त, मुंबई पश्चिम
3.         श्री.संजय वासुदेव जांभुलर,पोलिस उपायुक्त़, सशस्त्र पोलिस, मरोळ, मुंबई
4.        श्री. जानकीराम बंडुजी डाखोरे, कमांडंट, SRPF, GR IX, अमरावती
5.         श्री.प्रकाश प्रभाकराव कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद
6.         श्री. रशीद तुराब तडवी, , सशस्त्र पोलिस निरीक्षक, SRPF GR VI, धुळे
7.        श्री.सुभाष भास्कर दागडखैर, पोलिस निरीक्षक, नायगांव, मुंबई
8.         श्री.सतीश पांडुरंग क्षीरसागर, पोलिस निरीक्षक,  SRPF, GR I मुंबई
9.         श्रीमती सुरेखा प्रताप डुगी, पोलिस निरीक्षक, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई
10.       श्री.शामकांत रामराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, रिडर शाखा, आयुक्त कार्यालय, औरंगाबाद शहर
11.        श्री.विष्णु त्र्यंबकराव बडे, पोलिस उपनिरीक्षक, गुप्तचर विशेष शाखा, मुंबई शहर
12.       श्री.हनुमंत भानुदास सुगांवकर, पोलिस उपनिरीक्षक, बन गार्डन, पोलिस स्टेशन, पुणे शहर
13.       श्री.सखाराम दत्तु रेडेकर, पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे अन्वेषण़, गुप्तचर विभाग, मुंबई
14.      श्री. राजन दत्तात्रेय मांजरेकर, पोलिस उपनिरीक्षक, वाहतुक प्रतिबंध शाखा, मुंबई शहर
15.       श्री. एकनाथ विष्णु केसरकर, पोलिस उपनिरीक्षक, टिळक नगर पोलिस स्टेशन, मुंबई शहर
16.       श्री.बाळासोहब श्रीपती देसाई, पोलिस उपनिरीक्षक, कुर्ला पोलिस स्टेशन, मुंबई शहर
17.       श्री.चंद्रकांत पर्बती पवार, पोलिस उपनिरीक्षक, बोरीवली पोलिस स्टेशन, मुंबई शहर
18.       श्री.राजेंद्र सुधाकर झेंडे, वरीष्ठ  गुप्तचर यंत्रणा अधिकारी
19.       श्री.राजेंद्र पुंडलिकराव होटे, पोलिस उपनिरीक्षक, मंगळूर पोलिस स्टेशन, अमरावती ग्रामीण.
20.       श्री. भास्कर रामराव वानखेडे, सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, नागपूर शहर
21.       श्री. भागवत किससराव तपसे, सहायक उपनिरीक्षक, एम.टी.विभाग, बीड
22.       श्री.वसंत राजाराम सारंग , सहायक उपनिरीक्षक, नागपाडा पोलिस स्टेशन , मुंबई शहर
23.       श्री. लियाकत अली मोहम्म्द अली खान, सहायक उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, भंडारा,
24.      श्री. सुभाष पिलोबा रनवरे, सशस्त्र सहायक उपनिरीक्षक, SRPF, GR II, पुणे
25.      श्री. दिलीप शिवराम भगत, सहायक उपनिरीक्षक, गुप्तचर विभाग, उस्मानाबाद
26.       श्री.शामवेल सदानंद उजागरे, सशस्त्र सहायक उपनिरीक्षक, SRPF, GRV, दौंड
27.      श्री. अरुण यशवंत बुधकर, सहायक उपनिरीक्षक, पिंपरी पोलिस स्टेशन, पुणे शहर
28.      श्री. अरुण वामनराव पाटील, सहायक उपनिरीक्षक, बी.डी.डी.एस, जळगांव,
29.       श्री. मोतीलाल दगडु पाटील, सहायक उपनिरीक्षक, गुप्तचर विभाग, ठाणे शहर
30.       श्री. भारतीनाथ दामु सोनवणे, सशस्त्र सहायक उपनिरीक्षक, SRPF, GR I, पुणे.
31.       श्री. मधुकर अर्जुन भागवत, सशस्त्र सहायक उपनिरीक्षक, SRPF, GRV, दौंड
32.       श्री सतीश रंगनाथ जामदार, सहायक उपनिरीक्षक, SRPF, GR V, दौंड
33.       श्री. हिम्मत लक्ष्मण जाधव, सशस्त्र सहायक उपनिरीक्षक, SRPF, GR VII, दौंड
34.      श्री.राजेंद्र शरद पोहरे, सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर.
35.श्री.प्रकाश लक्ष्मण ब्रम्हा, बिनतारी संदेश, हेड कॉन्सटेबल, अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालय, पुणे
36.       श्री.संभाजी खंडू पाटील, सशस्त्र हेड कॉन्सटेबल, SRPF, GR II, पुणे.
37.      श्री.प्रदिप गजानन कडवाडकर, हेड कॉन्सटेबल, सशस्त्र पोलिस, वरळी, मुंबई शहर
38.श्री.बबन विठ्ठल अढारी, बिनतारी संदेश, हेड कॉन्सटेबल अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालय, पुणे
39.श्री.विठ्ठल यशवंत पाटील, बिनतारी संदेश, हेड कॉन्सटेबल अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालय, पुणे

40.      श्री.अशोक मधुकर रोकडे, हेड कॉन्सटेबल, ए.टी.एस, मुंबई .
41.      श्री.तुकाराम दत्तू बनगर, हेड कॉन्सटेबल, कपूरबवेदी , पोलिस स्टेशन, ठाणे शहर. 
           याशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कॉन्सटेबल सुरज मोहीते यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. 
                                                           ०००००००



महाराष्ट्रातील दोघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर



                                                                           

नवी दिल्ली, दि. २५ : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील ५० व्यक्तींना  आज ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झालेत. यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अनुमतीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार २०१५’ आज जाहीर करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्रातून सतीश वैजनाथराव आणि  अक्षय आनंद तांबे यांचा जीवन रक्षा पदक पुरस्कार विजेत्यांच्या यादीत समावेश आहे. 

देशातील ५० नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात ३ ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’, ९ ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ आणि ३८ ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ आहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर  काही कालावधीने देशातील संबंधीत राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
                                                                     0000




राष्ट्रपतींच्या हस्ते शिरीष मोहोड व शेखर चन्ने यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान




नवी दिल्ली, दि. २५ : महाराष्ट्राच्या स्वीप कार्यक्रमाचे समन्वयक तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड  आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते सोमवारी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

        केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील मानेकशा सेंटरच्या झोरवार सभागृहात आयोजित ‘६ व्या राष्ट्रीय निवडणूक मतदातादिनाच्या’ कार्यक्रमात निवडणूक पध्दतीच्या उत्तम अंमलबाजवणीसाठी विविध राज्यांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी, निवडणूक आयुक्त द्वय ए.के.जोती आणि ओमप्रकाश रावत मंचावर उपस्थित होते.  

 मतदान व्यवस्थापनाअंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वीप’ कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने २००९ पासून देशातील विविध राज्यात ‘मतदारांना साक्षरकरून त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी करण्याचा कार्यक्रम’(स्वीप) राबविण्यात येत आहे. श्री. मोहोड आणि श्री. चन्ने  यांनी या कार्यक्रमाच्या तिस-या टप्प्यात वर्ष २०१५ मधे महाराष्ट्रात उत्तम प्रकारे अमंलबजावणी केली आहे. त्यांनी ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसायातील व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविला आहे.या कार्यक्रमात महाराष्ट्राशिवाय बिहार, झारखंड, दिल्ली व पश्चिम बंगाल या राज्यांच्या प्रतिनिधींनाही विविध श्रेणींमधे पुरस्कार प्रदान करण्यात आला.                                                                

                                                                     ०००००   

Sunday, 24 January 2016

नागपूर शहराच्या विकासासाठी फ्रांससोबत महाराष्ट्राचा करार






चंदीगढ, दि.24 : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत नागपूर शहराचा विकास करण्यासाठी फ्रांसीसी विकास संस्था (एएफडी) आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सीस्को हॉलंड यांच्या उपस्थितीत रविवारी महत्वपूर्ण करार झाला.  

            फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीला आजपासून सुरुवात झाली असून उभय देशांदरम्यान व्यापाराला चालना देण्यासाठी चंदीगढ शहरात आज भारत-फ्रांस व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत महाराष्ट्र आणि फ्रांसीसी विकास संस्थे दरम्यान  द्विपक्षीय करार झाला. महाराष्ट्रासोबतच पॉण्डेचेरी आणि चंदीगढ शहराच्या विकासासाठीही असा करार करण्यात आला.

            या करारानुसार नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वास्तू शिल्प व वारसा क्षेत्राचा विकास, नवीन व नवीकरणीय उर्जाक्षेत्र विकास आदी क्षेत्रांमधे फ्रांस तांत्रिक मदत देणार आहे. फ्रांसमधून याकामासाठी येणा-या तंत्रज्ञ व तज्ज्ञांचा सर्व खर्च फ्रांसीसी विकास संस्था उचलणार आहे.                                 
                                       पंतप्रधानांनी मानले आभार 

भारत-फ्रांस व्यापार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आधुनिक शहर निर्माण करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती दिली. तसेच, नागपूरसह देशातील तीन शहरांमधे स्मार्टसिटी निर्माण करण्यासाठी फ्रांसने घेतलेल्या पुढाकाराबाबत आणि आज उभय देशांमधे याबाबत झालेल्या द्वीपक्षीय कराराबाबत फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले. या परिषदेत भारत व फ्रांसच्या कंपन्यांमधे एकूण १६ करार झाले.
                                 ००००००

पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील चौघांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान ; नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्देला मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’






नवी दिल्ली, दि.24 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महाराष्ट्रातील 4 शूर बालकांसह देशातील 25 बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानीत केले.

            पंतप्रधानांच्या 7, रेस कोर्स या निवासस्थानी आयोजित शानदार कार्यक्रमात आज 3 मुली आणि 22 मुलं अशा एकूण 25 बालकांना ‘वर्ष 2015’ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण करण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिध्दार्थ यावेळी उपस्थित होत्या.

            याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित बालकांना संबोधित केले. ते म्हणाले, पुरस्कार प्राप्त बालकांच्या प्रसंगावधान व साहसामुळे इतरांचे प्राण वाचले. त्यांच्या या साहसाचे कौतुकच आहे. यशाने हुरळून न  जाता आपला विकास करून देशाच्या विकासात सहभागी होण्याचे आणि साहस हा आपला स्वभाव भाव बनविण्याचे आवाहन  त्यांनी,  उपस्थित बालकांसह देशातील बालकांना केले. मनेका गांधी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 शौर्य पुरस्कारामधील सर्वोच्च गणला जाणारा “भारत पुरस्कार” नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्दे याला मरणोत्तर जाहीर होता. गौरवची आई रेखा आणि वडील कवळू सहस्त्रबुध्दे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जळगांव जिल्हयातील कोथळीच्या निलेश भील, वर्धा जिल्हयातील सिंदी रेल्वेच्या वैभव घंगारे आणि मुंबईतील वाळकेश्वरच्या मोहीत दळवी यालाही राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

            नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्दे याने अंबाझरी तलावात बुडणा-या 4 मुलांचा प्राण वाचविला, त्यात गौरवला आपले प्राण गमवावे लागले. गौरवच्या या साहसी कर्तृत्वासाठी त्याला मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’  जाहीर झाला होता.  
            जळगांव जिल्हयातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात राहणा-या निलेश रेवाराम  भिल  याने कोथळी येथे संत मुक्ताईच्या दर्शनासाठी आलेल्या 11 वर्षांच्या मुलाला मंदिरा समोरच्या घाटावर बुडताना वाचविले.  निलेश भील हा कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिकत आहे.      

            वर्धा येथील सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथील सहावीत शिकणा-या  वैभव घंगारे हा नंदी नदी किनारी मित्रांसोबत खेळत असताना अचानक नदीला पूर आला. नदीतील पाण्याच्या प्रवाहासोबत वैभवचा मित्र सुहास बोरकर वाहून गेला. वैभवने जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली व मित्राचे प्राण वाचविले.   

            मुंबईतील वाळकेश्वर भागात आत्याकडे राहणा-या  मोहीत ने परिसरातील तलावात स्नान करताना  बुडत असलेल्या मुलीचे प्राण वाचवले. तलावात आंघोळीसाठी गेलेली मुलगी तलावात बुडत होती तिने आपल्या मैत्रीनीला हात दिला पण तिला पोहता येत नसल्याने मैत्रीनेही हात न दिल्याचे चित्र मोहीत ने पाहिले. तोच त्याने 25 फुट खोल तलावात उडी घेऊन  मुलीचे प्राण वाचविले व तिला नजीकच्या इस्पितळात भरती केले. मोहीत वाळकेश्वर येथील  महानगर पालीकेच्या बालगंगा कवळेमठ शाळेत आठवीत शिकत आहे. 

            प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणा-या पथसंचलनात ही बालके सहभागी होणार आहेत. पुरस्कार प्राप्त बालकांनी याआधी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राज्यपाल नजीब जंग यांची  भेट घेतली आहे .

भारत देशाच्या विविध भागातील अतुल्य शौर्य दाखविणा-या ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आधी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रीकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते 

         00000

Friday, 22 January 2016

राजधानीत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी



नवी दिल्ली, 23 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली. 

            कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त अजीतसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिक्षक भागवंती मेश्राम यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
  महाराष्ट्र परिचय केंद्रात सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. उपसंपादक रितेश भुयार यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. उपस्थित कर्मचा-यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.   
                                                                     00000 

Tuesday, 19 January 2016

शिरीष मोहोड यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा पुरस्कार

             

नवी दिल्ली, दि. 19 : मतदान व्यवस्थापनाअंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वीप’ कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या स्वीप कार्यक्रमाचे समन्वयक तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा विशेष प्राविण्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
        केंद्रीय  निवडणूक आयोगाच्यावतीने २००९ पासून देशातील विविध राज्यात ‘मतदारांना साक्षरकरून त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी करण्याचा कार्यक्रम’(‘स्वीप’) राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या तिस-या टप्प्यात वर्ष २०१५ मधे महाराष्ट्रात उत्तम प्रकारे अमंलबजावणी करण्यासाठी श्री. मोहोड हा पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते २५ जानेवारी रोजी  येथील दिल्ली कॅण्टच्या मानेकशॉ सेंटर मधे  पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
            ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसायातील व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यात शिरीष मोहोड यांनी उत्तम कामगिरी केली आहे. राज्यात २०१४ मधे तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसायातील २०० व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीकृत होते. वर्ष २०१५ मधे शिरीष मोहोड यांच्या प्रयत्नांनी ही संख्या पाचपटीने वाढून १,०१८ झाली. श्री. मोहोड यांनी राज्यातील अशासकीय संस्थांच्या मदतीने तसेच तृतीय पंथींयांसाठी कार्यकरणा-या श्रीमती लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या सहकार्याने हा सकारात्मक बदल घडवून आणला. त्यांच्या या उल्लेखनीय कामासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राशिवाय बिहार, झारखंड, दिल्ली व पश्चिम बंगालला विविध श्रेणींमधे पुरस्कार जाहीर झाले 

Monday, 18 January 2016

महाराष्ट्र के चार बालकों को राष्ट्रीय वीरता पुरस्कार- नागपुर के गौरव सहस्त्रबुध्दे को मरणोपरांत ‘भारत पुरस्कार’



नई दिल्ली, १8 :  राष्ट्रीय वीरता पुरस्कार की घोषणा आज कि गई. देभभर के 25 बालकों को वीरता पुरस्कार से सन्मानित किया जायेंगा. इनमें महाराष्ट्र के 4 बालकों का समावेश है. भारतीय बालकल्याण परिषद की अध्यक्षा गीता सिध्दार्थ ने पत्रकार परिषद मे यह जानकारी आज दि.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों 24 जनवरी को सेव्हन रेसकोर्स उनके निवास स्थान पर यह पुरस्कार प्रदान किये जायेंगे. वीरता पुरस्कार में सर्वोच्च ‘भारत पुरस्कार’ नागपूर के गौरव सहस्त्रबुध्दे को मरणोपंरात घोषित किया गया. जलगांव जिले के कोथली के निलेश भील, वर्धा के वैभव घंगारे, एवं मुंबई (वालकेश्वर) के मोहीत दलवी को वीरता पुरस्कार  के लिए चुना गया. देशभर के कुल 25 बालकों को वर्ष 2015 का राष्ट्रीय वीरता़  पुरस्कार प्रदान किया जायेंगा. इनमें 3 लड़कीया तथा 22 लड़के शामील है. पुरस्कार का स्वरूप  पदक, प्रमाणपत्र, नगद रकम है.
इन पुरस्कारों मे सर्वोच्च ‘भारत पुरस्कार’नागपुर के गौरव कवडूजी  सहस्त्रबुद्धे को मरणोपरांत प्रदान किया जायेंगा. नागपुर के गौरव सहस्त्रबुध्दे 3 जून 2014 को अपने चार दोस्तो के साथ अंबाझरी झील के पास खेल रहे थे. अचानक उनमें से एक का पैर फिसला और वह झील मे डूबने लगा.  यह देख, उसके मित्र उसे बचाने के लिए पानी में कूद पड़े परन्तु वे भी डूबने लगे. उसी समय गौरव सहस्त्रबुद्धे वहाँ पहुँचा. लड़को को डूबता देख उसने तुरन्त पानी में  छलाँग लगा दी, और एक-एक कर उन्हे बाहर निकालने लाग.  परंतु चौथे लड़के को बाहर निकालते वक्त वह काफी थक चुका था. अत: वह स्वंय झील में डूबने लाग. चारों लड़के मदद के लिए चीख पुकार करने लगे वहाँ किसी को न पाकर वे पास से मछुआरों को बुलाया बाद में गौरव का मृत शरीर निकाला गया. गौरव ने अदभुत साहस का परिचय देते हुए चार बहुमूल्य जीवन बचाने की खातिर अपने प्राणों की आहूति दि. उसके इसी साहसिक कार्य के लिए मरणोपरांत गौरव को ‘भारत पुरस्कार’ घोषित किया गया है. यह पुरस्कार उनकी माँ स्वीकारेगी.
जलगांव के निलेश रेवाराम भिल 30 अगस्त 2014 को ऋषिपंचमी के अवसर पर अपने मामा के साथ मुक्ताई मंदिर गया था. मंदिर में दर्शन के बाद, वह  पेड़ के नीचे बैठकर भोजन कर रहा था. अचानक निलेश को कुछ चीख की आवाज सुनाई दी. उसने देखा कि एक लड़का पानी में डूब रहा था. वह तुरंत ही नदी में कूदा और उस लड़के को बचा लिया. उसके  साहसिक कृत्य के लिए एसे वीरता पुरस्कार प्रदान किया जायेंगा.
वर्धा जिले के सेलू तहसील के वैभव रामेश्वर घंगारे ने 26 जुलाई 2014 को नंदा नदी में गिरे सुहास  नामक बच्चे को बचाया. सुहास दूसरे बच्चों के साथ खेलते खेलते अचानक नंदा नदी में गिर गया. नदी में बाढ़ आई हुई थी  नदी के बहाव के साथ, वह पुल के नीचे एक सीमेंट के पाईप में जाकर फँस गया. वैभव तुरतं ही नदी में कूद पड़ा सीमेंट पाइप से सुहास को बाहर धकेलते हुए, वैभव ने उसे सुरक्षित नदी के किनारे ले आया. वैभव घंगारे के शौर्यपूर्ण और सामयिक कृत्य ने डूबते हुए बच्चे के प्राण बचा लियें, उसके इसी साहस के लिए वैभव को पुरस्कृत किया जायेंगा.

मुंबई (वालकेश्वर) के मोहित महेंद्र दलवी ने कृष्णा नामक लड़की के प्राण बचायें जो  गर्मी के छुट्टीयों में अपने मामा के घर आई थी. 25 अप्रैल 2015 को घर के सामने के तालाब में कृष्णा नहा रही थी.  पानी का स्तर बहुत ज्यादा था और कृष्णा को तैरना नही आता था. उसने अपने सहेली का हाथ पकड़ लिया उसे भी तैरना नही आता था.  मोहित ने तुरंत तालाब में छलांग लगा दी और कृष्णा को सुरक्षित पानी से बाहर निकाला. मोहित दलवी के असाधारण शौर्य से एक बहुमूल्य जीवन बचा. इसी साहस के लिए महेंद्र को वीरता पुरस्कार दिया जायेंगा

महाराष्ट्रातील चौघांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार - नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्देला मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’

                

नवी दिल्ली, दि.18 : राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. देशातील २५ बालकांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील ४ बालकांचा समावेश आहे.भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिध्दार्थ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ जानेवारी रोजी या बालकांना गौरविण्यात येणार आहे. शौर्य पुरस्कारामधील सर्वोच्च गणला जाणारा “भारत पुरस्कार” नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्दे याला मरणोत्तर जाहीर झाला आहे. जळगाव जिल्हयातील कोथळीच्या निलेश भील, वर्धा जिल्हयातील सिंदी रेल्वेच्या वैभव घंगारे आणि मुंबईतील वाळकेश्वरच्या मोहीत दळवी ला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

            नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्दे याने अंबाझरी तलावात बुडणा-या ४ मुलांचा प्राण वाचविला, त्यात गौरवला आपले प्राण गमवावे लागले. दहावीत शिकणारा गौरव ३ जून २०१४ ला आपल्या ४ मित्रांसह अंबाझरी तलावजवळ खेळत असताना अचानक त्याचे मित्र पाण्यात बुडत असल्याचे त्याने पाहीले. प्राणाची पर्वा न करता त्याने आपल्या तीन मित्रांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आणि चौथ्या मित्राला  सुखरूप बाहेर काढत असतानाच गौरव पाण्यात बुडाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. गौरवच्या या साहसी कर्तृत्वासाठी त्याला ‘भारत पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.  गौरवची आई रेखा कवडूजी सहस्त्रबुध्दे हा पुरस्कार स्वीकारणार आहे.

            जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात राहणा-या निलेश रेवाराम  भिल याला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ३० ऑगस्ट २०१४ ला ऋषिपंचमीच्या दिवशी बुलढाणा येथील ओंकार उगले हे कुटूंबियांसह कोथळी येथे संत मुक्ताईच्या दर्शनासाठी आले असता भागवत उगले हा ११ वर्षांचा मुलगा मंदिरा समोरच्या घाटावर पाय धुण्यासाठी गेला असता पाण्यात पडला.हे चित्र मंदिरात दर्शनासाठी आलेल्या निलेश भिलच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेऊन ओंकार उगलेचे प्राण वाचविले.  निलेश भील हा कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेत ५ वीत शिकत आहे.    
  
            वर्धा येथील सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथील सहावीत शिकणा-या  वैभव रामेश्वर घंगारे ला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. वैभव हा  २६ जुलै २०१४ ला गावातील नंदी नदी किनारी मित्रांसोबत खेळत असताना अचानक नदीला पूर आला. नदीतील पाण्याच्या प्रवाहासोबत वैभवचा मित्र सुहास बोरकर वाहून गेला. तो पुढे एका पुलाखालील सिमेंटच्या पाईपजवळ अडकला. तिथे उभ्या असणा-या लोकांपैकी सुहासच्या मदतीला कोणीच धजावले नाही मात्र वैभवने जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली व मित्राचे प्राण वाचविले. 
  
            मुंबईतील वाळकेश्वर भागात आत्याकडे  राहणा-या  मोहीत ने परिसरातील तलावात स्नान करताना  बुडत असलेल्या मुलीचे प्राण वाचवले. २५ एप्रिल २०१५ ला  आपल्या मामाकडे दिवाळीच्या सुटीत आलेली मुलगी तलावात आंघोळीसाठी गेली असता तलावात डुबत होती तीने आपल्या मैत्रीनीला हात दिला पण तीला पोहता येत नसल्याने मैत्रीनेही हात न दिल्याचे चित्र मोहीत ने पाहिले. तोच त्याने २५ फुट खोल तलावात उडी घेऊन  मुलीचे प्राण वाचविले व तिला नजीकच्या इस्पितळात भरती केले. मोहीतच्या आई वडीलांचे निधन झाले असून तो आत्याकडे राहणारा मोहीत वाळकेश्वर येथील  महानगर पालीकेच्या बालगंगा कवळेमठ शाळेत आठवीत शिकत आहे.  

३ मुली आणि २२ मुलं अशा एकूण २५ बालकांना  वर्ष २०१५ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रीकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते 

         00000

Sunday, 17 January 2016

दिल्ली हाट में ‘महा-मेले’ का शानदार उदघाटन



नई दिल्ली, १७ :  आयएनए स्थित दिल्ली हाट में महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक निदेशालय की सचिव श्रीमती वल्सा आर. नायर सिंह के हाथों, मराठी संस्कृति के विभिन्न प्रस्तुतीयों के साथ रविवार को ‘महा-मेले’ का उदघाटन हुआ. 
  
महाराष्ट्र की हस्तकला प्रदर्शन तथा बिक्री, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलाओं की प्रस्तुती के साथ कई कार्यक्रमों का आनंद दिल्लीवालों सहीत देश-विदेश के पर्यटकों को हो, इस हेतुसे 17 से 31  जनवरी तक महाराष्ट्र की वैभवशाली संस्कृती की पहचान देश की राजधानी में यह आयोजन किया गया है. आज उदघाटन हुए इस महा मेले में  महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक निदेशक अजय अंबेकर इस अवसर पर उपस्थित थे. महाराष्ट्र सरकार की ओर से पहली बार दिल्ली में महाराष्ट्र राज्य की हस्तकला, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला का दर्शन एक साथ एक जगह आयोजित कि जा गया है. प्रख्यात कला निर्देशक नितीन देसाई ने इस परिसर को सजायां है .

इस महोत्सव का मुख्य उद्देश  महाराष्ट्र कला का दर्शन प्रदर्शित करना है. हस्तकला का प्रदर्शन, बिक्री करने के साथ ही राज्य के पर्यटन की जानकारी देना भी है. ‘महा-मेले’ का़ आयोजन महाराष्ट्र सरकार के सांस्कृतिक कार्य निदेशालय ने महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महानिगम, महाराष्ट्र पर्यटन विकास महानिगम, महाराष्ट्र सिनेमा रंगभूमी तथा सांस्कृतिक विकास महानिगम के तथा राज्य सरकार के अन्य विभागों के सहयोग से किया है.
महा-जत्रा (मेले) में महाराष्ट्र सांस्कृतिक जीवन की पहचान सभी लोगों को हो इसके मद्देनजर कार्यशालाओं  का आयोजन यहा किया गिया है. महाराष्ट्र  की पारंपारिक वारली चित्रकला, महारष्ट्र की प्रसिद्ध रंगोली, आदिवासी मुखबीरे बनाना, मिट्टी के किले बनाना, महाराष्ट्र की साडी (नऊवारी) पहनना, ऐसे अनेक विषयोंपर कार्यशालाओं का आयोजन दिल्ली हाट में प्रथमत: हो रहा है. इसके साथ लघु उद्योग, स्वयं सहायता समुह, रेशम उद्योग, हथकरगा वस्त्रों के स्टॉल्स, पर्यटन सूचना स्टॉल्स को यहाँ प्रदर्शित कीया गया है.

महाराष्ट्र की समृद्ध लोककला की हररोज नई-नई की प्रस्तुती भी यहाँ पेश कि जायेंगी जिसका आनंद पर्यटक उठा सकते है.

इस महोत्सव में एक और विशेष प्रदर्शन  प्रदर्शित किया गया है. जिसके तहत राष्ट्रीय स्तर पर महत्व की ऐतिहासिक व सामाजिक घटना जिसमें महाराष्ट्र की सहभागीता से संबंधित दुर्लभ कागजातों का प्रदर्शन शामील है. साथ ही राज्य सरकारने प्रकाशित कि हिंदी व अंग्रजी पुस्तकों की बिक्री, महाराष्ट्र के ऐतिहासिक विरासत का कथन करने वाले वस्तुकों का प्रदर्शन भी महोत्सव में  है.
                                 महाराष्ट्र सूचना केंद्र की और से प्रदर्शनी
महाराष्ट्र सकार ने अपने एक साल के कार्यकाल में लिए जनहित के निर्णय तथा विभिन्न जनहितों के कार्यक्रमों का किया सफल क्रियान्वय दर्शाना वाले प्रदर्शन का आयोजन महाराष्ट्र सूचना केंद्र दिल्ली की और से इस मेले में किया गया.


000000